Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

तरुणाई टेन्शनमध्ये

0
0
‘कामयाब नही काबील बनो’ असे सांगणाऱ्या ‘थ्री इड‌ियट’ चित्रपटामधील रणछोडदासचा अद्याप महाविद्यालयीन तरुणाईवर पाह‌िजे तसा परिणाम झालेला नाही. जळगावसारख्या शहरातील महाविद्यालयीन युवा वर्ग अभ्यासाचा अतिरेक, करिअरची चिंता व पालकांकडून असलेल्या अपेक्षांमधून आलेल्या ताण-तणावाच्या ओझ्याखाली दाबला जात आहे. अशा या युवकांचे प्रमाण २० टक्के एवढे आहे.

‘बोलण्याचा संस्कार आत्म‌िय हवा’

0
0
वाणीची शुद्धता आणि योग्य श्रवण हा संस्काराचा एक विशेष आणि महत्त्वाचा भाग आहे. बोलण्याचा संस्कार आत्म‌िय हवा असतो, कोणालाही त्रास होईल असे बोलू नका, असे मत प्रा. डॉ. वृंदा भार्गवे यांनी व्यक्त केले.

गरज निस्वार्थी नाट्यचळवळीची

0
0
अन् मी ही भर उन्हात गुलमोहराच्या झाडावर चढलो. हिरव्यागार शेंगांच्या तलवारी तोडल्या आणि इथल्या प्रतिष्ठीतांशी, विस्थापितांशी, सारस्वतांशी जोरदार लढाई सुरू केली. तिथल्या रंगभूमीच्या प्रयत्नांना तिचा हक्क मिळवून देण्यासाठी, माझ्यातला कडवट वारा हळू हळू पसरतही गेला.

कोरडा दिलासा!

0
0
यंदा धरणात पाणीसाठा मुबलक असल्याने पाणी कपात न करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. २०१३ मध्ये पाण्यासाठी झालेली वणवण पाहता हा सुखद धक्का म्हणावा लागेल. पाण्याचा साठा मुबलक असून, तो ऑगस्टपर्यंत पुरेल असा महापालिकेचा अंदाज आहे.

उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये मैदाने झाली फुल्ल

0
0
उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये सिडको, सातपूरमधील प्रमुख मैदाने फुल्ल झाली आहेत. पोलिस भरतीसाठी तरुण मैदानी खेळांचा सराव करत जोरदार तयारी करतांना दिसत आहेत. त्यातच सकाळी व सायंकाळी तरुणांची क्रिकेट खेळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे.

हमी द्या नाही तर आत्मदहन करणार

0
0
भारतीय रिर्झव्ह बँकेने आर्थिक निर्बंध घातलेल्या रूपी बँकेच्या व्यवस्थापकांनी पैसे परत करण्याबाबत १५ मेपर्यंत लेखी हमी द्यावी, अन्यथा बँकेच्या गेटसमोर आत्मदहन करण्याचा इशारा ६५ ठेवीदाराच्यावतीने मुकुंद कुलकर्णी यांनी दिला आहे.

विभागीय महिला लोकशाही दिन १२ मे रोजी

0
0
विभागीय आयुक्तालयातर्फे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय लोकशाही दिना सोबतच महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार सोमवार दिनांक १२ मे, रोजी सकाळी ११ वाजता विभागीयस्तरावर महिला लोकशाही दिनाचे आयोजन विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिकरोड येथे करण्यात आले आहे.

गंगापूर रोड, कॉलेजरोडवरील वाहतूक मार्गात बदल

0
0
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत बाराबंगला जलशुध्दीकरण केंद्र ते औरंगाबाद रोडवरील निलगिरी बागपर्यंत नवीन पाइपलाइन टाकण्यात येणार आहे. त्यामुळे कॉलेजरोड, गंगापूर रोड परिसरात वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात येणार आहेत.

आरोग्य विज्ञान विद्यापीठाला ‘आयएसओ’

0
0
आयएसओ ९००१-२००८ च्या रुपाने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. यामुळे प्रशासकीय कामकाजाचा वेग वाढविण्यास मदत होईल. जागतिक स्तरावर नामांकित विद्यापीठांच्या यादीत स्थान मिळण्यासही मदत होईल, अशी आशा कुलगुरु प्रा. डॉ. अरुण जामकर यांनी व्यक्त केली आहे.

जनजागृती अभावी वाढतोय थॅलेसेमिया

0
0
थॅलेसेमिया हा मूलत: रक्ताचा अनुवंशिक आजार असल्याने ही व्याधी जडल्यानंतरच लक्षात येण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. देशात ४.७ टक्के थॅलेसेमियाचे वाहक (थॅलेसेमिया मायनर) असल्याने प्रभावी जनजागृती झाल्यास ही व्याधी (थॅलेसेमिया मेजर) थोपविता येऊ शकते.

पेस्टकंट्रोल ठेकेदारास पुन्हा महिन्याची मुदतवाढ

0
0
पेस्टकंट्रोल करणाऱ्या ठेकेदारास महापालिकेने नव्याने एका महिन्याची मुदतवाढ दिली आहे. मागील सहा महिन्यांपासून ठेकेदारास मुदतवाढीचा ‘डोस’ देण्यात येत असून, ठेका देण्यासंबंधी कायमस्वरूपी निर्णय केव्हा होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पाऊस नुकसानीच्या पंचनाम्यांना सुरुवात

0
0
जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये बुधवारी संध्याकाळी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून, एकूण ९५.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरु आहे.

टोल दरवाढी विरोधात आंदोलनाचा पुन्हा इशारा

0
0
मुंबई-आग्रा हायवेवरील पिंपळगाव बसवंत येथील टोल नाक्यावर येत्या १२ तारखेपासून तिप्पट टोल दरवाढ करण्याचे पीएनजी टोलवे कंपनीने जाहीर केले असले तरी या बेकायदेशीर टोलची पंतप्रधान कार्यालयाकडून चौकशी सुरू असल्याची माहिती निफाडचे आमदार अनिल कदम यांनी दिली आहे.

मतमोजणीसाठी निश्चित मार्गानेच या!

0
0
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी येत्या १६ मे रोजी होणार असल्याने मतमोजणीच्या ठिकाणी राजकीय पक्षांना नेमून दिलेल्या मार्गानेच तेथे यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी आणि पोलिस यांनी दिले आहेत. यासंदर्भात उमेदवारांच्या प्रतिनिधींची आणि राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.

विजयनगर, गंगापूररोडवर घरफोडी

0
0
पंपिंग स्टेशन रोडवरील रामतीर्थ हौसिंग सोसायटीतील एका सदनिकेचा कड‌ीकोयंडा तोडून चोरट्याने लॅपटॉप आणि सोने चांदीचे दागिने चोरून नेले. बुधवारी सकाळी पावणेसहा ते नऊच्या दरम्यान हा प्रकार घडला.

अमित रोहेराला न्यायालयीन कोठडी

0
0
देवळाली कॅम्प येथील दोन अल्पवयीन मुलांच्या आत्महत्या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी अमितशेठ रोहेरा याला अटक केली होती. त्याची पोलिस कोठडी आज संपल्याने मनमाड येथील न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली.

मिडब्रेन अॅक्ट‌िवेशन संस्थेला पोलिसांची समज

0
0
मिडब्रेन अॅक्ट‌िवेशन या फसव्या विज्ञानाच्या आधारे लहान मुलांची मानसिक तर पालकांची आर्थिक फसवणूक सुरू आहे. त्यामुळे ही फसवणूक तातडीने थांबवावी अशा आशयाचे निवेदन अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या नाशिक शाखेने पोलिस आयुक्तांना दिले होते.

टिप्परच्या सहा नातलगांना पोलिस कोठडी

0
0
मोबाइलवर बोलू दिले नाही म्हणून शहरातील कुख्यात टिप्पर गँगमधील मोक्कातील सराईत गुन्हेगार आणि त्यांच्या काही नातलगांनी कोर्टाच्या आवारात बुधवारी धुमाकूळ घातला होता. याप्रकरणी संबंधीतांच्या ६ नातलगांना पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली. त्यांना न्यायालयाने ११ मे पर्यंत पोलिस कोठडी सूनावली आहे.

चांगला हमीभावच शेतकऱ्यांना तारेल

0
0
‘शेतमालाचे भाव वाढले की सर्वसामान्य ग्राहक आरडाओरडा सुरू करतात. कांदा ४० रुपये किलोपेक्षा अधिक महाग झाला की ग्राहक शेतकऱ्यांच्या नावाने बोटे मोडू लागतात. परंतु तेच चित्रपट अथवा अन्य लक्झरी सेवा सुविधांचे दर वाढले की तेथे निमूटपणे पैसे काढून देतात. ही मानसिकता बदलायला हवी.’ अशी अपेक्षा माजी आमदार पाशा पटेल यांनी बुधवारी व्यक्त केले.

नकारात्मक ऊर्जेला वाट करुन द्या

0
0
भावना या सकारात्मक व नकारात्मक असतात. राग ही नकारात्मक ऊर्जा असते. तिला वेळीच योग्य मार्गाने वाट मोकळी करुन दिली पाहिजे, असे प्रतिपादन पुणे येथील मानसोपचार तज्ज्ञ वैशाली देशपांडे यांनी आज येथे केले.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images