Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

लेबर सेसमधून उद्योजकांची सुटका

$
0
0
जे कारखाने कंपनी कायदा आणि फॅक्टरी अॅक्ट या नियमाखाली नोंदणीकृत आहेत. अशा सर्व कारखान्यांना लेबर सेस लागू राहणार नाही, अशी घोषणा उद्योग विकास आयुक्त राधिका रस्तोगी यांनी केली. तसेच, यासंबंधीची सूचना दोन दिवसांच्या आत विभागीय कार्यालयांना दिली जाईल, असे रस्तोगी यांनी स्पष्ट केले. यामुळे उद्योजकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नाशिकमध्ये 'एमपीएससी'चा 'कुंभ'

$
0
0
'एमपीएससी'तर्फे (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) ७ एप्रिलला घेतल्या जाणा-या पूर्व परिक्षेला नाशिक केंद्रातून तब्बल २३ हजार ३७७ विद्यार्थी प्रविष्ठ होणार आहेत. आजवरची ही रेकॉर्डब्रेक उमेदवार संख्या मानली जात असून, त्यासाठी जिल्हा प्रशासनाने ६५ केंद्रांची व्यवस्था केली आहे.

ट्रॅफीकविरोधात वाहने केली पंक्चर

$
0
0
शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या गोळे कॉलनीतील वाहतूक समस्या निकाली काढण्यात पोलिसांकडून वेळोवळी प्रयत्न होत असले तरी त्यास वाहनचालकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. यावर पर्याय म्हणून अस्ताव्यस्त लावलेल्या वाहनांना पंक्चर करण्याची मोहीमच पोलिसांनी हाती घेतली असून मंगळवारी तसा प्रत्यय काही वाहनचालकांनी घेतला.

उलगडले कवितांचे विश्व

$
0
0
जिल्हा माहिती कार्यालयामार्फत आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथोत्सवामध्ये मंगळवारी कवितांचे‌विश्व उलगडले. केटीएचएम कॉलेजमधील अॅनेक्स २ सभागृहात झालेल्या या काव्यसंमेलनात शहरातील अनेक कवींनी आपल्या कविता सादर केल्या. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी कवी प्रकाश होळकर होते.

गॅरेजेसची अतिक्रमणे हटवली

$
0
0
मुंबई नाका परिसरातील मदिना चौक ते सारडा सर्कलपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील अतिक्रमणे महापालिकेच्या पथकाकडून मंगळवारी हटविण्यात आली. त्यात विशेषत: परिसरातील अनेक गॅरेज हटवली.

निर्भयाला श्रध्दांजली पथनाट्यांतून

$
0
0
दिल्लीमधील युवतीवर घडलेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणाने महिलांवर होणारा अन्याय पुन्हा एकदा सर्वांसामोर आला. जागतिक महिला दिनानिमित्त या युवतीला पथनाट्यांमधून श्रध्दांजली वाहण्याचा उपक्रम कल्याणी महिला सहकार प्रबोधिनीमार्फत राबविण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्ष अॅड. अंजली पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

एचएएल घोटाळ्यावर शिक्कामोर्तब

$
0
0
एच. ए. एल. एम्प्लॉइज को-ऑप. क्रेडिट सोसायटीत २००१ ते २०१२ या ११ वर्षांच्या कालावधीत संचालक मंडळासह सेक्रेटरीने सुमारे ५५ कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याची बाब फेरलेखापरीक्षणातून पुन्हा सिद्ध झाली आहे. याविषयीची माहिती सोसायटी नवनिर्माण कृती समितीतर्फे प्रवीण तिदमे यांनी पत्रकारांना दिली.

टंचाईग्रस्त गावांना देव पावणार?

$
0
0
कोट्यवधींचे दान आणि दक्षिणा जमा होणाऱ्या विविध मंदिरांच्या राज्यातील ट्रस्टने दुष्काळासाठी मदत करण्याचे 'पुण्य' यंदा पदरी पाडले आहे. नाशिकच्या काळाराम ‌मंदिरानेही या समाजोपयोगी उपक्रमाला हातभार लावला आहे. अन्य मंदिरांच्या ट्रस्टने मात्र टंचाईग्रस्त गावांच्या मदतीसाठी अद्याप हात आखडताच ठेवला आहे.

गौणखनिजातून १ कोटीचा दंड वसूल

$
0
0
वाळू, मुरुम, माती अशा गौणखनिजाची बेकायदा वाहतूक करणाऱ्या ८२९ वाहनांविरुद्ध कारवाई करत महसूल विभागाने तब्बल १ कोटी १३ लाख ९१ हजारांची दंडवसुली केली. डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान केलेल्या या कारवाईअंतर्गत अनेक वाहनांविरुद्ध फौजदारी स्वरुपातील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सावरकर तलावातून पाणीगळती!

$
0
0
एकीकडे महापालिकेचे पदाधिकारी शहरातील पाण्याचे नियोजन करण्याकरिता पाणीकपात, काटकसरीचे सल्ले देतात. मात्र, दुसरीकडे महापालिकेपासून जवळ असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावातून दररोज तीन लाख लिटर पाणी वाया जात असल्याचा खबबळजनक दावा महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मामा ठाकरे यांनी केला आहे.

प्रेमप्रकरणातून रचला लुटीचा कट

$
0
0
पेट्रोल विक्रीतून जमा झालेले अडीच लाख रुपये लुटून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयित आरोपींमधील प्रेमी युगुलानेच लुटीचा कट रचला, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. संशयितांना पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली होती.

फटाके कारखान्यात स्फोट; २ ठार

$
0
0
चाळीसगावजवळ तरवाडे-करजाई गावाजवळ असलेल्या एका फटाक्याच्या कारखान्यात मंगळवारी दुपारी भीषण स्फोट होऊन एक महिला व एका मुलीचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत इतर तीन जण जखमी झाले आहेत.

३२० वाड्यांना टँकरने पाणी

$
0
0
मार्चच्या पहिल्याच आठवड्यात जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गाव-वाड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या टँकर्सची संख्या १११ वर पोहोचली आहे. दीड महिन्यांपूर्वी हीच संख्या ४३ वर होती. धरणांतील साठा व टँकर्सची वाढती मागणी पाहता गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा दुष्काळ अधिक गंभीर ठरतो आहे.

म्हाडा घरांचे बुकींग ऑगस्टमध्ये

$
0
0
महाराष्ट्र हौसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या (म्हाडा) नाशिक शहरातील प्रस्तावित सात प्रकल्पांपैकी चार प्रकल्पांमधील घरे येत्या ऑगस्टमध्ये विक्रीला खुली होणार असल्याची माहिती आहे. या चारही प्रकल्पांचे काम सुरु झाले असून ४२७ घरे नाशिककरांसाठी उपलब्ध होणार आहेत. तर उर्वरीत तीन प्रकल्पांचे कामही लवकरच सुरु होणार असून त्यात ६७० घरे साकारली जाणार आहेत.

प्रश्नांनी वेढलाय नाशिकरोडचा भाजीबाजार

$
0
0
नाशिकरोड मधील भाजीबाजार गेल्या अनेक वर्षांपासून वादाचा विषय राहीला आहे. महापालिकेत या विभागातील अनेक नगरसेवक आले आणि गेले; परंतु त्यांना भाजीबाजाराचा प्रश्न सोडवता आला नाही.

पाचवा नाशिक चित्रपट महोत्सव २१ मार्चपासून

$
0
0
पाचव्या नाशिक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची नुकतीच घोषणा करण्यात आली. २१ ते २४ मार्च दरम्यान गंगापूर रोड येथील रावसाहेब थोरात सभागृह व कुसुमाग्रज स्मारक या ठिकाणी हा महोत्सव होणार आहे.

'केबीसी' उभारणार सामान्यांसाठी रिसॉर्ट

$
0
0
महागाईमुळे प्रत्येकालाच निसर्गसान्निध्यात रिसॉर्टमध्ये जाऊन राहणे शक्य होत नाही. हा विचार करूनच केबीसी क्लब व रिसॉर्टद्वारे सामान्यांच्या स्वप्नातील रिसॉर्ट साकारले जाणार असल्याचे केबीसी ग्रुप ऑफ कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक भाऊसाहेब चव्हाण यांनी जाहीर केले.

समतानगरवर डासांचीच 'ममता'

$
0
0
सातपूरमधील पपया नर्सरीला लागून असलेल्या समतानगरमध्ये महापालिकेऐवजी डासांचीच ममता असल्याने परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. यासंदर्भात तक्रार करुनही महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

भोसला कॉलेजमध्ये उद्या चर्चासत्र

$
0
0
भोसला मिलिटरी कॉलेजच्या मानसशास्त्र विभागामार्फत पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता सुधार कार्यक्रमांतर्गत 'विवेकानंद आणि युवकांचा विकास' या विषयावर दोन दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हा बँकेतील 'तो' पुतळा बेकायदा

$
0
0
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने द्वारका येथील मुख्यालयाच्या आवारात उभारलेला पुतळा बेकायदा असल्याचा दावा भ्रष्टाचार निर्मूलन अभियानाने केला आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनानेच अधिकृत माहिती दिल्याचे अभियानाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मुश्ताक अहमद शेख यांनी सांगितले आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images