Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

प्रचारसाहित्य आले फॉर्मात!

$
0
0
मतदानाचा दिवस जवळ येत असल्याने निवडणूक प्रचारसाहित्याची विक्री वाढली आहे. शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या दुकानांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, रिपाईं, मनसे, शिवसेना, भाजप, माकप अशा सर्वच पक्षांचे साहित्य एकत्रितरित्या पाहायला मिळत आहे. सध्या तरी राजकीय पक्षांच्या साहित्यांपेक्षा अपक्षांच्या साहित्याला अधिक किंमत मिळत असल्याचे चित्र आहे.

नाशिकमध्येही मतदारांची नावे गायब!

$
0
0
गेल्या पंचवीस वर्षापासून वास्तव्यास असताना, त्याचबरोबर यापूर्वी वेळोवेळी मतदानाचा हक्क बजावूनही राजीवनगर परिसरातील शेकडो मतदारांना यंदा मतदानापासून वंचित राहावे लागणार आहे.

रोटेशनअभावी ४० गावांच्या पाणीपुरवठा योजना ठप्प

$
0
0
चणकापूर धरणातील रोटेशन दहा दिवस उशिराने मिळत असल्यामुळे गिरणा नदीपात्र कोरडेठाक झाले आहे. पाण्याअभावी सुमारे चाळीस गावांच्या पाणीपुरवठा योजना ठप्प झाल्या आहेत. या भीषण पाणीटंचाईमुळे सटाणा आणि देवळा शहरासह चाळीस गावांना दहा दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहेत.

आचारसंहितेने काढला उमेदवारांचा घाम

$
0
0
निवडणुका म्हटल्या की वाहनांचा ताफा, कार्यकर्त्यांची फौज, कर्णकर्कश आवाजातील लाउडस्पीकरचा गोंधळ याम‌ुळे सगळेच हैराण होऊन जातात. मात्र, यंदा निवडणूक आयोगाच्या कडक आचारसंहितेमुळे मतदारांपर्यंत पोचण्यासाठी उमेदवाराकडे प्रत्यक्ष भेटीगाठींशिवाय पर्याय राहिलेला नाही. आचारसंहितेच्या नियमांमुळे उमेदवारांना घाम फुटला असून, मतदारांना मात्र दिलासा मिळाला आहे.

मध्य रेल्वे रविवारी होणार `स्लो`

$
0
0
मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण व पनवेल ते नेरुळ या मार्गावर दुरुस्ती करण्यात येणार असल्याने रविवारी दुपारी ११ ते ४ या कालावधीत मेगाब्लॉक करण्यात येणार आहे. या मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या नसल्या तरी त्या धिम्या गतीने चालण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, मुंबईहून नाशिकरोडकडे येणाऱ्या प्रवाशांना लेट होण्याची शक्यता वर्तविला जात आहे.

मोटारसायकल गिरणीने सोडवला रोजगाराचा प्रश्न

$
0
0
गरज ही शोधाची जननी आहे, असं म्हटलं जातं. वाढत्या बेरोजगारीने शहरांबरोबरच ग्रामीण भागातही तरुणांच्या हाताला काम नाही. यामुळे बदापूर येथील तरुणाने मोटरसायकलवर गिरणी बसवून रोजगाराचा नवा पर्याय शोधून काढला. त्याच्या या प्रयत्नांना चांगले यश मिळाले असून त्याच्या रोजीरोटीची प्रश्न सुटला आहे.

मोदी विधानसभेत तोंडही उघडत नाहीत

$
0
0
गुजरात मॉडेल फसवे असल्याचे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शुक्रवारी पुन्हा नरेंद्र मोदींवर हल्ला चढविला. गुजरातमध्ये वर्षभरात फक्त दहा दिवसांचे अधिवेशन होते. या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी अभिभाषणात उत्तर देणे आवश्यक असताना नरेंद्र मोदी मात्र तोंड उघडत नाही. ही लोकशाहीची पायमल्ली असून, अशा प्रवृत्तींना वेळीच समाजाने रोखणे आवश्यक आहे, अशी टीका पवार यांनी केली.

जनता भुजबळांच्याच पाठिशी

$
0
0
आपले हित, अहित कशात आहे हे, जनतेला चांगले कळते. त्यामुळे येत्या नाशिक लोकसभा निवडणुकीत कुणाला विजयी करावयाचे, याचा निर्णय जनता जनार्दनच घेईल. कोण विकास करतोय, कोण फक्त गप्पा मारतोय, कोण फक्त आश्वासने देतोय, हेही जनतेला चांगले ठाऊक आहे. त्यामुळे ज्यांची जात आणि धर्म विकास आहे, अशा छगन भुजबळांच्या पाठिशी जनता राहिल, असा विश्वास वनाधिपती विनायकदादा पाटील यांनी व्यक्त केला आहे.

नाशिकमधील पोलिस असुरक्षित

$
0
0
कायदा आ​णि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना अनेकदा कारवाई करावी लागते, मात्र नियम किंवा कायद्याचे पालन करण्याऐवजी पोलिसांनाच मारहाण करण्याच्या घटना शहरात वाढत आहेत. वाहतूक पोलिस तसेच पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक पदावरील अधिकाऱ्यांवर हल्ला करण्याचे प्रसंग वारंवार घडत आहेत. त्यामुळे पोलिस हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे.

पाणी कापणाऱ्यांची मस्ती जिरवा

$
0
0
घोटाळ्यांमधून कमावलेला पैसा आणि गुंडागर्दी यांच्या मदतीने निवडणुका जिंकण्याची काँग्रेस आघाडीची रित आहे. या आधारेच आता ते गोरगरीबांचे पाणी तोडण्याची भाषा करीत असून त्यांची मस्ती या निवडणुकीत सर्वसामान्य जनताच ​जिरवणार, अशी टीका शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली.

महागाईसोबत उत्पन्नही वाढले!

$
0
0
गगनाला भिडणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असताना ‘महागाई वाढली असली तरी लोकांचे उत्पन्नही वाढले आहे,’ असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आमदार नवाब मलिक यांनी सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. राष्ट्रवादीचे नाशिकचे उमेदवार छगन भुजबळ यांच्या प्रचारार्थ जुन्या नाशिकमध्ये आयोजित सभेत बोलताना मलिक यांनी हा अजब युक्तीवाद केला.

उत्सुकता राज ठाकरेंच्या सभेची

$
0
0
‘माझ्या १९ तारखेच्या सभेला या, बघा कसा टराटरा फाडतो’, या शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नाशिकमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार छगन भुजबळ यांना इशारा दिल्याने नाशिकसह राज्याचे लक्ष राज यांच्या आजच्या(शनिवार) सभेकडे लागले आहे.

उपनिरीक्षक पांडव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

$
0
0
रेल्वे सुरक्षा दलाचे सहाय्यक उपनिरीक्षक अनिल नथु पांडव (४६) यांच्यावर शनिवारी जेलरोड येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बंदुकीच्या फैरींची सलामी देत साश्रु नयनांनी त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी त्यांचे सहकारी, नागरिक व आप्तेष्ट उपस्थित होते.

मतदानासाठी मतदार यादीत नाव हवेच!

$
0
0
मतदार यादीत नाव नसले तरी अन्य पुरावे दाखवून मतदान करता येईल, अशा प्रकारचे संदेश व्हॉट्स अप आणि इतर सोशल नेटवर्किंग साईटसवरुन फिरत असले तरी ते बनावट असून मतदार यादीत नाव असलेल्यांनाच मतदान करता येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

विकासात्मक लेखाजोखा

$
0
0
सत्ताधाऱ्यांकडून आपण नेमकी कोणती कामे केली हे पटवून देण्यासाठी पक्षपातळीवर विविध प्रयत्न केले जात आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे को-ऑपरेटिव्ह सेलचे राज्यप्रमुख विश्वास ठाकूर यांनी मात्र एक आगळावेगळा प्रयत्न केला आहे. आघाडी सरकारने आपल्या कार्यकाळात कोणती कामे केली याचा लेखाजोखाच त्यांनी माहितीपुस्तिकेच्या स्वरुपात जनतेसमोर मांडला आहे.

अजित पवार आज नाशिकमध्ये

$
0
0
लोकसभा निवडणुकीतील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे नाशिकमधील उमेदवार छगन भुजबळ यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज(रविवार) नाशिक दौऱ्यावर आहेत. आपल्या एकदिवसीय नाशिक दौऱ्यात ते गिरणारे, भगूरसह लेखानगर परिसरात प्रचारसभा घेणार आहेत.

शक्ती प्रदर्शनासाठी सरसावली सेना

$
0
0
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेला शिवसैनिकांनी प्रंचड प्रतिसाद दिला. शिवसैनिकांमधील हा उत्साह पुढील तीन ते चार दिवस टिकवून धरण्यासाठी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली असून, त्या अनुषगांने प्रचारनीती आखण्यात आली आहे. यासाठी विविध नेत्यांच्या सभा आणि रोडशोच्या आयोजनावर सेनेने भर दिला आहे.

मतदान चिठ्ठी नाही मिळाली? फोन करा

$
0
0
बुथ लेव्हल ऑफिसर्स (बीएलओ) कडून मतदान चिठ्ठी वाटप सुरू झाले असले तरी ज्यांना अद्याप चिठ्ठी मिळालेली नाही त्यांना मतदार हेल्पलाइनला फोन करून संबंधित बीएलओचा संपर्क क्रमांक मिळू शकणार आहे. त्यामुळे मतदान चिठ्ठीची घरी वाट पाहण्याऐवजी थेट बीएलओला गाठून ही चिठ्ठी प्राप्त करता येणार आहे.

उमेदवाराच्या घराजवळ गोंधळ घालणारा ताब्यात

$
0
0
लोकसभा निवडणुकीतील बहुजन समाज पक्षाचे उमेदवार दिनकर पाटील यांच्या घराजवळ गोंधळ घालून प्रचारकार्यात अडथळा आणणाऱ्याला गंगापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संबंधित आरोपीचा उद्देश जाणून घेण्यासाठी त्याची सखोल चौकशी करा, असे निवेदन पाटील यांनी पोलिस तसेच निवडणूक आयोगाला दिले आहे.

नाशिक-पुणे मार्गावर अपघातात तीन ठार

$
0
0
नाशिक-पुणे महामार्गावर हाबेवाडी शिवारात हॉटेल अतुलजवळ दोन कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातात तीन जण ठार, तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेदहाच्या दरम्यान घडली. गंभीर जखमी झालेल्यांमध्ये सिन्नर मनसेचे तालुकाध्यक्ष जयंत आव्हाड यांचा समावेश असून, त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे समजते.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images