Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

आदिवासी उतरले रस्त्यावर

0
0
वनहक्क जमिनीचा कायदा लोकसभेत संमत झाला असताना प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नाही. या कायद्याची अंमलबजावणी त्वरित करावी व आदिवांसीचे प्रश्न सोडवावेत, अशा विविध मागण्यांसाठी बुधवारी लोक संघर्ष मोर्चातर्फे नाशिकरोड येथील विभागीय आयुक्तालय व आदिवासी विकासभवनावर मोर्चा काढण्यात आला.

राज धावून आले अंजनाच्या मदतीला

0
0
नाशिक जिल्ह्यात झालेल्या वादळी पावसामुळे राष्ट्रीय धावपटू व सुवर्णकन्या अंजना ठमके हिच्या घराचा काही भाग कोसळला होता. पैशांअभावी घर दुरूस्त करणे शक्य नसल्याने अंजनाच्या कुटुंबियांनी व अंजनाने स्वत:त घरासाठी मजुरीचे काम सुरू केले होते.

जन्मोजन्मी लाभो साथ...

0
0
पती-पत्नीचे नाने जन्मोजन्मी अखंड रहावे अशी प्रार्थना करत शहरातील महिलांनी वटपौर्णिमा पारंपारिक पध्दतीने उत्साहात साजरी केली. शहरातील जुने नाशिक, पंचवटी, सिडको, सातपूर, कॉलेजरोड, गंगापूररोड, म्हसरुळ, नाशिकरोड यासह सर्वच भागांमध्ये असणाऱ्या वडाच्या झाडांची पूजा करण्यासाठी गुरुवारी महिलांनी गर्दी केली होती.

मराठा आरक्षणासाठी हवा छोडो आंदोलन

0
0
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शुक्रवारपासून (१३ जून) राज्यभर हवा छोडो आंदोलन करण्याचा इशारा छावा संघटनेने दिला आहे. आजपर्यंत आघाडी सरकारने आश्वासनाशिवाय आमच्या पदरात काहीही दिलेले नाही.

स्वच्छतेच्या मुद्यांवर प्रभाग सभा गाजली

0
0
नाशिकरोड परिसरात पावसाळी कामे पूर्ण झाली नसून परिसरात अनेक ठिकाणी डासांचे साम्राज्य पसरल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. नाशिकरोड प्रभाग समितीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा होऊन कामे होत नसल्याबद्दल नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला.

महिंद्रा अॅडव्हेंचर रॅलीचा आजपासून थरार

0
0
वेस्टर्न इंडिया स्पोर्टस् असोसिएशनच्या वतीने नाशिकच्या मोटारस्पोर्ट प्रेमींसाठी १२ ते १५ जून या कालावधीत इंडियन रॅली चॅम्पियनशीपचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी महिंद्र अॅडव्हेचर रॅली ऑफ महाराष्ट्र चॅम्पियनशिपच्या पहिल्या राउंडला सिटीसेंटर मॉल येथून सुरुवात झाली.

‘मनौधैर्य’चा आठ महिलांना लाभ

0
0
बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार आणि अॅसिड हल्ला झालेल्या महिला व बालकांना अर्थसहाय्य आणि त्यांचे पुनर्वसन करण्यासासंदर्भात स्थापन केलेल्या मंडळाने आठ प्रस्तावांना मान्यता दिली आहे. त्यानुसार आठ पीडित महिलांना आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

महिंद्रा अॅण्ड महिंद्राला उत्कृष्ट कंपनी पुरस्कार

0
0
निमातर्फे दर तीन वर्षांनी दिला जाणारा उत्कृष्ट कंपनी पुरस्कार (मोठे उद्योग) महिंद्रा अॅण्ड महिंद्राला देण्यात आला. हॉटेल गेटवे ताज येथे झालेल्या पुरस्कार समारंभात मोठ्या उद्योगांबरोबरच मध्यम व लहान उद्योगांनाही पुरस्काराने गौरविण्यात आले. एच. एल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. एस. सुब्रम्हण्यम, क्रॉम्प्टन ग्रिव्हजचे वरिष्ठ उपाध्यक्ष जे. जी. कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

गोदा प्रदूषणमुक्तीसाठी किती खर्च करणार ?

0
0
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सुमारे दोन हजार कोटीहून अधिक रुपये खर्च केले जाणार आहेत. मात्र, त्यापैकी किती पैसे गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी खर्च होणार आहेत किंवा त्यासाठी नक्की किती तरतूद करण्यात आली आहे, असा प्रश्न मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला विचारला आहे. गोदावरी प्रदूषणाबाबतच्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली.

कुंडीतल्या वडाचाच उरला आधार!

0
0
गेल्या काही वर्षांत शहरात सिमेंटचे जंगल वाढत असतानाच वड, पिंपळ अशा मोठ्या झाडांची सर्रास कत्तल करण्यात आली. शहरीकरण व औद्योगिकीकरणाच्या रेट्यात शहरातील अनेक मोठ्या झाडांचा बळी गेला. शहरात सध्या सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामातही वडाची अनेक झाडे नष्ट झाली आहेत. त्यामुळेच यंदा वटपौर्णिमा साजरी करण्यासाठी वट‍वृक्ष न मिळाल्याने काही ठिकाणी महिला वर्गाला कुंडीत लावलेल्या वडाची पूजा करावी लागली.

घोटीला नगरपालिकेचा दर्जा द्या

0
0
घोटी शहर हे जिल्ह्याची नामांकीत बाजारपेठ असून महत्त्वाची उद्योगनगरी आहे. शहराची वाढती लोकसंख्या व व्यापक भौगोलिक विस्तार या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीकडून होणाऱ्या विकासकामांवर मर्यादा येत आहेत. या पार्श्वभूमीवर नगरपालिका निर्मितीसाठी शासनाच्या सर्व अटींची घोटीकरांनी पूर्तता केली असल्याने घोटी नगरपालिका निर्मितीसाठी शासनाने तत्काळ निर्णय घ्यावा, असे सांगत घोटी शहरवासीयांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात जनहीत याचिका दाखल करण्याचा इरादा घोटीतील सामाजिक कार्यकर्ते अण्‍णासाहेब डोंगरे व मुन्ना शेख यांनी व्यक्त केला आहे.

रविवारी आदिवासी जागृती परिषद

0
0
महाराष्ट्र सरकार काही समाजांचा अादिवासी प्रवर्गामध्ये समावेश करीत असल्याच्या निषेधार्थ आदिवासी संस्थांच्या वतीने आदिवासी जागृती परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद रविवारी सकाळी १० ते ५ या वेळेत दादासाहेब गायकवाड सभागृहात होणार आहे. माजी आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांच्यासह राज्यातील आदिवासी आमदार व प्रमुख नेते परिषदेत सहभागी होणार आहेत.

त्र्यंबकमध्ये हरिनामाचा गजर

0
0
शेकडो वर्षांच्या परंपरेने भागवत धर्माचे आद्य संस्थापक संत निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी विठुमाऊलीच्या भेटीसाठी रवाना झाली आहे. त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर असा २७ दिवसांचा पायी प्रवास सुरू झाला असून, सुमारे ४० दिंड्या या सोहळ्यात सहभागी झाल्या आहेत. टाळ मृदुंग, डोयीवर तुळस घेतलेल्या वयोवृध्दा हरिनामाचा गजर करत आषाढीच्या ओढीने मार्गस्‍थ झाले आहेत.

एलबीटी नको, १% सरचार्ज चालेल

0
0
जकात नकोच, पण एलबीटीही नको. एलबीटीला पर्याय म्हणून व्हॅटमध्ये एक टक्का सरचार्ज भरण्यास तयार असल्याचे नाशिक शहरातील प्रमुख २६ व्यापारी उद्योजक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी महापौरांना सांगितले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना संघटनांच्या भावाना कळवण्याचे आश्वासन महापौर अॅड. यतीन वाघ यांनी यावेळी दिले.

बांगलादेशी तरुणीकडून देहविक्री

0
0
बांगलादेशी तरुणीला देहविक्रेय लावल्याचा प्रकार अंबड पोलिस स्टेशनच्या हद्दीत उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. २०१३ पासून कलकत्ता, मुंबई, अहमदनगर पाठोपाठ नाशिकमध्ये हा प्रकार घडला.

सहा महिन्यांनंतर लागला सेटच्या निकालाचा मुहूर्त

0
0
सहाय्यक प्राध्यापक पात्रता पदासाठी घेण्यात येणाऱ्या राज्य चाचणी परीक्षा (सेट)चा निकाल गुरूवारी (१२ जून) रोजी जाहीर झाला. ही परीक्षा पुणे विद्यापीठातर्फे १ डिसेंबर २०१३ मध्ये घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी एकूण ६९६४१ परीक्षार्थी बसलेले होते. त्यापैकी २८१० जण उत्तीर्ण झाले. या परीक्षेचा निकाल ४.०३ टक्के लागला.

डेंग्यूचा पहिला पेशंट आढळला

0
0
गेल्या वर्षी पावसाळ्यात धुमाकूळ घालून नागरिकांना त्रस्त करणाऱ्या डेंग्यू आजाराचा पहिला पेशंट पावसाळा सुरू होण्यापूर्वीच आढळून आला आहे. जेलरोड परिसरातील महालक्ष्मीनगर येथील पंचक येथे ४२ वर्षीय व्यक्तीस डेंग्यूची लागण झाली असल्याचे आढळून आले.

आदिवासींच्या आंदोलनाचा आदिवासींनाच फटका?

0
0
पावसाळ्यात आदिवासी गावांमध्ये राबविण्यात येणाऱ्या नवसंजीवनी योजनेची बैठक आदिवासी बांधवांच्याच आंदोलनामुळे गुरुवारी रद्द करावी लागली आहे. आदिवासी बांधवांनी आदिवासी विकास आयुक्तालयाला घेराव घातल्याने प्रकल्प अधिकारी बैठकीला अनुपस्थित राहू शकले नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील ही बैठकच होऊ शकली नाही.

चौथ्या दिवशीही उपोषण सुरूच

0
0
सिन्नर तालुक्यातील माळेगाव औद्योगिक वसाहतीतील टीआय सायकल या कारखान्यातील कामगारांनी आपल्या न्याय मागण्यासाठी कंपनीच्या गेटवर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. चार दिवस होऊनही उपोषणाकडे व्यवस्थापणाने लक्ष न दिल्याने सात उपोषणकर्त्यांची प्रकृती गंभीर झाली आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सिटूतर्फे शनिवारी (दि. १४) तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

मालेगाव तालुक्यात खरिपाच्या मशागतीला वेग

0
0
शेतकरी खरीप हंगामाच्या पेरणीपूर्व मशागतीला लागला असून बियाणे, खते घेण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. यावर्षीही मका आणि कापूस लागवडीवर शेतकऱ्यांचा भर आहे. खत विक्रेत्यांना शासनाचे नियम धाब्यावर बसवून निर्धारीत किंमतीपेक्षा जास्त किंमतीने बियाणे विक्री सुरू केल्याने हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांच्या शोषण करण्यास सुरुवात केली आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images