Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

शहरात चोरट्यांचा धुमाकूळ

$
0
0
शहरात घरफोड्या करणाऱ्या तसेच हातोहात रोकड लांबविणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. शहरात घरफोडीच्या घटनांचा आलेख उंचावत असून, अशा घटना रोखणे पोलिसांपुढेही आव्हान ठरू लागल्या आहेत.

शहरात वृद्धासह तिघांची आत्महत्या

$
0
0
शहरात गेल्या दोन दिवसांत तिघांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. तीनही वेगवेगळ्या घटनांमध्ये वृध्द , विवाहीता तसेच एका मुलाचा समावेश आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. पाथर्डी फाट्याजवळील हनुमाननगरात राहाणाऱ्या सागर गुलाब मरसाणे (१६) याने घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

YCMOU पदवीदान समारंभाला अखेर मुहूर्त

$
0
0
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त व‌िद्यापीठाचा २० वा पदवीदान समारंभ येत्या १५ मार्च रोजी आयोज‌ित करण्यात आला आहे. या सोहळ्यात नोव्हेंबर २०१२ आण‌ि मे २०१३ या शैक्षण‌िक वर्षातील सुमारे सव्वा लाख व‌िद्यार्थ्यांना पदवी आण‌ि पदव‌िका देवून गौरव‌िण्यात येणार आहे.

केंद्राची मॅट्र‌िकपूर्व श‌िष्यवृत्ती योजनाही ऑनलाइन

$
0
0
अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने नववी आण‌ि दहावीत श‌िक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केंद्राप्रमाणेच राज्य सरकारने मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना राबव‌िण्याचा न‌िर्णय घेतला होता. ही योजना आता ऑनलाइन करण्यात आली आहे.

दीड कोटींचीच झाली सफाई

$
0
0
शहरातील सर्वांत मोठा म्हणून गणल्या जाणाऱ्या जुने नाशिक येथील कत्तलखान्यातील ईटीपी (इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट) मागील दोन वर्षांपासून ठेकेदार आणि महापालिकेच्या वादामुळे सुरू होऊ शकलेला नाही.

सत्ताधाऱ्यांचे रिलायन्स ‘कनेक्शन’

$
0
0
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन सत्ताधारी गटाकडून नाशिककरांच्या डोळ्यात निव्वळ धूळफेक केली जात आहे. गोदापार्कच्या माध्यमातून हे काम केले जात असून फोरजीच्या रिलायन्स कनेक्शनमधून उखळ पांढरे करण्याचा प्रकार सुरू आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांनी केला.

काँग्रेस म्हणजे देशाला झालेला कॅन्सर

$
0
0
'देशाच्या सद्यस्थितीला काँग्रेस पक्षच जबाबदार असून ज्याप्रमाणे शरीरातील एखाद्या अवयवाला कॅन्सर झाल्यास तो काढून टाकला जातो, त्याचप्रमाणे काँग्रेसला देशातून उखडून टाका,' असे आवाहन भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केले.

गोदापार्क राज्यासाठी आदर्श ठरेल

$
0
0
गोदापार्क हा माझा प्रायव्हेट प्रोजेक्ट नसून तो नाशिककरांसाठी आहे. हा प्रकल्प अशा पद्धतीने उभारा की, तो राज्यासाठी आदर्श ठरावा, असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले. शनिवारी गोदापार्क नूतनीकरणाच्या भूमिपूजनप्रसंगी राज यांच्यासह भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी उपस्थित होते.

राज-गडकरी मैत्रीपार्क

$
0
0
​भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना वेळोवेळी टोले लगावणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर भाजपचे अनेक नेते नाराज असताना भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी व राज यांनी शनिवारी येथील एका कार्यक्रमात परस्परांवर स्तुतिसुमनांचा वर्षाव करून पुढील काही दिवसांच्या चर्चेची बेगमी करून ठेवली.

डॉ. पी. बी. पाटील यांचे निधन

$
0
0
महाराष्ट्रातील थोर विचारवंत शिक्षणतज्ञ, पंचायत राज व्यवस्थेचे प्रणेते आणि नवेगाव आंदोलनाचे प्रणेते प्रा. डॉ. पी. बी. पाटील यांचे आज, रविवारी सांगली येथे निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. डॉ. पाटील गेली दोन वर्ष कर्करोगाने आजारी होते.

रस्ता रुंदीकरणाला विजेच्या खांबांचा अडथळा

$
0
0
आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात सर्वच प्रमुख्य रस्त्यांचे भूमिपूजन झाले आहे. काही भागांत रुंदीकरणाचे काम सुरुही झाले आहे. मात्र, तेथे महापालिकेच्या वीज खांबाचाच अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे रस्त्यांची कामे रखडली असल्याचेही दिसून येत आहे.

वाढीव बांधकामांतून बुडतोय कोट्यवधींचा महसूल

$
0
0
वेगाने वाढणारे नाशिक शहर व परिसरात अतिक्रमणांबरोबरच अनधिकृत बांधकामांचे इमलेच्या इमले बांधले जात आहे. या बांधकांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आहेच, त्याशिवाय यातून महापालिकेचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडतो आहे.

मॅनेजरच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता

$
0
0
भुसावळ विभागाचे रेल्वे मॅनेजर महेशकुमार गुप्ता यांनी नाशिकरोड रेल्वे स्टेशनला नुकतीच भेट दिली. स्टेशनच्या आवारात वाहनांचे पार्किंग होऊ न देण्याबाबत त्यांनी सूचना केल्या. साहेबांचा आदेश नेहमीचाच झाल्याने त्यांच्या आदेशाला रेल्वे प्रशासनानेही वाटाण्याच्या अक्षता लावल्या. रविवारी पार्किंगची परिस्थिती पुन्हा जैसे थे होती.

सिडकोत वाहतुकीचा बोजवारा

$
0
0
सिडकोमधील वाहतुकीच्या नियोजनाकडे पोलिस व प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे सिडकोमध्ये वाहतुकीचा बोजवारा उडाला असून छोट्या मोठ्या-अपघातांमध्ये वाढ होत आहे. वर्षानुवर्षे रस्त्यांचे रुंदीकरणही न झाल्याने वाहतूक कोंडीतून सुटका होणार तरी कधी? असा प्रश उप‌स्थित होत आहे.

पहिल्या पायरीवरच घ्या सप्तशृंगीचे दर्शन

$
0
0
सन २००८ मध्ये सप्तशृंग गडावर दरड कोसळून मोठी वित्तहानी झाली होती. त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे २५ फेबुवारी ते ७ मार्च या काळात भाविकांना मंदिरात प्रवेशास मनाई करण्यात आली आहे.

रेल्वे स्टेशनवर पाणीटंचाई

$
0
0
अद्याप उन्हाळा सुरू झालेला नसतानाही नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक दोन आणि तीनवर असलेल्या नळांना पाणीच येत नसल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. रेल्वे स्टेशनवर प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या पिण्याच्या पाण्यासारख्या मुलभूत सुविधांचा अभाव आहे.

गल्फ सुपरक्रॉस

$
0
0
स्पोर्टसक्राफ्ट व नाशिक ऑटोमोटिव्ह स्पोर्टस असोसिएशनव्दारा आयोजित ‘गल्फ सुपरक्रॉस’मध्ये रविवारी कुटेज सुपरक्रॉस ट्रॅकवर मोटरसायकल रेसिंगच्या साहसी कृत्यांनी नाशिककरांची मने जिंकली.

दोलायमान तरुणाई

$
0
0
नाश‌िक शहराची एक वेगळी सांस्कृतीक ओळख आहे. गंगेवरच्या यशवंतराव महाराज पटांगणावरील वसंत व्याख्यानमाला प.सा.नाट्यगृहात होणारे प्राचार्य श‌िवाजीराव भोसलेंसारख्या वक्त्याचे व्याख्यान यासाठी तुडूंब गर्दी व्हायची.

श्रोत्यांची कुजबूज

$
0
0
आजचे जग केवळ सादरीकरणाचे आहे. तुमच्याजवळ असणाऱ्या दर्जापेक्षा नसणाऱ्या गोष्टींच्या दर्जेदार सादरीकरणाला व‌िशेष महत्त्व अल‌िकडे आले आहे. यामुळेच पुरस्कार उदंड जाहले, असे म्हणण्याची वेळ येते.

पोषणकर्त्यांवरच गुन्हा दाखल

$
0
0
पाटबंधारे विभागाअंतर्गत झालेल्या पाटचाऱ्यांच्या कामाची चौकशी व्हावी, या मागणीसाठी कजगाव येथील वृद्ध शेतकरी प्रल्हाद शंकर पाटील यांनी १५ फेब्रुवारीपासून भडगाव तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images