Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पाण्यासाठी मनमाडमध्ये हंडा मोर्चा

$
0
0
मनमाड शहराचा पाणीप्रश्न तातडीने सोडवावा, यासाठी रिपब्लिकन पक्ष आठवले गटाच्या वतीने शुक्रवारी शहरातून हंडा मोर्चा काढून मनमाड-येवला मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी पाण्यासाठी करावी लागणारी कसरत सर्वांसमोर मांडली.

मानूरची पोटनिवडणूक जाहीर

$
0
0
बागलाण तालुक्यातील मानूर गणाच्या रिक्त झालेल्या जागेसाठीची पोटनिवडणूक शुक्रवारी जाहीर झाली. या निवडणुकीसाठी ७ एप्रिल रोजी मतदान होणार असून, त्यासाठीची आचारसंहिता लागू झाली आहे.

म्हसरुळमध्येही समस्याच समस्या

$
0
0
महापौर तुमच्या दारी उपक्रमांतर्गत म्हसरुळ परिसरातील प्रभाग क्रमांक १मधील समस्यांची महापौर अॅड. यतीन वाघ व आमदार उत्तमराव ढिकले यांनी पाहणी केली. यावेळी नागरी कामांविषयी नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

‘बाजार नोंद’साठी नोंदणीचा फेरा

$
0
0
शहराबाहेरील उद्योगांकडे पाठविण्यात येणाऱ्या मालाला बाजार नोंदची पावती देण्यासाठी महापालिकेने आता अचानक नोंदणीची सक्ती केली आहे. यासंबंधीचा निर्णय स्थायी समितीच्या सभेत झाला असून या निर्णयामुळे अनेक ट्रक जकात नाक्यावर अडकले आहेत.

आजपासून दहावीची परीक्षा

$
0
0
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतली जाणारी दहावीची परीक्षा आजपासून (२ मार्च) सुरू होत असून २५ मार्चपर्यंत ही परीक्षा सुरू राहणार आहे. नाशिक विभागातून १ लाख ८४ हजार ३८१ विद्यार्थी ही परीक्षा देणार असून यासाठी विभागामध्ये ३६१ परीक्षा केंद्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

‘आधार’चा टक्का पन्नाशीकडे

$
0
0
जिल्ह्यातील आधार नोंदणीने गती घेतली असून, ‘आधार’च्या टक्केवारीने पन्नाशीकडे वाटचाल सुरू केली आहे. या नोंदणीत महापालिका क्षेत्र आघाडीवर, तर नगरपालिका क्षेत्र पिछाडीवर असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी निलेश जाधव यांनी दिली.

संशयास्पद कम्प्युटर खरेदीला प्रतिबंध करा

$
0
0
नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने कम्प्युटर खरेदीसाठी कोलकाता येथील नेलिटो कंपनीची निवड केली असून ही कंपनी ब्लॅकलिस्टेड असल्याने या खरेदीस प्रतिबंध करण्याची मागणी बँकेचे संचालक तथा आमदार माणिकराव कोकाटे यांनी विभागीय सहनिबंधकांकडे केली आहे.

सभापतीपदाचे दावेदार नसतानाही सेनेला भाव

$
0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अशोक मुर्तडक यांचे स्थायीच्या मैदानात टिकून राहिलेले आव्हान आणि अपक्ष सदस्य दामोधर मानकर यांनी दिलेला राजीनामा यामुळे स्थायी समितीच्या सभापतीपदाची चुरस वाढली आहे.

ओके टूल्समध्ये वेतनवाढ

$
0
0
अंबड औद्योगिक वसाहतीतील ओके टूल्स या कंपनीतील कामगारांना सरासरी चार हजार रुपयांची वेतनवाढ जाहीर झाली आहे. यासंदर्भात नाशिक वर्कर्स युनियन आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यात नुकताच करार झाला आहे.

सर्व्हिसरोडच्या वाटेवर पुन्हा अर्थसंकल्प

$
0
0
महापालिका आयुक्तांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात स्थायी समितीने तब्बल ८०३.१५ कोटींची महसुली वाढ सुचविली असून त्यामुळे आता अर्थसंकल्प २३५९.९५ कोटींपर्यंत पोहचले आहे.

विवाहितेचा विनयभंग

$
0
0
विवाहित महिलेस शारीरिक संबंध ठेवण्यासाठी बळजबरी करणाऱ्याविरोधात भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली. ही घटना पखालरोडवरील कितवन को. ऑप. सोसायटीत गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.

एसटीचालक उमेदवारांच्या फसवणुकीचे समर्थन

$
0
0
चालकपदासाठी निवड झालेल्या उमेदवारांकडून दीड लाख रुपये उकळल्याप्रकरणी संबंधित डॉक्टरविरुद्ध कारवाई करण्याऐवजी एसटीच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी या फसवणुकीचे समर्थन करत डॉक्टरला पाठिशी घालण्याचा उद्योग सुरू केला आहे.

नितीन उपासनी कार्यमुक्त

$
0
0
महापालिका शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांना २८ फेब्रुवारीला कार्यमुक्त करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त संजय खंदारे यांनी दिली. महापालिकेच्या विभागीय अधिकारी जयश्री सोनावणे यांच्याकडे हा पदभार सोपविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

सिन्नर क्रीडा संकुलाद्वारे काटशहाचा डाव

$
0
0
खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात क्रीडा संकुल प्रस्तावित असले तरी जिल्ह्यातील सिन्नर, निफाड आणि मालेगाव या तीन तालुक्यांच्या संकुलांसाठी राजकारणाची खेळी खेळली जात आहे. त्यामुळे हे तिन्ही संकुल अद्याप मार्गी लागलेले नाहीत.

‘हास्ययोगा’चा मिळाला कानमंत्र

$
0
0
हसणं ही जरी नैसर्गिक क्रिया असली, तरी हे हसणं आपल्या आरोग्यासाठी किती उपयुक्त आहे हे सर्वांनाच माहित असतं असं नाही. म्हणूनच ‘महाराष्ट्र टाइम्स’मार्फत ‘हा हा हा हास्ययोग’ या सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. हास्ययोग तज्ज्ञांनी उपस्थितांना हसण्याचा कानमंत्र दिला.

क्षयरोगाचा घटतोय आकडा

$
0
0
भारतात दर मिनिटाला एक व्यक्ती क्षयरोगाने (टीबी) मृत्युमुखी पडत असून दर दिवसाला मृत्युचे प्रमाण एक हजार इतके आहे. नाशिक शहरात क्षयरोगाच्या उपचार घेणाऱ्यांचे प्रमाण वाढत असून उपचार घेणाऱ्या शंभर पेशंटपैकी ८५ पेशंट बरे होतात.

एसटीकडून संपाचा इशारा

$
0
0
वेतनवाढीची मागणी मान्य न झाल्यास बेमुदत संपाचा इशारा एसटी कामगार संघटनेचे सरचिटणीस हनुमंत ताटे यांनी नाशिकमध्ये दिला. संघटनेने २२ टक्के वाढीचा प्रस्ताव दिला असतानाही, नव्या वेतनकरारात मुख्यमंत्र्यांनी केवळ १० टक्के वेतनवाढ दिली असल्याचेही त्यांनी सांगितले.

तात्यासाहेबांना साहित्य उजळणीतून ‘कुसुमांजली’

$
0
0
‘उत्तम दर्जाच्या साहित्य निर्मितीनंतरही तात्यासाहेबांमधला माणूस कायम राहिला,’ असा सूर मुक्त विद्यापीठात मराठी दिनानिमित्त आयोजित ‘कुसुमाग्रज साहित्य दर्शन’ या कार्यक्रमातून उमटला. कुसुमाग्रज अध्यासनातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कामात काम...मुक्तीधाम

$
0
0
ही म्हण अस्सल नाशिकची आहे, कामात काम...मुक्तीधाम. दिवसभराची कामे या बाजूलाच आहेत ना! मग चला दर्शन घेऊ टाकू. खास त्यासाठी नाही, इकडे आलो आहे म्हणून. तर विषय साधा सोपा. एखाद्या कामात आपले काम उरकून टाकणे.

कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे काव्यशिष्यवृत्ती

$
0
0
मराठीचे संवर्धन, अनुवाद, संशोधन तसेच लेखन यासाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे काव्य शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून या शिष्यवृत्ती संदर्भात विचार-विनिमय व बैठका होत होत्या परंतु निर्णय होत नव्हता.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images