Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

रेणुने घेतला कीर्तनातून प्रबोधनाचा वसा

$
0
0
तरुण वर्गात वाढलेली व्यसनधीनता, अनैतिकता व गुन्हेगारी वृत्ती या विषयावर कीर्तनातून प्रबोधन करुन मुक्तीच्या चार गोष्टी सांगण्याचा वसा युवा कीर्तनकार रेणू रामदासी हिने वसा घेतला आहे. नाशिकच्या एन. बी. टी. लॉ. कॉलेजमध्ये कायद्याचा अभ्यास करून वकिली शिकतेय तर दुसरीकडे नववारी साडी नेसून हातात झांजा घेवून महाराष्ट्रात सर्वत्र कीर्तन करत रेणू गावोगावी हिंडतेय.

‘झूम’ची बैठक थेट जूनमध्ये?

$
0
0
औद्योगिक समस्यांसंदर्भात होणारी जिल्हा उद्योग मित्रची (झूम) बैठक प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे आणि आगामी आचारसंहितेच्या कारणामुळे थेट जूनमध्येच होण्याची चिन्हे आहेत. परिणामी, तब्बल सहा महिन्यांच्या कालावधीनंतर औद्योगिक समस्यांसाठी व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

गोदाघाटाचे काम रखडण्याची चिन्हे

$
0
0
पुढील वर्षी होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक आणि त्र्यंबकच्या गोदाघाटाचे काम करण्यासाठी पाटबंधारे विभागाने गुडघ्याला बाशिंग बांधले असले तरी हे काम रखडण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे आगामी सिंहस्थापर्यंत ते पूर्ण होणार की नाही याबाबत साशंकताच आहे.

जिल्ह्यातील गॅस एजन्सींचा उद्यापासून संप?

$
0
0
घरगुती गॅसचा पुरवठा करणाऱ्या जिल्ह्यातील गॅस एजन्सी येत्या मंगळवारपासून संप पुकारण्याची शक्यता आहे. यासंबंधीचा निर्णय सोमवारच्या बैठकीत होणार असून या संपाचा जिल्ह्यातील साडेदहा लाख ग्राहकांना फटका बसण्याची चिन्हे आहेत.

३ घरफोड्यांत २.५ लाखांचा ऐवज लंपास

$
0
0
शहरात तीन ठिकाणी झालेल्या घरफोड्यांमध्ये दागिने, रोख रक्कम आणि किमती वस्तू असा सुमारे अडीच लाखांचा ऐवज चोरीस गेला. म्हसरूळ परिसरात राहणाऱ्या गंगाधर रामचंद्र वाघ (६१) यांच्या बंगल्याच्या खिडकीचे गज तोडून चोरट्याने ९२ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले.

‘त्या’ १५० रेशनकार्डांची चौकशी

$
0
0
काही दिवसांपूर्वी नाशिक धान्य वितरण कार्यालयात तयार करण्यात आलेल्या १५० पिवळ्या रेशनकार्डांची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिले आहेत. कुठल्याही पुराव्याविना हे रेशनकार्ड तयार करण्यात आले असून या प्रकरणी विस्तृत अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

ओझर टर्मिनल सांभाळणार कोण?

$
0
0
नांदेड आणि जळगाव येथे सुसज्ज टर्मिनल आणि सुविधा उपलब्ध असतानाही ही दोन्ही विमानतळे विमानसेवा सुरू होण्याच्या तीव्र आतुरतेतच आहेत. याच धर्तीवर आता ओझर येथे सुसज्ज पॅसेंजर टर्मिनल साकारण्यात आले आहे. या टर्मिनलचे उद्घाटन येत्या काही दिवसांतच केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे.

फायर सेफ्टी नॉर्म्सचे त्रांगडे कायम

$
0
0
अग्निशमन दलाकडून फायर सेफ्टी नॉर्म्सची एनओसी घेतल्याशिवाय शहरातील हॉस्पिटल्सला महापालिकेकडे रजिस्ट्रेशन करता येणे शक्य नाही. तांत्रिक कारणांमुळे हॉस्पिटल्स प्रशासनाला कायद्यातील तरतुदीचे पालन करणे शक्य होत नसल्याने शहरातील १ हजार २२६ पैकी ८९६ हॉस्पिटल्स प्रशासनाने रजिस्ट्रेशन करण्याकडे पाठ फिरवली आहे.

हेचि फळ काय मम तपाला?

$
0
0
एखाद्या कार्यक्रमासाठी आटापिटा करणारा कार्यकर्ता जेव्हा त्या कार्यक्रमाच्या उदघाटनप्रसंगीच वरिष्ठांच्या कामासाठी कोठे गेला तर! त्याचे झाले असे की एका वॉर्डामध्ये वाचनालय उघडण्याच्या इच्छेने एका कार्यकर्त्याला झपाटून टाकले होते.

नाशिककरांसाठी सांस्कृतिक मेजवानी

$
0
0
नाशिकमधील ‘आर. एम. ग्रुप’तर्फे नाशिककरांना सांस्कृतिक मेजवानी मिळणार आहे. या ग्रुपतर्फे २६ आणि २७ फेब्रुवारीला सांस्कृतिक कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

घ्या सूर्यनमस्काराचा वसा

$
0
0
‘भानू या शब्दाचा अर्थ तेज आहे. शरि‌र, बुध्दी तेज:पुंज करण्यासाठी महिलांनी शारिरीक व मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थीनींनी सूर्यनमस्काराचा वसा घ्यावा’, असा सल्ला सिडको कॉलेजच्या क्रीडा संचालिका मिनाक्षी गवळी यांनी विद्यार्थीनींना दिला.

जिल्ह्यात वादळी पावसासह गारपीट

$
0
0
जिल्ह्याच्या विविध भागांत सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. कळवण, इगतपुरी, सटाणा, चांदवड, निफाड, नांदगाव तालुक्यात काही ठिकाणी गारपीट झाली. यामुळे रब्बीच्या पिकांबरोबरच द्राक्ष, डाळिंब, मिरची व टोमॅटो या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

कोतवालांच्या उपोषणात २ अत्यवस्थ

$
0
0
राज्यातील कोतवालांना चतुर्थ श्रेणीत सामावून घ्यावे यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयावर सुरू असलेल्या उपोषणातील दोन आंदोलक अत्यवस्थ झाले असून त्यांना बिटको हॉस्पिटलच्या आयसीयूत दाखल करण्यात आले आहे.

मंदीने मोडले महापालिकेचे कंबरडे

$
0
0
औद्योगिक क्षेत्रातील मंदीचा थेट फटका महापालिकेला बसला असून एलबीटी अर्थात लोकल बॉडी टॅक्सच्या महसुलात सुमारे सव्वाशे कोटी रूपयांची घट निर्माण होण्याची शक्यता आहे.

वाळूचे १५ ट्रक ताब्यात

$
0
0
खान्देशातून नाशिक शहरात येणारे वाळूचे तब्बल १५ ट्रक नाशिकच्या मंडल अधिकारी आणि तलाठी यांच्या पथकाने ताब्यात घेतले आहेत. या सर्व ट्रकमध्ये परवानगीपेक्षा अधिक वाळू वाहतूक करण्यात येत असल्याने या सर्व ट्रक चालक आणि मालकांविरोधात कारवाई करण्यात येणार आहे.

सरकारचे टोलमाफियांशी संगनमत

$
0
0
​राज्यातील टोल बंद करण्यासाठी विविध पर्याय आहेत. मात्र, सरकारला ते बंद करायचे नाहीत. टोलच्या माध्यमातून राज्यात टोलमाफिया तयार झाले असून सरकारचे या टोलमाफियांशी संगनमत असल्याचा आरोप करत भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.

नाशिकरोड परिसरात मुसळधार पाऊस

$
0
0
नाशिक शहरात सायंकाळच्या सुमारास काळोख दाटून आला असतानाच नाशिकरोड परिसरात मात्र सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला.

कळवण, निफाड, इगतपुरीला पावसाने झोडपले

$
0
0
दिवसभराच्या ढगाळ वातावरणानंतर दुपारी चार वाजेच्या सुमारास जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांबरोबरच चाकरमान्यांची चांगलीच धावपळ उडाली.

गॅस एजन्सींचा संप मागे

$
0
0
गॅस सिलेंडरचा पुरवठा करणाऱ्या एजन्सींच्या मागण्या तत्वतः मान्य करण्यात आल्याने मंगळवारपासून होणारा देशव्यापी संप मागे घेण्यात आला आहे. नाशिक जिल्हा गॅस एजन्सी संघटनेनेही त्यानुसार संप मागे घेतला आहे.

​गोदाकाठ हिरवाईने बहरणार

$
0
0
पर्यावरण जागृतीचे काम करण्याऱ्या ‘आपले पर्यावरण’ या संस्थेतर्फे शहरातील गोदावरीच्या काठावर शक्य असेल, अशा ठिकाणी वृक्षारोपण करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images