Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

सिन्नर तालुक्यावर शोककळा

$
0
0
केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाल्याची वार्ता समजताच भाजप कार्यकर्त्यांच्या आवाहनानंतर सिन्नर शहरातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेऊन श्रदांजली वाहिली. मुंडे यांच्या आकस्मिक निधनामुळे संपूर्ण सिन्नर तालुक्यावर शोककळा पसरली होती.

...अन् आरोग्य व‌िद्यापीठाची म‌िळाली भेट

$
0
0
सुमारे दीड दशकांपूर्वी महाराष्ट्र आरोग्य व‌िज्ञान व‌िद्यापीठाच्या न‌िर्म‌ितीचा न‌िर्णय झाला. पण पुढच्याच टप्प्यात नागपूरमधील काँग्रेसच्या नेत्यांकडून नागपुरात हे व‌िद्यापीठ साकारण्यासाठी दबाव वाढीस लागला.

सोशल मीडियावरही हळहळ

$
0
0
सोशल मीडियावरही मुंडे यांच्या निधानाबद्दल शोक व्यक्त होत राहिला. केवळ मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण करणारे संदेश पहायला मिळत होते.

राजापूरला दीड तास रास्तारोको

$
0
0
भाजप नेते, केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाची सीबीआय चौकशी करावी, या मागणीसाठी येवला तालुक्यातील राजापूर येथे ग्रामस्थांनी येवला-नांदगाव मार्गावर रास्तारोको आंदोलन करून गावात बंद पाळला.

कुटुंबवत्सल माणसाची एग्झिट

$
0
0
राजकारणात अत्यंत कुशाग्र तसेच मुत्सदी असलेले मुंडे हे माणूस म्हणून प्रचंड महान होते, अशा आशयाचे शोकसंदेश शरणपूर रोड, रामदास कॉलनी येथील पुष्कर अपार्टमेंटमध्ये घेऊन येणाऱ्यांची गर्दी दिवसभर वाढतच होती.

वणव्यांच्या दाहात पर्यावरणाची होरपळ!

$
0
0
जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने केवळ थातूरमातूर कार्यक्रमांच्या आयोजनात धन्यता मानणाऱ्या नाशिकच्या वनविभागाने खरे तर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. गेल्या चार वर्षात जिल्ह्यात तब्बल २५ ठिकाणी वणवे लागले आहेत.

भूतबाधा झाली म्हणून मारहाण

$
0
0
भूतबाधा झाल्याच्या कारणावरून सासू-सासऱ्यांनी आजारी पडलेल्या सुनेला भगताकडे नेत लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले. हा प्रकार निफाड तालुक्यातील वनसगाव येथे उघडकीस आला आहे.

अखेर ‘डीएमओ’ मिळाला

$
0
0
सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या वर्षभरावर येऊन ठेपला असताना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी (डीएमओ) हे पद रिक्त होते. ‘मटा’मध्ये याबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत जिल्हा प्रशासनाने डीएमओ म्हणून प्रशांत वाघमारे यांची नियुक्ती केली आहे.

दूध भेसळीचा पूर

$
0
0
मुंबईसह राज्याच्या अनेक भागाला दूध पुरविणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दूध भेसळ होत असल्याची बाब निदर्शनास येत आहे. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) नगर जिल्ह्यातील ३७ जणांवर गेल्या दोन वर्षात कारवाई करीत १२ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.

चिखलीकर, वाघविरोधात चार्जशीट

$
0
0
जिल्ह्यासह राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या सतीश ​​चिखलीकर आणि जगदीश वाघ या सार्वजन‌िक बांधकाम खात्यातील इंजिनीअर्सविरोधात अँटी करप्शन ब्युरोने (एसीबी) मंगळवारी कोर्टात चार्जशीट दाखल केले.

नाशिककरांनी पाळला बंद

$
0
0
केंद्रीय मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर नाशिक शहर व जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात आली. जागोजागी उस्फूर्तपणे बंद पाळण्यात आला.

वीज कोसळून तरूण ठार

$
0
0
शहर व जिल्ह्याच्या काही भागात मंगळवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. देवळाली कॅम्पसह परिसराला पावसाने झोडपले तर, नानेगाव येथे वीज कोसळल्याने समाधान संतू दाते ( वय ३०) हा युवक ठार झाला. आगामी काही दिवस ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

बढतीचा सुखद धक्का!

$
0
0
पोलिस विभागात अधिकाऱ्यांच्या बदली व बढतीच्या प्रक्र‌ियेला सुरुवात झाली. कोणाला बढती मिळाली, तर कोणाची बदली झाली. नको त्या ठिकाणी बदली झाल्याने अनेकांना धक्का बसला. बदली झाल्यानंतर अनेकांनी फिल्डिंग लावली.

इनडोअर हॉकीला हवी संजीवनी

$
0
0
भारताचा राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकीची क्रेझ कमी होत असताना या खेळाला सोन्याचे दिवस यावेत, यासाठी पुन्हा प्रयत्न सुरू झाले आहेत. हॉकी आणि इनडोअर हॉकीचा समावेश शालेय खेळात व्हावा यासाठी महाराष्ट्र इनडोअर हॉकी असोसिएशनचे पदाधिकारी झटत असून, नुकतेच राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र इनडोअर हॉकी असोसिएशनच्यावतीने आयोजित केलेल्या स्पर्धेला खेळाडूंनी आणि प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. अशा स्पर्धा कायम होत राहिल्यास निश्चितच इनडोअर हॉकीला सोन्याचे दिवस येतील.

...तर मुंडेंचा विदेश दौरा मॉरिशस असता!

$
0
0
‘‘गोपीनाथ मुंडेजी, आपको मॉरिशस में सन्माननीय गेस्ट करके इन्व्हाइट करते है. आप आईये. हमारा भी मॉरिशस देखीये.’’ मॉरिशसचे पंतप्रधान नवीन रामगुलाम यांनी शपथविधी सोहळ्यात गोपीनाथ मुंडे यांना निमंत्रण दिले. त्यांना जी तारीख योग्य वाटेल ती त्यांच्याकडून लगेच घ्या, असे मॉरिशस सरकारचे भारतातील विशेषाधिकारी व किरगीझस्तान सरकारचे राजशिष्टाचार अधिकारी देवेंद्र साळी यांना सांगितले.

प्रोफाईल पिक्चरवर मुंडेची हसरी छबी

$
0
0
केंद्रीय ग्रामविकास मंत्री आणि भाजप नेते गोपीनाथ मुंडे अनंतात विलीन झाले. परंतु त्यांच्याप्रतीचा आदर दर्शविण्यासाठी अनेकांनी आपले व्हॉट्स अॅप आणि फेसबुक या सोशल साईट्सवरील प्रोफाईल पिक्चर बदलले आहेत. जुन्या प्रोफाईल पिक्चर्सची जागा मुंडे यांच्या हसऱ्या छबींनी घेतली आहे.

मालेगावच्या यंत्रमागधारकांनी जागवल्या मुंडेंच्या आठवणी

$
0
0
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाने मालेगाव शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. डबघाईला आलेल्या यंत्रमाग व्यवसायाला जिवंत ठेवण्यासाठी मुंडे यांनी वीजबिलात सवलत दिल्याच्या उपकाराची जाणीव येथील यंत्रमाग व्यावसायिकांनी झाली.

बंद पाळून गोपीनाथ मुंडेंना श्रध्दांजली

$
0
0
भाजप नेते, केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधना निमित्ताने येवलेकरांनी बुधवारी उत्स्फूर्तपणे बंद पाळला. अत्यावश्यक सेवा वगळता गावातील बाजारपेठ, सर्व दुकाने बंद होती.

भारनियमनाने कळवणकर त्रस्त

$
0
0
कळवण शहरात सध्या भारनियमन प्रचंड वाढले असून त्यातच रात्रीच्या भारनियमनामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. भारनियमन रद्द करावे या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस व छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वीज वितरण कंपनीचे अभियंता किरण जाधव यांना निवेदन दिले.

तलाठी नुकसानीचा कधी करतील पंचनामा?

$
0
0
दोन जून रोजी झालेल्या वादळवाऱ्यामुळे तालुक्यातील आठ गावांतील ६२ हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने जिल्हा कृषी अधिकारी यांना सादर केला आहे. मात्र नुकसानाचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने तयार केला असला तरी अद्याप पंचनामे होत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्याकडून येत आहेत.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images