Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

करसुविधेसाठी किऑस्कचा ‘स्टॅण्ड’

0
0
घरपट्टी आणि पाणीपट्टी बिलांच्या काउंटरवर अखेरच्या काळात प्रचंड प्रमाणात गर्दी होते. गर्दीचा ताण नागरिकांसह महापालिका कर्मचाऱ्यांवर देखील पडतो. यामुळे आगामी काही महिन्यात गर्दी होणाऱ्या विभागीय कार्यालयात किऑस्क मशिन्स बसविण्याच्या हालचाली महापालिका प्रशासनाने सुरू केल्या आहेत.

खर्च तपासणीला सुरुवात

0
0
लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या खर्च तपासणीला शनिवारपासून प्रारंभ झाला आहे. नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघातील उमेदवारांनी त्यांच्या खर्चाचा तपशील खर्च निरीक्षकांपुढे शनिवारी सादर केला.

यात्रेकरूचा पाण्यात बुडून मृत्यू

0
0
कळवण जवळील नदीपात्रात आंघोळीसाठी उतरलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. हा तरुण गावातील तरुणांच्या ग्रुपसमवेत वणी येथील सप्तश्रृंग गडावर दर्शनासाठी येत होता. मयुर मोहन साठे (१६, रा. सालदारनगर, शहादा) असे त्याचे नाव आहे.

बंदोबस्तासाठी शहरात २९६० पोलिस

0
0
येत्या २४ एप्रिलला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी नाशिक शहरात २९६० पोलिस तैणात करण्यात येणार आहेत. त्यात २०५८ कॉन्स्टेबल आणि ७०० होमगार्डचा समावेश आहे.

जागृती निरीक्षक पुन्हा नाशकात

0
0
नाशिक जिल्ह्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या जागृती निरीक्षक शुभा गुप्ता पुन्हा नाशकात दाखल झाल्या आहेत. जिल्ह्यातील मतदानाचे प्रमाण गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा वाढावे, यासाठी करण्यात येणाऱ्या जनजागृतीचा त्या आढावा घेणार आहेत. जिल्ह्यात मतदान होईपर्यंत त्या नाशकात असणार आहेत.

शिवसेनेचा प्रचार आता शहराकडे

0
0
ग्रामीण भागातील दौरा आटोपल्यानंतर शिवसेनेने शहरातील प्रचारावर आपला भर देण्यास सुरूवात केली आहे. यापूर्वी सेनेने सिन्नर, घोटी, इगतपुरी तसेच त्र्यंबकमध्ये प्रचार दौरे केले आहेत. ग्रामीण भागातील दौरा आटोपल्यानंतर हेमंत गोडसे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी शहरातील विविध भाग पिंजून काढण्यास सुरूवात केली आहे.

सिंधुदुर्गचा नाशिकमध्येही इफेक्ट

0
0
निलेश राणे यांचा प्रचार करण्यास राष्ट्रवादीने नकार दिल्याने राणे समर्थकही आक्रमक झाले आहेत. जोपर्यंत कोकणातील तिढा सुटत नाही तोपर्यंत राणेंच्या नाशिक लोकसभा मतदारसंघातील समर्थकांनी राष्ट्रवादीचे उमेदवार छगन भुजबळ यांच्या प्रचारातून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे.

ठाकरे बंधू म्हणजे कौरवांची सेना

0
0
उध्दव व राज या ठाकरे बंधुची सेना ही कौरवांची सेना असून ज्याप्रमाणे यापूर्वी कौरवांना पराभव केला त्याचप्रमाणे आताच्या कौरवांनाही धडा शिकवा असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे महासचिव एन. डी. त्रिपाठी यांनी ठाकरे बंधुंवर हल्लाबोल केला. राष्ट्रवादीचे नाशिकमधील उमेदवार छगन भुजबळ यांच्या प्रचारासाठी त्र‌िपाठी शनिवारी नाशिकला होते.

पंचवटीत ४ लाखांचा मद्यसाठा जप्त

0
0
निवडणूक काळात शहरात मोठ्या प्रमाणात मद्य आणले जाते. असे प्रकार रोखण्यासाठी पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त पथक तयार केले असून, त्यांनी केलेल्या पहिल्याच कारवाईत सुमारे ५ लाखांचा देशी आणि विदेशी मद्याचा साठा जप्त करण्यात यश आले आहे. कारवाईत चौघांना ताब्यात घेतले आहे.

शून्याचे जनक आलिया भट

0
0
शहरातील एका नामवंत शिक्षण संस्थेतील शाळांमध्ये शालांतर्गत वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना भारतातील प्रसिध्द व्यक्तिमत्वांबाबत बोलण्याची संधी यावेळी देण्यात आली होती. मुलंही भराभर पुढे येऊन वेगवेगळ्या क्षे‌त्रातील व्यक्तींची माहिती देत होती.

हसणे ही मनाची निरामय अवस्था

0
0
'हसण्याला साधे समजू नका. ते तुम्हाला दु:खाकडे घेऊन जाते कारण हसणे ही मनाची निरामय अवस्था आहे. अंगावर धावत येणारी सल पकडता आली पाहीजे', असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. फ. मुं. शिंदे यांनी केले.

गोदावरी स्वच्छता अभियान कायमस्वरुपी राबवू

0
0
गोदावरी स्वच्छता अभियान हा उपक्रम मविप्रच्या शतकी महोत्सवानिमित्त संस्थेने हाती घेतला आहे. तो या वर्षापुरताच मर्यादित न ठेवता संस्थेच्या शाळा, महाविद्यालयांच्या सहकार्याने कायमस्वरुपी राबविणार असल्याची माहिती मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी दिली.

सरकारी वसत‌िगृहांचे प्रवेश ऑनलाईन

0
0
सामाज‌िक न्याय व‌िभागाच्या मागासवर्गीय सरकारी वसत‌िगृहाचे प्रवेश यंदापासून ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहेत. यामुळे या प्रवेश प्रक्र‌ियेत पारदर्शकता येईल, असा व‌िश्वास समाज कल्याण सहआयुक्त एम.एम.आत्राम यांनी व्यक्त केला.

कॉम्रेड शरद पाटील यांना अखेरचा लाल सलाम!

0
0
सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक, ज्येष्ठ विचारवंत, प्राच्यविद्यापंडित कॉम्रेड शरद पाटील (वय ८९) यांना रविवारी सायंकाळी अखेरचा लाल सलाम देण्यात आला. सायंकाळी उशिरा त्यांच्या पार्थिवावर अंत्यंस्कार करण्यात आले.

जियो और जिने दो...

0
0
भगवान महावीर जयंतीनिमित्त मिरवणूक म. टा. वृत्तसेवा, येवला भगवान श्री महावीर जयंतीनिमित्ताने जैन समाजाच्या वतीने शहरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली.

इगतपुरीत भगवान महावीर यांची शोभायात्रा

0
0
हर्ष हर्ष जय जय, अहिंसा परमो धर्म, भगवान महावीर स्वामी की जय, जियो और जिने दो या घोषण देत इगतपुरीत भगवान महावीर यांची शोभायात्रा निघाली होती.

शरद पाटील यांना अखेरचा लाल सलाम

0
0
सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक, ज्येष्ठ विचारवंत, प्राच्यविद्यापंडित कॉम्रेड शरद पाटील (वय ८९) यांना रविवारी सायंकाळी अखेरचा लाल सलाम देण्यात आला. सायंकाळी उशिरा त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

भैरवनाथ यात्रेसाठी सिन्नरकर सज्ज

0
0
सिन्नर तालुक्यातील जनतेचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांची भव्य यात्रा आज (दि.१४) होत असून यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे. यात्रेच्या निमित्ताने मंदिराला रंगरंगोटी, विद्युत रोषणाईने मंदिर परिसर झगमगला आहे.

पिंपळगाव बसवंतमध्ये १७९ दिवाणी दावे निकाली

0
0
पिंपळगाव बसवंत येथे न्यायालय व विधीसेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी महालोक अदालत झाली. यामध्ये दिवाणी, फौजदारीसह बीएसएनएल व बँकांचे अनेक खटले निकाली काढण्यात आले.

सटाण्यात दोनशे दिवाणीप्रकरणे निकाली

0
0
सटाणा - महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये सटाणा कोर्टात महालोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये दिवाणी, फौजदारीसह बीएसएनएल व बँकांचे अनेक खटले निकाली काढण्यात आले.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images