Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

​मनसे कार्यकर्त्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा

$
0
0
आचारसंहिता लागू असतानाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराचा प्रचार होईल अशा प्रकारे आक्षेपार्ह वर्तन केल्याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी मुंबईनाका येथे युवक मित्र मंडळाचा अध्यक्ष वाल्मिक मोटकरी यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

​मायावतींची पुढील आठवड्यात सभा

$
0
0
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर बसपच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांची सभा नाशिकमध्ये पुढील आठवड्यात होत आहे. राष्ट्रीय नेत्याची या निवडणुकीतील पहिलीच सभा नाशकात होत असल्याने निवडणुकीचा धुराळा या सभेपासून उडण्याची चिन्हे आहेत.

राजकीय पदाधिकाऱ्यांनाही प्रतिबंधात्मक नोटीस

$
0
0
लोकसभा निवडणूक निर्विघ्न पार पाडण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली असून, गेल्या लोकसभा निवडणुकीत गोंधळ निर्माण करणाऱ्या राष्ट्रवादी व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक कारवाईचा भाग म्हणून नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

गारपीटग्रस्तांच्या मदतीसाठी माकपचा मोर्चा

$
0
0
जिल्ह्यात अवकाळी पाऊस अन् गारपिटीने थैमान घातल्याने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी भरपाई मिळावी, यासह विविध मागण्यांसाठी माकपाने शहरातून मोर्चा काढला होता. गोल्फ क्लब येथून मोर्चाला गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमाराला सुरुवात करण्यात आली.

खडसे-महाजन ठिणगीचा विद्यमान खासदारांनाच ‘चटका’!

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा उपाध्यक्ष अनिल चौधरी यांच्या भाजप प्रवेशावरून विधानसभा विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे आणि प्रदेश उपाध्यक्ष गिरीष महाजन या जळगाव जिल्ह्यातील नेत्यांमधील अंतर्गत वाद पुन्हा उफाळून आलेले आहे.

गोरक्षणासाठी ‘उज्ज्वल’चा पुढाकार

$
0
0
दरवर्षी कमी होणारा पाऊस, सातत्याने दुष्काळाचे सावट, चारा व पाणी टंचाई यामुळे शेतकऱ्यांना आता पशुधन सांभाळणे कसोटीचे ठरत असून ग्रामीण भागात आता पशुधन कमी होत आहे.

‘मोहन’साठी कृतज्ञता दिन

$
0
0
अस्मानी संकटाला सामोऱ्या जाणाऱ्या बळीराजाने कृषीधनाविषयी कृतज्ञता व्यक्त करायला सुरुवात केली असून अर्जून देवराम जाधव या शेतकऱ्याने चक्क आपल्या घोड्याचे श्राध्द करण्याचे निश्चित केले आहे.

खान्देशच्या मातीचे ऋण फेडणारा ‘मोल’

$
0
0
खानदेशातील बोलीभाषा म्हणजे अहिराणी. इतर भाषांपेक्षा अहिराणी या भाषेत दर्जेदार चित्रपट जवळजवळ नाहीच. जे काही आहेत ते फक्त सी डी लेव्हल चे चित्रपट. मात्र मराठी आणि हिंदी चित्रपटांची बरोबरी करू शकेल असा सुमारे एक कोटी रुपये बजेट असणारा अहिराणी भाषेतील पहिला ‘मोल’ हा चित्रपट येत्या मे मध्ये रिलीज होणार आहे.

दरवर्षी खोदल्या जातात ७०० विहिरी

$
0
0
घटते पर्जन्यमान, दिवसेंदिवस घटत चाललेली भूजल पातळी तसेच दुष्काळी परिस्थतीमुळे येवला तालुक्यात शेतकरी शेती सिंचनासाठी पाण्याचा शोध सातत्याने घेत असतात. पाण्याच्या शोधात तालुक्यात दरवर्षी सुमारे ७०० विहिरी खोदल्या जात असल्याचे भयानक चित्र आहे.

सातपूर, सिडकोत नळ जोडण्यांना सील

$
0
0
सातपूर, सिडको भागात महापालिकेने कर वसुलीची मोहीम तीव्र केली आहे. थकबाकीदारांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्याबरोबरच पाणीपट्टी थकीत असलेल्यांच्या नळ जोडण्या बंद करण्यात आल्या आहेत.

चित्रपट महोत्सवाला ‘नब्बे’ने झाली सुरुवात

$
0
0
‘नब्बे... एव्हरी सेकंड काऊंटस्’ या ९० मिनिटांच्या चित्रपटाने सहाव्या नाशिक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सुरुवात झाली. उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ अभिनेते नागेश भोसले, डॉ. राधिका शुक्ल, सई रानडे, संजय शेजवळ, रिषी बुटाणी, विशाल पाटील यांची उपस्थिती होती.

महासभा तहकूब

$
0
0
महापालिकेची सर्वसाधारण मासिक सभा गुरूवारी पार पडली. आयुक्तांच्या गैरहजेरीवरून विरोधकांनी टिकेची झोड उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर लागलीच ही सभा तहकूब करण्यात आली.

१६५ गावांना भेडसावणार पाण्याचे दुर्भिक्ष

$
0
0
यंदा समाधानकारक पाऊस झाला असला तरी एप्रिल ते जून या काळात जिल्ह्यातील १६५ गावांना पाण्याचे दुर्भिक्ष राहणार आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने तसा अहवालच जिल्हाधिकाऱ्यांना दिला असून, या गावांची टँकरवरच भिस्त राहण्याची चिन्हे आहेत.

प्रतिज्ञापत्रासाठी महापालिकेला पुन्हा मिळाली मुदतवाढ

$
0
0
एलईडी प्रकरणात वीज बचतीबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी महापालिकेला मुंबई हाय कोर्टाने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. येत्या सोमवारपर्यंत महापालिकेला मुदत मिळाली असून, त्यावर येत्या १ एप्रिलला सुनावणी होणार आहे.

वडांगळीत निघाली जावयाची धिंड

$
0
0
सिन्नर तालुक्यातील वडांगळी येथे होळीच्या निमित्ताने पारंपरिक पद्धतीने गाढवावर बसून जावयाची धिंड बुधवारी काढण्यात आली. वडांगळी येथील धोंडू रंगनाथ खुळे यांचे जावई अशोक रामनाथ शिरोळे (रा. पोहेगाव ता. कोपरगाव, सध्या कीर्तांगळी) यांना यंदा ग्रामस्थांनी राजी केले.

आज भुसावळ-पुणे रद्द

$
0
0
कसारा लोकलचे पाच डबे गुरुवारी दुपारी घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांचे मोठे हाल झाले. तसेच गुरुवारची गोदावरी एक्सप्रेस आणि शुक्रवारची भुसावळ-पुणे रेल्वेगाडी रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.

उमेदवारांची ‘सोशल’ तयारी

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष प्रचाराला अद्याप सुरुवात झाली नसली तरी प्रचारात कुठेही कमी पडू नये यासाठी उमेदवार जोरदार तयारी करत आहेत. स्वतःची वेबसाइट तयार करण्यासह फेसबुक, टि्वटरसारख्या सोशल साइटवर अकाउंट सुरू करण्यात येत आहे.

कांदा यंदाही रडवणार

$
0
0
वारंवार कोसळणारा अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे उन्हाळ कांद्यासाठी प्रसिध्द असलेल्या नाशिक जिल्ह्यात यंदा दर्जेदार कांदा उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. राज्यात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड वाढल्यामुळे २० लाख टन अधिक उत्पादन वाढणार होते.

सीप्लेनचाही नाशिकला बायपास

$
0
0
ओझर येथील पॅसेंजर टर्मिनल सज्ज झाले तरी तेथून प्रवासी विमानसेवेची प्रतीक्षा असतानाच गंगापूर धरणाच्या ठिकाणाहून उत्कंठा असलेली सीप्लेनची सेवाही नाशिककरांसाठी धूसर होत आहे.

येवला तालुक्यात २० कोटींचे नुकसान

$
0
0
गारपिटीने तालुक्यात झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे कृषी विभागाने पंचनामे पूर्ण केले आहेत. याबाबतचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात आला असून ३६ गावांना गारपिटीचा फटका बसला आहे. तालुक्यातील ८ हजार ३८५ शेतकऱ्यांचे एकूण तीन हजार ९०६ हेक्टर क्षेत्र गारपिटीने बाधित झाले आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images