Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‘इताह’ कारखान्याचे आगीत दहा लाखांचे नुकसान

0
0
सिन्नर तालुक्यातील माळेगाव औद्योगिक वसाहतीतील इताह इलेक्ट्रिकल प्रा. लिमिटेड या कारखान्यात गुरुवारी दुपारी भीषण आग लागल्याने सुमारे दहा लाख रुपयांच्या मुद्देमाल आगीत भस्मसात झाला. ही आग दुपारी अडीच वाजेच्या सुमारास लागली.

सरपंच, तलाठी, ग्रामसेवकाला कोंडले

0
0
बागलाण तालुक्यातील अजमीर सौदाणे येथील ग्रामस्थांना गेल्या वीस दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा एक थेंबही मिळालेला नाही. यामुळे संतप्त महिलांनी गुरुवारी सकाळी ग्रामपंचायतीवर हंडा घेऊन हल्लाबोल्ल करत ग्रामपंचायत सदस्यांसह सरपंच, तलाठी, ग्रामसेवकाला ग्रामपंचायत कार्यालयात चार तास कोंडून ठेवले.

दोघा मजुरांचा शेततळ्यात बुडून मृत्यू

0
0
निफाड तालुक्यातील उगावखेडे येथे शेततळ्यात बुडून दोघा मजुरांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. इम्रान नशीर खान (वय २१) सुंदरपूर ता. निफाड व वैशाली मंगेश पवार (वय १९) काथरगाव ता. निफाड अशी या दुर्घटनेत मृत झालेल्यांची नावे आहेत.

सिन्नर औद्योगिक वसाहतीला मिळणार नवीन पोलिस ठाणे

0
0
सिन्नर तालुक्यात असलेल्या मुसळगाव व माळेगाव या दोन औद्योगिक वसाहती, इंडिया बुल्सचा सेझ आणि वाढती गुन्हेगारी या पार्श्वभूमीवर शासनाने सिन्नर पोलिस ठाण्याचे अखेर विभाजन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

जितेंद्र आव्हाडांना मंत्रिपद; सिन्नरमध्ये समर्थकांचा जल्लोष

0
0
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मंत्रिपद मिळाल्याने सिन्नरमध्ये जल्लोष करण्यात आला. तालुक्यातील आव्हाड यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी मुंबई गाठून त्यांचे अभिनंदन केले.

पतंगराव कदम आज नाशकात

0
0
राज्याचे वने, मदत व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर येत आहेत. नाशिक आणि धुळे वनक्षेत्रातील कामकाजाचा तर नाशिक जिल्ह्यातील मदत व पुनर्वसन विभागाचा ते आढावा घेणार आहेत.

एजाज शेख यांना पुरस्कार

0
0
एमआरएफ मोटोग्रीप एफएमएससीआय सुपरक्रॉस चॅम्पियनशीप २०१४ च्या छायाचित्र स्पर्धेचा प्रथम पुरस्कार महाराष्ट्र टाइम्सचे छायाचित्रकार एजाज शेख यांना जाहीर झाला आहे.

पुण्याची ‘चॉकलेटचा बंगला’ अव्वल

0
0
अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे आयोजित कै. अनंत कुबल राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत पुण्याच्या गरवारे वाणिज्य महाविद्यालयाने सादर केलेली ‘चॉकलेटचा बंगला’ ही एकांकिका अव्वल ठरली.

कारच्या धडकेत दोघे जखमी

0
0
मेरी लिंक रोडने जाणाऱ्या मोटारसायकलला अल्टो कारने धडक दिल्याने वाहनचालक सदाशिव गंभीरे व मागे बसलेल्या लक्ष्मीबाई मनोहर चव्हाण जखमी झाले. याप्रकरणी अल्टोकार चालविणाऱ्या नंदू काशिनाथ पगार याच्याविरोधात सदाशिव गंभीरे यांनी तक्रार नोंदवली असून पंचवटी पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंदविला आहे.

‘विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड रुजावी’

0
0
‘शालेय स्तरापासूनच विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड रुजायला हवी. त्यादृष्टीने शालेय स्तरावरच अनुकूल वातावरण तयार होण्यासाठी सर्व घटकांचे एकत्र‌ित प्रयत्न गरजेचे आहेत,’ असे प्रत‌िपादन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. अरूण जामकर यांनी केले.

सहकार भारतीचे उद्यापासून प्रदेश अधिवेशन

0
0
सहकार क्षेत्रात ३४ वर्षांपासून बहुमुल्य योगदान देणाऱ्या सहकार भारती या संस्थेचे ९ वे प्रदेश अधिवेशन नाशिकच्या मुंबई नाक्याजवळील भाभानगर येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात ३१ मे व १ जून रोजी संपन्न होत असून माजी केंद्रीय अर्थमंत्री पद्मश्री बाळासाहेब विखे पाटील यांच्या हस्ते उद्‌घाटन होणार आहे.

नाशिकला रेल्वे टर्मिनल उभारावे

0
0
जगात सर्वाधिक झपाट्याने विकसित होणाऱ्या शहरांच्या यादीत नाशिक सोळाव्या स्थानी आहे. राज्यात मुंबई, पुणे नंतर सर्वाधिक झपाट्याने विकसित होणारे नाशिक शहर आहे. राज्यातील चौथे मोठे शहर म्हणूनही नाशिकची ओळख आहे. मात्र, या शहराला गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वे प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे.

घोटीसाठी मनसेची तयारी

0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इगतपुरी तालुका पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घोटी येथे राजारात साळवी मंगल कार्यालयात झाली. आगामी विधानसभा निवडणुकी संदर्भात बैठकीत मंथन करण्यात आले.

अतिसूक्ष्म आराखडा तयार करा

0
0
आगामी सिंहस्थ हा मान्सूनच्या काळात होणार असल्याने त्या काळात उदभवू शकणाऱ्या आपत्ती लक्षात घेवून जिल्ह्यातील संबंधित यंत्रणानी आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन करावे. त्यासाठी अतिसूक्ष्म आराखडा तयार करावा, अशी सूचना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे वरिष्ठ सल्लागार निवृत्त मेजर जनरल व्ही. के. दत्ता यांनी केले.

सर्वपक्षीय इच्छुकांची लगबग

0
0
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ६० व प्रभाग क्रमांक १७ मध्ये २९ जून रोजी पोटनिवडणूक होत असून, सर्वच पक्षांचे इच्छूक कामाला लागले आहेत. खासदार हेमंत गोडसे यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या विहितगाव-वडनेर (प्रभाग क्र. ६०)मध्ये, तर लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे बंडखोर नगरसेवक दिनकर पाटील यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या शिवाजीनगर (प्रभाग क्र.१७) मध्ये पोटनिवडणुकीचा ज्वर हळूहळू चढू लागला आहे.

पावसात घरांचे नुकसान

0
0
जिल्ह्यात सर्वत्र जोरदार हजेरी लावणाऱ्या मान्सून पूर्व पावसामुळे बुधवारी हजारो घरांचे नुकसान झाले तर वीज पडून दोन लहान मुलांचाही बळी गेला आहे.

स्टेनो परीक्षेचे ढिसाळ नियोजन

0
0
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे ‌शहरातील गजबजलेल्या सिडको परिसरात ‘गर्व्हमेंट कमर्शिअल सर्टिफिकेट’च्या (जीसीसी) स्टेनो अभ्यासक्रमाच्या परीक्षा सध्या घेतल्या जात आहेत. मात्र, परिषद आणि संबंधित शाळा व्यवस्थापनामध्ये समन्वयाच्या अभावामुळे परीक्षांना गुरुवारी अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

‘NCP’चा वर्धापन दिन आला, पण...

0
0
सोनिया गांधी यांच्या काँग्रेसमधील उदयानंतर वेगळी चूल मांडत शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला येत्या १० जून रोजी १५ वर्षे पूर्ण होत आहेत. नेहमी जल्लोषात साजरा होणाऱ्या ‘राष्ट्रवादी’च्या वर्धापन दिनावर यंदा मात्र, लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाचे सावट आहे.

अशी घडली अद्दल

0
0
उपदेश हे फार मोठे शस्त्र आहे. परंतु त्याचा वापर योग्य ठिकाणी व्हायला हवा नाहीतर तो कधीही अंगलट येऊ शकतो. योग्य माणसाला समजावणीच्या स्वरात दोन शब्द सांगितल्यास तो ऐकतो मात्र हेच चुकीच्या माणसाला सांगायला गेल्यास तो सांगणाऱ्यासाठी तापच होऊन बसतो.

मारहाणीत विवाहितेचा मृत्यू

0
0
बागलाण तालुक्यातील आखतवाडे येथील तरुण विवाहितेचा बेदम मारहाणीत मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पतीसह सासू, नणंद यांना अटक केली आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images