Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

जंक्शनचा चेहरामोहरा बदलणारा उमेदवार हवा

$
0
0
देशातील कोणत्याही भागात जाण्यासाठी रेल्वेचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या मनमाड जंक्शनचा चेहरामोहरा बदलावा, सुविधांची वानवा असणाऱ्या जंक्शन स्थानकाला आता तरी न्याय मिळावा, अशी प्रवासी वर्गासह स्थानिक नागरिकांची इच्छा आहे. केंद्रात जाऊन रेल प्रशासनाला विकास करायला भाग पाडेल, अशाच उमेदवाराला मत देण्याचा निर्धार चाकरमान्यासह सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.

कोटमगावचे सरपंच अतिक्रमणामु‌ळे अपात्र

$
0
0
शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याचे सिध्द झाल्याने तालुक्यातील कोटमगाव खुर्द ग्रामपंचायतीच्या सरंपच गयाबाई बाबासाहेब कोटमे यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. ज्ञानेश्वर लहरे यांनी त्यांच्याविरोधात विवाद अर्ज दाखल केला होता.

पांढरेंची भुजबळांना प्रश्नावली

$
0
0
राज्यात ठ‌िकठ‌िकाणी झालेल्या स‌िंचन घोटाळ्यांचा संदर्भ देत काही द‌िवसांपूर्वी अज‌ित पवारांना टीकेचे लक्ष्य करणाऱ्या ‘आप’ चे उमेदवार व‌िजय पांढरे यांनी पालकमंत्री छगन भुजबळांवर नेम साधला आहे.

१९ मतदारसंघांमध्ये महिलाराज

$
0
0
लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम राज्यात सध्या जोरात असून, या निवडणुकीत महिला अधिकाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे. राज्यातील तब्बल ९ जिल्ह्यांमधील १९ लोकसभा मतदारसंघांसाठी उपजिल्हा निवडणूक अधिकारी या पदावरील ९ महिला काम पाहत आहेत.

युवराजांपुढे वाचला तक्रारींचा पाढा

$
0
0
लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात असतानाही जिल्ह्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील शीतयुध्द काही संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. राष्ट्रवादीच्या कारभारावर नाराज असलेले काँग्रेस पदाधिकारी वरिष्ठांकडे आपली खदखद सतत व्यक्त करतात.

सोनियांची मालेगावची सभा रद्द

$
0
0
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची मालेगाव येथे येत्या रविवारी होणारी जाहीर सभा रद्द झाली असून, त्याच दिवशी नंदुरबार येथील सभा मात्र होणार आहे. त्यामुळे नाशिक आणि धुळे जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांमध्ये निराशेचे वातावरण आहे.

एसटी वाढवणार मतांचा टक्का

$
0
0
मतदान करणे हा प्रत्येकाचा हक्क असला तरी निवडणुकीच्या कामामध्ये गुंतून पडणाऱ्यांना इच्छा असूनही मतदान करता येतेच असे नाही. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीतही असेच घडते. मात्र, यंदा निवडणुकीसंदर्भातील कामे सोपविलेल्या चालक आणि वाहकांना मतदानाचेही कर्तव्य पार पाडता यावे, यासाठी त्यांच्या मतदान केंद्राजवळील भागातच ड्यूटी द्या, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.

मनसेची गुजरातीत पत्रकबाजी!

$
0
0
मनसेने नाशिकमधील उमेदवार डॉ. प्रदीप पवार यांच्या प्रचारार्थ मोदी यांच्या फोटोसह गुजराती भाषेतील पत्रके वाटल्याने नाशिकमधील शिवेसना भाजपमध्ये संताप व्यक्त केला जातो आहे. हा मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रकारा असल्याची टीका सेना-भाजपने केली आहे.

रंजना फडकेंच्या ‘कथक’चे आयोजन

$
0
0
मुंबईच्या रंजना फडके यांच्या कथक नृत्याचा कार्यक्रम १९ एप्रिलला (शनिवार) नाशिकमध्ये आयोजित करण्यात आला आहे. संध्याकाळी सहा वाजता गंगापूररोडवरील शंकाराचार्य डॉ. कूर्तकोटी सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.

सटाण्यात पटेलांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीची आघाडी

$
0
0
राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी असली तरी ऐन निवडणुकीत बहुतांश ठिकाणी दोघांमध्ये धुसफूस होऊन आघाडीची बिघाडी झाल्याचे दिसून आले. धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये मात्र काँग्रेसचे उमेदवार अमरीश पटेल यांच्या प्रचारात बागलाणमध्ये स्वपक्षीयांचे तोंड चार दिशांना असताना राष्ट्रवादी एक पाऊल पुढेच असल्याचे चित्र आहे.

दरेगावकर बजावणार मतदानाचा हक्क

$
0
0
बागलाण तालुक्यातील प्रलंबित हरणबारी डाव्या कालव्याच्या कामासाठी येत्या २४ तारखेच्या मतदानावर बहिष्कार टाकणाऱ्या दरेगांवकरांपुढे दोन्ही राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांनी लोटांगण घातल्यामुळे बहिष्काराचा निर्णय मागे घेतला.

शिक्षण मंडळ विद्यार्थ्यांच्या दारी

$
0
0
महापालिका शाळांमध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, याकरिता महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी किरण कुवर आपल्या सहकाऱ्यांसह घरोघरी जात आहेत. सिडको व सातपूर भागात हा उपक्रम राबविला जात आहे. महापालिका शाळांमधील सुविधांची माहिती देत पालकांशी संवाद साधण्यात येत आहे.

पोलिस महासंचालक पदकावर नाशिकची मोहोर

$
0
0
नाशिक पोलिस दलात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दोन निरीक्षकांसह चार कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालकांचे पदक जाहीर झाले आहे. विशेष म्हणजे पदक प्राप्त विजेत्यांमध्ये नाशिक ग्रामीण पोलिसांची संख्या अधिक आहे.

गोदावरीच्या मोकळ्या श्वासासाठी उपाययोजना

$
0
0
प्रदूषित पाण्याचे स्रोत बंद करून गोदावरी नदीच्या पाण्याची बीओडी (ऑक्सीजन) पातळी दहापर्यंत आणण्यासाठी आज झालेल्या बैठकीत एकमत झाले. यासाठी गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्याबाबत हायकोर्टाच्या सूचनेनुसार नियुक्त झालेल्या समितीची आढावा बैठक विभागीय महसूल आयुक्त एकनाथ डवले यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

नाले वाढवताहेत प्रदूषण

$
0
0
मुंबई हायकोर्टाने गोदावरी प्रदूषणाबाबत नेमलेल्या समितीने गोदावरीची पाहणी केली असली तरी गोदावरीत मिसळणाऱ्या सांडपाण्याची पाहणी समिती करणार तरी कधी, असा सवाल उपस्थित होत आहे.

सायखेडा रोडवर उभारले स्पीडब्रेकर

$
0
0
जेलरोडच्या प्रभाग ३२मधील जुना सायखेडा मार्गावर अखेर स्पीडब्रेकर तयार करण्यात आल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

उद्धव यांची आज नाशिकमध्ये सभा

$
0
0
नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा शुक्रवारी साडेपाच वाजता गोल्फ क्लब मैदानावर आयोजित करण्यात आली असून सभेच्या यशस्वीतेसाठी शिवसेनेने जय्यत तयारी केली आहे.

आणखी ३०० कर्मचाऱ्यांना इलेक्शन ड्युटी

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या कामांसाठी निवडणूक आयोगाने महापालिकेच्या सुमारे एक हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. महापालिकेने इलेक्शन ड्युटीसाठी यापूर्वीच ७२० कर्मचाऱ्यांना नियुक्त केले होते. आता नव्याने सुमारे ३०० कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्यात आली असून हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

निवडणुकीसाठी एमईटीच्या कर्मचाऱ्यांचा वापर?

$
0
0
नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार छगन भुजबळ यांच्या मालकीच्या मुंबई एज्युकेशन ट्रस्ट (एमईटी) या संस्थेतील कर्मचाऱ्यांना निवडणूक कामकाजात सहभागी केले जात आहे का, अशी विचारणा करत जिल्हाधिकाऱ्यांनी एमईटीच्या सचिवांकडून खुलासा मागविला आहे.

निवडणूक ओळखपत्र नाही, नो टेन्शन!

$
0
0
येत्या २४ एप्रिल असलेल्या मतदानासाठी निवडणूक ओळखपत्र मतदाराकडे नसले तरी त्यांची चिंता करण्याची गरज नाही. कारण, एकूण ११ ओळखपत्रांपैकी कुठलेही एक ओळखपत्र मतदाराने दाखविल्यास त्याला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images