Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

काळ्या फिल्म बसविणाऱ्यांना कोर्टाचा रस्ता

0
0
उन्हाच्या झळा जाणवू लागल्याने मोटारीवर काळ्या फिल्म लावण्याचा विचार तुम्ही करीत असाल तर सावधान! आता अशी फिल्म लावणे चांगलेच महागात पडू शकते. पूर्वी केवळ १०० रुपयांच्या दंडावर तुम्ही स्वत:ची सुटका करून घेतलीही असेल.

पाणीपट्टीची एका दिवसात विक्रमी वसुली

0
0
पाणीपट्टी बिले वसूल करण्यासाठी महापालिकेने थकबाकीदारांविरोधात मोहीम सुरू करत २ हजार २७ कनेक्शन बंद केले. परिणामी शुक्रवारी दिवसभरात ५२ लाख ८७ हजार रूपयांची विक्रमी वसुली झाली. या आर्थिक वर्षातील ही सर्वांत मोठी वसुली असल्याचे सांगण्यात आले.

आयकर खात्याचीही उमेदवारांवर नजर

0
0
आचारसंहितेदरम्यान निवडणूक आयोगाबरोबरच उमेदवार तसेच कार्यकर्त्यांवर आता आयकर खात्याचीही नजर असणार आहे. कुणी प्रलोभने दाखविण्याचा प्रयत्न केला तर तत्काळ आयकर निदेशक कार्यालयातील तक्रार कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन आयकर खात्यातर्फे करण्यात आले आहे.

कुणी पाणी देता का पाणी?

0
0
काका मला पाणी देता का... मावशी एवढी पाण्याची बाटली भरून द्या ना... असा पाण्यासाठी टाहो फोडण्याची वेळ महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांवर आली आहे. देवळाली गावच्या आठवडे बाजाराजवळ असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाणी नसल्याने दारोदार भटकून पाणी आणावे लागत आहे.

उमेदवार काँग्रेसचा, मेळावा NCPचा

0
0
बागलाण पंचायत समितीतील काँग्रेस आणि भाजप यांच्या अभद्र युतीवर राष्ट्रवादीने आक्षेप घेत दोन दिवसांत हा घरोबा तोडा अन्यथा आम्ही तटस्थ राहू, अशी भाषा करणाऱ्या राष्ट्रवादीने रात्रीतूनच रंग बदलला आहे.

शरद पवारांनी दिला कानमंत्र

0
0
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, पालकमंत्री व खासदारांनी केलेल्या कामगिरीवर विजयाचा दावा करत असले तरी पक्षातील वरिष्ठ नेते जोखिम पत्करायला तयार नाहीत.

मनसेला सेनेची टाळी

0
0
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चुरशीची होऊ पाहणाऱ्या प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जवळ केले. गेल्या वर्षीप्रमाणेच भाजप, सेना व मनसे या तिन्ही पक्षांनी सहकार्याची भूमिका कायम ठेवली.

शिवसेनेच्या खेळीने विरोधक थंड

0
0
महापालिकेच्या पूर्व, पश्चिम आणि पंचवटी प्रभाग समिती सभापतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पार्टीने गत वर्षीचा फॉर्म्युला कायम ठेवत तीन प्रभाग समित्यांवर वर्चस्व निर्माण केले आहे.

‘युनिव्हर्सल’चा काँक्रीट पंप नाशकात

0
0
बांधकाम क्षेत्राला लागणारे विविध प्रकारच्या मश‌िनरी पुरविणाऱ्या युनिव्हर्सल ग्रुपच्या वतीने काँक्रीट पंपचे नाशिक शहरात शुक्रवारी लॉन्चिंग करण्यात आले. शहराच्या वाढत्या विस्तार आणि पायाभूत सुविधांच्या दृष्टीने काँक्रीट पंप अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास ग्रुपने व्यक्त केला आहे.

कंपन्यांनी पगारवाढीचे करार वेळेत करण्याची मागणी

0
0
कंपन्यांनी पगारवाढीचे करार वेळेवर करण्याची मागणी निवेदनाद्वारे कामगार विकास मंचने कामगार उपायुक्तांकडे केली आहे. वेळप्रसंगी कामगारांच्या न्यायहक्कासाठी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशाराही मंचातर्फे देण्यात आला.

न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखणार

0
0
शाळेतून बेकायदेशीरपणे काढून टाकण्यात आलेल्या व‌िद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत घ्यावे, असा अंतरिम आदेश मुंबई हाय कोर्टाने स‌िल्व्हर ओक शाळेला द‌िला आहे. तर सिल्व्हर ओकने न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

विमानसेवेसाठी नाशिककरांचा पुढाकार

0
0
मोठी उत्कंठा असलेली विमानसेवा लवकरच सुरु व्हावी यासाठी आता नाशिककरांनीच पुढाकार घेतला आहे. विमानसेवेचा लाभ घेण्यास इच्छुक असलेल्या आणि वारंवार विमानसेवेचा वापर करणाऱ्यांची माहिती ऑनलाईन संकलित करण्यासाठी खास वेब पेजही तयार करण्यात आले आहे.

गोदावरीसाठी उपसमित्यांची स्थापना

0
0
गोदावरी प्रदूषणासंदर्भात हायकोर्टाने नियुक्त केलेल्या समितीच्या पहिल्याच बैठकीत आणखी दोन उपसमित्या स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित यंत्रणांनी त्यांचा लेखी अहवाल सादर करावा, असे निर्देश समितीचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्तांनी दिले आहेत.

शिक्षण उपसंचालकांच्या दालनात पालकास मारहाण

0
0
नाशिकरोड येथील शिक्षण उपसंचालकांच्या दालनात विद्यार्थिनीच्या पालकाला मारहाण झाल्याचा प्रकार आज घडला. तर या पालकाने दालनात बळजबरीने प्रवेश करुन अत्यंत उद्धट वर्तणूक केल्याचे शिक्षण उपसंचालकांनी सांगितले. दरम्यान, नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.

शंभराची नोट झाली ‘चिल्लर’

0
0
मोबाइलवर बोलणारे वाहनचालक दंडाची क्षुल्लक रक्कम पोलिसांच्या तोंडावर भिरकावण्यासारखी कृत्ये करू लागली आहेत. दंडाच्या शुल्काची लोकांना धास्तीच वाटत नसल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलिसांचा वाहतूक विभाग पोहोचला आहे.

हेमंत गोडसे यांचा राजीनामा

0
0
दोन वर्षांपूर्वी मनसेच्या त‌िकीटावर न‌िवडून आलेले आण‌ि सध्या श‌िवसेनेत असलेले हेमंत गोडसे यांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा द‌िला आहे. श‌िवसेनेच्या त‌िक‌ीटावर लोकसभेची आगामी न‌िवडणूक लढव‌िण्यामागील तंत्र म्हणून त्यांनी शन‌िवारी राजीनामा दिल्याचे म्हटले जात आहे.

प्रभाग समितीत ‘युती कायम’

0
0
पूर्व, पश्च‌िम आणि पंचवटी प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत सेना भाजपा आणि मनसेने एकत्र आपले वर्चस्व कायम ठेवले. या पक्षांची युती कायम राहिल्याने आज, शनिवारी झालेल्या सिडको, सातपूर आणि नाशिकरोड प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत मनसेचा एक आणि सेनेचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले.

मनसे-सेना-भाजप एकत्र

0
0
लोकसभेच्या तुलनेत फारसे महत्व नसलेल्या प्रभाग समिती सभापतीसाठी झालेल्या निवडणुकीत विस्तव जात नसलेल्या मनसे-सेना आणि भाजपने एकत्र येत आपले वर्चस्व कायम ठेवले. लोकसभेसाठी एकमेकांविरोधात उभ्या ठाकलेल्या पक्षांनी महापालिकेत एकमेकांना मदत केल्याने, हा मुद्दा चर्चेचा विषय ठरला आहे.

मराठा आरक्षणाला विरोध नाही

0
0
‘मी ओबीसींसाठी लढतो म्हणून काही लोकांना ते खुपतं. परंतु त्यांच्याकडे बोलायला काही नसल्याने ते मला मराठा आरक्षणविरोधी ठरवतात. माझा मराठा आरक्षणाला कधीही विरोध नव्हता.’ असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नाशिक लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार छगन भुजबळ यांनी केले.

नाशिकच्या शिक्षण खात्यात चाललंय काय?

0
0
नाशिकमधील शिक्षणाचा गेल्या चार ते पाच वर्षांमधील इतिहास आपण पाहिला तर मुलांच्या शिक्षण हक्कासाठी धडपडणारे पालक आणि त्यांना सहकार्य न करणारे अधिकारी असेच दिसून येईल.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images