Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

सिन्नरफाटा चौक बनला अपघातांचे केंद्र

$
0
0
नाशिकचे पूर्वेकडील प्रवेशद्वार म्हणून सिन्नर फाटा ओळखला जातो. या चौकातून सिन्नर, सामनगावरोड सिन्नरफाटा, विष्णूनगर आणि नाशिकरोड असे पाच रस्ते जातात. येथेच शाळा, हास्पिटल, खासगी क्लासेस आहेत.

वीज कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार वेतनवाढ नाहीच

$
0
0
वीज कर्मचाऱ्यांशी नवीन पगारवाढीच्या वाटाघाटी ११ एप्रिलपासून सुरू होतील, वेतनवाढ सहाव्या आयोगानुसार न करता कंपनीच्या प्रचलित पद्धतीनुसार केली जाईल, असे कंपनी व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.

ग्रंथपालांच्या हेलपाट्यांना लागेना ‘ब्रेक’

$
0
0
राज्यातील पदवीधर ग्रंथपालांच्या वेतनश्रेणीबाबत कोर्टाने सरकारला वारंवार खडे बोल सुनावूनही सरकार दरबारी मात्र अन्याय होतो आहे. कोर्टाने द‌िलेल्या न‌िकालानंतरही ग्रंथपालांचे फायदे देताना सरकारकडून स्वीकारल्या जाणाऱ्या पळवाटेचा श‌िक्षकेतर संघटनेने न‌िषेध नोंदव‌िला आहे.

वाघळेच्या शेतकऱ्याची आत्महत्या

$
0
0
वाघळे येथील शेतकरी देविदास दशरथ भामरे (वय ३५) यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. देविदास भामरे यांची २७ गुंठे जमीन आहे. त्यामध्ये त्यांनी टोमॅटो व कांदा लागवड केली होती.

‘हो, आघाडीत बिघाडी’

$
0
0
दहावर्षांपासून केंद्राच्या आणि पंधरा वर्षांपासून राज्यातील सत्तेत एकत्र असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतल्या कुरबुरी अद्यापही कायम आहेत. राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे मान्य करत लोकसभा निवडणुकीत बहुतांश मतदारसंघात आघाडीमध्ये चांगले वातावरण असले तर काही मतदारसंघ अपवाद असल्याचे सांगितले.

मनसेचेही तोडीसतोड शक्तीप्रदर्शन!

$
0
0
नाशिक लोकसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार डॉ. प्रदीप पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शुक्रवारी सकाळी रॅली काढून जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. पंचवटी कारंजा येथून काढण्यात आलेल्या रॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

डॉ. पवारांकडे ३ कोटींची संपत्ती

$
0
0
नाशिक लोकसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार डॉ. प्रदीपचंद्र पवार यांच्याकडे एकूण ३ कोटी रुपयांची संपत्ती आहे. ते उच्च विद्याविभूषित असून, त्यांच्याविरोधात तीन गुन्हे दाखल आहेत.

गोडसे सव्वा चार कोटींचे मालक

$
0
0
शिवसेना, भाजप आणि रिपाइं अशा महायुतीचे नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार हेमंत गोडसे आणि त्यांच्या पत्नीकडे एकूण सव्वा चार कोटी रुपयांची संपत्ती आहे. गोडसे यांचा व्यवसाय शेती व बांधकाम असा आहे. ते सिव्हिल इंजिनीअर आहेत.

शिवसेना जोरात, नियोजन बारगळले!

$
0
0
लोकसभा निवडणुकीसाठी हेमंत गोडसे यांचा उमेवारी अर्ज भरण्यापूर्वी शिवसेनेने जोरदार शक्तीप्रदर्शन केले. मात्र, सभेचे नियोजन बारगळल्याने काही काळ कार्यकर्त्यांसह नेत्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले.

तुटेपर्यंत ताणू नका

$
0
0
काही अनपेक्षित गोष्टी घडत असतात. पण त्यामुळे तुटेपर्यंत ताणायचे नसते, असे सूचक विधान करत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा मतदारांना कुरवाळण्याचा प्रयत्न केला.

भुजबळ एकवीस कोटींचे धनी

$
0
0
भुजबळ हे गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात असले तरी त्यांचा आणि त्यांच्या पत्नीचा व्यवसाय हा शेती असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. भुजबळ दांपत्याने आपली संपत्ती सुमारे एकवीस कोटी दाखवली आहे.

आपुलीच प्रतिमा आपुलीच वैरी

$
0
0
उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेचा मतदारंसघ म्हणून नाशिकचा उल्लेख होतो, तो विविध आरोपांचे धनी असलेले राष्ट्रवादीचे फायरब्रँड नेते छगन भुजबळ आणि ज्यांच्या आरोपांमुळे अजितदादा पवारांसारख्या तगड्या राष्ट्रवादी नेत्याला उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला, ते आम आदमी पक्षाचे उमेदवार विजय पांढरे यांच्या उमेदवारीमुळे.

प्रचारामुळे महिलांच्या हाताला रोजगार

$
0
0
लोकसभा निवडणुकीमुळे सिडको, सातपूरमधील महिलांना प्रचाराचे काम मिळाले असून ‘रोज’ मिळत असल्याने त्यांच्या हाताला रोजगार मिळाला आहे. एवढेच नव्हे, तर महिलांना दररोज प्रचारासाठी घेऊन जाण्यासाठी तसेच पुन्हा घरापर्यंत सोडण्यासाठी खास गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

१४००० विद्यार्थी देणार जेईई

$
0
0
राज्यातील शासकीय अनुदान‌ित आण‌ि खासगी व‌िना अनुदान‌ित इंज‌िनीअरिंग कॉलेजमधील प्रवेशासाठी घेण्यात येणारी जेईई (मेन) परीक्षा आज (६ एप्र‌िल) व‌िव‌िध केंद्रांवर घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी ज‌िल्ह्यातून सुमारे १४ हजार व‌िद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

‘इप्कॉस’ची घसघशीत पगारवाढ

$
0
0
टिडीके इप्कास कंपनीतील कामगारांच्या त्रैवार्षीक पगारवाढीच्या करारानूसार साडेअकरा ते साडेबारा हजार रुपयांची भरघोस पगारवाढ देण्यात आली असून कंपनीत ६० ट्रेनी कामगारांना कायम करण्यात आले आहे.

डासांच्या त्रासातून सोडवा

$
0
0
सातपूरगाव व परिसरातील रहिवाश्यांना नासर्डी नदीतील प्रदूषण व साचलेल्या पाण्यामुळे डासांचा त्रास होत आहे. या त्रासातून सुटका करण्याची मागणी रहिवाशांनी महापालिकेकडे केल्यानंतर आरोग्य अधिकारी सुन‌ील बुकाणे यांनी नासर्डी नदीची पाहणी केली व नदीचा प्रवाह सुरळीत करण्याच्यादृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या.

टकल्या गँगच्या गुंडाना रिव्हॉल्व्हरसह अटक

$
0
0
शहरात अवैध शस्त्र विक्री करणाऱ्या कुख्यात टकल्या गँगच्या दोघा गुंडांना गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी दोन रिव्हॉल्व्हरसह अटक केली.

बनावट जातीचा दाखला देणाऱ्यांवर गुन्हा

$
0
0
उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी संगनमताने बनावट जातीचा दाखला दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रोजगार हमी शाखेतील शिपायासह तिघांवर सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

चैत्रोत्सवासाठी वणीला ३०० जादा बसेस

$
0
0
वणी गडावर चैत्रोत्सवात होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन राज्य मार्ग परिवहन महामंडळाने जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. ८ ते १६ एप्रिल या कालावधीत जिल्हाभरातून नियोजित बसेस व्यतिरिक्त ३०० जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.

ऑनलाइनची सूचना अवघी २ द‌िवस अगोदर

$
0
0
मॅनजमेंटच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या माध्यमातून व‌िद्यार्थ्यांना ‘मॅनेजमेंट’ श‌िकव‌िणाऱ्या पुणे व‌िद्यापीठाने अवघ्या दोन द‌िवस अगोदर ऑनलाइन परीक्षेची सूचना द‌िली आहे. परिणामी, मॅनेजमेंटचे धडे श‌िकू पाहणाऱ्या व‌िद्यार्थ्यांना व‌िद्यापीठाच्या या अजब कारभाराने संभ्रमात टाकले आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images