Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

जातीच्या बनावट कागदपत्रांसह दलाल ताब्यात

0
0
सटाण्याच्या तहसीलदारांच्या निवासस्थानासमोर दलालाने थाटलेल्या दुकानावर मंगळवारी महसूल पथकाने छापा टाकून बनावट प्रमाणपत्र हस्तगत केल्याने खळबळ उडाली आहे. दलालाला पोलिसांच्या ताब्यात दिले असून बोगस जातीचे दाखल्यांचे बनविणारे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.

किस्सा ‘आप्पां’चा

0
0
लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाची तारीख महिनाभरावर आल्याने सर्वच उमेदवार जोमाने कामाला लागले आहेत. यात निवडणूक प्रचारासंबंधीची माहिती विविध परवानग्यांसदर्भात उमेदवार किंवा त्यांच्या समर्थकांना निवडणूक अधिकाऱ्यांकडे जावं लागतंय.

आंदोलनानंतर कांदा भावात सुधारणा

0
0
सटाणा बाजार समितीत सोमवारच्या कांदा २५ पैसे किलोने लिलाव पुकारणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसल्यानंतर मंगळवारी कांद्याच्या भावात सुधारणा होऊन कमीत कमी सत्तर पैसे किलोने लिलाव पुकारण्यात आला.

वाळूचे सहा ट्रॅक्टर जप्त

0
0
अभोणा शिवारातील गोसराने येथील वाळू लिलावावर बेकायदेशीर वाळू उपसा करणारे ट्रॅक्टर कळवणचे पोलिस उपअधीक्षक सचिन गुंजाळ यांनी पकडून अभोणा पोलिसात जमा केल्याने वाळू चोरामध्ये खळबळ उडाली आहे. महसूल यंत्रणेचे काम आता कायदा सुव्यवस्था पाहणारे करू लागल्याची चर्चा तालुक्यात होत आहे.

भरदिवसा शेतकऱ्याचे दीड लाख लुटले

0
0
पिंपळगाव बसवंत येथील रानमळा परिसरात दोन पल्सर मोटरसायकलवर आलेल्या चार ते पाच जणांच्या टोळक्याने भर दुपारी दावचवाडी (ता. निफाड) येथील एका शेतकऱ्याची सुमारे एक लाख साठ हजार रुपयांची लूट केल्याने शेतकरी, व्यापारी यांच्यासह परिसरात घबराट पसरली आहे.

बॅच बनविण्याचा छंदच बनला व्यवसाय

0
0
येवला शहरातील उत्साही व होतकरू तरूण मुकेश लचके यास प्रारंभपासून चित्रकलेची आवड होती. कलादृष्टी असलेल्या मुकेशला रंगीबेरंगी बॅचेस (बिल्ले) तयार करण्याचा छंद जडला. हा छंद बघता बघता व्यवसाय कधी बनला हे त्यालाही कळाले नाही.

द्वारका चौक घेणार मोकळा श्वास!

0
0
चुकीच्या नियोजनामुळे अपघातप्रवण झालेला द्वारका चौक काही प्रमाणात मोकळा श्वास घेणार आहे. या चौकातील वादग्रस्त वाहतूक बेटाचा आकार कमी करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. सध्या या ठिकाणी सकाळी आणि सायंकाळच्या सुमारास प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे.

अन्यथा आंदोलन छेडू

0
0
आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी तक्रार करूनही याप्रकरणाची चौकशी होत नसेल तर २७ मार्च पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा संजय चव्हाण यांनी दिला आहे. दरम्यान, महापालिका आयुक्तांनी सहा तक्रारीपैकी तीन तक्रारींचा खुलासा मंगळवारी निवडणूक अधिकाऱ्यांना सादर केला.

प्रभाग सभापती निवडणुकीवर लोकसभेचे पडसाद?

0
0
महापालिकेच्या सहा प्रभाग समिती सभापतीपदासाठी येत्या २८ व २९ तारखेस निवडणूक होणार आहे. लोकसभा निवडणुकीचे पडसाद प्रभाग समिती सभापतीच्या निवडणुकीवर पडणार असल्याने प्रमुख पक्षांची गोची झाली आहे.

सुधारित बजेट कोलमडणार?

0
0
एलबीटीसह घरपट्टी आणि पाणीपट्टी बिले वसुलीला लागलेल्या ब्रेकमुळे महापालिकेचे सुधारित बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. सध्य:स्थितीत महापालिकेला ६५ कोटी रूपयांची देणी द्यावी लागणार असून भूसंपादानासाठीही मोठा खर्च होण्याची शक्यता आहे.

‘ओआयव्ही’ समन्वयकपदी होळकर

0
0
इंडियन ग्रेप प्रोसेसिंग बोर्डाचे अध्यक्ष जगदीश होळकर यांची इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ वाईन अँड वाइन या संस्थेच्या बेदाणा क्षेत्राच्या समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

रस्ते अपघातात ६६२ जणांचा बळी

0
0
नाशिक शहरात अपघाताच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून २०१३ मध्ये झालेल्या अपघातात ६६२ नागरिकांचा मृत्यू झाला. तर ४५४ नागरिक गंभीर जखमी झाल्याची माहिती वाहतूक विभागाकडून देण्यात आली आहे.

अन्नसुरक्षेसाठी महिलांचा ठिय्या

0
0
वडाळागावातील रेशन दुकानांकडून अन्न सुरक्षा योजनेची अंमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ तेथील महिलांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर मंगळवारी ठिय्या आंदोलन केले.

गारपीटग्रस्तांना लाखाची मदत

0
0
पंचवटी एक्सप्रेसमधील सी- ३ या आदर्श कोचचा वर्धापनदिन २८ मार्चला साध्या पद्धतीने साजरा होत आहे. यानिमित्ताने अनावश्यक खर्च टाळून एक लाख एक हजार एकशे अकर रुपयांचा निधी राज्यातील गारपीटग्रस्तांना देण्यात येणार असल्याची माहिती रेल परिषदेचे अध्यक्ष बिपिन गांधी यांनी दिली.

नाशिकरोडला उद्या पाणीपुरवठा नाही

0
0
ट्रान्सफॉर्मर जोडणीसाठी पंपिंग स्टेशन बंद ठेवावे लागणार असून यामुळे उद्या, २७ मार्च रोजी नाशिकरोडचा पाणी पुरवठा खंडीत करण्यात येणार आहे. तसेच २८ मार्च रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.

आयटी इंजिनीअरचा वधारला भाव

0
0
निवडणुका हायटेक झाल्याने प्रचाराची सर्व यंत्रणा संगणकीकृत झाली असून, तिच्या वापरासाठी सर्व पक्षांना कम्प्युटर इंजिनीअर व ऑपरेटरची चणचण भासू लागली आहे.

भाडेकरू पोलिसांच्या निशाण्यावर

0
0
दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर घरमालकांनी भाडेकरूंची माहिती पोलिस स्टेशनला कळवावी अन्यथा घरमालकाविरोधात थेट गुन्हे दाखल करणार असल्याचा इशारा शहर पोलिसांनी दिला आहे. यापूर्वी काही अतिरेक्यांनी भाडेकरूंच्या रूपानेच शहरात आश्रय घेतल्याचे समोर आले होते.

टोमॅटो दीड रुपया किलो!

0
0
अस्मानी संकटाला सामोरे जाणाऱ्या शेतकऱ्यांना आता सुलतानी संकटाला तोंड द्यावे लागत आहे. सटाण्यात २५ पैसे ‌किलो दराने कांदा पुकारल्याने शेतकरी संतप्त झाल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी घोटी बाजार समितीत टोमॅटोची विक्रमी आवक झाल्याने भाव कोसळले.

उमेदवारांची नजर असंतुष्टांवर

0
0
नाशिक लोकसभा मतदारसंघातील बहुरंगी लढत पाहता प्रत्येक मत महत्त्वाचे असल्याने सर्व पक्षांचे उमेदवार मतांची जुळवाजुळव करत आहेत. शहरभर दौऱ्यांसह विविध नेते-पदाधिकाऱ्यांच्या भेटींचा सपाटा उमेदवारांनी लावला आहे.

‘राष्ट्रवादी’ उद्या फोडणार नारळ

0
0
लोकसभा निवडणुकीसाठी विविध पक्ष आपल्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत बैठका व मेळाव्यांवर भर देत असताना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला स्थानिक पदाधिकाऱ्यांसह उमेदवारांच्या दौऱ्यावर समाधान मानावे लागते आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images