Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

मिशन वन टू थ्री फोर

0
0
धावपळीच्या युगात आपसातील संवाद संपत चाललाय. मुलांबरोबर बोलायलाही आई-वडीलांना वेळ मिळत नाही. प्रसार माध्यमांचाही मोठा प्रभाव या मुलांवर होत असल्याचे परिणाम हाच दिग्दर्शक अमोल मुके यांच्या ‘मिशन वन टू थ्री फोर’ या च‌ित्रपटाचा आशय आहे.

दिंडोरीत उपसरपंचपदी शांताराम चारोस्कर

0
0
ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शांताराम चारोस्कर यांची बिनविरोध निवड झाली आहे. उपसरपंच त्र्यंबकराव मुरकुटे यांनी अवर्तनानुसार राजीनामा दिला होता. यानंतर आज दिंडोरी ग्रामपालिकेच्या सभागृहात सरपंच छबाबाई वाघ यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामविकास अधिकारी संजय पाटील यांचे उपस्थितीत उपसरपंचपदासाठी निवडणूक झाली.

वाघेरा ग्रामपंचायतीवर मनसेचा फडकला झेंडा

0
0
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणा-या वाघेरा ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा फडकला आहे. सरपंचपदी जयराम मोंढे यांची बिनविरोध निवड झाली आहे. हरसुल मंडलाधिकारी बोरसे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

सरकारी डॉक्टरांची खासगी प्रॅक्टिस

0
0
महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक आरोग्य सेवेत कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकारी व कर्मचा-यांना मूळ वेतनाच्या ३५ टक्के व्यवसाय रोध भत्ता मंजूर केलेला असतानाही कळवण उपजिल्हा रुग्णालयातील अनेक डॉक्टर खासगी प्रॅक्टिस करत आहेत. शासनाच्या नियमाला हरताळ फासण्याचे काम डॉक्टरांकडून बिनबोभाटपणे सुरू आहे.

रेल्वेत खाद्यपदार्थ शौचालयाच्या दारी

0
0
रेल्वेस्थानकावर तसेच रेल्वेत मिळणाऱ्या खाद्यपदार्थांची गुणवत्ता आणि दराबाबत नेहमीच जागरुक प्रवाशांकडून आवाज उठविला जातो. यावर तोडगा शोधून रेल्वे प्रशासनाकडून तात्पुरत्या कारवाईचा आव आणला जातो.

मालेगाव @ ४४ अंश

0
0
नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे गरमागरम राहणारे मालेगाव आता उष्ण तापमानामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सोमवारी (ता. २८) मालेगावमध्ये विक्रमी ४४ अंश तापमानाची नोंद झाली आहे. तळपत्या उन्हाने घामाळलेल्या मालेगावकरांची काहिली झाली आहे.

ज्येष्ठ साहित्यिक गोपाळ रेडगावकर कालवश

0
0
ज्येष्ठ साहित्यिक गोपाळ त्र्यंबक रेडगावकर यांचे दीर्घ आजाराने शनिवारी पहाटे निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले,सुना,नातवंडे भाऊ असा परिवार आहे. नाशिकच्या साहित्य वर्तुळात नाना या नावाने प्रसिध्द असलेल्या रेडगावकर यांनी विविध नियतकालिकातून विपुल लेखन केले.

आवडेल तेथे प्रवासातून खिशाला आर्थिक झळ

0
0
राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सेवेसाठी सुरू केलेली आवडेल तेथे प्रवास ही योजना नागरिकांच्या पसंतीस उतरली असली तरी सततच्या दरवाढीमुळे प्रवाशांमधून नाराजीच सूर उमटत आहेत.

मजुरांच्या पळवापळवीवरून वाद

0
0
बांधकाम साईटवरील कामगार अन्य साईटवर घेऊन गेल्याचे प्रकारामुळे आडगाव परिसरात दोघात वाद झाला. याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी पोलिसांनी दाखल केल्या आहेत. बांधकाम व्यावसायिक प्रकाश दयाराम जगताप (२७) आणि रविंद्र नंदू जाधव (३३) यांनी या फिर्यादी दिल्या आहेत.

‘एलईडी’चा वाद लवकरच सुप्रीम कोर्टात

0
0
एलईडी फिटींग्जप्रकरणी ३ एप्रिल रोजी हायकोर्टाने विरोधकांच्या याचिका फेटाळून लावत सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी सहा आठवड्याचा कालावधी दिला होता. यामुळे विरोधकांनी सुप्रीम कोर्टात धाव घेण्याची तयारी सुरू केली आहे.

पालिकेच्या वृक्ष धोरणाविरोधात ग्रीन ट्रिब्युनलमध्ये याचिका

0
0
महापालिकेच्या वृक्षविरोधी धोरणाविरोधात अखेर पुण्यातील नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलमध्ये याचिका दाखल झाली आहे. याप्रकरणी येत्या ७ मे रोजी सुनावणी होणार असून महापालिकेला आता वृक्षांबाबत योग्य ते धोरण स्विकारावे लागणार आहे.

स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक लांबणीवर

0
0
ठाणे महापालिकेतील स्थायी समितीपाठोपाठ कल्याण-डोंबवली महापालिकेच्या निवडणुकीत सेना-भाजपासह मनसे काय भुमिका घेते याकडे महापालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ठाण्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि मनसेने एकत्र येण्याची भुमिका घेतली.

नवे आर्थिक वर्ष मंदीच्या फेऱ्यात ?

0
0
औद्योगिक क्षेत्रात असलेल्या मंदीमुळे २०१३-१४ या आर्थिक वर्षात महापालिकेच्या उत्पन्नाला सुमारे ५० ते ६० कोटी रूपयांचा फटका बसला. आता २०१४-१५ हे आर्थिक सुरू झाले असून मंदीचा फेरा कायम राहणार का? याची भ्रांत महापालिकेला पडली आहे.

सोन्याच्या भावात स्थिरता

0
0
सोन्याच्या भावातील स्थिरता, लग्नाचा सिझन आणि अक्षय्यतृतीचा मुहूर्त अशा त्रिवेणी संगमामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात सोने खरेदीची शक्यता असल्याने सराफ व्यावसायिक सज्ज झाले आहेत. मात्र, मंदी चाहुल लक्षात घेता ग्राहकांकडून सोन्याचे भाव आणखी कमी होतील का याकडे लक्ष लागले आहे.

खर्चात भुजबळ, भारती पवारांची आघाडी

0
0
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार छगन भुजबळ आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. भारती पवार यांनी निवडणूक खर्चात आघाडी घेतली आहे. तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक खर्च सर्व उमेदवारांना निरीक्षकांना सादर केला आहे.

वगळलेल्या नावांच्या चौकशीला सुरुवात

0
0
जिल्ह्यात गेल्या वर्षभरात वगळण्यात आलेल्या २ लाख ४३ हजार नावांच्या चौकशीला सोमवारपासून प्रारंभ झाला. या चौकशीत दोषी आढळणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

त्र्यंबकला लवकरच ३२ कोटी

0
0
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी त्र्यंबक शहर परिसरात प्रस्तावित असलेल्या विविध विकासकामांसाठी लवकरच ३२ कोटी रुपये देण्यात येतील, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे तेथील कामांना वेग येईल, असेही त्यांनी सांगितले.

निकालानंतर १५० कोटींच्या कामांना सुरुवात

0
0
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू असलेली आचारसंहिता पूर्णतः मागे घेतल्यानंतर महापालिका प्रशासन सिंहस्थ कुंभमेळ्यासंबंधी नवीन १५० कोटी रूपयांची कामे सुरू करणार आहे. ही कामे मे महिन्यातील शेवटच्या टप्प्यात सुरू होतील, असे संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

कार्यालय सुरू झाले पण, कुणाच्या सोयीसाठी?

0
0
आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शहरात दोन नवे दुय्यम निबंधक कार्यालये सुरू झाली असली तरी ती नक्की कुणाच्या सोयीसाठी आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. गंगापूररोड, सातपूर, पंचवटी, मखमलाबाद, आडगाव, पाथर्डी या भागांतील सर्वसामान्यांच्या सुविधेसाठी ही दोन्ही कार्यालये प्रस्तावित असताना प्रत्यक्षात ती द्वारका येथे कार्यन्वित करून मुद्रांक व नोंदणी विभागाने सर्वसामान्यांना त्रास देण्याचेच काम सुरू ठेवले आहे.

रस्त्याच्या कामात अनियमीतता

0
0
महापालिकेने महापालिका क्षेत्रात सुरू केलेल्या विविध रस्ते कामामध्ये अनियमितता असून यात मोठ्या प्रमाणार भ्रष्टाचार होत असल्याची टीका माजी महापौर दशरथ पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. यापूर्वी पाटील यांनी अनेकदा पत्रकार परिषदा घेत रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार असल्याचा आरोप केला आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images