Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

ज‌िल्ह्याला पुन्हा गारपिटीचा तडाखा

$
0
0
शनिवारीही अवकाळी पावसाने नाश‌‌िकसह उत्तर महाराष्ट्राला झोडपल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर शहरी भागांतील जनजीवन व‌िस्कळीत झाले. शनिवारी दुपारी लासलगाव, विंचूर, ब्राह्मणगाव, पिंपळगाव, निमगाव वाकडा, वाकी, पाचोरे, आंबेगाव, वेळापूर यासह डझनभर गावांमध्ये सुमारे वीस मिनिटे गारपिट आणि अर्धा तास जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला.

नगरसेविका जाधव यांची ‘माकप’तून हकालपट्टी

$
0
0
नाशिक महापालिकेतील प्रभाग क्रमांक ५०च्या नगरसेविका नंदिनी जाधव यांची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातून (माकप) हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षाच्या जिल्हा कमिटीचे सेक्रेटरी माजी आमदार जीवा पांडू गावित यांनी जाधव यांच्या हकालपट्टीची घोषणा केली.

क्रीडा धोरणाला आचारसंहितेचा ब्रेक

$
0
0
शहरातील खेळाडूंना पोषक वातावरण व प्रोत्साहन मिळावे म्हणून आखल्या जात असलेल्या महापालिकेच्या क्रीडा धोरणाला आचारसंहितेमुळे ब्रेक लागला आहे. निवडणुकीनंतर क्रीडा धोरणावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

निवडणूक तक्रारींसाठी कॉल सेंटर

$
0
0
निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याची तक्रार करण्यासाठी २३१६२१४ हा क्रमांक उपलब्ध करून देतानाच या तक्रारींसाठी स्वतंत्र कॉल सेंटर सुरू करण्यात आले आहे. यामुळे आचारसंहितेचे तंतोतंत पालन होण्यात मोठी मदत होणार आहे.

कार्यकर्त्यांचे लक्ष परिषदेकडे

$
0
0
शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसह शिवसेना, मनसेचे कार्यकर्ते लोकसभा निवडणुकीच्या तयारीत व्यस्त असताना काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे लक्ष विधान परिषद निवडणुकीकडे लागले आहे.

गोदावरीत अस्थी विसर्जन बंद

$
0
0
गोदावरीचे प्रदूषण रोखण्यासाठी रामकुंड परिसरात अस्थी विसर्जनासाठी कृत्रिम तलाव उभारण्याचे स्पष्ट निर्देश मुंबई हायकोर्टाने नाशिक महापालिकेला दिले आहेत. येत्या दोन महिन्यात हा तलाव उभारुन त्याचा वापर करण्यासाठी नागरिकांना प्रवृत्त करावे तसेच गोदावरीसाठी पोलिस उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष कक्ष स्थापन करावा, असेही आदेश कोर्टाने दिले आहेत.

आजचा दिवस मतदार राजाचा

$
0
0
लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारयादीत नाव असणे आवश्यक आहे. त्यामुळे मतदारयादीत नाव नोंदविण्यासाठी रविवारी राज्यभरात विशेष अभियान राबविण्यात येणार आहे.

वाढीव टोलआकारणी लांबली

$
0
0
मुंबई-आग्रा हायवेवरील पिंपळगाव बसवंत येथे सुरु असलेल्या टोल नाक्याचे दर तिप्पट वाढविण्याचे जाहीर करण्यात आले असले तरी येते काही दिवस त्याची अंमलबजावणी होणार नाही. जिल्हाधिकारी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या संमतीनंतर येथील वाढीव टोल वसुली सुरु होणार आहे.

डॉ. पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब?

$
0
0
नाशिक लोकसभा मतदारसंघातून आम आदमी पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, माकपपाठोपाठ शिवसेनेची उमेदवारी जाहीर झाल्याने सर्वांच्या नजरा मनसेच्या उमेदवाराकडे लागल्या आहेत.

कुंचल्यातून साकारली सुरक्षा

$
0
0
औद्योगिक आरोग्य व सुरक्षा संचालनालायाच्या नाशिक विभागाकडून ‘सुरक्षा’ या विषयावर मतिमंद मुलांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. आपल्या चित्रकलेने या विद्यार्थ्यांनी उपस्थितांची शाबासकी मिळवली.

बालकवींनी भरले स्पर्धेत रंग

$
0
0
स्त्री भ्रूण हत्या, पर्यावरण, माझी मराठी भाषा यासारख्या आजच्या ज्वलंत विषयांबरोबरच आई, आजोबा यासारख्या हळव्या विषयांवरील कविता सादर करुन बालकवींनी स्पर्धेत रंग भरले.

कन्या वाचवा

$
0
0
‘समाजातील स्त्री भ्रूण हत्येच्या घटनांना आळा घालून कन्या वाचवा अभियान सर्वत्र हाती घेणे आवश्यक आहे’, असे भालचंद्र रत्नपारखी यांनी व्यक्त केले. गोविंदनगर येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.

डिजिटल मार्केटिंगचे विद्यार्थ्यांना धडे

$
0
0
गेल्या काही वर्षांत डिजिटल टेक्नॉलॉजीमध्ये मोठी प्रगती झाल्यामुळे मार्केटिंग या क्षेत्रातही डिजिटल मार्केटिंग ही संकल्पना रुढ होत आहे. त्यामुळेच ‘आयएमआरटी’ या मॅनेजमेंट इन्स्टिट्युटच्या विद्यार्थ्यांना याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

असाही महिला दिन

$
0
0
महिला दिन म्हटलं की विविध संस्था, संघटनांमार्फत कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. कोणी सत्कार तर कोणी आरोग्य तपासणीसारखे विविध कार्यक्रम आयोजित करतात. या कार्यक्रमांना महिला गोळा करण्यासाठी विविध माध्यमांचा उपयोग केला जातो.

महिला कैद्यांच्या गुणांना वाव द्यायला हवा

$
0
0
महिला बंदीजनांमध्येही विविध गुण आणि कौशल्य असतात. त्यांना योग्य व्यासपीठ आणि संधी उपलब्ध करुन देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मराठी सिने अभिनेत्री नम्रता गायकवाड यांनी केले.

गळती थांबल्याने वाचले हजारो लीटर पाणी

$
0
0
सुभद्रा इस्टेटस् सीएसआर डिव्हिजनतर्फे शहरातील सुमारे सत्तर शाळांचे सर्व्हेक्षण करून या शाळांमधील गळत असलेले नळ इंडियन प्लंबिंग असोसिएशनच्या मदतीने दुरुस्त करून हजारोलीटर पाणी वाचविले आहे.

आज नाशिकचा सराफ बाजार बंद

$
0
0
सोने व्यावसायिकांवर लादलेल्या जाचक अटींच्या निषेधार्थ देशभरातील व्यावसायिक सोमवारी बंद पाळणार आहेत. या बंदमध्ये कारागिरांपासून ते निर्यातदारांपर्यंत सर्वच व्यावसायिक सहभागी होणार आहेत.

देवळालीची गदा रोकडोबाच्या गायकरला

$
0
0
शंभर वर्षांची परंपरा असलेल्या देवळाली गावातील म्हसोबा महाराज यात्रेची सांगता कुस्ती स्पर्धेने झाले. विजेतेपदाची ३५ हजार रुपये किमतीची चांदीची गदा नाशिक येथील रोकडोबा व्यायामशाळेचा मल्ल संदीप गायकर याने पटकावली. २५० मल्ल या स्पर्धेत सहभागी झाले होते.

ओबीसींनी एकत्र यावे

$
0
0
बारा बलुतेदारांसह ओबीसींनी(इतर मागासवर्गीय) आपल्यातील पोटजाती विसरुन एकत्र यावे, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

व‌िद्यापीठाच्या भरतीप्रक्रियेत ‘मुक्त’कुरण?

$
0
0
पदोपदी ‘मुक्त’ कारभारामुळे चर्चेत असणाऱ्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त व‌िद्यापीठातील सहाय्यकांच्या पुर्नन‌ियुक्त्या यंदा वादात सापडण्याची च‌िन्हे आहेत. या नेमणुकांबाबत व‌िद्यापीठाचे न‌ियम आण‌ि तरतुदी धाब्यावर बसव‌िण्यात आल्याचा आरोप होत आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images