Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

एसटीच्या विभागीय नियंत्रकपदी पहिल्यांदाच महिला

0
0
राज्य मार्ग परिवहन महांमडळाच्या नाशिक विभागाच्या नियंत्रक म्हणून योगिनी जोशी यांनी बुधवारी पदभार स्वीकारला. महामंडळाच्या इतिहासात पहिली महिला नियंत्रक बनण्याचा बहुमान त्यांनी पटकावला आहे.

भाडेवाढीचा नाशिककरांनाही भुर्दंड

0
0
राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) लागू केलेल्या दरवाढीचा फटका नाशिकच्या प्रवाशांनाही बसणार आहे. राज्यातील विविध भागांत नाशिकहून धावणाऱ्या बसेसच्या प्रवास भाड्यापोटी प्रवाशांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

जिल्ह्यात पावसाचे थैमान

0
0
नाशिक शहरासह जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने थैमान घातले. मुसळधार पावसासह पंधरा मिनिटे गारपीट झाल्याने द्राक्ष, कांदा याबरोबरच रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले. सिन्नर, सटाणा, निफाड तालुक्यात अक्षरशः गारांचा खच पडला होता.

महायुतीच्या मेळाव्यात सटाण्यात गोंधळ

0
0
धुळ्याचे विद्यमान खासदार प्रतापदादा सोनवणे यांचे तिकीट कापल्यामुळे भाजपाचा ताप वाढला आहे. उमेदवारी नाकारल्यामुळे सटाण्याचे शहराध्यक्ष राहुल सोनवणे यांनी बुधवारी सटाण्यात झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात गोंधळ घालून संताप व्यक्त केला.

सिन्नरला गारपिटीने शेतकऱ्याचा मृत्यू

0
0
सिन्नर तालुक्यात मंगळवारी तालुक्याच्या पश्चिम भागात तुफान गारपिटीने मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान केले. बुधवारी पूर्व भागात जोरदार पावसासह गारपिटीने रब्बीच्या पिकासह द्राक्ष व डाळिंंब बागांचे मोठे नुकसान झाले. या गारपिटीत एक पन्नास वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला.

बेमोसमी कहर; द्राक्ष, कांदा, गहू भूईसपाट

0
0
दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरणानंतर मंगळवार व काल बुधवारी बेमोसमी पावसाने कहर केला. हाता तोंडाशी आलेली पिके उध्वस्त होत असल्याने जगाचा पोशिंदा हवालदिल झाला आहे. द्राक्ष बागाईतदार मेटाकुटीला आले असून पाऊस व गारपीटमुळे त्यांचे तोंडचे पाणी पळाले आहे.

जाहिरातीने वादंग

0
0
सेंटच्या बिभत्स व अश्लिल जाहिरातींचे प्रमाण टीव्हीवर कमी झाले असले तरी त्यांच्या उत्पादकांनी शहराकडे मोर्चा वळविला आहे. नाशिकरोड येथे मुलींच्या शासकीय वसतीगृहाच्या प्रवेशव्दाराजवळच अशा जाहिरातीच फलक लावण्यात आल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

बिटको चौकात वाहतुकीचे ‘तीन तेरा’

0
0
नाशिकरोडच्या बिटको चौकात अवैध पार्किंगमुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. या पार्किंगमुळे शिवाजी पुतळा, बिटको चौक, मुक्तीधाम याठिकाणी दररोज वाहतूक कोंडीचा त्रास सर्वसामान्य वाहनधारक व पादचाऱ्यांना सहन करावा लागतो.

खांडेनगरला रस्ते, स्ट्रीट लाइटची प्रतीक्षा

0
0
सिडकोमधील सावतानगरला लागून असलेल्या खांडेनगर परिसरात रस्ते व स्ट्रीट लाइट नसल्याने रहिवाशांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. महापालिकेने तातडीने नागरी सुविधा पुरवाव्यात, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे.

दरोड्याच्या तयारीतील तिघांना अटक

0
0
वैद्यनगर परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील तिघांना अटक करण्यात भद्रकाली पोलिसांना यश आले आहे. शंकर संजू शिंदे (२२, मधुबन कॉलनी, पंचवटी), गणेश जगदीश रॉय (३०, रा. काझीपुरा, जुने नाशिक), अमर झिमर गवे (रा. घासबाजार, भद्रकाली) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.

​तडीपारीच्या कारवाईसाठी पो‌लिसही सरसावले

0
0
लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजल्यामुळे पोलिसही सतर्क झाल्याचे पहावयास मिळत आहे. निवडणूक काळात गुन्हेगारी पार्श्वभुमीच्या सराईत गुन्हेगारांकडून डोकेदुखी वाढू नये यासाठी त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.

सेना-मनसे उमेदवारांबाबत उत्सुकता

0
0
निवडणूक आयोगाने निवडणुकीचा बिगूल फुंकल्याने गेल्या काही दिवसापासून मतदानाच्या तारखेच्या प्रतिक्षेत असलेले कार्यकर्ते काहीसे सुखावले. त्यातून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससह आम आदमी पार्टी, माकपचे कार्यकर्ते तयारीला लागल्याचे समजते.

धावत्या रेल्वेत मुलीवर बलात्कार

0
0
हावड्यावरून मुंबई येथे जाणाऱ्या धावत्या रेल्वेमध्ये आरक्षित डब्यातील स्वच्छतागृहात सतरा वर्षीय अल्पवयीन विवाहित मुलीवर बलात्कार झाल्याची घटला बुधवारी घडली. या प्रकरणी पीडित मुलीने मनमाड लोहमार्ग पोलिसात तक्रार दिली असून मनमाडच्या संदीप राऊत या तरूणावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निवडणूक खर्चावर करडी नजर

0
0
लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराचा खर्च यंदा ४० लाखांवरून ७० लाख करण्यात आला असला तरी या खर्चावर निवडणूक यंत्रणेची करडी नजर राहणार आहे. राजकीय उमेदवारांकडून दिला जाणाऱ्या खर्चाचा तपशील वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याने उमेदवारांना यावेळी अधिक जागरूक रहावे लागणार आहे.

मराठा आरक्षण लांबले

0
0
मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देण्यासाठीचे सर्वेक्षण पूर्ण होण्यापुर्वीच समितीचे अध्यक्ष उद्योगमंत्री नारायण राणे यांनी २० टक्के आरक्षण देण्याची शिफारस केली असली तरी लोकसभेची आचारसंहिता लागू झाल्याने मराठा आरक्षणाची घोषणा लांबली आहे.

​जिल्ह्यातील वातावरण तापले

0
0
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरणानेही वेग घेतला आहे. नाशिक, दिंडोरी आणि धुळे या तिन्ही मतदारसंघांसाठीच्या आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यानुसार शहरासह जिल्ह्यातील विविध बॅनर्स उतरवितानाच पदाधिकाऱ्यांच्या गाड्याही जमा करण्यात येत आहेत.

​स्थायी अडकली आचारसंहितेत

0
0
आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती पदाची निवडणूक लांबणीवर पडली आहे. स्थायी समितीच्या उर्वरित आठ सदस्यांचा राजीनामा सादर करण्यासाठी बुधवारपर्यंतची मुदत देण्यात आली होती.

कसारा घाटात अपघातात ३ ठार

0
0
मुंबई आग्रा महामार्गावर ठाणे येथून नाशिककडे जाणारी महिंद्र पिकअप दरीत कोसळल्याने तिघांचा मृत्यू झाला तर सात जण जखमी झाले. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.

... म्हणे शासनाचे प्रत‌िन‌िधी

0
0
अगाध ज्ञान माणसाला उपकारक ठरते, तसे कधी नसलेले दाखव‌िण्याची सवय अपायकारकही ठरु शकते. सगळीच माणसे ‘अगाध ज्ञानी’‌ या गटात मोडत नाहीत. पण् जे या गटात श‌िरु पाहतात त्यांच्या वाट्याला फज‌िती नाही‌ तर दुसरे काय येणार ?

चौथे मराठी ई-साहित्य संमेलन नाशकात

0
0
‘युनिक फीचर्स’तर्फे आयोजित मराठी ई-साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद यंदा रानकवी ना. धों. महानोर भूषविणार आहेत. युनिक फीचर्सच्या www.uniquefeatures.in या वेबसाइटवर भरविल्या जाणाऱ्या या संमेलनाचे हे चौथे वर्ष आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images