Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

चर्चा स्टंटबाजीची

$
0
0
अलीकडे निवडणुकीलाही युद्धाचेच स्वरूप प्राप्त झाल्याने या काळात जो काही हैदोस चालतो तो क्षम्य मानावा, अशा अपेक्षेनेच राजकारणी मंडळी कार्यरत राहतात. या हैदोसाचीच सभ्य आवृत्ती म्हणून प्रसिध्दीच्या अनोख्या फंडांकडे पहावे लागेल. प्रसिध्दीच्या या स्टंटमुळे उमेदवार वा त्याचा पक्ष सतत चर्चेत राहतात व जनसामान्यांचीही घडीभर करमणूक होते. काही वेळा हेच स्टंट महागही पडतात.

राष्ट्रीय प्रकल्प स्पर्धेत एसएनडीचे उपकरण तृतीय

$
0
0
येथील एसएनडी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यंत्र शाखेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘कापूस वेचणी यंत्र’ या उपकरणाला मुंबई येथे झालेल्या ‘तंत्रज्ञान १४’ या राष्ट्रीय प्रकल्प स्पर्धेत तृतीय क्रमांकासह रोख पाच हजार रुपयांचे बक्षिस मिळाले.

मंदिरांमध्ये लागतेय ‘त्यांचे’ चित्त

$
0
0
मार्च संपला की विद्यापीठातील पदवी आणि पदव्युत्तरच्या परीक्षांना सुरुवात होते. विद्यार्थी परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी निवांत जागा शोधू लागतात. काही लायब्ररीत जातात तर काही समाज मंदिर, प्रार्थनास्थळे अशा ठिकाणाचा आसरा घेऊ लागतो.

२० विद्यार्थ्यांना गॅस्ट्रोसदृश आजाराची लागण

$
0
0
सिन्नर तालुक्यातील पाटोळे येथील जोगेश्वरी प्राथमिक आश्रम शाळेतील २० विद्यार्थ्यांना गॅस्ट्रोसदृश आजाराची लागण झाली असून, त्यांना उपचारासाठी मंगळवारी रात्री सिन्नर येथील यशवंत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

कांद्याने हसवले अन् रडवलेही

$
0
0
अस्मानी संकटानंतर कांद्याचे भावही गडगडले. मात्र, गेल्या आठवड्यापासून काही कांद्याला हजार रुपये क्विंटल भाव मिळत असताना काही बाजार समित्यांमध्ये मात्र, भावात कमालीची घसरण पहावयास मिळत आहे.

दहा महिन्यांचा मुलगा सापडला मंदिरात

$
0
0
विंचून - प्रकाशा राज्य मार्गावरील आसरा मातेच्या मंदिराजवळ दहा महिन्याचे अनोळखी बालक आढळल्याने खळबळ उडाली आहे. गुरुवारी मध्यरात्री मंदिरात सापडलेले हे बालक अनैतिक संबंधातून जन्माला आले असल्याची चर्चा आहे.

विजय पांढरेंचा रखडला अर्ज

$
0
0
मुर्हूताच्या मुद्यावरून इतर पक्षांना लक्ष्य करणा-या ‘आप’वर मुहूर्तवाल्यांच्याच रांगेतच उभे राहण्याची वेळ आली आहे. उमेदवारी अर्जात तांत्र‌िक अडचणी न‌िघाल्या असल्याचे कारण देत ‘आप’चे बहुचर्च‌ित उमेदवार व‌िजय पांढरे यांचा अर्ज गुरुवारी दाखल होऊ शकला नाही. अशुभ मुहूर्तावरच ‘आप’ चा अर्ज रखडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

जायभावेंकडे ५५ लाखांची संपत्ती

$
0
0
नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने उमेदवारी अर्ज भरणाऱ्या तानाजी जायभावे यांच्याकडे ५५ लाख रुपयांची मालमत्ता असून, त्यांच्याविरोधात आजवर एकही गुन्हा दाखल झाला नसल्याचे त्यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

हेमंत वाघेरेंकडे पॅनकार्डही नाही

$
0
0
दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने अर्ज दाखल करणारे हेमंत वाघेरे यांच्याकडे साधे पॅनकार्डही नाही. प्रतिज्ञापत्रात त्यांनी ही बाब नमूद केली आहे. वाघेरे हे पूर्णवेळ पक्षाचे कार्यकर्ते असल्याने त्यांनी त्यांचा व्यवसायही तोच दाखविला आहे.

‘आप’चे माळी बिनपगारी प्राध्यापक

$
0
0
दिंडोरी मतदारसंघातून आम आदमी पार्टीच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल करणारे प्रा. ज्ञानेश्वर माळी हे बिनपगारी प्राध्यापक आहेत. तर, त्यांची पत्नी मजुरी करीत असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. माळी यांच्यावर कुठल्याही गुन्ह्याची नोंद नाही.

बांधकाम व्यावसायिकांना मंदीच्या झळा

$
0
0
मार्केटमधील मंदीच्या लाटेने बांधकाम व्यावसायिकांना पुरते जाम केल्याने या क्षेत्रातील बहुतांश व्यावसायिक यंदा इन्कम टॅक्स भरण्यास अपात्र ठरले आहेत. याचा थेट फटका इन्कम टॅक्स विभागाच्या वसुलीला बसला आहे.

गोदापात्र प्रदुषित करतायं, सावधान!

$
0
0
गोदावरी नदीच्या प्रदुषणात भर घालणाऱ्यांची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. वाहने तसेच जनावरे धुणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येत असून संबं‌धितांवर दंडात्मक कारवाई देख‌ील केली जात आहे. तेव्हा कळत नकळत तुम्ही प्रदुषणाला हातभार लावत असाल तर सावधान !

मोलकरीण मुलीवर बलात्कार

$
0
0
होस्टेलमध्ये राहाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा मोलकरीण म्हणून सौदा करण्यात आला. तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची वाच्यता झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी पसार असला तरी संबंध‌िताचा गुन्हा दडवून ठेवणाऱ्या दोन महिलांना गंगापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सहकारी संस्थांवर मदतीचा भार

$
0
0
फेब्रुवारी व मार्च महिन्यात झालेल्या प्रचंड गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी जबाबदार असलेल्या सरकारने शेतकऱ्यांना वेळेवर मदत केली नाहीच; परंतु आता सहकारी सोसायट्यांवर हा भार टाकून आपले हात झटकून टाकले आहे.

आयुक्तांविरोधात आणखी एक तक्रार

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी महापालिका आयुक्तांविरोधात दाखल करण्यात आलेल्या पाच तक्रारींची चौकशी सुरू झाली आहे. असे असताना बुधवारी रात्री निवडणूक आयोगाकडे आणखी एक तक्रार दाखल करण्यात आल्याने चर्चेला पेव फुटले आहे.

आजचा दिवस शक्तिप्रदर्शनाचा

$
0
0
एकाच दिवशी सर्व प्रमुख उमेदवारांचे प्रचाररथ, मोठ्या रॅली व आश्वासनांचा पाऊस... असे एरवी प्रचाराच्या अंतिम टप्प्यात दिसणारे दृष्य शहरवासियांना आजच (शुक्रवार) अनुभवता येणार आहे.

मोबाइलकरण

$
0
0
गेल्या काही वर्षांपासून माणसाचं आयुष्य इतकं मोबाइलमय झालंय की, एखाद्या वेळेस श्वास घ्यायचं चुकतील पण, मोबाइलपासून क्षणभरही बाजूला राहवत नाही अशी परिस्थिती आहे. या वाढत्या मोबाइलकरणातून मोबाइल ही आजची लाइफस्टाईल बनली आहे.

दे टाळी

$
0
0
सवयी का कुणाला सांगून लागतात? कुणाला बोलताना सारखं ‘टच’ करण्याची सवय असते तर कुणाला शब्दाशब्दाला टाळ्या मागण्याची सवय असते. त्यातही एखाद्या मित्राला ती सवय असावी अन् दिवसभराच्या धावपळीनंतर तो समोर दत्त म्हणून उभा रहावा.

संयमाचा कडेलोट

$
0
0
शाळांमध्ये सध्या परीक्षांचा माहोल आहे. पेपरला वेळेत पोहोचता यावे यासाठी विद्यार्थ्यांची घालमेल सुरू होती. पेपरची वेळ जवळ येऊन ठेपली तरी स्कूल व्हॅन वाहतूक कोंडीमुळे वेळेत येऊ शकल्या नाहीत. पेपरला वेळेत पोहोचू की नाही या चिंतेने विद्यार्थी अस्वस्थ झाले होते.

एलईडीचा विरोधकांना ‘शॉक’

$
0
0
गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या युक्तिवादानंतर मुंबई हायकोर्टाने एलईडीबाबतच्या तिन्ही याचिका फेटाळून लावल्या. याचिकाकर्त्यांनी कोर्टात येण्यास उशीर केला तसेच आयुक्त संजय खंदारे यांनी वीजबचतीबाबत सादर केलेले प्रतिज्ञापत्र योग्य असल्याचा निर्वाळा देत कोर्टाने शुक्रवारी हा निर्णय दिला.
Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images