Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

शरद पवार, मुख्यमंत्री उद्या नाशिक दौऱ्यावर

$
0
0
केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे दोन्ही नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर शनिवारी येण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत.

सहा जणींची सुटका

$
0
0
ठाणे येथील डान्सबारवर कारवाई करण्यात आल्यानंतर वात्सल्य शासकीय महिला वसतिगृहात ठेवण्यात आलेल्या महिलांपैकी ६ जणींची सुटका करण्यात आली आहे. उर्वरित १७ महिलांना सोडण्यासंदर्भातील आदेश २० मार्चपर्यंत होणे अपेक्षित असून त्यानंतर या महिलांनाही सोडण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

कॉम्बिंगमध्ये सापडले ४० आरोपी

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी सर्व पोलिस स्टेशन्सच्या हद्दीमध्ये कॉम्बिंग ऑपरेशनची मोहीम अधिक तीव्र केली आहे.

मोबाइल विकणारी टोळी जेरबंद

$
0
0
हरवलेला मोबाईल परत मिळवण्यासाठी महत्त्वाचा दुवा म्हणजे आयएमईआय क्रमांक. परंतु, हा क्रमांकच बदलून मोबाइल विकणाऱ्या टोळीला मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रँचने बुधवारी जेरबंद केले.

मनसे नगरसेवक कोंबडेंवर गुन्हा दाखल

$
0
0
घरांवर बेकायदेशीररित्या जेसीबी ‌फिरवून काही लोकांना बेघर करण्यात आल्याचा प्रकार पाथर्डी गावात गुरूवारी (ता.१३) सकाळी घडला. या प्रकरणी मनसेचे नगरसेवक सुदाम कोंबडे यांच्यासह १२ जणांवर इंदिरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

काश्मीरमधील हिमवृष्टीत नाशिकचा जवान सुरक्षित

$
0
0
काश्मीरमध्ये विविध ठिकाणी जोरदार हिमवृष्टी... दोन जवानांसह ११ जणांचा मृत्यू, कुँपवाडात अतिरेक्यांचा हल्ला... अशा दोन `ब्रेकींग न्यूज` जवान नवनाथ दत्तात्रय फापळे यांच्या कुटुंबियांनी पाहिल्या आणि त्यांच्या छातीत धस्स झाले.

काका, आमचे गार्डन दुरुस्त करून द्या!

$
0
0
सिडकोतील रायगड चौकातील शिवनेरी गार्डन दुरुस्त करून सोयी-सुविधा पुरविण्याच्या मागणीसाठी परिसरातील बच्चे कंपनीने थेट महापालिकेचे विभागीय अधिकारी राजेंद्र गोसावी यांना साकडे घातले. बच्चे मंडळीने गोसावी साहेबांना घेराव घालून आपली कैफियत मांडली.

नाश‌िककरांना गवसणार प्रेरणेचा स्त्रोत

$
0
0
केवळ प्रबळ इच्छाशक्ती आण‌ि तीव्र च‌िकाटीच्या जोरावर डोळसांनाही लाजवेल, अशी प्रगती साधणारे उद्योजक भावेश भाटिया यांच्या संवादाचा उपक्रम उद्या (द‌ि. १५) पार पडणार आहे.

पंचवटी ‘लेट’, प्रवाशांचा उद्रेक

$
0
0
सर्वसामान्यांची आणि चाकरमान्यांची रेल्वेगाडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसला सातत्याने उशिर होत आहे. आजही त्याची पुनरावृत्ती झाल्याने संतप्त प्रवाशांनी स्थानक प्रबंधकांनाच घेराव घातला.

मुक्त विद्यापीठाचे उद्या पदवीदान

$
0
0
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या व‌िसाव्या पदवीदान समारंभाचे आयोजन उद्या (द‌ि. १५) दादासाहेब गायकवाड सभागृहात करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता हा सोहळा होणार आहे.

मोफत डाउनलोडिंगचा ‘अॅपअड्डा’!

$
0
0
स्मार्टफोनसाठी लागणारे विविध प्रकारचे अॅप्स इंटरनेटशिवाय प्ले स्टोअरवरून डाउनलोड करता आले तर? हे आता अशक्य नाही. कारण, त्यासाठी भारतासह जगाच्या बाजारात लवकरच येत आहे ‘अॅपअड्डा’.

थैमान सुरूच

$
0
0
गेल्या दोन आठवड्यांपासून बेमोसमी पाऊस व गारपिटीच्या माऱ्याने हवालदिल झालेल्या नाशिक जिल्ह्यातील बळीराजाला गुरुवारी पुन्हा वादळी वारे, पाऊस व गारपीट या तिहेरी आपत्तीने तडाखा दिला.

तुम्ही बोला, आम्ही ऐकतोय

$
0
0
म्हणतात वक्ता दशसहस्त्रेषु परंतु तो त्या तोडीचा असेल तर या उपमेला अर्थ आहे. एखाद्याला मात्र व्यासपीठ मिळालं व तो जरासा अविचारी असला तर तो काय बोलेल ते सांगता येत नाही बरं त्याच्या हेदेखील लक्षात येत नाही की तो समोरच्याचा अपमान आहे.

ऑनलाइन शॉपिंगकडे वाढला कल

$
0
0
सध्या ऑनलाइन शॉपिंगचा ट्रेंड वाढलेला दिसतो. याचं मुख्य कारण म्हणजे डिस्काउंट, ऑफर्स, वेळेची बचत, नवे ब्रँड आणि घरपोच वस्तू मिळण्याची हमी. मात्र, अशा प्रकारची शॉपिंग करताना फसवणूक होण्याची शक्यता जास्त असते.

शिवजयंतीवर आचारसंहितेचे सावट

$
0
0
शिवजयंतीचा उत्सव अवघ्या पाच दिवसांवर आला असला तरी आचारसंहितेमुळे यंदा हा उत्सव जल्लोषात साजरा करता येऊ शकेल की नाही याबाबत शिवप्रेमींमध्ये संभ्रम आहे. शिवजयंतीवर आचारसंहितेचे सावट असल्याने शिवप्रेमींच्या उत्साहावर पाणी फिरण्याची शक्यता असून साधेपणानेच हा उत्सव साजरा होण्याची शक्यता बळावली आहे.

बंद सोनोग्राफी केंद्रामुळे रुग्णांची हेळसांड

$
0
0
कळवण उपजिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी केंद्र कित्येक दिवसांपासून बंद असून यासाठी उपलब्ध असणारा निधीही पडून आहे. सर्व आधुनिक साधनसामग्री धूळखात पडून असताना जिल्हा प्रशासनाला कुणी सोनोग्राफी तज्ज्ञ मिळालेला नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

जोरण फाट्याजवळ आढळले बछडे

$
0
0
सटाणा-डांगसौंदाणे रस्त्यावरील जोरण फाट्याजवळ दुपारी चार वाजेच्या सुमारास बिबट्याचे बछडे आढळून आले. ऊसतोड सुरू असताना ऊसतोड कामगारांना आढळलेले हे बछडे वनविभागाच्या अधिका-याकंडे सुपूर्द करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांच्या घेरावामुळे उडाला गोंधळ

$
0
0
गारपीटग्रस्त भागाची पाहणी आणि पीडित शेतक-यांशी चर्चा करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाचा पाहणी दौरा तीन शेतक-यांची भेट वगळता बंद काचेच्या कार मधूनच झाल्याने केवळ फार्स ठरला. मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या भागाकडे पथक फिरकलेच नसल्यामुळे त्या भागातील शेतक-यांनी पथकाला घेराव घालण्याचा प्रयत्न केल्यामुळे गोंधळ उडाला होता.

हत्याप्रकरणी तिघांना कोठडी

$
0
0
पंचवटीत प्रवीण उर्फ समीर सुरेश हांडे (२४, रा. शिवनगर, कोठारवाडी) या तरुणाची गोळ्या झाडून हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता, तिघांनाही २० मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. अमोल चांगले, विनोद उर्फ पप्पू खैरे (रा. गणेशवाडी) आणि प्रवीण कुमावत (रा. क्रांतीनगर) अशी त्यांची नावे आहेत.

कॅरीबॅग विरोधात कारवाईचा बडगा

$
0
0
पर्यावरणास घातक ठरणाऱ्या ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरीबॅग बाळगणाऱ्या दोघा व्यवसायिकांविरोधात महापालिकेने कारवाई करीत दहा हजार रूपयांचा दंड वसूल केला. गुरूवारी रविवार कारंजा भागात ही कारवाई करण्यात आली.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images