Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

नाशिक क्राइम डायरी

0
0
नाशिकचे गुन्हेविषयक वृत्त

सात सरकारी बाबू गजाआड

0
0
नाशिक विभागांतर्गत वेगवेगळया जिल्ह्यांमध्ये लाचलुुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवायांमध्ये ७ सरकारी बाबुंना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये पोलिसांसह जलसंधारण, महावितरण, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

सात मिनिटांत वाहन परवाना

0
0
वाहन चालविण्याचा ‌शिकाऊ परवाना मिळविण्यासाठी आता आठवडाभर प्रतिक्षा करण्याची गरज नाही. प्रादेशिक परिवहन कार्यालयात त्यासाठी खास स्टॉल प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून त्यामुळे अवघ्या सात मिनिटांत परवाना मिळू लागला आहे.

आपत्ती व्यवस्थापनाचे तीन तेरा!

0
0
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होऊ घातलेल्या सिंहस्थाच्या आपत्ती व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित व्हावे, असेच वातावरण आहे. या सोहळ्याप्रती जिल्हा प्रशासनाला नसलेले गांभीर्य त्यास विशेषत्वाने कारणीभूत आहे.

लेटलतिफांची दुनिया!

0
0
कामावर उशिरा येणे हा जणू सरकारी कर्मचाऱ्यांचा जन्मसिद्ध हक्कच बनला आहे. सरकारी काम अन् बारा महिने थांब, अशी म्हण अशाच लेटलतीफ मंडळींमुळे प्रचलित झाली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांची मात्र पावलोपावली अडवणूक होते.`मटा`ने केलेल्या स्टींग अॉपरेशनमध्ये लेटलतिफांची दुनियाच अनुभवायला मिळाली.

भावाचा बहिणीवर बलात्कार

0
0
कधी मारहाण करून तर ठार मारण्याची धमकी देऊन भावासह चुलता आणि अन्य दोघांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली. या प्रकरणी तिघांना सरकारवाडा पोलिसांनी अटक केली असून पीडित मुलीचा भाऊ फरार आहे.

अहो, ‘डीएनए’ म्हणजे ?

0
0
भाषा हे जनरेशन गॅपचा प्रत्यय देणारे एक साधन आहे. याचाही प्रत्यय अनेकदा येतो. हा काळाचा प्रभाव आहे. मागील प‌िढीला काही इंग्रजाळलेल्या शब्दांचा पर्यायी शब्द हवाच असतो. नाहीतर त्यांची भाषे व‌िषयीची अस्म‌िता जागी होते. अन् काही इंग्रजी शब्द असे असतात क‌ी, त्यांना मराठीत पर्यायी शब्दच उपलब्ध नसतो.

तीन नगरसेवकांची पोलीस चौकशी

0
0
खंडणी प्रकरणातील संशयितांशी संबंध असल्याच्या संशयावरून पोलिसांनी शहरातील तीन नगरसेवकांची बुधवारी दुपारी तब्बल दोन तास कसून चौकशी केली.

वाकी-खापरी धरणाचे काम बंद

0
0
इगतपुरी तालुक्यातील नांदूरमधमेश्वर प्रकल्पांतर्गत सुरू असलेले वाकी-खापरी धरणाचे काम संतप्त धरणग्रस्तांनी बंद पाडले.

दिराकडून भावजयीवर बलात्कार

0
0
एकवीस वर्षीय विवाहितेवर बलात्कार करणाऱ्या चुलत दिरास लासलगाव पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी अटक केली. नवनाथ निवृत्ती खांदोडे असे आरोपीचे नाव आहे. पीडित महिलेने लासलगाव पोलिसांत तक्रार दिल्यानंतर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

त्र्यंबक गोदावरीचा आज फैसला

0
0
त्र्यंबकेश्वर शहरात काँक्रिटीकरणाद्वारे गोदावरी नदीला बंदिस्त केल्याप्रकरणी गुरुवारी पुण्यातील नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलमध्ये अंतिम सुनावणी होणार आहे. गोदावरीवरील काँक्रीटीकरण काढण्याचा आदेश ट्रिब्युनल देणार का याबाबत त्र्यंबकवासियांसह सर्वांचेच लक्ष या सुनावणीकडे लागले आहे.

मालेगावला पावसाने झोडपले

0
0
मालेगाव शहर आणि परिसरात मुसळधार बेमोसमी पाऊस पडला. गेल्या तीन महिन्यांपासून अंगावर ऊन झेलणा-या मालेगावकरांना या जोरदार पावसाने दोन तासांत उन्हाळ्याचा विसर पाडत सर्वत्र गारेगार वातावरण तयार केले. परिसरातील कांदा व इतर शेतपिकांना मात्र या पावसामुळे मोठा फटका बसणार आहे.

कांदा रडवणार?

0
0
झणकेदार आणि टिकाऊ कांदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकच्या उन्हाळ कांद्याला यंदा गारपीट आणि अवकाळी पावसाचा बट्टा लागला आहे. त्यामुळे हा कांदा घेण्यास व्यापाऱ्यांकडून सुरू असलेल्या नकारघंटेमुळे शेतकरी हतबल झाला आहे.

नव्या अभ्यासक्रमांना चालना

0
0
सीबीएसई बोर्डातील अभ्यासक्रमाच्या धर्तीवर आधारीत असणारे १३ नवीन अभ्यासक्रम यंदापासून सुरू करण्याचा न‌िर्णय व‌िद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) घेतला आहे. महाव‌िद्यालयीन स्तरावर हे अभ्यासक्रम राबव‌िण्यात येणार असल्याने व‌िद्यार्थ्यांना म‌िळणाऱ्या रोजगार संधींमध्ये वाढ होणार आहे.

बद्रिनाथ यात्रा सुरू

0
0
केदारनाथ व बद्रिनाथ परिसरात संततधार पाऊस सुरू असल्याने प्रशासनाने १६ मेपर्यंत स्थगित केलेली यात्रा मार्गातील अडथळे दूर झाल्याने सुरू केली आहे.

पाइपलाइनची दुरुस्ती

0
0
‌त्रिमूर्ती चौकातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत मटाने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेत महापालिकेने पाइपलाइनमधून होणारी पाणी गळती थांबवण्याचे काम हाती घेतले आहे.

तीन नगरसेवकांची पोलिसांकडून चौकशी

0
0
खंडणी प्रकरणातील संशयितांशी संबंध असल्याच्या संशयावरून पोलिसांनी शहरातील तीन नगरसेवकांची बुधवारी दुपारी तब्बल दोन तास कसून चौकशी केली. इन कॅमेरा करण्यात आलेल्या या चौकशीबाबत नगरसेवक आणि पोलिसांकडूनही कमालीची गुप्तता पाळली जात असल्याने ‘दाल मे कुछ काला है’ अशी चर्चा शहरात रंगली आहे.

कॉलेजव‌िरोधात समाज कल्याणचे फर्मान

0
0
ई स्कॉलरशिप म‌िळाली नसल्याने परीक्षेपासून वंच‌ित राहण्याची वेळ काही कॉलेजच्या मनमानी धोरणांमुळे व‌िद्यार्थ्यांवर ओढावली आहे. या व‌िद्यार्थ्यांना परीक्षेपासून दूर न ठेवण्याचा इशारा समाज कल्याण व‌िभागाने द‌िला आहे.

खबरदार, झाडांची कत्तल कराल तर!

0
0
मुंबई-आग्रा हायवेच्या रुंदीकरणादरम्यान तोडलेल्या झाडांच्या मोबदल्यात रोपे लावण्यात आणि टिकविण्यात आलेल्या अपयशाची गंभीर दखल घेत मुंबई हायकोर्टाने राष्ट्रीय हायवे प्राधिकरण आणि नाशिक महापालिकेला चांगलेच फटकारले आहे.

नवा गडी, नवा खेळ

0
0
पूर्वी मैदानी खेळांची चलती होती. घरातील एकतरी युवक एखाद्या खेळात पारंगत असायचा. त्यामुळे शरीर व मन दोन्ही तंदुरुस्त असायचे. काळ जसा बदलत गेला तसे खेळाचे प्रकार बदलत गेले.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images