Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

भाऊ, हे कोण?

$
0
0
सार्वजनिक कार्यक्रमांतल्या किश्यांची मजा काही औरच असते. त्यातचे हे कार्यक्रम राजकीय असले विचारायलाच नको. परवा पंचवटीत असाच एक कार्यक्रम मोठ्या दिमाखात पार पडला. राजकीय पक्षाचा सर्वपरिचित असलेला एक मोठा नेता स्वतः तिथं उपस्थित होता. 'महिला सबलीकरण' हा या कार्यक्रमाचा विषय असल्याने महिलांची संख्याही मोठी होती.

... अन् कॅम्पसला जाग आली

$
0
0
दिल्लीतील अत्याचार घटनेच्या धक्क्याने अवघा देशच हादरलेला असताना मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न जागोजागी ऐरणीवर आला आहे. पावलोपावली समाजातील विकृत नजरांची आव्हाने झेलताना सावित्रीच्या लेकींना अधिक सक्षम बनविण्यासाठी थिअरी अन् प्रॅक्टिकल्सचे धडे कॅम्पसमध्ये वेगाने मिळू लागले आहेत. शहरातील प्रत्येक कॉलेज कॅम्पसमध्ये यापूर्वी अलिप्तपणे उभा असलेला मुलींचा '‌स‌िक्युरिटी सेल' या घटनेने जागा झाल्याचे चित्र निदर्शनाला येत आहे.

नव्वदनंतरच्या आंबेडकरवादी कवितांमध्ये विद्रोह व वेदना

$
0
0
१९९० नंतरच्या आंबेडकरवादी कवितांमध्ये विद्रोह व वेदना पहायला मिळतात. त्यांचा प्रवास जागतिकीकरणानंतरच्या कवितांचा प्रवास दलित्वाकडून मानवतेकडे नेणारा आहे, असे प्रतिपादन पुणे विद्यापीठाचे मराठी विभागाचे प्रमुख डॉ. अविनाश सांगोलेकर यांनी केले.

स्वतःतल्या दडलेल्या राजहंसाचा शोध घ्या

$
0
0
'आपल्या प्रत्येकामध्ये एक राजहंस दडलेला आहे. त्या दडलेल्या राजहंसाचा शोध घ्या. स्वतःतला राजहंस शोधणे म्हणजे शिक्षण. आजचे तरुण हे भाग्यावर विसंबून असतात. परंतु परिश्रम करणा-यांना भाग्य साथ देते. या प्रयत्नांना दुर्दम्य इच्छाशक्तीची जोड आवश्यक असते', असे प्रतिपादन नियोजन आयोगाचे सदस्य डॉ नरेंद्र जाधव यांनी रविवारी दीपस्तंभ आयोजित स्पर्धा परीक्षा गुरूकुल नामकरण सोहळ्यात केले.

शिक्षणापासून एकही बालक वंचित राहू नये

$
0
0
राज्यात सर्व बालकांसाठी लागू असलेल्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकारापासून जिल्ह्यातील एकही बालक वंचित राहणार नाही, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. तसेच सर्व पालकांनी आपल्या मुलांना नियमित शाळेत पाठवण्याचे आवाहन पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी केले.

कापसाचा ट्रक उलटून तीन ठार

$
0
0
कापसाने भरलेला ट्रक उलटल्याने कापसाच्या ढिगाऱ्याखाली दबले जाऊन तीन जण जागीच ठार तर ११ जण जखमी झाले. ही दुर्घटना रविवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील नीमखेडीखुर्द गावाजवळ घडली.

...अन् भाजपामधील गटबाजी प्रकाशझोतात आली

$
0
0
भाजपाच्या शहराध्यक्ष पदावरुन पक्षात निर्माण झालेली गटबाजी शनिवारी एका आंदोलनाच्या निमित्ताने प्रकाश‌झोतात आली आहे. पक्षाच्या प्रमुख पदाधिका-यांनी छेडलेले आंदोलन पोलिसांनी शांत केल्यानंतर त्याच जागेवर पक्षातील दुस-या गटाने पुन्हा त्याच कारणाहून आंदोलन छेडून नेमके साधले तरी काय, असा सवाल शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चेत आला आहे.

मोटारसायकलीच्या धडकेत चिमुरडीचा मृत्यू

$
0
0
भरधाव वेगाने धावणा-या मोटरसायकलीची धडक बसल्यामुळे श्वेता अशोक पाटील या आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला. शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास धुळे शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस पुतळ्याजवळ ही घटना घडली. श्वेता अशोक पाटील दुसरीमध्ये शिकत होती. तिचे आईवडील धुळे तालुक्यातील देवभाने येथे वास्तव्यास आहेत.

अलाहाबाद कुंभमेळ्यासाठी स्पेशल ट्रेन

$
0
0
अलाहाबाद येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनसवरुन नियमित खास गाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पहिली गाडी शुक्रवारी (२५ जानेवारी) रोजी सोडण्यात आली.

चित्रपट शतकपूर्ती नाशिकला

$
0
0
भारतीय चित्रपटाला शंभर वर्ष पूर्ण होत असून या घटनेचे औचित्य साधत चित्रपट विकास महामंडळ व सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्यावतीने यंदा ८ फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शतकपूर्ती नाशिकला होणार आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी कालिदास कलामंदिरात प्राथमिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

पोलिस वर्तन : रिट दाखल करणार

$
0
0
धुळे दंगलीत पोलिसांच्या वर्तनासंदर्भात कोर्टात रिट पिटिशन दाखल करुन दाद मागण्याचा मानस सिटीजन फॉर जस्टीस अॅण्ड पीस या संस्थेच्या सेक्रेटरी तिस्ता सेटलवाड यांनी व्यक्त केला. रविवारी त्यांनी दंगलग्रस्त भागाची पाहणी केली.

कर्मचा-याची कॉलेजातच आत्महत्या

$
0
0
धुळे शहरातील एसएसव्हीपीएस सायन्स कॉलेजचे कर्मचारी प्रमोद प्रताप शिंदे (४८) रा. रामनगर देवपूर यांनी कॉलेजमधील प्रयोगशाळेत गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे खळबळ माजली आहे. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.

सव्वा लाखांची लूट

$
0
0
वाखारकरनगरमधील शांतीनगर परिसरातील एका बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरातील सुमारे सव्वा लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास करण्यात आल्याची घटना रविवारी उघडकीस आली.

'जनस्थान' उपेक्षीतच

$
0
0
'जनस्थान' हा साहित्य क्षेत्रातील मानाचा पुरस्कार यंदा सलग दुस-यांदा नाशिकऐवजी मुंबईला जाहीर झाला. जनस्थान पुरस्कार म्हणजे नाशिकची ओळख. असे असताना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष जब्बार पटेल यांसह समितीला पुरस्कार जाहीर करण्यासाठी मुंबईचे असलेले प्रचंड आकर्षण नाशिककरांसाठी तोट्याचे ठरत आहे.

भुजबळ-कोकाटेंची दिलजमाई ?

$
0
0
सिन्नर तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्यावतीने २६ जानेवारीच्या पार्श्वभूमीवर भव्य पतंगोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी अनेकांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे पतंग उडवून सिन्नरकरांचे चांगलेच मनोरंजन केले. मात्र उत्सवात पालकमंत्री छगन भुजबळ व आमदार कोकाटे यांची एकत्र उपस्थिती अनेकांच्या चर्चेचा विषय ठरली.

नाशिकमध्ये भाजीही ऑनलाईन

$
0
0
गोल्डन ट्रँगलमधील तिसरे डेस्टीनेशन असलेल्या नाशिकला मुंबई पुण्यापाठोपाठ अनेक सुविधा निर्माण होत आहेत. याच धर्तीवर आता नाशिककरांना घरबसल्या ऑनलाईन भाजीपाला खरेदी करता येणार असून आता थेट तुमच्या घरात भाजीपाला पोहोचणार आहे.

घोषणेनंतर पहिलीच 'झूम' लांबली

$
0
0
औद्योगिक समस्यांसंदर्भात होणारी जिल्हा उद्योग मित्र बैठक (झूम) सातत्याने घेण्यात जिल्हा उद्योग केंद्राला सपशेल अपयश येत आहे. विशेष म्हणजे, दर महिन्याच्या तिस-या मंगळवारी घेण्याचे केंद्रानेच डिसेंबरमध्ये जाहीर केले आणि पहिलीच बैठक घेण्यात केंद्राला यश आलेले नाही. त्यामुळे उद्योजकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

'एव्हरेस्ट'मध्ये तीन हजाराची वेतनवाढ

$
0
0
दिंडोरी तालुक्यातील एव्हरेस्ट कंपनीच्या कामगारांना तीन हजार रुपयांची पगारवाढ मिळाली आहे. कामगार उपायुक्तांनी दिलेल्या प्रस्तावाला कामगार संघटना आणि कंपनी व्यवस्थापनाने मान्यता दिली आहे.

स्थायीत अखेर एलईडीचा झगमगाट

$
0
0
गेल्या काही महिन्यांपासून वादग्रस्त ठेवलेल्या एलईडी निविदेला स्थायी समितीच्या सोमवारी झालेल्या सभेत अखेर मंजुरी देण्यात आली. राष्ट्रवादीचे विक्रांत मते वगळता ‌हैद्राबाद येथील एमआयसी कंपनीच्या निविदेचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला.

पवननगर रस्त्याचा कोंडला श्वास

$
0
0
सिडको परिसरातील मुख्य रस्त्यांवर फेरीवाले, तसेच इतर व्यावसायिकांनी ठाण मांडल्यामुळे संपूर्ण विभागात वाहतूक कोंडी होत असून मुख्यत्वे पवननगर स्टॉपवरील भाजीबाजाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या ‌ठिकाणी रस्त्यावरच भाजीविक्रेते, फळविकेते बसत असल्याने रस्त्याचा श्वास कोंडत आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images