Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

सहकार मोडीत काढण्याचा डाव

$
0
0
सहकारात मोठी ताकद असून, राज्यातील अनेक नेतृत्व याच माध्यमातून पुढे आले आहेत. तरीही ग्रामीण अर्थकारणाची ही वाहिनी बंद करुन सहकार चळवळ मोडीत काढण्याचा काही जण प्रयत्न करीत आहेत.

महिला पदाधिकारी ना‘राज’

$
0
0
मनसेतील महिला पदाधिकाऱ्यांना दुय्यम वागणूक दिली जात असल्याचा आरोप करीत काही महिला पदाधिकारी लवकरच पक्ष अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

श्रीराम शेटेंना विधानपरिषदेवर घ्या

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीराम शेटे यांची राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्यपदी वर्णी लावावी यासाठी नासिक जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून, अनेक पदाधिकाऱ्यांनी थेट पक्षाध्यक्ष शरद पवार, पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेवून त्यांना साकडे घातले आहे.

पारुंडेलाही मिळणार सिंहस्थनिधी

$
0
0
पुणे जिल्ह्यातील पारुंडे या गावालाही सिंहस्थ निधी उपलब्ध होणार आहे. पारुंडे येथील विविध विकासकामांचा प्रस्ताव नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मागविला आहे.

भूसंपादनानेच महापालिका हतबल

$
0
0
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने सुरू केलेल्या विविध कामांवर आजवर ९० कोटी ४५ लाख रुपये खर्ची पडले आहेत. यातील बहुतांशी म्हणजे ५८ कोटी ५९ लाख रुपये फक्त भूसंपादनावरच खर्ची पडले असल्याने महापालिकेला पैशांची चणचण भासू लागली आहे.

कोऱ्या शिधापत्रिका गहाळ झाल्यास कारवाई

$
0
0
शिधापत्रिका वाटपात होणाऱ्या काळाबाजाराला आता अंकुश लागणार आहे. कार्यालयातील कोऱ्या शिधापत्रिका जतन करणे व काळाबाजार रोखण्यासाठी शासनाने कडक धोरण राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

येवल्यात तलाठ्यांची दुहेरी कसरत

$
0
0
जिल्ह्यातील अनेक तालुक्यात सजेवरील तलाठींच्या जागा रिक्त दिसत असून येवला तालुकाही त्याला अपवाद ठरलेला नाही. येवला तालुक्यातील एकूण ३४ सजांपैकी तब्बल ११ ठिकाणी कायमस्वरूपी तलाठी नसल्याने कार्यरत असलेल्या २३ तलाठ्यांपैकी ११ तलाठ्यांनाच आपल्या कायम सजेव्यतीरिक्त रिक्त जागीही अतिरिक्त कार्यभार सांभाळावा लागत आहे.

सुहास कांदेना नांदगावमधून उमेदवारी

$
0
0
शिवसेनेत नव्याने दाखल झालेले आणि अल्पावधीतच मनमाडसह नांदगांवमधे विकासकामांचा धडाका लावणारे शिवसेना संघटक सुहास कांदे हे आता मनमाडचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी आमच्याबरोबर विधानसभेत असतील, अशी ग्वाही शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांनी मनमाड येथे दिली.

घोटी ग्रामपालिकेच्या निवडणूक हालचाली गतिमान

$
0
0
घोटी ग्रामपालिकेची निवडणूक जाहीर झाल्याने इच्छुकांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. राजकीय क्षेत्रातील चळवळीचे शहर असलेल्या या शहराची या वेळेची निवडणूक चांगलीच गाजण्याची चिन्हे आहेत.

आकाशवाणी चौकात मद्यपीचा धुमाकूळ

$
0
0
शहरातील आकाशवाणी चौकात दुपारी एकच्या सुमारास एका मद्यधुंद वाहनचालकाने गोंधळ घालत वाहतूक वेठीस धरली. अखेर पोलिसांनी आपला खाक्या दाखविल्यानंतर त्याची धुंदी उतरली आणि सर्वच वाहनचालकांनी सुटकेचा सुस्कारा सोडला.

खिडकी एक, गोंधळ अनेक

$
0
0
तत्काळ आरक्षणाची वेळ, त्याच दरम्यान असलेल्या दोन गाड्या मात्र, तिकिटासाठी असलेली एकच खिडकी यामुळे रावेर रेल्वे स्टेशनवर दररोज प्रवाशांमध्ये वाद होत असून, रेल्वे प्रशासनाने दोनही तिकीट खिडक्या चालू कराव्यात, अशी जोरदार मागणी प्रवाशांनी केली आहे.

सहकार नव्हे; स्वाहाकार

$
0
0
आर्थिक गैरव्यवहारामुळे अडचणीत आलेल्या जिल्ह्यातील पतसंस्थांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून मार्च अखेरपर्यंत जिल्ह्यातील २७ पतसंस्थांवर कारवाई करण्यात आली आहे.

भुयारी गटार योजना मार्गी लागणार

$
0
0
येवला नगरपालिकेच्या विविध विकास योजनांसंदर्भात मुंबई येथे राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांच्या दालनात भुजबळ व नगरविकास विभागाचे राज्यमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली.

कांदा आवक टिकून; बाजारभावात घसरण

$
0
0
येवला बाजार समिती व अंदरसूल उपबाजार आवारावर उन्हाळ कांद्याची आवक टिकून होती. तर बाजारभावात घसरण झाल्याचे दिसून आले. कांद्यास देशांर्तगत उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली, छत्तीसगड, पंजाब, आसाम आदी राज्यात मागणी कमी राहिली तसेच बाजारात खराब प्रतीचा कांदा मोठ्या प्रमाणात येत असल्याने बाजारभावात घसरण झाल्याचे दिसले.

तीन हजार रुग्णांची तपासणी

$
0
0
जिल्हा परिषद आरोग्य विभाग, जिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने कनाशी ये‌थे सर्व रोग निदान शिबिर झाले. कनाशी प्राथमिक रुग्णालय झालेल्या या‌ शिबिरात सुमारे तीन हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली.

सटाणा शहरात आंदोलनामुळे तणाव

$
0
0
छत्रपती शिवराय, संभाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अवमानकारक फोटो काही समाजकंटकांनी फेसबुकरवर प्रसारित केल्याने खळबळ उडाली आहे.

रास्ता राेको अन् कडकडीत बंद

$
0
0
छत्रपती शिवाजी महाराज व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सोशल मीडियावर बदनामी केल्याच्या निषेधार्थ नाशिक जिल्ह्यात निषेध करण्यात आला. अनेक तालुक्यांमध्ये बंद पाळण्यात आला तर काही ठिकाणी बंदला हिसंक वळण लागले. बसला लक्ष्य करीत काचा फोडण्यात आल्या.

इंजिनीअरिंगमध्ये संधींचा सुकाळ

$
0
0
‘उद्योग जगतातील वि स्तार आणि् सर्वच क्षेत्रात झपाट्याने सुरू असणारे यांत्रियकीकरण यामुळे इंजि नीअरिंग क्षेत्रात आगामी दहा वर्षांत देशात संधींचा सुकाळ असेल. या संधी मिुळवि‌ण्यासाठी इंजि नीअरिंगच्या शिाक्षणाकडे दहावीनंतरच सकारात्मक दृष्टीने बघा,’ असा संदेश प्राचार्य प्रकाश कडवे यांनी दििला.

मुक्त ‌विद्यापीठात बी.एड. प्रवेश

$
0
0
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सेवांतर्गत शिक्षणशास्त्र पदवी शिक्षणक्रमाची (बी.एड.) शैक्षणिक वर्ष २०१४ -१६ ची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, ऑनलाइन अर्जाद्वारे पात्र ठरलेल्या गुणवत्ताधारक उमेदवारांच्या निवडी संदर्भात निर्णय घेण्यासाठी आज (२ जून) पासून प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात येणार आहे.

बांधकाम कामगारांना आर्थिक मदत

$
0
0
बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांना आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी तीन हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय बांधकाम कामगार कल्याण मंडळाने घेतला आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images