Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पत्नीची आत्महत्या; पतीला अटक

0
0
वेळोवेळी पैशांची मागणी करून पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या संशयावरून पोलिसांनी पतीला अटक केली आहे. चंद्रकांत विष्णु आव्हाड ( वय ४१, रा. अशोकनगर, सातपूर) असे त्याचे नाव आहे. आशा चंद्रकांत आव्हाड (वय ३८, रा. प्रितेश पार्क सोसायटी, जाधव संकुल) असे आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचे नाव आहे.

घोलपांना आणखी एक धक्का

0
0
माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप यांना शुक्रवारी सेशन्स कोर्टाने बेहिशेबी मालमत्तेच्या खटल्यात तीन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावल्यानंतर शिर्डी लोकसभा मतदारसंघातून भाजपचे माजी आमदार सदाशिव लोखंडे व काँग्रेसचे नेते प्रेमानंद रूपवते यांच्यात शिवसेनेच्या उमेदवारीसाठी स्पर्धा लागली आहे. दरम्यान, पुतणे रविकिरण घोलप यांनी 'राष्ट्रवादी'त जाण्याचे ठरविल्याने घोलप यांना आणखी एक कौटुंबिक धक्का बसला आहे.

जलदिनालाच गळती

0
0
जगभरात शनिवारचा (२२ मार्च) दिवस जागत‌िक जलदिन म्हणून साजरा होत असला तरी नाशिकमध्ये मात्र जलदिनालाच गळती लागल्याचे चित्र शहरातील विविध भागात पहायला मिळत होते. जागोजागी फुटलेल्या जलवाहिन्या अन् वाया जात असलेले हजारो ल‌िटर पाण्यामुळे काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत होता.

जिल्हाभरात रंगोत्सव साजरा

0
0
एकमेकांवर सप्तरंगांची उधळण करत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच शुक्रवारी रंगपंचमीचा आनंद लुटला. जिल्ह्यातील विविध भागात रंगोत्सवाचे सामने रंगले होते.

‘ई पीजीकॉन’ उपक्रम प्रेरणादाय‌ी

0
0
‘अभ‌ियांत्र‌िक‌ी‌ क्षे‌त्रात व‌िद्यार्थ्यांची प्रगती घडवून आणण्यासाठी सृजनात्मक संकल्पना अत्यंत महत्त्वाच्या असतात. ‘ई पीजीकॉन’ सारखी कॉन्फरन्स अशा संकल्पनांच्या न‌िर्मितीसाठी प्रेरणादायी ठरते आहे,’ असे प्रत‌िपादन प्राचार्य व पुणे व‌िद्यापीठ अभ‌ियांत्र‌िकी शाखेचे अध‌िष्ठाता डॉ. गजानन खराटे यांनी केले.

न्यायदान हे आव्हानात्मक क्षेत्र

0
0
‘न्यायदानाचे क्षेत्र आव्हानात्मक आहे. वकील ते न्यायाधीशापर्यंतची वाट कठीण आहे, मात्र अशक्य नाही. म्हणूनच अनेकांनी ही वाट सर करून न्यायदानाच्या क्षेत्रात भक्कमपणे पाय रोवले आहेत.

‘मोबाइल कॉन्फ्लुएन्स’ आज

0
0
मोबाइल फोनने संपूर्ण विश्वच हातात सामावले आहे. या छोट्याशा स्मार्टफोनद्वारे आपण अशक्यप्राय बाबीही करु लागलो असून आपल्या जगण्याला मोठी गती मिळाली आहे. त्यामुळे मोबाइल तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर करण्याचीही मोठी संधी आहे.

सप्तरंगात रंगले नाशिककर

0
0
कुठे पारंपरिक रहाडीत एकमेकांना डुबविण्यासाठी सुरू असलेली चढाओढ तर कुठे डीजेच्या तालावर थिरकत अंगावर रंगीत पाण्याचे फवारे झेलणारे अबालवृध्द अशा जल्लोषमय वातावरणात शहरात शुक्रवारी रंगपंचमीचा सण उत्सवात साजरा झाला.

सभांची रणधुमाळी

0
0
भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, आम आदमी पक्षाच्या समन्वयक अंजली दमानिया, केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल अशा मातब्बरांनी शनिवारी लोकसभा निवडणुकीसाठी विदर्भात आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. त्याचवेळी मराठवाडा, अहमदनगर येथे शरद पवार, मेधा पाटकर यांच्या प्रचारसभांची रणधुमाळी सुरू होती.

घोलपांना आणखी एक धक्का

0
0
माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप यांना शुक्रवारी सेशन्स कोर्टाने बेहिशेबी मालमत्तेच्या खटल्यात तीन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावल्यानंतर शिर्डी लोकसभा मतदारसंघातून भाजपचे माजी आमदार सदाशिव लोखंडे व काँग्रेसचे नेते प्रेमानंद रुपवते यांच्यात शिवसेनेच्या उमेदवारीसाठी स्पर्धा लागली आहे.

​नाशकात मनसेचे कार्यालय झाकले

0
0
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराबरोबरच सत्ताधारी व विरोधक अशा सुंदोपसुंदीलाही सुरुवात झाली आहे. निवडणुकीची आचारसंहिता सर्व पक्षांना लागू असताना केवळ सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली प्रशासन मनसेला टार्गेट करत असल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे.

बुरा ना मानो...

0
0
काही लोकांना रंगांची फारच अॅलर्जी असते. पण कधीतरी त्यांचा चांगलाच पोपट होतो. असेच किस्सा परवा रंगपंचमीला झाला. शहरात विविध मंडळांकडून रंग खेळण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

धक्के पे धक्का

0
0
आजपासून बरोबर महिन्याने नाशिक, दिंडोरी व धुळे मतदारसंघांसाठी मतदान होत आहे. नाशकात षटकोणी, दिंडोरीत त्रिकोणी तर धुळ्यात कदाचित चौरंगी लढत होईल. आगामी तीस दिवसांत भारताचे राजकीय भवितव्य घडविणाऱ्या मुद्यांची घुसळण होईल. या मंथनातून जे काही बाहेर येईल, त्याचा फैसला पावणेदोन महिन्यांत होईल.

‘वसंतस्मृती’ला मिळणार झळाळी

0
0
लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्ष कार्यालय सज्ज होत असताना एनडी पटेल रोडलगतचे ‘वसंतस्मृती’ हे भाजप मध्यवर्ती कार्यालयही कात टाकत आहे. काळानुरुप बदलानुसार कार्यकर्त्यांची गरज लक्षात घेत भाजपतर्फे या मध्यवर्ती कार्यालयाचे नुतनीकरण करण्यात येत आहे.

आयुक्तांविरोधात आणखी तीन तक्रारी

0
0
आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी चौकशी सुरू असलेल्या महापालिका आयुक्त संजय खंदारे यांच्याविरोधात आणखी तीन तक्रारी निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्या आहेत.

बारा हजार नव्या मालमत्ताधारकांची नोंद

0
0
मालमत्ता कराला इमारत पूर्णत्व दाखल्याशी संलग्न केल्यापासून महापालिकेकडे नवीन १२ हजार ३८४ मालमत्ताधारकांची नोंद झाली आहे. यंदाच्या (२०१३-१४) आर्थिक वर्षापासून इमारत पूर्णत्व दाखला आणि मालमत्ता कराची सांगड घालण्यात आली असून, याचा महसूल वाढीला कितपत फायदा होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

युवतीचा विनयभंग; दोघांवर गुन्हा

0
0
कॉलेजरोड येथील एका हॉटेलमध्ये युवतीचा विनयभंग करण्यात आला. शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास हा प्रकार घडला. एका १७ वर्षीय युवतीने दिलेल्या फिर्यादीनुसार वत्सल भरत कोटेचा व त्याच्या मैत्रिणीवर सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

वाडा कोसळल्याने मुलगा जखमी

0
0
सराफ बाजार येथील एका पडक्या वाड्याचा काही भाग रविवारी सायंकाळी कोसळला. त्यामध्ये एक मुलगा जखमी झाला असून तो खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.

आरोपीची पोलिसांच्या हातावर तुरी

0
0
वैद्यकीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलेला आरोपी आडगाव पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला. रविवारी सायंकाळी हा प्रकार घडला.

निकृष्ट कोळशाने एकलहरेत बिघाड

0
0
एकलहऱ्याच्या औष्णिक वीज केंद्रातील दोन संच तांत्रिक बिघाडामुळे बंद पडल्याने नॅशनल ग्रीडला होणारा विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. राज्यातील औष्णिक केंद्रांना होत असलेला निकृष्ट दर्जाच्या कोळश्यामुळे ही परिस्थिनती उद्भवत असून संपूर्ण राज्यात ८ संच बंद पडले आहेत.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images