Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

महिला टक्का वाढविण्यासाठी साऱ्यांचाच खटाटोप!

$
0
0
महिलांचा निवडणुकांमधील सहभाग हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला असून, त्या मतदानालाही येत नसल्याने त्यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी सर्वच पक्षांचा खटाटोप सुरू आहे. राजकीय पक्षांनी महिलांपर्यंत पोहचण्यासाठी पथके तयार केली असून, त्यांच्या माध्यमातून थेट किचनपर्यंत शिरकाव करून महिलांना मतदानाचे आवाहन केले जात आहे.

मंडल अधिकाऱ्याविरोधात आचारसंहिता कक्षाकडे तक्रार

$
0
0
कळवण तालुक्यातील मोकभणगी येथील मंडल अधिकारी एम. एल. पवार हे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांचा प्रचार करीत असल्याची तक्रार आचारसंहिता कक्षाकडे करण्यात आली आहे.

नाशिकला प्रतीक्षा मतदान यंत्रांची

$
0
0
नाशिक लोकसभा मतदारसंघात तब्बल १४ अपक्ष उमेदवारांनी रिंगणात उडी घेतल्याने निवडणूक यंत्रणेला मतदान यंत्राची काळजी लागली आहे. या लोकसभा मतदारसंघात १,८५० मतदान यंत्र कमी पडल्यामुळे ही यंत्रे विदर्भातील काही जिल्ह्यांमधून आणण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

भुजबळांची संपत्ती तिप्पट, तर गोडसेंची चौपट

$
0
0
निवडणुकीत उमेदवारांकडून सादर होणारे संपत्तीचे विवरण चर्चेचा विषय असते. नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रंणागणात उतरलेल्या उमेदवारांची संपत्तीही चर्चेत असून, यात राज्याचे सार्वजनिक बांधकाम तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सादर केलेल्या विवरणानुसार गेल्या पाच वर्षात त्यांच्या संपत्तीत जवळपास तिप्पट वाढ झाली आहे.

मतदानासाठी पगारी सुटी

$
0
0
लोकसभा निवडणुकीसाठी येत्या २४ एप्रिलला मतदान असून, या दिवशी उत्तर महाराष्ट्रातील विविध कामगारांना भरपगारी सुटी देण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. त्यामुळे कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण असून, यानिमित्ताने मतदानाचा टक्का वाढेल, अशी अपेक्षा आहे.

पाच जणांचे अर्ज ठरले अपात्र

$
0
0
नाशिक लोकसभा मतदारसंघात ५ उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले असून, एका अपक्ष उमेदवाराने माघार घेतल्याने २३ उमेदवार रिंगणात आहेत. येत्या ९ एप्रिलपर्यंत उमेदवारी माघार घेण्याची मुदत असून, त्यानंतर मतदारसंघाचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

दिंडोरीत चौघांचे अर्ज नामंजूर

$
0
0
दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील ४ उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आल्याने ११ उमेदवार रिंगणात आहेत. बुधवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या मतदारसंघाचे चित्र स्पष्ट होणार आहे.

उमेदवाराचा पेट्रोलपंपावर राडा

$
0
0
नाशिक लोकसभा मतदारसंघातून अॉल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकच्या उमेदवाराने पेट्रोलचे पैसे देण्याऐवजी कर्मचाऱ्यांना दमदाटी केली. महेश आव्हाड असे या उमेदवाराचे नाव आहे. त्याने पेट्रोल पंपावरील मशिनची तोडफोडी केली.

उद्या पाणीपुरवठा खंडीत

$
0
0
गांधीनगर येथील जलशुद्धीकरण केंद्रावर तांत्रिक दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्यामुळे नाशिकरोडसह पूर्व विभागातील पाणीपुरवठा उद्या, बुधवारी खंडित करण्यात येणार आहे. गुरूवारचा पाणीपुरवठाही कमी दाबाने होणार आहे.

सतारवादनाने बहरणार संध्याकाळ

$
0
0
नाशिककर रसिकांना सतार वादनाच्या अनुभवाने मुग्ध करण्यासाठी शहरात सतार वादनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पुण्यातील सतार वादक समीप कुलकर्णी यांचे सतार वादन ऐकण्याची संधी या कार्यक्रमात नाशिककरांना मिळणार आहे.

विद्यार्थिनींना मार्गदर्शन सिकलसेलचे

$
0
0
‘गौरी सामाजिक कल्याणकारी संस्थे’मार्फत जागतिक आरोग्यदिनानिमित्त कर्मवीर शिक्षणसंस्था वसतिगृहामध्ये ७ एप्रिलला (सोमवारी) जागतिक सिकलसेल आजाराविषयी मार्गदर्शन करून मुलींंची तपासणी करण्यात आली.

पथनाट्यातून आरोग्यविषयक जनजागृती

$
0
0
मविप्र मॅरेथॉन चौकात एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी स्वतःच लिहून सादर केलेल्या माहितीपूर्ण पथनाट्याने आरोग्य दिनाच्या विविध उपक्रमांना सुरुवात झाली.

चिमुरड्या रोनितचे रेकॉर्ड

$
0
0
गुढी पाडव्याच्या मुहूर्त साधून अवघ्या पाच महिने आणि १९ दिवसांच्या रोनित खानापुरे या मुलाने १० मिनिटे आणि १७ सेकंद पाण्यावर तरंगण्याचा विक्रम केला. तो पाहण्यासाठी अमॅझिंग वर्ल्ड रेकॉर्ड संस्थेचे पदाधिकारी खास उपस्थित होते हे विशेष.

‘हलकं-फुलकं’चा शुभारंभ नाशकात

$
0
0
एखाद्या व्यावसायिक नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग करायचा म्हटलं, की निर्माते डोळे झाकून पुण्या-मुंबईचीच निवड करताना दिसतात. पण डोळे उघडून उर्वरीत महाराष्ट्रातल्या रसिकांनाही हा पहिला मान देण्याचा निर्णय घेतला आहे, निर्माते प्रसाद कांबळी.

चलो, कुछ तुफानी करते हैं

$
0
0
परीक्षांचा फिव्हर आता उतरू लागला आहे. त्यामुळे मुलांनी परीक्षा संपण्यानंतर सुट्यांचे प्लॅनिंग सुरू केले असून अनेकांनी एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या अडव्हेंचर कँपमध्ये सहभागी होण्यासाठी नावनोंदणीस सुरूवात केली आहे.

श‌िक्षण क्षेत्रातील भीष्माचार्य : बेजन देसाई

$
0
0
सन् १९८१ च्या सुमारास मी नाश‌िकमध्ये वास्तव्याला आलो. महाराष्ट्र पोल‌िस अकादमीच्या प्राचार्यपदाची जबाबदारी सांभाळताना दुसरीकडे चांगली माणसं जोडण्याचाही माझा छंद होता. याच प्रयत्नातून नाश‌िकमध्ये सर्वात पह‌िल्यांदा झाली ती कव‌िश्रेष्ठ कुसुमाग्रजांची भेट.

दुपारची वेळ

$
0
0
सध्या प्रचाराचा हंगाम जोरात आहे. शहराच्या सर्वच भागात सर्व राजकीय पक्ष झपाटून कामाला लागले आहेत. कार्यकर्त्यांची शोधाशोध, त्यांना जमवणे आणि प्रचार असा सारा प्रकार सध्या घडतो आहे.

धुळ्यात मुस्लिम उमेदवारांमुळे काँग्रेस चिंतेत!

$
0
0
धुळे लोकसभा मतदारसंघात निर्णायक भूमिका बजावणाऱ्या ‘मुस्लिम फॅक्टर’मुळे यंदा काँग्रेस उमदेवार अमरीश पटेल यांची चिंता वाढवली आहे. अर्ज छाननीनंतर शिल्लक राहिलेले २६ पैकी १५ उमेदवार मुस्लिम आहेत. यापैकी १३ उमेदवार एकट्या मालेगाव शहरातील असल्याने मुस्लिम मतांचे वाटेकरी वाढल्याची चिंता काँग्रेसच्या गोटात आहे.

मुबलक पाणी अन् वीज पुरविणार

$
0
0
मुबलक पाणी आणि वीज पुरविण्याबरोबरच शिक्षणाच्या चांगल्या सोयी सुविधा देऊन मतदारसंघात बदल घडवायचा आहे. उद्योग निर्मितीसाठी दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर या महत्वाकांक्षी प्रकल्पाला चालना द्यायची आहे.

निवडणूक मैदानात एकाकी झुंज

$
0
0
निवडणूक कोणतीही असो पक्ष आणि कार्यकर्त्यांचे पाठबळ आवश्यकच असते. एकटा उमेदवार प्रचाराची सर्व धुरा सक्षमपणे सांभाळू शकेलच असे नाही. स्वपक्ष आणि मित्रपक्षांकडून पुरेशी मदत होत नसल्याने जळगाव जिल्ह्यातील मनीष जैन आणि खासदार ए. टी. पाटील हे दोघे उमेदवार कोंडीत सापडले आहेत.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images