Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

रातीर-नामपूर रस्त्यावर अपघातात धुळ्याचे २ ठार

0
0
स्कार्पियो आणि अॅपेरिक्षा यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या दुर्घटनेत धुळे जिल्ह्यातील दोन प्रवाशी जागीच ठार झाले तर, आठ जण जखमी झाले. ही दुर्घटना मंगळवारी सकाळी रातीर-नामपूर रस्त्यावर घडली. जखमींना उपचारासाठी नामपूर ग्रामीण हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

४ दिवसाआड येवल्यात पाणीपुरवठा

0
0
शहरात संभाव्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर येत्या रविवार, (दि. १५) पासून चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. पाणीपुरवठा समिती सभापती मुश्ताक शेख यांनी ही माहिती दिली.

उन्हाची दाहकता होईना कमी

0
0
मान्सूनपूर्व रोहिण्या कोरड्याठाक जातांनाच महत्वाच्या मृगाचा प्रवेश होऊनही पावसाचा पत्ताच नसल्याने येवलेकर हैराण झाले आहेत. कडक उन्हाच्या दाहकतेच्या चटक्याने तालुक्यातील जनमाणूस घामाघूम होत सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले आहे.

तांत्रिक अडचणींमुळे पाणीप्रश्न सुटेना

0
0
मनमाडचा पाणीप्रश्न येत्या काही महिन्यात सोडविण्याच्या दिशेने निश्चित स्वरुपाचे प्रयत्न सुरू आहेत. पाटोदा ते वाघदरडी धरण पाईपलाइन योजना आणि मनमाड शहरातील अंतर्गत पाईपलाइनचे काम पूर्णपणे कार्यन्वित झाल्यास पाणीप्रश्न सुटू शकेल.

पावसामुळे खरीपाच्या मशागतीला वेग

0
0
जिल्ह्यात मंगळवारी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार आगमन झाले. आव्हाटी, विरगांवसह करंजाडी आणि मोसम खोऱ्यात पाऊन तास मुसळधार पाऊस झाला. पावसाच्या जोरदार आगमनामुळे बळीराजा सुखावला असून खरीपाच्या मशागतीला वेग येणार आहे.

मुख्याध्यापकांच्या वेतनश्रेणीचा प्रश्न मार्गी लावू

0
0
पाचव्या आण‌ि सहाव्या वेतन आयोगाचा लाभ देताना मुख्याध्यापकांच्या वेतनश्रेणीतील त्रुटी लवकरच दूर करण्यात येतील, असे आश्वासन शालेय श‌िक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी द‌िले. संयुक्त मुख्याध्यापक महामंडळाच्या श‌िष्टमंडळाने नुकतीच त्यांची भेट घेतली.

संशयिताचा खटला यापुढे मोक्का कोर्टात

0
0
दरोडा, जीवे मारण्याचा प्रयत्न, खंडणी, पोलिसांना मारहाण अशा विविध गुन्ह्यात मोक्कातंर्गत सेंट्रल जेलमध्ये असलेल्या चौघा संशयितासह त्यांच्या कुटुंबियांविरोधात पोलिसांनी पुन्हा मोक्कातंर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पाच दुचाकी चोरीस

0
0
शहरातील पंचवटी, इंदिरानगर, आडगाव आणि भद्रकाली परिसरातून पाच दुचाकींची चोरी झाली. याप्रकरणी संबंधीत पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, वाढत्या वाहनचोरींच्या घटनांमुळे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.

महापालिका करणार मिळकतींचा सर्व्हे

0
0
महापालिकेच्या मालकीच्या तसेच विविध कारणांनी सामाजिक संघटनाना भाड्याने दिलेल्या मिळकतींचा सर्व्हे करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या मिळकतीबाबत धोरण ठरविण्यासाठी लवकरच हा विषय महासभेत सादर होणार असल्याची माहिती महापौर अॅड. यतीन वाघ यांनी दिली.

ई स्कॉलरशीपची माह‌िती अपडेट करण्याची सूचना

0
0
सामाज‌िक न्याय व‌िभागाच्या ई स्कॉलरशिपचा लाभ घेण्यासाठी कॉलेजेसने संबंध‌ित माह‌िती त्वरित अपडेट करावी, अशा सूचना समाज कल्याण व‌िभागाच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत. कॉलेजेसने http://mahaeschol.maharashtra.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी.

‘सिंहस्थ महापालिकेचा नसून संपूर्ण देशाचा’

0
0
प्रत्येक १२ वर्षांनी भरणारा सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ नाशिक महापालिकेचा नाही तर संपूर्ण देशाचा सोहळा असल्याचे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सिंहस्थ निधीच्या बाबतीत राज्य सरकारला टोला हाणला आहे.

राज्याच्या टोल धोरणाचे काय?

0
0
राज्यातील ४४ टोलनाके रद्द करण्याचा सरकारचा निर्णय योग्य असला तरी आधी ६५ टोल नाके रद्द करण्यात येणार होते. त्या यादीचे काय? असा सवाल उपस्थित करीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याच्या टोल धोरणावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

पेलिकन पार्क बनले कचरा डेपो

0
0
येथील पेलिकन पार्क म्हणजे कचरा डेपोच झाला आहे. त्याच्या लगतच्या रस्त्यांवरही नागरिक सर्रास कचरा टाकतात. महापालिकेचे सफाई कर्मचारी हा कचरा उचलून नेण्याऐवजी कचरा जागेवरच जाळून प्रदूषणात भर घालत आहेत. यामुळे उपचारापेक्षा इलाज भयंकर अशी स्थिती झाली आहे.

फेसबुकवरील आक्षेपार्ह मजूकर हटवा

0
0
फेसबुकवर सातत्याने हिंदू देवदेवतांची, राष्ट्रपुरुषांची बदनामी करणारा मजकूर त्वरित काढून घ्यावा आणि संबधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे. याबाबत, सोमवारी रात्री अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनेश बर्डीकर यांना निवेदनही देण्यात आले.

मनसेला मिळालाच नाही उमेदवार

0
0
मनसे प्रमुख राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आले असताना महापालिकेच्या दोन प्रभागांच्या पोटनिवडणुकीत मनसेने एकही उमेदवार न देता पक्षप्रमुखांना अनोखी भेट दिली. प्रभाग ६१ मध्ये गेल्या वेळी मनसेचा उमेदवार निवडून आल्यानंतरही या वेळी उमेदवार न दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

टँकर्सची संख्या १३९ वर

0
0
जिल्ह्यातील पाणी टंचाईची परिस्थिती दिवसेंदिवस वाढत असून, टँकरच्या फेऱ्याही त्यामुळे वाढल्या आहेत. मान्सूनच्या तीव्र आगमनाची उत्सुकता असतानाच जिल्ह्यात १३९ टँकर्सद्वारे ग्रामीण भागात पाणी पुरवठा केला जात आहे.

शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण करू नका

0
0
येवला शहर व तालुका शिवसेनेची मंगळवारी सायंकाळी माजी आमदार कल्याणराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली.

‘मायानगरी मुंबईवर लवकरच चित्रपट’

0
0
हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक अशा सर्वच क्षेत्रात यशाचे शिखर गाठलेले प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक यांच्या आगामी ‘मायानगरी’ सिनेमामधून मुंबई शहराचे दर्शन घडणार आहे. यशस्वी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून मायानगरी मुंबईत आलेल्या दोन तरुणांच्या जीवनाचा प्रवास या सिनेमातून उलडणार आहे.

जिल्हा बँकेला ४८ कोटींचा नफा

0
0
संचालक मंडळाच्या गैरकारभारामुळे वादग्रस्त बनलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रशासक मंडळाने अवघ्या वर्षभरातच बँकेचे व्यवहार सुरळीत करून ८० कोटींचा तोटा भरून काढत तब्बल ४७.८८ कोटींचा नफा कमावण्याची जादुई कामगिरी साधली आहे.

स्थायी सभापती निवडणुकीत शिवसेना ठरणार किंगमेकर

0
0
महापालिकेच्या आर्थिक तिजोरीची चावी असलेल्या स्थायी समितीवर नवीन सदस्यांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. महापालिकेला आता स्थायी समिती ​सभापती निवडणुकीचे वेध लागले असून मागील वर्षीप्रमाणे यंदाच्या निवडणुकीत शिवसेनाच किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images