Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

राजकडे मॉल घेण्यासाठी पैसे कुठून आले?

$
0
0
राज ठाकरे यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचं सांगत दुबईत मॉल घेण्यासाठी राज यांनी पैसा कुठून आणला होता, प्रश्न राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केला आहे.

कार्यकर्ते अडकले ल‌िफ्टमध्ये

$
0
0
नेत्याच्या लेखी कार्यकर्त्याची ‘धरलं तर चावतं अन् सोडलं तर पळतं’ अशी अवस्था असते. कार्यकर्त्याच्या या महतीमुळेच न‌िवडणूकीसारख्या हंगामात त्याचे मन मोडून अज‌िबात चालत नाही. परिणामी, ‘वाट्टेल तसा वागू दे पण् पक्षासाठी राबू दे’ हेच धोरण अडलेल्या उमेदवाराला स्वीकारावे लागते.

''मातोश्री', 'कृष्णकुंज'वर सर्वाधिक टोल"

तुमच्या हक्काचे पाणी तुम्हालाच मिळणार

$
0
0
केंद्रात नरेंद्र मोदींची सत्ता येणारच असून उद्या जर महाराष्ट्राचे वाट्याला एकच मंत्रिपद आले तर माझ्याऐवजी हरिश्चंद्र चव्हाण यांना केंद्रीय मंत्रिपद देईल. मोदी महाराष्ट्राला भरभरून देतील. तुमच्या वाट्याचे पाणी तुम्हालाच मिळेल.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे ‍शहरात संचलन

$
0
0
लोकसभा निवडणूक दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने शहरात पोलिसांची अतिरिक्त कुमक दाखल झाली आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे आवाहन करीत शहरातील काही पोलिस स्टेशन्सच्या हद्दीत सोमवारी पोलिसांनी संचलन केले.

पटेलांचा शिरपूर पॅटर्न फसवा

$
0
0
शिरपूर पॅटर्न एक भूलभूलय्या असून स्वतःचे साम्राज्य सांभाळण्यासाठीच अमरीश पटेल यांचा खासदारकीचे कवच मिळविण्यासाठी आटापिटा सुरू असल्याची टीका बागलाणचे आमदार उमाजी बोरसे यांनी केली.

मनमाड शहरात सभांचाही दुष्काळ

$
0
0
लोकसभा निवडणुकीचा प्रचार सर्वत्र शिगेला पोहचला पण मनमाडकर मात्र यावेळी निवडणुकीच्या त्या खुमारापासून, त्या शाब्दिक कोट्या आणि आरोप प्रत्यारोप यांच्या शाब्दिक फटकेबाजीपासून चक्क वंचित राहिले.

इगतपुरी-घोटीत उमेदवारांचा कस

$
0
0
नाशिक जिल्ह्याचे प्रवेशव्दार व राजकीयदृष्ट्या संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण तालुका म्हणून इगतपुरी तालुक्याचा उल्लेख होतो. हा तालुका गेल्या पंचावार्षिक निवडणुकीपासून नाशिक लोकसभा मतदारसंघात समाविष्ट झाल्याने इगतपुरीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

‘पेशकारांनी २४ तासात बिनशर्त माफी मागावी’

$
0
0
‘शिमगा घोटाळ्यांचा’ या पुस्तिकेतून निवडणूक काळात आपली प्रतिमा मलिन केल्याचा आरोप करून नाशिक लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार छगन भुजबळ यांनी प्रकाशक प्रदीप पेशकार यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे.

‘समता’चे कार्यकर्ते भुजबळांच्या प्रचारार्थ

$
0
0
समता परिषदेचे सर्वेसर्वा आणी राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांच्या विजयासाठी बागलाणचे समता सैनिक एकवटले आहेत. परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष व नगरसेवक राजेंद्र सोनवणे यांच्यासह शेकडो समता सैनिक नाशिककडे रवाना झाले.

नावे शोधण्यासाठी होतेय फी आकारणी

$
0
0
लोकसभा निवडणूक दोन दिवसावर येऊनही सरकारी यंत्रणेकडून अनेक ठिकाणी मतदारांना अनुक्रम नंबर असलेल्या स्लिपांचे वाटप झाले नाही. यामुळे आयती आलेली संधी साधून अनेक सायबर कॅफे चालकांनी मतदार यादीत नावे शोधून देण्यासाठी दहा रुपये फी अकारण्यास सुरुवात केली आहे.

दरोड्याच्या तयारीतील टोळीला अटक

$
0
0
शिंगाडा तलाव परिसरातील अभिजीत सोसायटी जवळ दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळी भद्रकाली पोलिसांच्या गस्तीवरील पथकाने अटक केली. रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

मनसेचा टीआरपी खालावला

$
0
0
गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी, भुजबळांवर घराणेशाहीची टीका उद्धव ठाकरे करतात. पण ते जर बाळासाहेबांचे पुत्र नसते तर शिवसेनेचे कार्याध्यक्ष झाले असते का? असा सवाल करत राज ठाकरे यांच्यावरही टीका केली.

विविध कारणांनी मतदार हैराण

$
0
0
अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्याच्या काही भागातील मतदार हैराण झाल्याचे पहायला मिळत आहे. विविध कारणांमुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून जिल्हाधिकारी कार्यालयात वादावादीचीही घटना घडली आहे.

निवडणुकीत काँग्रेस कमिटीला टाळे!

$
0
0
लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच प्रमुख पक्ष जोमाने कामाला लागले असताना काँग्रेस कमिटी मात्र कुलूप बंद होती. निवडणुकीच्या नियोजनातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी झालेल्या वादामुळे काँग्रेस शहराध्यक्षांनी कमिटीला कुलूप ठोकल्याने एकच खळबळ उडाली.

नाशिककरांची शुद्ध फसवणूक

$
0
0
मनसेतर्फे गोदापार्कसाठी रिलायन्सकडून ५० कोटी आणल्याचे सांगितले जात असले तरी या प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीपोटी महापालिकेला २२०० कोटी मोजावे लागणार आहेत. त्यामुळे गोदापार्कची घोषणा म्हणजे निव्वळ फसवणूक असून, तो कधीही पूर्ण होणार नाही, असा टोला नाशिक लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार छगन भुजबळ यांनी मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला.

आचारसंहितेचा फटका

$
0
0
सार्वजनिक वाचनालयाची इमारत उभी असलेला भूखंड सरकारी मालकीचा असल्याने ‘सावाना’ने जाहीर केलेली २२ एप्रिलची वार्षिक सर्वसाधारण सभा मंडळाला तहकूब करावी लागली. सभा रद्द व्हावी यासाठी पी. वाय. कुलकर्णी यांनी कायदेशीर ‘जोर’ लावला होता.

अवकाळी पावसामुळे तारांबळ

$
0
0
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल होताना दिसत आहेत. कधी कडाक्याचे ऊन तर कधी ढगाळ हवामान आणि कधी पाऊस यामुळे नाशिकरांचे मात्र प्रचंड हाल होत आहेत. सोमवारी अशाच प्रसंगाला नाशिककरांना तोंड द्यावे लागले. अचानक आलेल्या पावसाने धावपळ करावी लागल्याने नाशिककर आता त्रस्त झाले आहेत.

नाशिकची जागा प्रतिष्ठेची

$
0
0
नाशिकमधील पक्षाचे आमदार, नगरसेवकांची संख्या पाहता नाशिक लोकसभा मतदारसंघ पक्षासाठी प्रतिष्ठेचा असून, कुठल्याही परिस्थितीत आपला उमेदवार निवडून आला पाहिजे, असे बजावत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नगरसेवकांना जोमाने काम करण्याचे आदेश दिले.

फसलेला व्यवहार

$
0
0
लोकसभा निवडणुकीतील प्रचारासाठी अखेरचा दिवस असल्यानं प्रमुख उमेदवारांनी मंगळवारी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. या शक्तीप्रदर्शनासाठी गर्दी जमवण्याचं आव्हान प्रमुख पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आलं होते.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images