Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

आधी देशाला काँग्रेसमुक्त करा

$
0
0
देशातली गरीबी सत्ताधाऱ्यांचे षड्यंत्र असून, देशाला जर गरीबीतून मुक्त करायचे असेल तर पहिल्यांदा काँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न आपल्याला पूर्ण करावे लागेल. गरीबांच्या नावाने योजना आणायच्या, त्या कधीही गरीबापर्यंत पोहचू द्यायच्या नाहीत. यांचे चेले-चपाटे सगळ्या योजना खाऊन टाकतात. ते श्रीमंत होतात अन् देशाला गरीब ठेवतात, असा घणाघाती आरोप करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केला.

शेवटचा रविवार होणार ‘इन्कॅश’

$
0
0
बहुतांश नागरिक रविवारच्या सुट्टीच्या दिवशी घरी असल्यामुळे या दिवशी सर्वच पक्ष आपापला उमेदवार आणि पक्षाचे चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचावे म्हणून धडपडत असतात. साहजिकच त्यामुळे रविवारच्या दिवशी प्रचाराचा वेग वाढतो. त्यातच राज्यात तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान २४ एप्रिलला होणार असल्याने प्रचारासाठी आज, शेवटचा रविवारच उमेदवारांच्या हाती आहे.

गुजराती मतांसाठी खटाटोप!

$
0
0
लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतदानासाठी अवघे पाच दिवस बाकी असल्याने प्रमुख पक्षांकडून मतांच्या मोर्चेबांधणीने वेग धरला आहे. यात प्रमुख संघटना, संस्था व समाजाची मते मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू असून, यात गुजराती बांधवांचाही समावेश आहे.

मोदी आज `थ्रीडी`च्या रूपात

$
0
0
भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे उत्सुकता सर्वांना होती. मात्र, व्यस्त कार्यक्रमामुळे नाशिक जिल्ह्यात त्यांची सभा पार पडली नाही. यावर पर्याय महायुतीने चक्क थ्री डी सभेचे आयोजन केले आहे.

मोदी पाणी पळवणार नाहीत!: मुंडे

$
0
0
नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे पाणी पळवणार नाहीत. मोदी प्रधानमंत्री झाले तर महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल, असे प्रतिपादन भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांनी करून, नाशिकमधून हेमंत गोडसे, दिंडोरीतून हरिश्चंद्र चव्हाण तर धुळ्यातून डॉ. भामरे यांना विजयी करा, असे आवाहन केले.

दोन हायवे प्रकल्प अडचणीत

$
0
0
अमरावती ते जळगाव आणि जळगाव ते गुजरात सीमा (एनएच ६) या खान्देशातील दोन रस्त्यांच्या रुंदीकरण प्रकल्पांमधून एल अँड टी कंपनीने काढता पाय घेतल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. त्यामुळे तब्बल एकूण साडेचार हजार कोटी रुपयांचे हे प्रकल्प गेल्या तीन वर्षांपासून रखडले असून हे रुंदीकरण पूर्ण होण्याला आणखी किती काळ लागेल, याबाबत संभ्रमावस्थाच आहे.

‘शिवसेनेला भुजबळ कसे चालतात?’

$
0
0
मी बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचे सांगणा-यांना बाळासाहेबांची टिंगल करणारे, त्यांच्यावर केसेस टाकणारे, त्यांना अटक करणारे छगन भुजबळ कसे चालतात, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.

गुजरातच्या तुलनेत त्र‌िपुरा वरचढच

$
0
0
त्र‌िपुरासारख्या दुर्गम राज्यालाही स्थलांतराच्या स्थ‌ितीतून आम्ही स्थैर्य म‌िळवून द‌िले आहे. त्र‌िपुरात‌ील प्रत्येक माणसाला पुरेसा रोजगार आण‌ि आद‌िवासींसाठी वनहक्क कायद्याची ९९ टक्के अंमलबजावणी करत आम्हीच खरा व‌िकास साधला आहे. गुजरातचा व‌िकास केवळ भांडवलदारांचा देखावा आहे. मोदी हे भांडवलदारांचे प्यादे आहे, असा प्रहार त्र‌िपुराचे मंत्री ज‌ितेंद्र चौधरी यांनी पत्रकार परिषदेत केला.

...त्यांनी मला आव्हान देऊ नये!

$
0
0
ज्यांना बापजाद्यांच्या जिवावर पक्षाची विरासत मिळाली आहे, त्यांनी मला निवडणूक लढविण्याचे आव्हान देवू नये. कारण, मी चौदा वेळा निवडणूक लढवून प्रचंड मतांनी निवडून गेलो आहे. तुम्ही एकदा तरी निवडणूक लढवून जिंकून दाखवा आणि मग मला आव्हान द्या, असे प्रत्युत्तर केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले.

... आता निघाले दिल्ली लुटायला!

$
0
0
राज्यातील विविध भूखंडांपासून स्वतःच्या उद्योगात भ्रष्टाचाराद्वारे भुजबळांनी गडगंज संपत्ती कमावली आहे. आजवर त्यांनी महाराष्ट्र लुटला असून, आता ते दिल्ली लुटायला निघाल्याची टीका करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिकमधील उमेदवार छगन भुजबळ यांना लक्ष्य केले.

कार अपघाताच तिघे ठार

$
0
0
कळवण शहरपासून अभोणा रस्त्यावरील कळमथे फाट्यानजीक मोरी पुलावरून वॅगण कार पन्नास फूट खाली कोसळून एकाच कुटुंबातील तीन जण जागीच ठार झाले. ही घटना संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली.

प्रचार फेरी

$
0
0
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या शहरात सर्वत्र जोरदार प्रचार सुरू आहे. या प्रचारामुळे गोरगरीबांनाही ‘किंमत’ मिळू लागली आहे. त्यामुळे शहरातल्या अनेक घरेलू काम करणाऱ्या महिला अचानक आजारी पडल्या आहेत.

मुसळगावच्या विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

$
0
0
सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथील विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार शनिवारी रात्री उघडकीस आला. चित्रा उर्फ शोभा सुकदेव शिंदे (वय ३०) रा. मुसळगाव, या विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्त्या केली.

भालेराव अॅग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्रीजचे आगीत २.५ कोटींचे नुकसान

$
0
0
निफाड तालुक्यातील कोठुरे शिवारातील भालेराव अॅग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्रीजला लागलेल्या भीषण आगीत अडीच कोटी रुपयांचे नुकसान झाले. नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील कोठुरे येथील शिवाजी भालेराव यांच्या मालकीची ही इंडस्ट्री आहे.

लाडक्या बडीसाठी केले जीवाचे रान

$
0
0
मधमाशांनी हल्ला केल्याने जीवन मरणाची लढाई लढणाऱ्या आपल्या लाडक्या बडी या कुत्र्याची रात्रंदिवस सुश्रुषा करून त्याला मरणाच्या दारातून सहीसलामत बाहेर आणण्याचे काम येथील ह्रदयरोग विशारद डॉ. संदीप कुलकर्णी यांनी केले आहे.

अत्यावश्यक सेवेच्या कक्षाला ‘उष्माघाताचे’ कोंदण

$
0
0
परिसरात उष्णतेच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनेकांना वाढत्या उन्हाचा त्रास होत आहे. उष्माघाताचा त्रास होणाऱ्या रुग्णांसाठी येथील ग्रामीण रुग्णालय प्रशासनाने अत्यावश्यक सेवेसाठी वापरण्यात येणाऱ्या रुममध्येच बंद पडलेले कुलर ठेवून तात्पुरती सोय केली आहे.

शिरपूर पॅटर्न देखावाच

$
0
0
काँग्रेसचे उमेदवार आमदार अमरीश पटेल यांच्या शिरपूर पॅटर्नची भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुंनगुट्टीवार यांनी चिरफाड केली. शिरपूर पॅटर्न म्हणजे जनतेला उल्लू बनवण्याचा प्रकार असल्याची टीका त्यांनी केली.

शिरपूर पॅटर्न अन् मराठा फॅक्टरवर मदार

$
0
0
धुळे लोकसभा निवडणुकीसाठी येत्या २४ एप्रिलला मतदान होत आहे. अखेरच्या टप्प्यात प्रचार शिगेला पोहचला आहे. या मतदारसंघात एकोणावीस उमेदवार नशीब आजमावत असले तरी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार अमरीश पटेल आणि भाजप महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्यात काँटे की टक्कर होत असल्याचे दिसून येते.

काँग्रेसचे प्रचार कार्यालय बनले वादग्रस्त ठिकाण

$
0
0
दोन माजी आमदारांच्या खडाजंगीनंतर सटाणा शहरातील काँग्रेस उमेदवाराचे प्रचार कार्यालय आता रोजच्या भांडणांनी चकमकीचे ठिकाण बनले असल्याची सध्या शहरात जोरदार चर्चा रंगली आहे.

जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पाऊस

$
0
0
अवकाळी पाऊस व गारपिटीचा कहर सुरूच असून रविवारी जिल्ह्यात काही भागात पाऊस व गारपीट झाली. यामुळे शेतकऱ्यांसह चाकरमान्यांची धावपळ झाली. गारपिटीमुळे सटाणा तालुक्यात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. गेल्या आठवड्यात बुधवारी बागलाणच्या पश्चिम पट्ट्यात मुसळधार पाऊस झाला होता.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images