Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

धरणात मुबलक पाणीसाठा

$
0
0
उन्हाच्या झळा वाढल्याने पाण्याच्या मागणीत वाढ होत आहे. धरणात मुबलक पाणीसाठा असल्याने महापालिकेने मागणीनुसार पाणी पुरवठ्यात वाढ केली आहे. मात्र, तांत्रिक कारणांमुळे काही भागात पाणी पुरवठा विस्कळीत होत असून पाणी कपात सुरू झाली की काय? अशी शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे.

नाशकात २९ तर दिंडोरीत १५ उमेदवारी अर्ज

$
0
0
लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत शनिवारी दुपारी तीनला संपली. नाशिकमध्ये एकूण २९ जणांनी तर दिंडोरी मतदार संघातून १५ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. सोमवारी (दि. ७) ला उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून बुधवारी (दि.९) दुपारी तीनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असणार आहे.

जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा

$
0
0
बंद घरात जुगार अड्डा चालविला जात असल्याचा प्रकार पंचवटी पोलिसांनी उघडकीस आणला आहे. याप्रकरणी सुनील मारुती गुंजाळ (२४, रा. तेलंगवस्ती, पेठरोड, पंचवटी) याच्यासह १३ जणांना अटक करण्यात आली होती. त्यांना जामिनावर सोडण्यात आले आहे.

सत्ताधाऱ्यांकडून गारपिटीचे राजकारण

$
0
0
‘राज्यात गारपिटीने थैमान घातले असताना शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसच्या मतदारसंघांचा दौरा करत राजकारण केले.’ असा आरोप करत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पवारांसह मुख्यंत्र्यावर टीका केली.

मार्चनंतरही पालिकेत सामसूम

$
0
0
मार्च एण्डची कामे संपली नाही तोच महापालिकेचे कर्मचारी निवडणुकीच्या कामात गुंतले आहेत. आयुक्त संजय खंदारे मोठ्या सुट्टीवर असून नगरसेवकांनी पाठ फिरवल्याने महापालिकेत कामाच्या वेळी देखील सामसूम निर्माण होते.

अबब ! १२.५ हजारांची चिल्लर

$
0
0
‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ हा चित्रपट तुम्ही पाह‌िला असेलच. मग तुम्हाला त्यातील मकरंद अनासपुरेचा धम्माल उडवून देणारा अनामत रक्कमेचा किस्साही आठवेल. उमेदवारी अर्ज भरतेवेळी चिल्लर देऊन त्याने धम्माल आणली होती.

गृहीत धरणाऱ्यांची मस्ती जिरवा

$
0
0
‘वारंवार निवडून येणारे तुम्हाला गृहीत धरतात, पैशाच्या जीवावर माज करतात अशांची मस्ती जिरवा’, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यावर बरसले.

बलात्कार प्रकरणी मनमाडमध्ये आणखी एका महिलेला अटक

$
0
0
नाशिक येथे एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी मनमाड येथील मनोरमा सदन या मुलींच्या अनाथ आश्रमशाळेतील माजी अधीक्षिका सुमन रणदिवे यांना नाशिक पोलिसांनी अटक केल्याने शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

चार गारपीटग्रस्त गावांसाठी निधी प्राप्त

$
0
0
तालुक्यातील अंगुलगाव, रेंडाळे, न्याहारखेडा, पांजरवाडी या चार गावांतील गारपीटग्रस्त ९४० शेतकऱ्यांना शासनाकडून मदत म्हणून ७० लाख ८४ हजार २५० रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.

चैत्रोत्सवासाठी सजला सप्तशृंग गड

$
0
0
साडेतीन शक्तीपीठांपैकी एक सप्तशृंग गडावर उद्यापासून (दि. ८) चैत्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. रामनवमी ते पौर्णिमा या कालावधीत उत्सव साजरा केला जाणार आहे. या उत्सवात सुमारे आठ ते दहा लाख भाविक दर्शनासाठी येतील, असा अंदाज आहे. या उत्सवाची तयारी झाली असून प्रशासनाने सुविधांचे नियोजन केले आहे.

पोलिसांच्या ताब्यातून आरोपीचे पलायन

$
0
0
जळगाव शहर पोलिस ठाण्याच्या ताब्यात असलेल्या एका आरोपीला कराड न्यायालयात सादर करून त्याला महाराष्ट्र एक्स्प्रेसने पोलिस बंदोबस्तात जळगावकडे आणले जात होते.

साई पालख्यांनी फुलले महामार्ग

$
0
0
श्री रामनवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिर्डी येथे जाणाऱ्या श्री साईबाबा पायी दिंडी, पालख्या अन् सायकलयात्रांनी महामार्ग फुलले आहे. जळगाव, धुळे, नांदगाव, चाळीसगाव परिसरातून मोठ्या संख्येने पायी दिंडी पालख्या, सायकलयात्रा शिर्डीकडे श्री साईबाबा दर्शनासाठी येत असतात.

सटाणा शहरवासियांना तीन दिवसाआड पाणीपुरवठा

$
0
0
सटाणा शहराला पाणीपुरवठा करणारे जलस्त्रोत मोठ्या प्रमाणात खालावल्यामुळे पालिकेतर्फे पाणी कपातीतस सुरुवात झाली आहे. शहरवासीयांना या पुढील काळात तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पाणीटंचाईचे वाढते संकट

$
0
0
अस्मानी व सुलतानी संकटानंतर आता पाणीटंचाईची झळ ग्रामीण भागाला बसू लागली आहे. जिल्ह्यात सध्या ४८ गावात पाण्याचे टँकर सुरू असून त्यात दिवसागणिक वाढ होत आहे.

इगतपुरी रेल्वे स्थानकात जलकुंभावर गर्दी

$
0
0
महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मध्य रेल्वेचे प्रमुख स्थानक असणाऱ्या इगतपुरी स्थानकावर प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी ताटकळत उभे राहावे लागेत आहे. त्यामुळे जलकुंभाची संख्या वाढवावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

देवळालीत पुन्हा पाणीटंचाई

$
0
0
देवळाली कॅम्पमध्ये सोडलेले पाण्याचे आवर्तन आठवडाभर पुरल्यानंतर आता पुन्हा एकदा पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सध्या या भागात दोन दिवसांआड पाणीपुरवठा सुरू झाला असून, ८ ते ११ एप्रिल या काळात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.

‘आप’साठी भाजपचा जप

$
0
0
गेल्या लोकसभा निवडणुकीत धुळे मतदारसंघात जनता दलाचे ज्येष्ठ नेते व मालेगावचे माजी आमदार निहाल अहमद यांच्या पारड्यात बहुसंख्य मुस्लिम बांधवांची मते पडल्याने भाजपचे उमेदवार प्रतापदादा सोनवणे यांचा विजय सुकर झाला होता.

आक्षेपार्ह एसएमएसवर पोलिसांचा ‘वॉच’!

$
0
0
निवडणूक काळात मोबाईलच्या माध्यमातून आक्षेपार्ह एसएमएस पाठविणे संबंधितांना चांगलेच महागात पडणार आहे. असे एसएमएस पाठविणाऱ्यांवर पोलिसांचाही वॉच असणार आहे. तसेच, नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना आक्षेप नोंदविता यावा यासाठी मोबाईल क्रमांकांची हेल्पलाइनही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

उत्तर महाराष्ट्रात मोदींच्या चार सभा

$
0
0
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या उत्तर महाराष्ट्रातील सहा जागांसाठी तब्बल चार सभा होणार आहेत. मोदींच्या देशव्यापी १५० हून अधिक सभा होत असून, त्यात उत्तर महाराष्ट्रातील चार सभांचाही समावेश आहे.

सारे काही टक्का वाढविण्यासाठी!

$
0
0
गेल्या लोकसभा निवडणुकीत ५० टक्क्यांपेक्षाही कमी मतदान झाल्याने निवडणूक यंत्रणा यंदा चांगलीच कामाला लागली आहे. यंदा ही टक्केवारी किमान ७५ असावी, या दृष्टीने नियोजन केले जात आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images