Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

कानडी कलाकारांची भुरळ

0
0
परंपरा म्हणून गावोगाव पारंपरिक भजन, भावगीते, नाट्यसंगीत सादर करून कला जोपासणाऱ्या कानडी कलाकारांच्या सुरेल व तालबध्द शास्त्रीय भजनांनी येवलेकरांना भुरळ घातली आहे.

दुकानफोडीचे सत्र सिन्नरमध्ये सुरूच

0
0
सिन्नर शहर परिसरात दुकानफोडी करण्याचे सत्र सुरूच असून सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी भर बाजारपेठेतील मद्य विक्रीचे दुकान फोडले. तसेच स्वामी सर्मथ मंदिरासमोरील सद्गुरू गारमेंट्स या रेडिमेड कापड दुकानाचे शटर वाकवून चोरी केली.

सिन्नरची तहान वाढतेय दिवसागणिक

0
0
जिल्ह्यातील सर्वाधिक दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिन्नर तालुक्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पंचायत समिती सभापती बाळासाहेब वाघ यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली.

‘त्यांच्या’ मदतीला मोबाइल दवाखाना

0
0
वाढत्या महागाईत आरोग्यावर खर्च करणे जिथे सर्वसामान्यांच्याही आवाक्याबाहेरचे होऊ लागले आहे तिथे गोरगरीबांच्या अवस्थेचर विचारही करवला जात नाही. पण हा विचार करुनच नाशिकच्या ‘नवजीवन वर्ल्ड पीस फाऊंडेशन’ने ‘मोबाइल हेल्थ युनिट’ची संकल्पना अंमलात आणली आहे.

सिडको, सातपूरचे फूटपाथ गिळंकृत

0
0
शहराप्रमाणेच उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात फुटपाथची समस्या भेडसावत असून सिडको, सातपूर परिसरातील फूटपाथ स्थानिक व्यावसायिकांनी गिळंकृत केले आहे.

पोलिस कर्मचाऱ्यांची बघ्याची भूम‌िका

0
0
टिप्पर गँगचे आरोपी पीएसआय सचिन सावंत यांना मारहाण करीत असताना कैदी पार्टीसोबत आलेले पोलिस मुख्यालयातील अन्य कर्मचारी त्यांच्या मदतीला धावून येण्याऐवजी केवळ बघत राह‌िले. ही बाब चर्चेचा विषय बनली आहे.

खरडपट्टी रोडची आणि प्रवाशांचीही

0
0
नाशिक-पुणे रस्त्याची अधिकाऱ्यांनी खरडपट्टी केल्यामुळे वाहनचालकांना अक्षरशः कसरत करत गाडी चालवावी लागत आहे. या रस्त्यामुळे नुकतेच एक वृद्धाला मृत्यूला सामोरे जावे लागले तर अनेक वाहनचालकांना जायबंदी व्हावे लागले आहे.

पंचवटी एक्स्प्रेस पुन्हा लेट

0
0
अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या पंचवटी एक्सप्रेसच्या विषयाने पुन्हा डोके वर काढले आहे. ७ वाजता निघणारी पंचवटी एक्सप्रेस नाशिकरोड स्टोशनवरून सोमवारी तब्बल अर्धा तास उशिरा निघाली. पावणे अकरा ते सव्वा अकराच्या दरम्यान मुंबईला पोहचणारी ही गाडी बुधवारी ११ वाजून ५० मिनिटांनी मुंबईला पोहचली. पंचवटीला नेहमीच उशीर होत असल्याने प्रवाशांनी स्टेशनमास्तरच्या दालनाजवळ जाऊन घोषणा दिल्या.

उद्योगभवनाच्या आवारात रोजच वादावादी

0
0
आयटीआय सिग्नलवरील उद्योग भवनात वाहनांना नो-पार्किंगमुळे उद्योजक व कामगार संतप्त झाले आहेत. त्यातच उद्योजक व कामगारांना वाहने उद्योग भवनाबाहेर रस्त्यावरच पार्क कराव्या लागतात. परंतु, या वाहनांची सुरक्षा एमआयडीसी घेणार काय? असा सवाल उद्योजक कामगार उपस्थित करत आहेत.

चारचाकींना मुभा, दुचाकींची मात्र उचलबांगडी

0
0
चारचाकी वाहनांना पार्किंगसाठी मुभा, मात्र दुचाकींची उचलबांगड, असा प्रकार सिटी सेंटर मॉल समोर दररोज अनुभवायला मिळतो. या प्रकारमुळे दुचाकी चालक मात्र रोष व्यक्त करत आहेत. वाहतूक पोलिसांकडून कारवाई करताना भेदभावाची वागणूक दिली जात असल्याच्या तक्रारी अनेकांनी केल्या आहेत.

नाटकाच्या प्रयोगाची परवानगी आवश्यकच

0
0
कोणत्याही संस्थेने नाटकाचा प्रयोग करताना परवानगी घेणे आवश्यक असून, स्वैराचार करणाऱ्यांना वेळीच चाप लावण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष राम जाधव यांनी येथे केले.

पसायदान हे जगण्याचा मंत्र बनावे

0
0
‘मानव जातीच्या कल्याणार्थ प्रकटलेली ज्ञानेश्वरी हा जगण्याचा मंत्र आहे, असे श्री शंकरमहाराज सांगत. या ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे सार पसायदान आहे. पसायदानाची ही अलौकीक अन् अतुलनीय क्षमता लक्षात घेऊन हा संदेश जीवनात रुजावा. पसायदान हे जगण्याचा मंत्र बनावे,’ असे प्रत‌िपादन प्रा. डॉ. आरती दातार यांनी केले.

आज सीईटी परीक्षा

0
0
आरोग्य व‌िज्ञान अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून घेण्यात येणारी एमएच-सीईटी परीक्षा आज (द‌ि. ८ मे रोजी) होणार आहे. ज‌िल्हाभरातून सुमारे साडेसात हजार व‌िद्यार्थी ही परीक्षा देणार आहे. यासाठी शहरातील १८ केंद्रांमध्ये न‌ियोजन करण्यात आले आहे.

नाशिकरांची दाणादाण !

0
0
वळवाच्या पावसाने बुधवारी नाशिक शहरात जोरदार हजेरी लावल्याने जिल्ह्यातील अनेक भागात वीजपुरवठा खंडीत झाला. हा वीज पुरवठा शंभर टक्के सुरू झाला असल्याचा दावा महावितरण करीत असले तरी शहराच्या काही भागांत वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता.

यंदा पाणी कपात नाही

0
0
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाण्याची स्थिती उत्तम असल्याने यंदा पाणीकपात होणार नसल्याची माहिती महापालिका आयुक्त संजीवकुमार यांनी दिली. मात्र, त्याचबरोबर पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.

शाही मिरवणुकीत भाविक नकोत

0
0
सिंहस्थ काळातील चेंगराचेंगरीचा पुर्वानुभव लक्षात घेऊन शाही मिरवणुकीत भाविकांना प्रवेश नाकारण्यात येणार आहे. साधू महंतांच्या शाही मिरवणुकीत भाविकांना सहभागी करवून घेऊ नये, तसेच वाहनेही मोजकीच ठेवावीत, असा प्रस्ताव पोलिसांनी साधु महंतांपुढे ठेवला आहे.

वृक्षतोडप्रकरणी महापौर हाजिर हो!

0
0
महापालिकेच्या वृक्षविरोधी कारभाराविरोधात दाखल झालेल्या याचिकेची दखल घेत पुण्यातील नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलने आयुक्त, महापौरांसह एकूण १८ जणांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या याचिकेची पुढील सुनावणी येत्या २८ मेला होणार आहे.

पीएसआयला बेदम मारहाण

0
0
मोक्कातील आरोपीला मोबाइलवर बोलू दिले नाही म्हणून शहरातील कुख्यात टिप्पर गँगने कोर्टाच्या आवारात धुमाकूळ घालत एका पीएसआयला बेदम मारहाण केली. बुधवारी भरदिवसा दुपारी बाराच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

नाशकात वळवाच्या पावसाचं तुफान

0
0
उन्हाच्या कडाक्याने हैराण झालेल्या नाशिककरांना बुधवारी सायंकाळी वळवाच्या पावसाने झोडपून काढले. आकाशात विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने उकाडा असह्य झाला होता.

टर्मिनलसाठी मातब्बर कंपन्या उत्सुक

0
0
ओझर येथील विमानतळाच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या पॅसेंजर टर्मिनलचा सांभाळ करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक दिग्गज कंपन्या इच्छुक आहेत. हिन्दुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) जाहीर केलेल्या टेंडरला उत्तम प्रतिसाद लाभला असून येत्या १० मे पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images