Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

टर्मिनल दर्शनातून मतदारांना आमिष?

$
0
0
ओझर विमानतळाच्या ठिकाणी नुकतेच सेवेत आलेले अत्याधुनिक पॅसेंजर टर्मिनलचे दर्शन घडवून आणण्याचा उद्योग गेल्या काही दिवसांपासून सुरू झाला आहे. शेकडोंच्या संख्येने शहराच्या विविध भागातील नागरिक (मतदार) टर्मिनलच्या ठिकाणी जात असून, हा प्रकार आमिष देण्याचाच एक भाग असल्याचा आरोप केला जात आहे.

नाशिकचा विकास हाच ध्यास

$
0
0
नाशिकचा विकास हाच आमचा ध्यास असल्याचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे. निवडणुकीला सामोरे जातानाही विकास हाच आमचा अजेंडा असेल, असेही त्यांनी मुलाखतीत आवर्जून सांगितले.

महाराष्ट्र तापू लागला!

$
0
0
सकाळी दहा वाजल्यापासूनच अंगाला चटके देणारे ऊन आणि रात्रीही कायम राहणारा उकाडा यामुळे नाशिककर आता हैराण होऊ लागले आहेत. उन्हातून काही मिनिटे चालल्यासही अंग भाजून निघत आहे. गाडीवरून जातानाही गरम वाऱ्याच्या झळांमुळे घामाच्या धारा लागत आहेत.

पहिल्या मताचं मोल

$
0
0
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी धडाक्यात सुरू आहे. देशात आपले सरकार आणण्यासाठी काँग्रेस-भाजप या प्रमुख पक्षांसह तिसरी आघाडी, आम आदमी पार्टीसारखे पक्ष जिवाचे रान करीत आहेत. पण यापैकी कोणाचेही सरकार आले, तरी यंदाच्या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका असेल ती तरुणाईची आणि विशेषकरून पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांची.

सीएटमध्ये कामगारांनी पाळला बंद

$
0
0
बॉश कंपनीपाठोपाठ सीएटमधील कामगारांनीही आता आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. पगारवाढीच्या मुद्यावरून गुढीपाडव्याच्या दिवशीच सीएटमधील कामगारांनी बंद पाळला. पगारवाढीचा करार लवकरात लवकर केला जावा, यासाठी कामगार उपायुक्तांनी लक्ष घालण्याची मागणी युनियन पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

नववर्ष स्वागताचा रंगला सोहळा

$
0
0
हिंदू पंचांगप्रमाणे सुरू होणाऱ्या नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सिन्नर तालुका सांस्कृतिक मंडळाच्या वतीने सोमवारी गुढीपाडव्यास भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत पारंपरिक मराठमोळ्या वेषात सिन्नरकरांनी सहकुटुंब सामील होऊन नवीनवर्षाचे जल्लोषात स्वागत केले. नववर्ष स्वागताचे हे तिसरे वर्ष आहे.

नाशकात तेजीची गुढी

$
0
0
हिंदू नववर्षाचा पहिला दिवस अर्थात गुढीपाडव्याच्या निमित्ताने गेल्या काही दिवसांत बाजारपेठेत असलेली मरगळ दूर झाली. शहर परिसरात तब्बल २५० ते ३०० कोटी रुपयांची उलाढाल आहे. रिअल इस्टेट क्षेत्रात सर्वाधिक उलाढाल झाली असून यानिमित्ताने बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण होते.

टर्मिनल दर्शनातून मतदारांना आमिष?

$
0
0
ओझर विमानतळाच्या ठिकाणी नुकतेच सेवेत आलेले अत्याधुनिक पॅसेंजर टर्मिनलचे दर्शन घडवून आणण्याचा उद्योग गेल्या काही दिवसांपासून सुरू झाला आहे. शेकडोंच्या संख्येने शहराच्या विविध भागातील नागरिक (मतदार) टर्मिनलच्या ठिकाणी जात असून, हा प्रकार आमिष देण्याचाच एक भाग असल्याचा आरोप केला जात आहे.

केबल्सने वाढवली नागरिकांची डोकेदुखी

$
0
0
नाशिकरोड परिसरात अनेक ठिकाणी एका खासगी कंपनीच्या फोर जी सेवेसाठी भूमिगत केबल टाकण्याचे काम सुरू आहे. काही ठिकाणी कामे अर्धवट आहेत, तर काही ठिकाणी कामे झाल्यानंतर केबल उघड्याच ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे अपघातांची शक्यता वाढली आहे.

‘अपोलो’ महिनाभरात नाशिककरांच्या सेवेत

$
0
0
जगभरात हेल्थकेअर सेवा देणारे अपोलो समुहाचे हॉस्प‌िटल महिनाभरात नाशिकमध्येही सुरू होणार आहे. अद्ययावत १५० बेडचे हॉस्प‌िटल सज्ज झाल्याची घोषणा अपोलो हॉस्प‌िटलचे सेंट्रल रिजन चीफ ऑपरेटिंग ऑफिसर डॉ. हरी प्रसाद यांनी केली.

हत्ती गेला अन् शेपूट राहिले!

$
0
0
बहुतांश वादांच्या मुळाशी श्रेयवाद दडलेला असतो. एका म‌िशनवर जाणाऱ्या संघाचे नेतृत्व जेव्हा या श्रेयवाद्यांवर पकड म‌िळव‌िते, तेव्हा त‌िथे न‌िम्म‌ी लढाई त्या संघाने ज‌िंकलेली असते. नाश‌िक कॅम्पसच्या अगोदर व‌िद्यार्थी सेवा केंद्र अन् ई-लायब्ररीची मुहूर्तमेढ नाश‌िकमध्ये रोवणाऱ्या पुणे व‌िद्यापीठ प्रशासनाने सर्वांना सोबत घेत न‌िम्मी मजल गाठली आहे. मात्र, यापुढे खरे आव्हान व‌िद्यापीठासमोर असणार आहे.

सहन होत नाही अन‍् सांगताही येत नाही...

$
0
0
ज्या गजानन शेलार यांच्यासाठी एकेकाळी छगन भुजबळ यांनी आपले मंत्रीपदही पणाला लावले होते, त्या शेलारांनी परवा भुजबळांवर कठोर हल्ला चढवला आणि राजकारणात शिष्योत्तम, निष्ठा या कशा अळवावरच्या पाण्यासारख्या असतात हे पुन्हा एकदा सिध्द केले.

प्रचाराची गाणी येणार फॉर्ममध्ये

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख पक्षाचे उमेदवार तसेच इच्छुक प्रचारासाठी गाणी लिहून घेण्यात व्यग्र असून, गीतकार तसेच कवींच्या लेखणीला त्यानिमित्ताने चांगला रोजगार मिळत आहे. पूर्वी या गाण्यांच्या रेकॉर्डिंगसाठी मुंबई गाठावी लागायची. मात्र, आता नाशिकमध्येच अत्याधुनिक स्टुडिओ उपलब्ध असल्याने उमेदवारांचे काम सोपे झाले आहे.

विकासाचे भ्रामक चित्र पुसणार

$
0
0
नाशिकच्या विकासाचे भ्रामक चित्र उभे केले जात आहे. वास्तववादी विकास म्हणजे काय, हे आगामी काळात दाखवून देऊ, असे शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी मुलाखतीत सांगितले.

निष्पक्ष निवडणुकीसाठी संकल्पना

$
0
0
यंदाची लोकसभा निवडणूक अधिकाधिक पारदर्शी आणि निष्पक्ष होण्यासाठी थेट निवडणूक निरीक्षकांकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उत्तर महाराष्ट्रातील सर्वसाधारण आणि खर्च निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आता होणार पैशांची ‘गारपीट’

$
0
0
शिगेला पोहचलेला प्रचार, निवडणुकीतील अनि​श्चितता आणि निवडून येण्यासाठी उमेदवाराकडून केले जाणारे सर्व प्रकारचे प्रयत्न, यामुळे राज्यातील बहुतांशी मतदारसंघात पैशांची अतिवृष्टी होणार का, याची उत्सुकता आता वाढू लागली आहे.

उमेदवारांनी पाडवा केला ‘एन्कॅश’

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरलेले राजकीय पक्ष व उमेदवारांसाठी प्रत्येक दिवस महत्त्वाचा असल्याने ते आलेल्या प्रत्येक संधीचा पुरेपुर फायदा उठवत आहेत. सोमवारी आलेल्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने उमेदवारांनी प्रचाराची अनोखी संधी साधली.

मतदार जागृतीसाठी `फ्लॅश मॉब`

$
0
0
मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी जनजागृती करण्यासाठी निवडणूक यंत्रणेने अत्याधुनिक तंत्र-मंत्रांचा वापर सुरू केला आहे. त्यामुळेच `फ्लॅश मॉब`सारखी आधुनिक संकल्पना मतदार जागृतीसाठी वापरली जात असून, जिल्ह्याच्या विविध भागात फ्लॅश मॉब सादर केले जाणार आहेत.

श्री हंस पाणपोई भागवतेय १६ वर्षे तहान

$
0
0
उन्हाळा असो अथवा पावसाळा... दिवस असो अथवा रात्र... अगदी कोणत्याही वेळी येणाऱ्या प्रत्येकाची तहान भागविण्याचे काम सातपूर गावातील श्री हंस पाणपोई करीत आहे. तब्बल १६ वर्ष अव्याहत सुरू असलेले हे पुण्यकर्म यापुढेही सुरूच ठेवण्याचा संकल्प मानवधर्म प्रेमींनी सोमवारी गुढीपाडव्याच्या निमित्ताने केला.

संचालनाचे सूत्र

$
0
0
निवडणुकीची धामधूम वाढल्यामुळे शहरातील वातावरण तापू लागले आहे. एका राजकीय पक्षाच्या नाराज शहराध्यक्षाने रविवारी समर्थकांचा मेळावा घेतला. याद्वारे त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शनाचा प्रयत्न केला.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images