Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

वाहनतळांची वसुली साइड ट्रॅकला

0
0
महापालिकेच्या जागेवर सुरू असलेल्या वाहनतळांच्या लायसन्स फी वसुलीकडे प्रशासनाने सपशेल दुर्लक्ष केले आहे. यंदाच्या वर्षात २९ टक्के वसुली करणेसुद्धा महापालिकेला शक्य झाले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

चला, ई- साहित्य संमेलनाला!

0
0
इंटरनेट हे आजचं आणि भविष्याचं माध्यम आहे. मोबाइलवर इंटरनेट आल्यानंतर ज्या गतीने इंटरनेटचा प्रसार होतो आहे तो बघता या समकालीन माध्यमाशी नुसताच परिचय नाही तर चांगली मैत्री असायला हवी.

मराठी बाणा

0
0
नाशिक शहर हे सांस्कृतिक म्हणूनही ओळखले जाते. शहरात अनेक सांस्कृतिक घडामोडी, घटना आणि कार्यक्रम हे सातत्याने होत असतात. असाच एक कार्यक्रम काही दिवसांपुर्वी कालिदास कलामंदिरात झाला.

उत्सवांची सरमिसळ झाल्याने...!

0
0
महाराष्ट्र हा उत्सवप्रिय लोकांचा देश आहे. सण कोणताही असो त्याचे उत्सवी स्वरूप येथील कलारसिक माणसांना आनंद देते. होळी, धुळवड आणि रंगपंचमी हे तीन उत्सव यापैकीच. उन्हाळ्याच्या सुरूवातीला येणारे हे तीन उत्सव गेल्या काही वर्षांपासून मात्र गोंधळाच्या वातावरणातच पार पडताना दिसत आहेत.

के.के.वाघ स‌िव्हील ड‌िपार्टमेंटतर्फे उद्यापासून ‘फोर्स २०१४’

0
0
के.के.वाघ इंज‌िनीअरिंग एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्ट‌िट्युटच्या वतीने बुधवारपासून (द‌ि.१९) दोन द‌िवसीय ‘फोर्स २०१४’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात सहभागी होणारे व‌िद्यार्थी व‌िव‌िध प्रोजेक्ट्स सादर करणार आहेत.

जाहिराती उदंड, कराची वसुली मात्र थंड

0
0
आचारसंहिता लागू झाल्यापासून महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने होर्डिंग्ज, फलक तसेच जाहिरातींचे बोर्ड काढून टाकण्याची मोहिम सुरू केली आहे. हजारो होर्डिंग्ज हटविण्यात आले.

खोट्या मृत्युपत्राद्वारे फसवणूक

0
0
वडिलांचे खोटे मृत्यूपत्र तयार करून जमीन बळकावण्याच्या उद्देशाने त्याचा सरकारी कार्यालयात वापर केल्याचा प्रकार आडगावमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.

बिबट्याच्या कातडीसह तरुणाला अटक

0
0
लासलगाव जवळील वनसगाव येथून बिबट्याच्या कातडीसह एकास अटक केली. लासलगाव व सांगली पोलिसांच्या संयुक्त पथकाने सोमवारी सकाळी छापा टाकून ही कारवाई केली. अटक केलेल्या प्रल्हाद सुभाष शिंदे याच्याकडून सुमारे चार लाख रुपये किमतीचे बिबट्याचे कातडे पोलिसांनी जप्त केले.

पारंपरिक वाद्यांच्या गजरात नाचले वीर

0
0
उत्तर महाराष्ट्रात प्रमुख असलेल्या सणापैकी धुलिवंदन हा सण उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी बालगोपाळांनी होळीची राख एकमेकाच्या अंगाला फासून धुलिवंदन साजरे केले तर संध्याकाळी गंगाघाटावर पारंपरिक वाद्यांच्या गजरात वीर नाचवण्यात आले.

एका रात्रीतच कोसळले स्वप्नांचे इमले

0
0
सावकाराकडून तीन टक्के दराने दीड लाख रुपये कर्ज घेतले. कमी पाण्यावर ठिबक सिंचन करून कांद्याची लागवड केली. जोमाने उभे असलेले पीक पाहुन पैशांची आकडेमोड होऊ लागली. दोन वर्षांपूर्वी कौले टाकली.

समृध्द ग्राम योजना कागदावरच ‘समृध्द’

0
0
शासनाच्या पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजनेमधून लाखो रुपये खर्च करून लावण्यात आलेली झाडे अनेक गावात देखभालीअभावी नष्ट झाली आहेत. ही योजना कागदोपत्रीच ‘समृध्द’ ठरली असून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची नागरिकांमध्ये चर्चा होत आहे.

शिकाऱ्यांमुळे मोरांचे अस्तित्व धोक्यात

0
0
कळवण तालुक्याचे कोकण म्हणून समजल्या जाणाऱ्या पश्चिम डोंगराळ परिसरातील निसर्गसंपन्न परिसरात मोरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तथापि, शिकाऱ्यांकडून मोरांची हत्त्या होत असून, या देखण्या व राजबिंड्या पक्ष्याचे संरक्षण करण्याचे मोठे आव्हान वनविभागापुढे उभे ठाकले आहे.

सिन्नरला वेगवेगळ्या अपघातात ६ ठार

0
0
सिन्नर-पुणे व शिर्डी महामार्गावर होळी पौर्णिमेच्या दिवशी झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. एका अपघातात पित्यासह पुत्राचा मृत्यू झाला. तर, डंपरने धडक दिल्याने मोटरसायकलवरील बिहारमधील तिघे बांधकाम मजूर जागीच ठार झाले. तसेच, कार उलटी झाल्याने एका महिलेचा मृत्यू झाला.

दारुसाठी मुलाकडून आईचा खून

0
0
दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने आपल्या जन्मदात्या मातेचा गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना मालेगाव तालुक्यातील पाटणे येथे घडली. सगुणाबाई महारू खैरनार (वय ६५) हे त्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे.

येवल्यात कांद्याच्या भावात घसरण

0
0
कधी या तर कधी त्या अनेक कारणांनी यापूर्वी अनेकदा नगदी पीक समजल्या जाणाऱ्या कांदा बाजारभावत घसरण होताना उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी लागलेले शुक्लकाष्ट आताही संपण्याच्या मार्गावर दिसत नाही.

दूषित पाणी होणार स्वच्छ

0
0
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीने नवीन शंभर एकर जागेत उभारलेल्या हायटेक बाजार आवारावर सुमारे तीस लाख रुपये खर्च करून दूषित व सांडपाणी शुध्दीकरण प्रकल्प उभारला आहे. तसेच हा जलशुध्दीकरण प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे.

नाशिकरोडला होतेय झाडांची कत्तल

0
0
व्यवसाय किंवा दुकानांची जाहिरात करणारे होर्डिंग्ज दिसावेत, म्हणून नाशिकरोड परिसरात सर्रासपणे झाडांवर कु-हाड चालवली जात आहे. या प्रकारांमुळे वृक्षप्रेमी तसेच नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. महापालिका हेतूपूर्वक वृक्षतोडीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे.

उद्‌घाटन झाले, पण कोणी नाही पाहिले!

0
0
श्रेयाच्या चढाईवर नेहमी अग्रेसर राहणारे लोकप्रतिनिधी वेळेप्रसंगी विरोधकांच्या कामांचेही श्रेय लाटतात. ही श्रेयवादाची लढाई मुद्द्यावरून गुद्यावर आल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. मात्र, सातपूरमधील प्रभाग १७ मधील नागरिकांना सध्या नेमका उलट अनुभव येत आहे.

सिडको प्राधिकरणची शाळा मोडकळीस

0
0
सिडकोमधील गणेश चौकातील सिडको प्राधिकरणची शाळा मोडकळीस आली आहे. अनेक वर्षे महापालिकेची जागा याच इमारतीत होती. मात्र, आता तिच्या दुरुस्तीबाबत अनेकदा सांगूनही महापालिका लक्ष देत नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

विभागीय आयुक्तालयात अशुद्ध पाण्याचा पुरवठा

0
0
पाच जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या विभागीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाण्याचा पुरवठा होत नसल्याने अनेकांना जवळच्या कॅन्टीनमधून पाणी विकत घ्यावे लागत आहे. शुध्द पाणी मिळावे अशी कर्मचाऱ्यांची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images