Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

गारपिटीने केले हेक्टरावर नुकसान

0
0
जिल्ह्यात २४ फेब्रुवारी ते १६ मार्च या काळात झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात एक लाख हेक्टर क्षेत्रावर शेतपिकांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

उत्तराखंड सरकारकडून नवाल कुटुंबियांना मदत

0
0
गेल्या वर्षी केदारनाथ येथील प्रलयात बेपत्ता झालेल्या नवाल दांपत्याच्या कुटुंबियांना उत्तराखंड सरकारने आर्थिक मदत दिली आहे. उत्तराखंड सरकारकडून साडेतीन लाख रुपयांचा धनादेश जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला होता. हा धनादेश नवाल कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आला आहे.

देवळालीचा पाणीप्रश्न तूर्तास मिटला

0
0
जनक्षोभाची दखल घेत जलसंपदा विभाग देवळाली कॅम्पला पाणीपुरवठा करण्यास राजी झाले आहे. गुरुवारी (ता. २७) दुपारी पाण्याचे एक आवर्तनही सोडण्यात आले. मात्र, हे पाणी कॅम्पमध्ये पोहचण्यास शनिवार उजाडणार असल्याने नागरिकांना तोपर्यंत पाणी टंचाईला तोंड द्यावेच लागणार आहे.

प्रभाग समितीत चुरस कायम

0
0
महापालिकेच्या सहा प्रभाग समिती सभापतीपदासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी विविध पक्षांच्या १८ उमेदवारांनी गुरूवारी आपले अर्ज सादर केले. गेल्या वर्षीच्या तुलनेत अर्जांची संख्या कमी झाली असली तरी निवडणुकीत चुरस कायम आहे.

लोकसभा निवडणुकांमुळे बिनविरोधसाठी शर्थीचे प्रयत्न

0
0
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या सहा प्रभाग समिती सभापती निवडणूका बिनविरोध करता येतील का? याची चाचपणी राजकीय पक्षांकडून सुरू आहे.

टेंडर पास, वर्कऑर्डर नापास

0
0
प्राकलन दरापेक्षा २७ टक्के कमी दराच्या निविीदा ४ महिन्यांपासून मंजूर असताना यासंबंधीचे वर्कऑर्डर देण्यात आलेले नाही. आता आचारसंहिता लागू असल्याने वर्कऑर्डर देण्याचे सोपास्कार आणखी लांबले आहेत. प्रशासनाचा या ढिसाळ कारभाराचा फटका महापालिकेला बसण्याची शक्यता आहे.

किरकोळ वादातून ‌दिंडोरीत तिघांची हत्या

0
0
बारमध्ये झालेल्या वादातून तीन हत्या झाल्याची घटना दिंडोरी तालुक्यात घडली. या प्रकरणात बारमध्ये आलेला एक ग्राहक, हॉटेलमालक आणि त्याचा आचारी ​यांचा खून झाला असून दोनशे ग्रामस्थांनी हॉटेलवर हल्ला चढवल्यामुळे या प्रकरणाने तणावाचे वातावरण असून पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

‘जलसंपदा’ ऑनलाइनच्या वाटेवर

0
0
गेल्या काही वर्षांपासून विशेष चर्चेत असलेल्या आणि राज्यातील मौलिक संपदेची मालकी बाळगणाऱ्या जलसंपदा विभागाला ऑनलाइनचे वेध लागले आहेत. त्यामुळेच ई-जलसेवा या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाद्वारे संपूर्ण विभागाचेच रूपडे पालटणार असून पुढील वर्षात तो पूर्णत्वाला जाण्याची चिन्हे आहेत.

मोकळे भूखंड बनले मद्यपींचे अड्डे

0
0
सिडको, सातपूर परिसरात अनेक ठिकाणी मोकळे भूखंड व रस्त्याच्या कडेला असलेल्या जागा मद्यपींचे अड्डे बनल्याचे दिसून येत आहे. मद्यपींनी पडिक शासकीय इमारतीही सोडल्या नसल्याचे चित्र आहे. पोलिसांनी संवेदनशील भागांमध्ये गस्त घालण्याचे मागणी नागरिक करत आहेत.

गोदामाई पुन्हा खळाळणार

0
0
एकेकाळी गोदामाई झुळझुळ वाहायची. लयबध्द प्रवाहातून उडणारे जलतरंग तिच्या सानिध्यात येणाऱ्या प्रत्येकाच्या मनात आनंदलहरी निर्माण करायचे. आता गोदामाई प्रदूषित झाल्याने आसवे गाळीत आहे. पानवेलींचा फास तिच्याभोवती घट्ट आवळला जात आहे.

‘मोदी PM झाल्यास देशात अराजक’

0
0
गुजरातमध्ये विकास झाला, असे भारतीय जनता पार्टीचे म्हणणे असेल तर ते धादांत खोटे आहे. अशा खोटारड्या भाजपचे सरकार सत्तेवर येऊन मोदी पंतप्रधान झाल्यास देशात अराजकता माजेल आणि पुन्हा जातीय दंगली सुरू होतील, असा शब्दांत बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावतींनी भाजप आणि मोदींवर हल्ला चढवला.

माझ्या जागेवर भुजबळ हवेः पवार

0
0
‘मी राज्यसभेवर गेल्याने लोकसभेत पक्षाची भूमिका कणखरपणे मांडण्यासाठी सक्षम नेतृत्त्व हवे आहे. त्यासाठी छगन भुजबळ यांच्याशिवाय पर्याय नसल्याने आम्ही भुजबळांना दिल्लीत पाठविण्याचा निर्णय घेतला’, असे सांगत केंद्रीय कृषीमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भुजबळांना लोकसभेत पाठविण्यासंबंधीची भूमिका स्पष्ट केली.

‘मोदी पंतप्रधान झाल्यास अराजकता’

0
0
गुजरातमध्ये विकास झाला, हे भाजपचे म्हणणे धादांत खोटे आहे. अशा खोटारड्या भाजपचे सरकार सत्तेवर येऊन मोदी पंतप्रधान झाल्यास देशात अराजकता माजेल आणि पुन्हा जातीय दंगली सुरू होतील, असा शब्दांत बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावतींनी भाजप आणि मोदींवर हल्ला चढवला.

यात्रेची तयारी जोरात, मंदिर मात्र दुर्लक्षित

0
0
सातपूरमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने होणाऱ्या यात्रेची तयारी जोरात असली तरी ग्रामदेवता असलेल्या प्राचिन मारूती मंदिराकडे मात्र आयोजक व महापालिकेकडून दुर्लक्ष झाले आहे. यात्रेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असली तरी या मंदिराकडे लक्ष द्यायला कुणीही तयार नाही.

नाशिकरोड पोलिस स्टेशनचा फोन नॉट रिचेबल!

0
0
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अधिक सतर्क राहायला हवे. त्याचबरोबर संवादाची माध्यमेही सुस्थितीत असणे आवश्यक आहे. मात्र, नाशिकरोड पोलिस स्टेशनमधील टेलिफोन गेल्या आठ दिवसापासून बंद आहे. नाशिकरोड विभाग हा बील न भरल्याने गेल्या आठ दिवसांपासून टेलिफोन बंद आहे.

`बॉश`च्या पदाधिकाऱ्यांकडे पुढाऱ्यांची रिघ

0
0
औद्योगिक वसाहतीतील मदर इंडस्ट्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बॉश (मायको) कंपनीतील युनियन पदाधिकाऱ्यांच्या उपोषणाला शुक्रवारी (ता.२८) प्रमुख उमेदवारांसह आमदार व विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी भेटी दिल्या. या वेळी कामगारांच्या समस्या जाणून घेतानाच, काही नेत्यांनी त्यांच्या आंदोलनाला पाठिंबाही दिला.

यांचा काय परिचय करून द्यायचा?

0
0
एखाद्या वक्त्याचा परिचय करून देणं ही सर्वात सोपी अन् तितकीच अवघड गोष्ट आहे. सोपी वक्त्यासाठी अन् अवघड परिचय करून देणाऱ्यासाठी. वक्त्याला वाटतं की, आपला तो काय परिचय करून द्यायचा पण परिचय करून देणाऱ्याला वाटतं काय बोलू अन् काय नको कारण त्याला कधीतरी व्यासपीठ मिळतं.

प्रेस कामगारांची मते ठरणार निर्णायक?

0
0
नाशिकरोडच्या दोन्ही प्रेस कामगारांची मते निवडणुकीत मोलाची ठरत असल्याने उमेदवारांनी प्रेसच्या गेटवर कामगारांच्या भेटी घ्यायला सुरुवात केली आहे. यावेळी मात्र प्रेस कामगार काय निर्णय घेतात, याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोघांना अटक

0
0
बेकायदेशीररित्या गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोघांना नाशिकरोड पोलिसांनी अटक केली आहे. शिवाजी महाराज पुतळ्याजवळील सैलानी बाबा चौकात गुरूवारी रात्री अकराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

हत्या प्रकरण : संशयितांना कोठडी

0
0
नाशिक-पेठ रस्त्यावरील गोळशी फाटा येथे हॉटेल आरती येथे झालेल्या तीन जणांच्या हत्येप्रकरणी १५ संशयितांना न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या सर्व जणांना शुक्रवारी दिंडोरीच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images