Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

जपानी कंपनीचा लखमापूरला प्रकल्प

$
0
0
टोमॅटोवर प्रक्रिया करणारी जपानमधील आघाडीची कंपनी कागोमे आणि मित्सुई या कंपन्यांनी भारतात अन्नप्रक्रिया उद्योग सुरू करण्याचे निश्चित केले आहे. या दोन्ही कंपन्यांनी इंदूरच्या रुची सोया कंपनीशी करार केली असून त्यांचा पहिला प्रकल्प दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथे सुरू होणार आहे.

सिडको-सातपूर भागात उद्या पाणी नाही

$
0
0
महापालिका पाणी पुरवठा विभागातर्फे करण्यात येणाऱ्या दुरुस्ती कामामुळे सिडको व सातपूर परिसरातील काही भागात उद्या (सोमवार) पाणी पुवरठा होणार नाही.

जुन्या नाशकातील ‘इटीपी’ सुरु होणार

$
0
0
शहरातील सर्वांत मोठा म्हणून गणल्या जाणाऱ्या जुने नाशिक येथील कत्तलखान्यातील इटीपी (इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट) अखेर सुरु होणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून ठेकेदार आणि महापालिकेच्या वादामुळे तो सुरु होऊ शकलेला नाही.

मतदारसंघावरून शिवसेनेत रंगली खलबते

$
0
0
लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीचा बार उडविताना शिवसेनेने राज्यातील वीस जागांवरील उमेदवार घोषित केले. मात्र यात नाशिकसारख्या प्रमुख मतदारसंघातील उमेदवाराचा समावेश नसल्याने राजकीय तर्कवितर्कांना जोर चढला आहे.

शिवसेना जिल्हाध्यक्षांसह ८ जणांवर गुन्हा

$
0
0
जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षांसह आठ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. विजय अप्पा करंजकर, माजी जिल्हाध्यक्ष दत्ता गायकवाड, अजय बोरस्ते, हेमंत गोडसे, विनोद नुनसे, महेश सोपे, बाळु कोकणे, संतोष कहार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

सामूहिक बलात्कार : २ संशयित ताब्यात

$
0
0
शहरात खळबळ उडविणाऱ्या देवळालीगावातील रोकडोबा वाडीतील सामूहिक बलात्कार प्रकरणी मुख्य संशयितांपैकी दोघांना आज पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिस तिसऱ्या संशयिताच्या मागावर असून तोही लवकरच हाती लागेल असे पोलिसांनी सांगितले. संशयिताचे वर्णन संबंधित महिलेने पोलिसांना दिले होते.

वाहन परवाना महागला

$
0
0
प्रादेशिक परिवहन विभागाकडून मिळणाऱ्या वाहन परवान्यांसाठी वाहनधारकांना आता जादा पैसे माजावे लागणार आहेत. प्रादेशिक परिवहन विभागाने स्मार्टकार्ड सेवेवर सेवाकर लागू केल्याने परवान्यांचे दर वाढणार आहेत, अशी माहिती आरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. शनिवार (दि.१) पासून नवीन दर अंमलात आले आहेत.

मालेगावात बालिकेचा खून

$
0
0
मालेगाव येथे पाच वर्षीय बालिकेचा गळा आवळून तसेच हाताच्या नस कापून अत्यंत निर्दयीपणे खून करण्यात आला. आयेशानगर भागात ही घटना घडली. मारेकऱ्याला अटक करावी यासाठी संतप्त नाग‌रिकांनी आयेशानगर पोलिस चौकीला घेराव घातला. तहेसिना जमिल अहेमद (वय ५, रा. मुक्तार अश्रफ नगर) असे त्या बालिकेचे नाव आहे.

त्र्यंबक गोदावरीचा प्रश्न उग्र होणार

$
0
0
त्र्यंबकेश्वर येथील गोदावरीच्या काँक्रिटीकरणाचा मुद्दा नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलमध्ये गेल्यानंतर आता हा प्रश्न चांगलाच पेटण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी शनिवारी त्र्यंबक दौऱ्यावर गेले असता याचिकाकर्ते आणि विरोधक यांच्यात चांगलीच हमरीतुमरी झाली आहे.

वसतिगृहातून पुन्हा ४ महिला पळाल्या

$
0
0
अशोकस्तंभाजवळील महिलांच्या शासकीय वसतिगृहातून पुन्हा चार महिला पळून गेल्याचा प्रकार शनिवारी मध्यरात्री घडला. गेल्या महिन्यात १७ महिलांनी वसतिगृहातून पलायन केले होते. त्यापैकी १३ जणींचा अद्याप शोध लागला नसताना पुन्हा ही दुसरी घटना घडली आहे.

घोषणा १२ सिलिंडरची, मिळणार ११

$
0
0
आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर केंद्र सरकारने अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरची संख्या ९ वरुन १२ अशी घोषणा केली असली तरी ग्राहकांना ११ च सिलिंडर देण्यात येत आहेत. त्यामुळे ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी असून एप्रिलपासून आगामी वर्षभर १२ सिलिंडर देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

त्र्यंबकेश्वर जवळील गावे विकासापासून वंचित

$
0
0
नाशिक शहरात तसेच त्र्यंबकेश्वरमध्ये होऊ घातलेल्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर रस्त्यालगत असलेल्या गावांच्या रस्त्यांची कामे लवकर करण्यात यावीत, अशी मागणी राष्ट्रीय दलित पँथरने केली आहे.

काँग्रेसनेच जातीयवाद जिवंत ठेवला

$
0
0
जगण्याच्या हव्यासापायी अन्याय सहन करू नका. सत्तेसाठी काँग्रेसनेच जातीयवाद जिंवत ठेवला आहे. युती जातीयवादी असल्याचा काँग्रेस पक्ष सुरुवातीपासून कांगावा करत आला आहे, अशी टीका रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी रविवारी येथे केली.

निवृत्तीनंतरही बजाविणार पोलिसाची भूमिका

$
0
0
सिंहस्थ कुंभमेळा काळात पोलिसांवरील ताण अनेक पटींनी वाढणार आहे. त्यामुळे ज्यांच्या सोबत काम केले त्यांना मदत व्हावी. त्यांच्यावरील कामाचा बोजा कमी व्हावा या उदात्त भावनेने सिंहस्थ काळात आपल्या सहका-यांच्या खांद्याला खांदा लावून सर्वतोपरी मदत करण्याचा निर्णय निवृत्त पोलिसांनी घेतला आहे.

‘काळाराम’चा सत्याग्रह समतेसाठीच

$
0
0
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखाली झालेला काळाराम मंदिराचा सत्याग्रह समता व समानतेसाठी होता, त्यात कुणाचाही द्वेष नव्हता.’ असे प्रतिपादन आरपीआय (अे)चे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी केले.

अतिक्रमणधारकांचाच उपोषणाचा इशारा

$
0
0
सारडासर्कलजवळील चांदशावली बाबा दर्ग्याजवळ असलेली १७ अतिक्रमणे हटवताना महापालिकेने कोर्टाच्या आदेशांकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे. याविरोधात कोर्टात अवमान याचिका दाखल करणार असल्याची माहिती व्यावसायिकांनी दिली आहे.

कोतवालांच्या उपोषणाचा २३ वा दिवस

$
0
0
महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेतर्फे नाशिकरोडच्या विभागीय आयुक्त कार्यालयाजवळ सुरु असलेल्या उपोषणाचा रविवारी तेव‌िसावा दिवस पूर्ण झाला. तरीही सरकार कोतवालांकडे दुर्लक्ष करीत असल्याने त्यांच्याकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

मनसे-भाजपमध्ये दिलजमाई

$
0
0
आपसातील कुरबुरीपेक्षा शहराचा विकास महत्त्वाचा असल्याचे सांगत महापालिकेतील युतीबाबत मनसे व भाजपमध्ये निर्माण झालेला दुरावा मिटल्याचे संकेत राज्याचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी दिले. खडसे यांच्या वक्तव्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून भाजप व मनसेत निर्माण झालेला तणाव निवळल्यात जमा आहे.

पोलिस स्टेशनमध्ये ‘PSI’ला धमकावले

$
0
0
‘हजेरीस उशिरा का आलास’ अशी विचारणा करणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकाचा हात पकडून त्याला नोकरीवरून घालविण्याची धमकी दिल्याचा प्रकार उपनगर पोलिस स्टेशनमध्ये शनिवारी रात्री घडला.

६.५ हजार हेक्टर क्षेत्रावर नुकसान

$
0
0
गेल्या आठवड्यात जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारला सादर केला आहे. त्यानुसार जिल्ह्यात साडेसहा हजार हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाल्याचे अहवालात म्हटले आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images