Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

गितेंविषयी नाराजी अन् बदलाचे संकेत

0
0
मनसेच्या स्थापनेपासून नाशिकमध्ये पक्षाचे वजनदार व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेल्या प्रदेश सरचिटणीस तथा आमदार वसंत गीते यांच्याविषयी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारी, नाराजी आणि स्थानिक संघटनेत मोठ्या फेरबदलाची चिन्हे हेच राज यांच्या दौऱ्याचे फलित असल्याचे स्पष्ट होत आहे.

सावधान ! ल‌िची व्हायरल येतोय...

0
0
गेल्याच आठवड्यात पश्चिम बंगाल येथील मालडा मेडीकल कॉलेजमध्ये ३ ते ५ वयोगटातील आठ बालके ल‌िचीची फळे खाल्यामुळे दगावली. सध्या नाशिकमध्ये पश्चिम बंगालमधील ल‌िची फळं विकली जात आहेत.

जकात परतणार ?

0
0
एलबीटी रद्द करून त्यास सक्षम पर्याय देण्याचा निर्णय पुढील चार दिवसात घेतला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील २६ महापालिकांच्या महापौरांना दिले. व्यापाऱ्यांना मान्य होईल अशी कर पध्दती लागू करण्यासाठी महापौरांनी आपआपल्या शहरातील व्यापाऱ्यांशी चर्चा करावी आणि तसा अहवाल सादर करावा, असे आदेश मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी दिलेत.

ही तर ‘सायलेंट मूव्ही’

0
0
लोकसभा निवडणुकीत मनसे उमेदवाराच्या दारुण पराभवाची दखल घेत मनसेचा गड असलेल्या नाशिकच्या पक्ष संघटनेत मोठी फेरबदल करण्याचे संकेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देतानाच सद्यस्थितीत स्थानिक पातळीवर ‘सायलेंट मूव्ही’चे वातावरण असल्याची खोच प्रतिक्रीया राज यांनी दिली आहे.

आजोबांनी काठी काढली तेव्हा…

0
0
रिक्षाचालकांकडून प्रामाणिकपणाचे दर्शन घडते, तसे उध्दट आणि मस्तवालपणाचेही. म्हणूनच रिक्षाचालक वाईट वागणुकीबद्दलच अधिक चर्चेत राहतात. एखाद्या रिक्षाचालकामुळे समस्त रिक्षाचालकांची बदनामी होत असते.

पावसाळी आजारांवर ‘स्पेशल सेल’

0
0
पावसाळ्यात साथीच्या आजारांचा प्रसार होण्याची शक्यता ‌अनेक पटींनी बळावते. या आजारांना वेळीच प्रतिबंध करताना रुग्णांना सर्वोत्तम सेवा देण्याच्या उद्देशाने प्रशासनाने कंबर कसली आहे. पावसाळी आजारांवर उपचार सेवा पुरविणारा सेल (स्वतंत्र कक्ष) लवकरच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कार्यान्वित होणार आहे.

शहर बससेवा, की ‘खटारा’सेवा!

0
0
नाशिक शहरात दररोज रात्रंदिवस, हजारो प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या एसटी गाड्यांची एकंदरच अवस्था पाहिली की, त्यांना ‘खटारा’ का म्हणू नये, असा प्रश्न निर्माण होतो. ताफ्यात गाड्या भरपूर, मात्र धड एकही नाही, अशी त्यांची स्थिती झाली असल्याचा अनुभव आज (११ जून) सकाळीच काही प्रवाशांना आला.

पहिल्याच पावसात रस्त्यांची लागली वाट

0
0
महापालिकेतर्फे सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाची पहिल्याच पावसात वाट लागल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी पावसाच्या सरींबरोबरच सिडको, सातपूर परिसरात खोदलेल्या रस्त्यांवर अनेक ठिकाणी वाहने अडकून पडली. महापालिकेच्या ठेकदाराकडून धिम्या गतीने होणा-या कामाचा त्रास वाहनचालकांना सहन करावा लागला.

कृषी अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले

0
0
एका विशेष योजनेंतर्गत मंजुर झालेला ‌पिस्टन पंप आणि इलेक्ट्रीक मोटार देण्यासाठी ७ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या कृषी अधिकाऱ्याला ताब्यात घेण्यात आले. लाचलुचपत प्रतिंबधक विभागाने निफाड पंचायत समिती कार्यालयात बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही कारवाई केली.

आघाडीतील नाराज भाजपच्या वाटेवर

0
0
लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षातील वातावरण ढवळून निघाले आहे. याचा प्रत्यय नुकत्याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनालाही आला. वर्धापनदिनानिमित्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये कुठलाही उत्साह दिसून आला नाही.

मनमाडला सत्ताधाऱ्यांची सभेला दांडी

0
0
नगरपालिकेचे स्थलांतर आणि वाढीव पाणीपट्टी रद्द करण्याच्या महत्वाच्या विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी आयोजित नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेला विरोधी शिवसेना गटाचे सात आणि सत्ताधारी आघाडीचा एकमेव नगर सेवक वगळता सर्व नगरसेवकांनी दांडी मारल्याने ही सभा गणपूर्तीअभावी तहकूब करण्याची वेळ नगराध्यक्ष गणेश धात्रक यांच्यावर आली.

मैत्रिणीवरच चोरीचा गुन्हा

0
0
किराणा आणण्यासाठी रविवार कारंजा येथे गेल्याचा फायदा घेत चोरट्याने महिलेच्या घरातून ५० हजारांची रोकड आणि ३५ हजारांचे दागिने असा ८५ हजारांचा ऐवज चोरून नेला. आरटीओ ऑफिसच्या मागे हा प्रकार घडला. याप्रकरणी फिर्यादी महिलेच्या मैत्रिणीवरच संशयित म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसभेतील पराभवामुळे राष्ट्रवादीत निरुत्साह

0
0
लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील नाशिक आणि दिंडोरी या मतदारसंघांमध्ये झालेल्या पराभवाच्या धक्क्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते अद्याप बाहेर पडू शकलेले नाहीत.

विकासकामांचा आढावा घेऊन राज परतले

0
0
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील विविध विकास कामांचा आढावा घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईला बुधवारी परतले. मात्र, ते नाशिक दौऱ्यावर पुन्हा केव्हा येणार याबाबत अनिश्चितताच आहे.

त्र्यंबकनगरीत सिंहस्थ कामांना अखेर वेग

0
0
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वर येथील प्रस्तावित कामांना वेग येत आहे. सिंहस्थासाठी नियुक्ती दोन्ही उपजिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी त्र्यंबकचा दौरा केला असून, येत्या १८ जून रोजी विभागीय महसूल आयुक्तांनी त्र्यंबकेश्वर येथे बैठकीचे आयोजन केले आहे.

आंदोलकांमुळे पोलिस यंत्रणा वेठीला

0
0
आदिवासी बांधवांनी आदिवासी विकास कार्यालयावर काढलेला विराट मार्चा शहरात बुधवारी चर्चेचा विषय ठरला. त्यांच्या मागण्या रास्त असल्या, आंदोलनही शांततेच्या मार्गाने केले असले तरी त्यामुळे पोलिस यंत्रणा वेठीस धरली गेली.

‘रिलायन्स’च्या अजेंड्यावर नाशिक हॉट फेव्हरिट

0
0
जागतिक पातळीवर झपाट्याने विकसित होणाऱ्या शहरांमध्ये सोळाव्या क्रमांकावर असलेल्या नाशिक शहराची भूरळ रिलायन्स या आंतरराष्ट्रीय कंपनीलाही पडली आहे. त्यामुळेच रिलायन्सने विविध प्रकल्पांद्वारे नाशिककडे रोख वळविला असून येत्या काळात त्यांची मोठी गुंतवणूक नाशकात होण्याची चिन्हे आहेत.

नासर्डीची नंदिनी कधी होणार?

0
0
गत विधानसभा निवडणुकीत नाशिक पश्चिम मतदारसंघातील बहुतांश उमेदवारांच्या जाहीरनाम्यात, प्रचारात नासर्डीची नंदिनी करणार हा मुद्दा होता. मात्र, साडेचार वर्षांत नासर्डीची नंदिनी तर झालीच नाही. उलट तिला गटार गंगेचे स्वरूप प्राप्त झाले.

फार्मसी ड‌िग्रीला भरती; PG ला ओहोटी

0
0
फार्मसीच्या क्षेत्रात आगामी काळात होणारी संभाव्य गुंतवणूक बघता या व‌िद्याशाखेत पदवी स्तरावरील आलेख एकीकडे उंचावतो आहे. मात्र, मुक्त हस्ते कॉलेज वाटपाच्या ‘एआयसीटीई’च्या अल‌िकडील धोरणामुळे याच व‌िद्याशाखेतील पदव्युत्तर अभ्यासक्रमाला ओहोटी लागल्याचे च‌िन्ह आहे.

जिल्ह्यात १० टक्के जलसाठा

0
0
जिल्ह्यात मान्सूनचे आगमन अद्याप झालेले नसताना जिल्ह्यातील विविध धरणांमध्ये एकूण १० टक्के पाणी साठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील ९ धरणे सध्या कोरडीठाक पडली आहेत. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस राहण्याचा अंदाज असल्याने पाणी साठ्याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images