Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

देवळाली कॅम्पमध्ये सव्वा लाखाची घरफोडी

$
0
0
बंद सदनिकेचा कडी कोयंडा तोडून चोरट्याने सव्वा लाखांहून अधिक किंमतीचा ऐवज चोरून नेला. देवळाली कॅम्प परिसरात ही घटना घडली. राजाराम पाटीलबा ढाले (पंचरत्न सोसायटी दे. कॅम्प) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिस भरतीला हजेरी वाढली

$
0
0
ना‌शिक शहर तसेच ग्राम‌ीण पोलिस दलामध्ये भरती होण्यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची पात्रता फेरीसाठी हजेरी वाढली आहे. पहिल्या दिवशी जवळपास ४० टक्के उमेदवार अनुपस्थित होते. आज मात्र १७०० उमेदवारांपैकी ५३८ उमेदवारांनी दांडी मारल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली आहे.

निर्विघ्न सिंहस्थासाठी आपत्ती व्यवस्थापन महासंघ

$
0
0
सिंहस्थ कुंभमेळा निर्विघ्न पार पाडताना गतवेळच्या चेंगराचेंगरीचा अनुभव लक्षात घेऊन प्रशासन सर्वंकष तयारीला लागले आहे. प्रशासनाच्या या प्रयत्नाला काही धडपड्या लोकांचीही साथ मिळू लागली आहे.

‘मतदारांची नावे वगळू नका’

$
0
0
मतदारांची नावे वगळल्याबाबत गेल्या लोकसभा निवडणुकीत आगपाखड सहन करावे लागलेल्या निवडणूक आयोगाने यावर्षी कुठल्याही मतदाराची नावे न वगळण्याचा निर्णय घेतला आहे. तशा कडक सूचनाच राज्य निवडणूक आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

आपत्तींशी करणार दोन हाथ

$
0
0
राज्यभरातील स्वयंसेवी संस्था राज्य आणि देशपातळीवर आपत्ती व्यवस्थापनात भरीव योगदान देऊ शकतात, हा विचार एका प्रशिक्षण शिबीरात यशदाच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्राचे प्रमुख कर्नल व्ही.एन सुपनेकर, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव आणि तेथील आपत्ती व्यवस्थापन प्रमुख ओमप्रकाश बहिवाल यांनी मांडला.

१२ द‌िवसात, १२ ज्योतिर्लिंग

$
0
0
अवघ्या बारा द‌िवसांच्या कालावधीत देशातील सात राज्य पालथी घालत बारा ज्योत‌िर्लिंगांच्या दर्शनाचा ध्यास चार नाश‌िककरांनी घेतला आहे. सोमवारी (९ जून) रामेश्वरपासून नाश‌िककरांच्या या अनोख्या प्रयोगाला सुरुवात होणार आहे.

रेडिरेकनरचे दर ‘जैसे थे’च!

$
0
0
नाशिक शहरातील रेडिरेकनरचे (जागांचे सरकारी मूल्य) भरमसाठ वाढलेले दर ‘जैसे थे’च राहणार आहेत. मात्र, मार्गदर्शक नियमावलीला (फूट नोटस) कायमस्वरुपी स्थगिती देण्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे.

वेबसाइटवरही अतिक्रमण!

$
0
0
वनविभागाच्या भोंगळ कारभाराची अनेक उदाहरणे असताना, आता चक्क नाशिक वनविभागाच्या वेबसाइटवरही अतिक्रमण झाल्याची बाब पुढे आली आहे. विशेष म्हणजे, वनविभागाचे अधिकारीही याबाबत अनभिज्ञच आहेत.

अकरावीसाठी १९ हजार ७०० जागा

$
0
0
महाराष्ट्र राज्य माध्यम‌िक आण‌ि उच्च माध्यम‌िक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षांचा न‌िकाल तोंडावर आल्याने माध्यम‌िक श‌िक्षण व‌िभागानेही अकरावीच्या प्रवेशांचे न‌ियोजन सुरू केले आहे. शहर हद्दीतील सुमारे ४६ कॉलेजमध्ये सुमारे १९ हजार ७०० जागांची प्रवेश क्षमता आहे.

घोटी ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी ११५ अर्ज

$
0
0
घोटी ग्रामपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सहा प्रभागाच्या सतरा जागांसाठी तब्बल १०० उमेदवारांनी ११५ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामुळे निवडणूक चांगलीच रंगणार असल्याचे दिसून येत आहे. घोटी ग्रामपालिकेची पंचवार्षिक मुदत पुढील महिन्यात संपुष्टात येत आहे. यासाठी येत्या २२ जून रोजी निवडणूक होत आहे.

पुढच्याला ठेच मागचा शहाणा

$
0
0
आडगाव पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाजीराव महाजन यांच्यावर झालेली निलंबनाची कारवाई हा अन्य बेशिस्त व हलगर्जी पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सावधानतेचा इशारा आहे. शहर पोलिस दलात महाजन एकटेच हलगर्जीपणा करतात, असे नाही. असे अनेक अधिकारी आणि कर्मचारी आहेत. पोलिस आयुक्तांनाही हे ठाऊक आहे.

शेणीतमध्ये शेतात सापडली स्फोटके

$
0
0
इगतपुरी तालुक्यातील शेणीत येथे रविवारी दुपारच्या सुमारास शेताची नांगरणी करीत असताना शेतकऱ्याला स्फोटकसदृश वस्तू आढळून आली. नाशिक व मालेगाव येथील बॉम्बशोधक पथकांनी घटनास्थळी जावून ही स्फोटके निकामी केल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

राष्ट्रसेवेचे धगधगते यज्ञकुंड डॉ. हेडगेवार

$
0
0
ज्या काळात समाज आत्मव‌िश्वास हरवून नैराश्याच्या गर्तेत चालला होता, त्या काळात डॉ. केशव बळीराम हेडगेवार या महापुरुषाने समाज मनातील स्फुल्ल‌िंग चेतव‌िले. आपल्या अफाट संकल्पशक्तीच्या बळावर डॉक्टरांनी जगातील सर्वात मोठे संघटन उभारले.

अल्पसंख्‍यांक दर्जा देण्याची लिंगायत समाजाची मागणी

$
0
0
लिंगायत समाजाला अल्पसंख्यांकाचा दर्जा मिळावा यासाठी या समाजाच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबई येथे भेट घेतली. समाजाला अल्पसंख्यांकाचा दर्जा देण्याबाबत राज्य व केंद्र स्तरावर पाठपुरावा करण्याची विनंती या नेत्यांनी पवार यांना केली.

पावसाने केले लोणचे ‌अधिकच आंबट

$
0
0
यंदा बेमोसमी पाऊस व वादळाच्या तडाख्यामुळे झाडावरील कैरी गळून पडल्याने लोणच्यासाठी लागणारी कैरीची आवक कमी झाली आहे. यामुळे चवदार असे लोणचे महाग होण्याची लक्षणे दिसू लागली आहेत. यामुळे लोणचे चांगलेच आंबट लागणार आहे.

मागासवर्गीय शेतकऱ्यांना अनुदानावर साहित्य वाटप

$
0
0
नाशिक जिल्हा परिषदेकडून जिल्हा परिषद सेस अंतर्गत मागासवर्गीय शेतकऱ्यांसाठी १०० टक्के अनुदानावर पंचायत समितीस प्राप्त झालेल्या सौर कंदिल, ताडपत्री, पाईप, झेरॉक्स मशीन आदी साहित्याचे वाटप लाभार्थ्यांना करण्यात आले. ही माहिती पंचायत समिती सभापती शिवांगी पवार यांनी दिली.

जिल्हा बँकेच्या त्रिपक्षीय कराराला संचालकांचा विरोध

$
0
0
महाराष्ट्रातील अनेक कारखाने बँकांनी ताब्यात घेवून कवडीमोल भावाने विकले असताना व जिल्हा बँकेने नाशिक सहकारी साखर कारखान्या (नासाका) सुद्धा तीच वेळ आणली आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने निसाकाच्या कामगार युनियनशी केलेल्या त्रिस्तरीय कराराला संचालकांनी तीव्र विरोध केला आहे.

औक्षण की ऑक्शन!

$
0
0
आपल्यावर इंग्रजीचा इतका प्रभाव पडला आहे की आता इंग्रजी आणि मराठी शब्दांचे अर्थांमधला फरकही कळत नाही. याचाच प्रत्यय एका सोशल साईटवर आला. हल्लीची तरुणाई चोवीस तास व्हॉटस् अॅप वर दिसते. मिनिटा मिनटाला अपडेट मिळत असतात.

रेल्वे स्थानक गर्दीने हाऊसफूल

$
0
0
लग्नसराई आणि पुढील आठवड्यात शाळा सुरू होणार असल्याने गावाहून घरी परतू लागलेल्या मंडळीमुळे सध्या रेल्वेस्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. रेल्वे गाड्यांना असणाऱ्या गर्दीमुळे रिजर्वेशन नसल्यास जनरल डब्यात प्रवास करताना प्रवाशांची दमछाक होत असल्याचे चित्र आहे.

पाणीपुरवठा योजनेसाठी वनविभागची आडकाठी

$
0
0
तालुक्यातील राजापूरची येथील रखडलेली पाणीपुरवठा योजनेसाठी वनविभागाने तातडीने परवानगी द्यावी, या मागणीसाठी राजापूर ग्रामस्थांनी रास्ता रोको करण्याचा इशारा निवेदनद्वारे संबंधितांना दिला आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images