Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयंती-उत्सव जोरात

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच उमेदवारांनी सार्वजनिक मंडळांना सढळ हाताने मदत केल्याने येणाऱ्या हनुमान जयंती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या वर्गणीसाठी कार्यकर्त्यांना करावी लागणारी वणवण थांबली आहे.

बोल अंबे की जय...

$
0
0
आदिशक्ती सप्तशृंग देवीच्या दर्शनास शुक्रवारी चैत्रयात्रेच्या चौथ्या दिवशी सुमारे सव्वालाख भाविकांनी दर्शनासाठी गडावर गर्दी केली. यात्रेचा चौथा दिवस व शुक्रवार यामुळे गडावर भाविकांची लक्षणीय उपस्थिती होती. बोल अंबे की जयचा जयघोष निनादात होता. ३० ते ३५ हजार भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला.

लिपिकास लाच घेतना रंगेहाथ अटक

$
0
0
दिंडोरी तालुक्यातील जांबूटके शिवारातील जमिनीची तत्काळ मोजणी करण्यासाठी पाच हजाराची लाच मागणाऱ्या भूमिअभिलेख कार्यालयातील लिपिकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दिंडोरी कार्यालयात रंगेहाथ पकडले.

पाच संचालकांचे राजीनामे

$
0
0
देवळा तालुक्यातील खालप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या कार्यरत असलेल्या एकूण अकरापैकी पाच संचालकांनी संस्थेचे सभापती बाजीराव सूर्यवंशी हे संचालकांना विश्वासत घेऊन कामकाज करीत नाही म्हणून राजीनामे दिले आहेत.

वधूवर मेळाव्यांना पक्षांचा ‘हातभार’

$
0
0
लोकसभा निवडणुका आणि लग्नाचा हंगाम एकत्र आल्याने चाणाक्ष नेत्यांनी वधूवर मेळाव्यांचे आयोजन करून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. शहरात सध्या वधूवर मेळाव्यांची धूम असून, त्यांच्या पाठिशी राजकीय पक्ष असल्याची जोरदार चर्चा आहे.

मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करावी

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाबाबत संभाजी ब्रिगेड आणि जिजाऊ ब्रिगेड यांची जिल्हास्तरीय बैठक नाशिक येथे झाली. सिन्नर, इगतपुरी, निफाड, त्र्यंबक, दिंडोरी आदी ठिकाणाहून कार्यकर्ते उपस्थित होते.

माळींनी साधला आदिवासींशी संवाद

$
0
0
दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील आम आदमी पार्टीचे उमेदवार प्रा. ज्ञानेश्वर माळी यांनी मतदार संघातील दिंडोरी, पेठ, सुरगाणा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील आदिवासी पाड्यांना भेटी देऊन मतदारत्यांशी संवाद साधला.

‘नथुराम ते देवराम’चा जन्म अंतर्मनाच्या तळमळीतून

$
0
0
‘नथुराम ते देवराम... लाख मोलाच्या गप्पा’चा जन्म अंतर्मनाच्या तळमळीतून झाला आहे. मला नाटकातून माझ्या मनातले बोलता येत नाही, सिरियलमध्ये फक्त लेखकाच्या तोंडचेच बोलावे लागते परंतु मला स्वत:ला रसिकांशी संवाद साधायचाय म्हणून ‘नथुराम ते देवराम’ची निर्मिती करावी लागली.’ असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी केले.

खबरदारी घेण्याचे आवाहन

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड परिसरातील कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, निवडणूक आचारसंहितेचे कुठेही उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलिस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी केले.

महालोकअदालतीपुढे आज १० हजार खटले

$
0
0
नाशिक जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये शनिवारी (दि. १२) महालोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

कागदपत्रे सादर करण्यावरून संभ्रम

$
0
0
एलबीटी अर्थांत लोकल बॉडी टॅक्सच्या मुद्द्यावरून प्रशासन आणि एलबीटी भरण्यास पात्र ठरणारे व्यवसायिक आमने-सामने येण्याची शक्यता आहे. महापालिका प्रशासने संबंधीत व्यवसायिकांना आपले विवरण सादर करण्याचे आदेश दिले आहे, तर कागदपत्रे जमा करण्याची पध्दत चुकीचा असल्याचा आरोप व्यावसायिकांकडून केला जातो आहे.

बलात्कारातील आरोपी पसारच

$
0
0
उच्चभ्रू वस्तीत घरकामगार मुलीवर बलात्कार करून पसार झालेल्या आरोपीला पोलिसांनी अजूनही अटक केलेली नाही. त्याला तातडीने अटक करा अन्यथा आंदोलन छेडले जाईल असा इशारा बारा बलुतेदार संघटनेने निवेदनाद्वारे पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांना दिला आहे.

पुढील महिन्यात पाणीपट्टी बिलांचे वाटप

$
0
0
पाणीपट्टी बिलांचे वाटप करताना होणारा घोळ यंदाच्या आर्थिक वर्षात होऊ नये म्हणून प्रशासनाने सावधगिरीची भुमिका घेत पुढील महिन्यापासून बिले वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. पाणीपट्टी बिलांचे वाटप योग्य पध्दतीने झाल्यास पाणीपट्टी बिलांचा महसूल वाढेल, अशी अपेक्षा प्रशासनाला आहे.

गारपीट ग्रस्तांसाठी ३५ कोटींचा दुसरा हप्ता

$
0
0
गारपिटीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी दुसरी टप्प्यातील मदत शासनाने जमा केली आहे. जिल्ह्याला ३५ कोटी रुपये मिळाले आहेत. पहिल्या टप्प्यात जिल्ह्याला १९ कोटी रुपयांची मदत मिळाली होती. आतापर्यंत ५४ कोटींची मदत मिळाली असून, जिल्ह्याला आणखी १२८ कोटी रुपयांची मदत अपेक्षित आहे.

रामजीकी निकली सवारी !

$
0
0
ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या श्रीरामरथ व गरुड रथोत्सवाला शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजता काळाराम मंदिरापासून सुरुवात करण्यात आली. गरुड रथाचे मानकरी, राम रथाचे मानकरी, जिल्ह्याची पालकमंत्री छगन भुजबळ, महापौर यतीन वाघ यांच्या हस्ते विधीवत पुजन करुन रथयात्रेला सुरुवात झाली.

मिळकतधारकांना फटका

$
0
0
मालमत्ता कराची रक्कम बिलापूर्वी भरणा करणाऱ्या मिळकतधारकांना २ ते ५ टक्क्यांपर्यंत सवलत देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी एप्रिल महिन्यापासून लागू होणे अपेक्षित होते.

पोलिसांमध्ये अस्वस्थता

$
0
0
मुलगा हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होता, परंतु सुटी घेऊन त्याच्याजवळ एक दिवस थांबू शकलो नाही, हे एका पोलिसाचे दु:ख. तर घरातल्या लग्नकार्यांनाही सुटीअभावी फोनवरूनच शुभेच्छा देतोय, अशी दुसऱ्याची कैफियत. दु:ख असो अथवा सुखाचे क्षण प्रत्येकाची व्यथा वेगळी. ना सणाचा आनंद ना कुटुंबीयांसाठी वेळ. सरकार दरबारी उपेक्षाचेच ओझे वाहाणाऱ्या पोलिस शिपायापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांची हीच कथा.

सभा, रॅलींमध्ये तासावर पैसे!

$
0
0
उन्हातान्हात घोषणाबाजी करत घसा कोरडा करायचा म्हणजे केवढे कष्ट. बरे ते ही राजकीय उमेदवारांसाठी, जे पुन्हा पाच वर्षे भेटतील की नाही याची शाश्वती नाही. त्यामुळे घोषणाबाजीने परिसर दुमदुमत असला तरी तो उगाच नाही. सहजासहजी आणि उत्स्फूतपणे तर अजिबातच नाही. घसा सुकेपर्यंत ओरडणाऱ्या गर्दीवर दररोज लाखो रुपयांचा खर्च होऊ लागला आहे.

एक रुपयात मिनरल वॉटर !

$
0
0
उमेदवारी अर्ज भरताना अनामत रक्कमेसाठी साडेबारा हजाराची चिल्लर आणली म्हणून चर्चेत आलेले अपक्ष उमेदवार प्रमोद नाथेकर निवडणुकीतील जाहीरमान्याद्वारे पुन्हा एकदा चर्चेत आले.

‘मनसे’ नाही ‘दिल से’ विचार करा

$
0
0
यंदाची निवडणूक देशासाठी महत्त्वाची आहे. ज्यांना गोदापार्क साकारण्यासाठी आठ वर्षे लागतात ते शहराचा विकास कधी करणार?, अशा शब्दांत युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली तर त्याचबरोबर तेलगीच्या पैशांना शिवबंधनाने मात द्या, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार छगन भुजबळ यांना लक्ष्य केले.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images