Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

५० हजारांहून अधिक नवमतदारांचे अर्ज

$
0
0
रविवारच्या मतदार नोंदणीला जिल्ह्यात उदंड प्रतिसाद लाभला असून सोमवारीही मोठ्या प्रमाणात अर्जांची स्विकृती झाली आहे. जिल्ह्यात ५० हजाराहून अधिक मतदारांचे अर्ज प्राप्त झाले असून सोमवारपर्यंत सादर झालेल्या अर्जदारांची नावे पुरवणी यादी प्रसिद्ध होऊ शकणार आहेत.

गारपिटीनंतर आता पाहणी सत्र

$
0
0
जिल्ह्यात काही दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे सत्र सुरू असताना आता या नुकसानीच्या पाहणी दौऱ्याचे सत्र सुरु होणार आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री हे मंगळवारी तर केंद्र सरकारचे पथक गुरुवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे.

‘त्या’ कर्मचाऱ्यांना तुरूंगवास!

$
0
0
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार नोंदणीसाठी रविवारी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत शहरात अनेक ठिकाणी गोंधळ झाल्याचे निदर्शनास आले. या गोंधळाला केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) जबाबदार असल्याची स्पष्टोक्ती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

खुनापूर्वी झाली होती वादावादी

$
0
0
मखमलाबाद रोडवरील एका हॉटेलात रविवारी रात्री जेवण करण्यासाठी प्रवीण हांडे मित्रांसमवेत गेला होता. सव्वा अकराच्या सुमारास तेथून परतताना एका ओळखीच्या तरुणाने त्याला हटकले. तू माझ्या मैत्रिणीशी गप्पा का मारतोस, अशी विचारणा करीत त्याच्याशी वाद घातला.

आरक्षणाबरोबरच संरक्षण हवे

$
0
0
आरक्षणाबरोबरच संरक्षणाच्या हक्कासाठी काय करता, हे उमेदवारांना विचारण्याची वेळ आली आहे. तेव्हा मते मागण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांना महिलांसाठी काय करणार हे विचारा, त्यांना खिंडीत पकडा, त्यांना अस्तित्व दाखवण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन महिला लोक आयोगाच्या कार्याध्यक्ष अॅड. वर्षा देशपांडे यांनी केले.

वसुलीसाठी सुट्ट्या रद्द

$
0
0
पाणीपट्टी आणि घरपट्टी बिल वसुलीचे उद्दिष्ठ साध्य करण्यासाठी प्रशासनाकडे अवघे २० दिवस शिल्लक आहेत. उर्वरित दिवसांमध्ये अशक्यप्राय वाटणारी वसुली प्रशासनाला करावी लागणार असून जास्तीत जास्त महसूल संकलित व्हावा म्हणून सार्वजनिक सुट्टी, शनिवार आणि रविवारीदेखील भरणा केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

भुसावळ-मुंबई वाहतूक विस्कळीत

$
0
0
नागपूरहून भुसावळला लोखंडी पत्र्याचे रोल घेऊन येणाऱ्या मालगाडीचे पाच डबे रविवारी सकाळी बोदवड रेल्वेस्टेशनजवळ घसरल्याने मध्य रेल्वेच्या भुसावळ-मुंबई मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

नाशिकरोडची २ रेल्वे कॅन्टीन बंद

$
0
0
नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर असलेल्या कॅन्टीनचा करार संपल्याने प्रशासनाने रेल्वे स्टेशनवरचे दोन कॅन्टीन बंद केले आहेत. बंद कॅन्टीनची झळ प्रवाशांना बसत असून इगतपुरी ते मनमाड दरम्यान प्रवाशांना खाण्याचे चांगले पदार्थ मिळत नसल्याने हाल होत आहे.

लाखापेक्षा वाचविले लाख मोलाचे प्राण

$
0
0
पिंपळगाव बसवंतवळ पालखेड कॅनॉलमध्ये पडलेल्या लहान मुलास वाचविण्यासाठी स्वतःच्या जीवाची व ‌खिशात असलेल्या एक लाख रुपयांची पर्वा न करता बेधडक कॅनॉलमध्ये उडी घेऊन मुलाचे प्राण वाचविणा-या एका पतसंस्थेच्या व्यवस्थापकाच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

लैंगिक छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

$
0
0
लैंगिक छळाला कंटाळून अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न करणा-या नांदगाव येथील विवाहितेचा उपचारादरम्यान नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी दीपक घोलप (वडाळी ता.नांदगाव) यास अटक केली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीचे सटाण्यात मनोमिलन

$
0
0
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यात आघाडी असताना बागलाणमध्ये मात्र गेल्या काही वर्षांपासून विस्तव देखील न जाणा-या या पक्षांची मंगळवारी आरोप-प्रत्यारोपाच्या फेरीनंतर मनोमिलन होऊन सुखी संसाराची शपथ देखील घेतली.

कांदा भावात घसरण

$
0
0
सोमवारच्या तुलनेत मंगळवारी पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या भावात सुमारे शंभर रुपयांनी घसरण झाली. कांद्याचे निर्यातमूल्य रद्द केल्यानंतर कांद्याची निर्यात होत असताना व देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याला चांगली मागणी असताना कांदा भावात होणारी घसरण शेतक-यांसाठी चिंतेची बाब ठरत आहे.

डाळिंबाची मातीमोल भावाने विक्री

$
0
0
गारपीटनंतर मंगळवारी सटाणा बाजार समितीत डाळिंबाचा अक्षरश: पूर होता. उदरनिर्वाहासाठी दोन पौसे मिळतील या आशेने विक्रीसाठी आणलेले डाळिंब आवक वाढल्याने कवडीमोल भावाने विकावे लागले. त्यामुळे हताश होऊन बळीराजाला घरी परतावे लागल्याचे दृश्य बघायला मिळाले.

एलईडी सुनावणी लांबली

$
0
0
मुंबई हायकोर्टाने वीजबचतीबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी महापालिकेला २१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. प्रतिज्ञापत्र सादर झाल्यानंतर २५ मार्चला त्यावर युक्तिवाद होणार आहे.

उमतील पहिले पेट-सिटी स्कॅन मशिन शहरात

$
0
0
कॅन्सरच्या पेशंटला विविध चाचण्यांसाठी लागणारा वेळ टाळण्यासाठी आणि एकाच जागी ती उपलब्ध व्हावी याकरिता क्युरी मानवता कॅन्सर सेंटरमध्ये पेट-सिटी पॉझिट्रॉन इमिशन टोमोग्राफी स्कॅनिंग हे अत्याधुनिक मशिन उपलब्ध करून दिले आहे.

एलबीटीच्या फेऱ्याने व्यापारी हैराण

$
0
0
नाशिकरोड परिसरातील सर्व प्रकारच्या व्यापाऱ्यांना एलबीटी (लोकल बॉडी टॅक्स) संबंधी कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी महापालिकेच्या मुख्यालयात राजीव गांधी भवन येथे चकरा माराव्या लागतात.

फायर ब्रिगेडच्या इमारतीचे काम रखडले

$
0
0
नाशिकरोड परिसरात नव्याने तयार होत असलेल्या फायर ब्रिगेड स्टेशनचे काम दोन वर्षापासून रखडले असून हे काम त्वरित पूर्ण करावे यावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. महापालिकेने गोसावीवाडीतील फायर स्टेशन तोडून रेड हॉस्पिटलच्या जागेत नव्या अद्ययावत अशा फायर स्टेशनच्या निर्मितीचे काम सुरू केले.

उद्योगांची उंची वाढणार

$
0
0
सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीत नव्या उद्योगांसाठी जागा उपलब्ध होत नसल्याने नाराजी असताना उद्योगांना वाढीव एफएसआय देऊन औद्योगिक विकास महामंडळाने उद्योजकांना दिलासा दिला आहे.

चुकलेला कार्यक्रम

$
0
0
अनेकदा घाईगडबडीत ‘जाना था जपान पोहोच गये चीन’ असा किस्सा होतो. परवा असाच एक किस्सा झाला. टिळकपथावरील एका सभागृहात सुरु असलेल्या सत्कार सोहळ्यात एक महाशय घाईगडबडीने येऊन बसले.

‘शिवकार्य गडकोट’चे श्रीगडावर श्रमदान

$
0
0
नाशिकच्या शिवकार्य गडकोट मोहिमेचा ११ वा श्रमदानाचा टप्पा भक्कम श्रीगडावर (ता.त्र्यंबक) पार पडला. उंचच उंच कातळ कडा आणि खोल दरी, भुयारी पायऱ्यांच्या श्रीगडकडे संबंधित विभागाचे पूर्ण दुर्लक्ष झाले असले तरीही तो आजही अभेद्य अवस्थेत आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images