Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

सर्व्हिसरोड झालाय ‘पार्किंग रोड’

0
0
सर्व्हिस रोडला वर्षानुवर्षे पडलेला गॅरेजेसचा विळखा मुंबई-आग्रा हायवेच्या सहापदरीकरणामुळे काहीसा कमी होतो न् होतो तोच, आता हा रस्ता बड्या शिक्षण संस्थांसाठी ‘पार्किंग रोड’ बनू लागला आहे. या पार्किंगमुळे सर्व्हिस रोडवरील प्रवास धोकेदायक बनला आहे.

वाइन उद्योगाला गती मिळेल!

0
0
भारतीय द्राक्ष हंगाम वाइन महोत्सव नाशकात शनिवारपासून सुरू होत आहे. द्राक्ष प्रक्रिया आणि खासकरून वाइन उद्योगाला चालना देणारा हा राष्ट्रीय महोत्सव अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण आहे.

नाशिक शिवसेनेत धूसफूस कायम

0
0
वर्षभरापासून प्रतीक्षेत असलेल्या शहर शिवसेनेच्या कार्यकारिणीला मुहूर्त लागला असला तरी नव्या कार्यकारिणीवरही वाद सुरू झाला आहे. नव्या कार्यकारिणीत निष्ठावंतांना वगळल्याबद्दल मध्य नाशिकमधील शिवसैनिकांनी पदाधिकाऱ्यांना जाब विचारला आहे.

वाळू तस्कराने पोलिसावर ट्रक घातला

0
0
वाळू तस्करांची मुजोरी वाढतच चालली असल्याचे प्रत्यंतर देणारी घटना शुक्रवारी पहाटे चाळीसगाव तालुक्यात घडली. कारवाई करायला गेलेल्या पोलिस पथकावर ट्रॅक्टर घालून एका कर्मचाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न एका तस्कराने केला.

वशीकरणाच्या नावाखाली फसवणूक

0
0
प्रेमवशीकरण, पत्नीवशीकरण, जादुटोणा, करणी, बाधा यासारख्या समस्यांवर उपाय करण्याच्या बहाण्याने आर्थिक फसवणुकीचा गोरखधंदा सर्रासपणे सुरु असल्याची बाब पुढे आली आहे.

मनसेची ‘कुसुमाग्रजां’कडे पाठ!

0
0
‘आजन्म ही तुझी मी केल्यावरी प्रतीक्षा... माझाच भास माझ्या अंगावरून गेला!’... सुरेश भटांच्या या आर्त ओळींची प्रचिती कुसुमाग्रज उद्यानाकडे पाहिल्यावर येते. कुसुमाग्रजांच्या जन्मदिनीही ‘मनसे’ने उद्यानाकडे पाठ दाखविल्याने मराठीचा टेंभा मिळविणाऱ्यांनी गेल्यावर्षी प्रसिद्धीसाठी केलेले ‘साफसफाई’चे ढोंग समोर आले आहे.

कुंपणच खाणार निधी

0
0
मालेगाव तालुका क्रीडा संकुलासाठी सामाजिक प्रश्नाचे भांडवल करीत स्थानिक आमदारांनी आग्रही भूमिका ठेवल्याने मालेगावला दोन संकुल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संकुलांसाठी अवघे एक कोटी रुपयेच मिळणार असून एका संकुलात केवळ कंपाऊंड वॉलचेच काम पूर्ण होऊ शकणार आहे.

पाथर्डीफाटा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला

0
0
नाशिक ते मुंबई प्रवास सुखकर करण्यासह नाशिकच्या सौदर्यात भर घालणाऱ्या पाच उड्डाणपुलापैकी महत्त्वाचा मानला जाणारा पाथर्डी फाट्यावरील उड्डाणपूल शनिवारी वाहतुकीस खुला करण्यात आला.

अध्यक्षांचा कालावधी पाच वर्षांचा

0
0
केंद्रीय सहकार कायदा लागू केल्यानंतर त्यावर आधारित जिल्हा बँकांसाठीची आदर्श उपविधी राज्य सरकारने लागू केली आहे. त्यानुसार बँकेच्या अध्यक्षांचा कालावधी पाच वर्षांचा राहणार आहे. या उपविधीनुसार नाशिक जिल्हा बँकेला १५ एप्रिलपूर्वी ही उपविधी मंजूर करावी लागणार आहे.

शारीरिक अपंगत्वावर मात करीत त्यांनी जपला हौसला

0
0
शारीरिक व मानसिक अपंगत्वावर मात करीत महात्मानगर ते एबीबी सर्कल दरम्यानच्या मॅरेथॉनमध्ये सहभागी होत मूकबधीर विद्यार्थ्यांनी 'हौसला' जपला. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांसह मल्लखांबासारख्या मैदानी खेळांमध्ये सहभागी होत या विद्यार्थ्यांनी वातावरणात चैतन्य निर्माण केले.

शहर वाहतुकीचा आजपासून सर्व्हे

0
0
नाशिक शहरातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी आज, रविवारपासून शास्त्रीय सर्व्हेला सुरुवात होत आहे. क्लीन एअर एशिया आणि इन्स्टिट्युट फॉर ट्रान्सपोर्टेशन अँड डेव्हलपमेंट पॉलिसी (आयटीडीपी) यांच्या वतीने आठ दिवस हा सर्व्हे होणार असून महिनाभरानंतर त्याचा रिपोर्ट महापालिकेला सादर केला जाणार आहे.

'त्या' बालकाला वाचविण्याचा प्रयत्न अयशस्वी

0
0
अमळनेर तालुक्यातील तांदळी येथील एका शेतात बोअरवेलमध्ये पडलेल्या साडेतीन वर्षाच्या भटू धनगरला बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने प्रयत्नांची शिकस्त केली, लष्करालाही बोलावले.

ब्लॅकलिस्टेड कंपनीलाच अॅडव्हान्स

0
0
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सत्ताधारी गटाने कम्प्युटर खरेदीसाठी अखेर कोलकाता येथील ब्लॅकलिस्टेड नेलिटो कंपनीला सुमारे १७ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेच्या संचालक मंडळाची बैठक शनिवारी दुपारी झाली.

जळगावातून एप्रिलात विमान उड्डाण

0
0
जळगाव विमानतळावरुन एप्रिलमध्ये विमानसेवा सुरू करण्याचे आश्वासन नागरी हवाई वाहतूकमंत्री अजितसिंग यांनी खान्देशच्या शिष्टमंडळाला दिले आहे, अशी माहिती रावेरचे खासदार हरीभाऊ जवळे यांनी दिल्लीहून मटाशी बोलतांना सांगितले.

नाशिक ब्रँडसाठी पुढाकार घेणार

0
0
नाशिक ब्रँड म्हणून विकसित करण्यासाठी सर्व संस्था-संघटनांनी एकत्रित बसून निर्णय घ्यावा. सर्वसमावेशक अशा नाशिक ब्रँडसाठी पुढाकार घेऊन सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन सर्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले. नाशिक फेस्टिव्हलच्या उद्‍‍घाटनप्रसंगी ते बोलत होते.

सदस्यपदासाठी इच्छुकांमध्ये रस्सीखेच

0
0
स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक समोर ठेवून सदस्यपदासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. अजय बोरस्ते यांच्या रिक्त जागेवर जाण्यासाठी शिवसेनेचे अॅड. शिवाजी सहाणे यांनी तयारी सुरू केली आहे. तर अन्य पक्षांतही इच्छुकांची भाऊगर्दी आहे.

होणार वाइन पर्यटनाचा विकास

0
0
देशभरात सांस्कृतिक, धार्मिक, किल्ले, लेण्या, शैक्षणिक, आरोग्य तसेच वाइन अशा विविध क्षेत्रांतील पर्यटनाला मोठी गती प्राप्त होत आहे. म्हणूनच वाइन कॅपिटल असलेल्या नाशकासह राज्यभरात वाइन पर्यटनाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी ग्वाही राज्याचे पर्यटनमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

घरपोच लायसन्सला 'SMS'ची जोड

0
0
कधी कुलूपबंद घर, तर कधी अचूक पत्त्याअभावी परत जाणाऱ्या आरसी बुक व ड्रायव्हिंग लायसन्सच्या तक्रारींना पायबंद घालण्यासाठी आरटीओ कार्यालयातर्फे 'क्रेड‌िट कार्ड'प्रमाणे घरपोच लायसन्स पद्धतीला 'एसएमएस अलर्ट'ची जोड देण्याचा विचार सुरू आहे.

मुलगी टाकून महिला फरार

0
0
किराण्याच्या बहाण्याने एक महिला साडेतीन-चार महिने वयाच्या मुलीला भांडेविक्रेत्या महिलेकडे सोपवून पळून गेल्याची घटना शनिवारी दुपारी सातपूरच्या शिवाजी मार्केटमध्ये घडली. किराणा घ्यायचा असल्याने मुलीला थोडावेळ सांभाळ, असे सांगत त्या महिलेने बाळ सोपविले.

तुझ्याचसाठी खेळ मांडियेला...

0
0
अवघ्या शहरावर लक्ष ठेवून असलेल्या दादांच्या चूकांवर बोलणं त्याहून मोठी चूक. तर मुद्द्याचा पॉईंट असा की, प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भागातल्या पोलिस स्टेशनमध्ये एके रात्री पत्त्यांचा डाव मांडण्यात आला होता.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images