Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

चिमुरडी पुन्हा आईच्या कुशीत!

$
0
0
पंचशील नगर या वस्तीतील घराच्या अंगणात खेळणारी दोन शाळकरी मुले अचानक गायब होतात अन् तब्बल एक महिन्यांनंतर पुन्हा आईच्या कुशीत विसावतात. हा प्रसंग एखाद्या चित्रपटातील प्रसंगासारखा वाटावा, पण गेला एक महिना सार्थक शिर्के (वय ८) व ऋतिक कदम (वय १०) यांच्या कुटुंबांची मुलांना शोधण्यासाठी झालेली फरफट मुले सापडल्यानंतर सार्थकी लागल्याची भावना त्यांनी 'मटा'शी बोलताना व्यक्त केली.

पाण्यासाठी नगरपरिषदेला घेराव

$
0
0
पालखेड धरणातून तातडीने पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे, शहरातील पाणीटंचाई दूर करावी, पाणीप्रश्न कायमस्वरुपी सोडवावा या मागण्यांसाठी सर्वपक्षीय मनमाड शहर बचाव कृति समितीतर्फे सोमवारी तब्बल पाच तास नगरपरिषदेला घेराव घालण्यात आला.

एमआयडीसीचे हेलिपॅड अधांतरीच

$
0
0
नाशिकच्या औद्योगिक वसाहतीत हेलिपॅड उभारून उद्योगांसह नाशिकच्या विकासाला चालना देण्याचा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा (एमआयडीसी) प्रस्ताव अधांतरीच असल्याचे निदर्शनास येत आहे. विशेष म्हणजे, एमआयडीसीने या हेलिपॅडसाठी केलेला दोन लाख रुपयांचा खर्चही वाया गेला असल्याचे स्पष्ट होत आहे.

कुंभमेळ्यासाठी निधी द्या

$
0
0
नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये भरणा-या सिंहस्थ कुंभमेळ्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून केंद्र सरकारने जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी धुळ्याचे खासदार प्रतापदादा सोनवणे यांनी केली.

नगरसेवक पवन पवार ताब्यात

$
0
0
नाशिकरोड विभागाचे प्रभाग सभापती तथा नगरसेवक पवन रामचंद्र पवार यांना पोलिसांनी सोमवारी सायंकाळी खंडणीप्रकरणी ताब्यात घेतले. पवार यांच्याविरुद्ध खंडणी मागितल्याचा तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा असे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत.

नाशिकरोडला टर्मिनस हवे!

$
0
0
मुंबईला जाण्यासाठी सकाळी सोयीच्या वेळी एक गाडी, नाशिक-पुणे रेल्वेमार्ग, नाशिकरोडला टर्मिनसची उभारणी आदी अनेक वर्षांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात, अशी रेल्वे बजेटकडून नाशिककरांची अपेक्षा आहे.

कृपया शांत रहा!

$
0
0
भाऊ, परवा एक किस्साच झालाना! दोघे जणं एकमेकांना भेटले आणि एका मुद्द्यावर चर्चा करु लागले. मुद्याचा शेवट असा निघाला की आपण दोघांनी त्या खात्याचे वरिष्ठ अधिकारी 'आयएएस' आहेत. त्यांना जाऊन भेटू आणि आपली शंका दूर करु. सरकारच्या योजना समजावून घेण्यासाठी दोघे गेले आयएएस ऑफिसरकडे.

विमानसेवेला टेक ऑफची प्रतिक्षा

$
0
0
देशाच्या सर्वच शहरांना नाशिकची नाळ जोडण्यासाठी हवाई मार्गाचा पर्याय आहे. त्यासाठीच ओझर येथे पॅसेंजर टर्मिनल उभारुन हवाई सेवा सुरु करण्यात येणार आहे. पुढील वर्षापर्यंत ही सेवा कार्यरत होणे अपेक्षित आहे. पण यासाठी सरकारी यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींना त्यात 'इंटरेस्ट' असणे आवश्यक आहे.

नाशिकच्या विशालचा 'ऑस्कर' इफेक्ट

$
0
0
यंदाच्या ऑस्कर सोहळ्यावर 'लाइफ ऑफ पाय'च्या निमित्ताने मराठी मुद्रा उमटली असून या सिनेमाला मिळालेल्या चार ऑस्करपैकी एक व्हिज्युअल इफेक्टसाठी आहे. हे इफेक्टस देणाऱ्या टिममध्ये नाशिकचा अॅनिमेटर विशाल संघानी याचा समावेश आहे.

'अभिनव भारत'च्या जीर्णोध्दाराचा मार्ग मोकळा

$
0
0
अभिनव भारत मंदिराच्या जीर्णोध्दाराचा प्रश्न राजकीय इच्छा शक्ती व नाशिककरांच्या पुढाकाराच्या आभावामुळे प्रलंबीत असल्याचा दावा अभिनव भारत मंदिर ट्रस्टचे एकमेव सदस्य सुर्यकांत रहाळकर यांनी केला आहे.

अपहारप्रकरणी डाकपालावर गुन्हा

$
0
0
टपाल खात्यातील विविध योजनांतर्गत खातेदारकांनी गुंतवलेले २ लाख ३९ हजार रुपये जमा न करता स्वतःसाठी वापरल्याप्रकरणी डाकपालाविरुद्ध गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नव्या तरतुदींचा पोलिसांकडून वापर

$
0
0
महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने न्यायमूर्ती जे. एस. वर्मा समितीच्या शिफारसी स्वीकारल्या. २६ जानेवारी रोजी राष्ट्रपतींनी वटहुकमावर स्वाक्षरी केल्यानंतर बलात्कार तसेच विनयभंग कायद्यातील बदललेल्या तरतुदी राज्यासह देशात लागू झाल्या.

रेल्वे बजेटमध्ये खान्देशचे पारडे रिक्तच

$
0
0
यंदाच्या रेल्वे बजेटमध्ये खान्देशने केलेल्या मागण्यांचा यंदाही कोणताही विचार झाला नाही. खान्देशच्या पारड्यात काहीही न पडल्याने घोर निराशा झाल्याची भावना खान्देशवासीय करीत आहेत.

सुरक्षेसाठी अंबडला तपासणी मोहीम

$
0
0
अंबड औद्योगिक वसाहतीत होणाऱ्या गुन्ह्यांची दखल घेत पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून सुरक्षेसाठी तपासणीची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे, अशी माहिती अंबड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर सुर्यवंशी यांनी दिली.

नाशिक विभागातून अवघे ६ कॉपीबहाद्दर

$
0
0
भाषेसारख्या विषयांना कॉपीबहाद्दरांचा वाढता आलेख बघणाऱ्या नाशिक विभागीय मंडळाला मंगळवारी अवघे सहा कॉपीबहाद्दर बघायला मिळाले. भौतीकशास्त्राच्या जुन्या अभ्यासक्रमाचा पेपर मंगळवारी पार पडला.

निमा पॉवरद्वारे हजार कोटींची उलाढाल

$
0
0
निमा पॉवर प्रदर्शनात बिझनेस टू बिझनेस मीट (बीटूबी) द्वारे इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योगांना ५०० कोटी रुपयांच्या, तर प्रत्यक्ष स्टॉलवर एकूण ५०० कोटी रुपयांच्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत.

महिला अत्याचाराच्या निषेधार्थ मोर्चा

$
0
0
अहमदनगर जिल्ह्यातील सोनई, बारामती जिल्ह्यातील इंदापूर व भंडारा येथे दलित तरुण व अल्पवयीन मुलींवर करण्यात आलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ मनमाड येथे दलित संघर्ष समितीतर्फे मंगळवारी मोर्चा काढण्यात आला.

येवला पोलिसांना चोरट्यांची तलाश

$
0
0
येवला तालुक्यातील कोटमगाव येथील देवीमंदिरातील दागिने व रोख रक्कम चोरी करणारा तसेच दाम्पत्याकडील २९ तोळे सोने लुटणा-या चोरट्यांनी येवला पोलिसांना गुंगारा दिला. त्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्हीची मदत घेतली असून आरोपींचे फोटो प्रसिद्ध केले आहेत.

सभापती पवारला २ दिवसांची कोठडी

$
0
0
खंडणी मागितल्याच्या कारणावरून पोलिसांच्या अटकेत असलेल्या नाशिकरोड विभागाचे प्रभाग सभापती पवन रामचंद्र पवार यास मंगळवारी कोर्टाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

कुंटणखाना प्रकरणातील प्रमुख आरोपी जेरबंद

$
0
0
बेबीबाई चौधरी कुंटणखाना प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी तथाकथित पत्रकार विजय टाटीया यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नाशिक शहरातील पाथडी नाका परिसरात मंगळवारी सकाळी अटक केली.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images