Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

बांधकामातही 'रेडी टू युज'चा पर्याय

$
0
0
बांधकामासाठी लागणारी वाळू, खडी आणि विटा या पारंपरिक उत्पादनांच्या टंचाईमुळे या साहित्याच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत. यावर पर्याय म्हणून आता रेडिमेड ब्लॉक्स, क्रश सँड आणि रेडिमेड मिक्स प्लास्टर यांसारख्या आधुनिक साहित्याला प्राधान्य दिले जात आहे.

पोलिस आयुक्तांचे घर आहे म्हणून...

$
0
0
वाहतूक विभाग आणि महापालिकेला महात्मानगर परिसरात वाहतुकीच्या सर्वच नियमांची आठवण झाली आहे. शहराच्या अन्य भागात वाहतुकीच्या सर्वच नियमांना हरताळ फासला जात असल्याने वाहतूक कोंडी आणि अपघात नित्याचे झाले असतानाही या दोन्ही यंत्रणा केवळ पोलिस आयुक्तांच्या निवासस्थानासाठीच जाग्या झाल्या आहेत की काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

नाट्यप्रशिक्षण मह‌त्त्वाचेच

$
0
0
कुसुमाग्रज स्मारकात सध्या नाट्यप्रशिक्षण सुरू आहे. शहरातील तरूण कलाकारांना धडे देण्यासाठी अनेक सेलिब्रेटी येत असून त्यात विजयाबाई मेहतां यांचं नाव अग्रक्रमाने आहे. बाई नाशिकला येणार म्हणजे कलाकारांसाठी सोनियाचा दिनुच आहे.

'आडगांवकर सराफ' यांचा पाणीबचतीसाठी उपक्रम

$
0
0
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आडगांवकर सराफ प्रा. लि. आणि रेडिओ मिर्ची यांच्या संयुक्त विद्यमाने पाणी बचतीसाठी विशेष उपक्रम राबविला जाणार आहे.

पीपल्स रिपाइंचा मोर्चा

$
0
0
राज्यात अनेक ठिकाणी दलित व मागासवर्गीयांवर अन्याय, अत्याचार केले जात असून, संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी पीपल्स रिपाइंच्या वतीने मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.

महालोक अदालतमध्ये १५७ दावे निकाली

$
0
0
नाशिकरोड न्यायालयात आयोजित करण्यात आलेल्या महालोक अदालतमध्ये ५६५ पैकी १५७ दावे तडजोडीने निकाली काढण्यात आले.

वाट्टेल तिथे करा पार्किंग ट्टेल तिथे करा

$
0
0
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था असतानाही राजकीय पदाधिकारी, बडे बिल्डर व खुद्द अधिकाऱ्यांची वाहनेही आता बिनदिक्कतपणे मुख्य इमारतीलगत पार्क होऊ लागली आहेत.

आता कार्यक्रम सुरू करा!

$
0
0
एका धार्मिक महोत्सवानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये अनेक भक्त आपापल्या परीने काही ना काही योगदान देत होते. शहरातील एका मंडळामध्ये असाच एक कार्यक्रम सुरू होता.

म्हाडाचे गृहप्रवेश होणार पारंपरीक पद्धतीनेच

$
0
0
महाराष्ट्र हौसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट अथॉरिटी (म्हाडा)च्यातर्फे मुंबईत बुकींग व लॉटरीसाठी ऑनलाईन पद्धत वापरली जाते. मात्र ही पद्धत नाशिकमध्ये राबविली जाणार नसल्याचे म्हाडाच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

आशीर्वाद फाउंडेशनतर्फे आज महिला महोत्सव

$
0
0
आशीर्वाद फाउंडेशनतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित महिला महोत्सवांतर्गत विविध स्पर्धा उद्या (दि. ७) होणार आहेत. यावेळी आदर्श माता पुरस्काराचे वितरण होणार आहे.

कुशन्स बनवा घरच्या घरी

$
0
0
आपलं हक्काचं घर आणि त्या घराची सजावट हे महिलांचं एक मोठं स्वप्न असतं. मग त्या घरात फर्निचर, त्याला साजेशा वस्तू हे सगळं करण्यात महिलांना खूप इंटरेस्ट असतो.

मंत्र्यांचे बदलीचे अधिकार काढा

$
0
0
'मंत्र्यांकडील बदल्यांचे प्रशासकीय अधिकार काढून घेण्याची गरज आहे कारण त्यात मंत्रीवर्गाची अधिक शक्ती खर्च होते. मंत्र्यांवरील ताण कमी केल्यास ते धोरणात्मक विषयात लक्ष घालू शकतील, त्यामुळे दर्जेदार काम होऊ शकेल.' असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी केले.

अखेर मनमाडकरांना नळाद्वारे पाणी

$
0
0
मनमाडसाठी मंगळवारी पालखेड धरणातून पाण्याचे आवर्तन सोडल्यानंतर तब्बल ४२ तासांचे अंतर पार करत बुधवारी सायंकाळी हे पाणी येथील पाटादो साठवणूक तलावात पोहोचले. आता या साठवणूक तलावातून रात्री हे पाणी १८ किमी अंतरावरील वागदर्डी धरणात घेतले जाईल.

कुसुमाग्रज स्मरणयात्रेत रसिक मुग्ध

$
0
0
कुसुमाग्रज स्मारक येथे बुधवारी सायंकाळी कुसुमाग्रज स्मरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात नितीन पवार व प्रमोद भडकमकर यांचे तबला सहवादन झाले. यावेळी नाशिककरांना तबला वादनाची वेगळीच जादू अनुभवायला मिळाली.

एकलहरे प्रकल्पग्रस्तांना दाखले मिळणार

$
0
0
एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्पाकरिता झालेल्या भूसंपादन प्रक्रियेतील प्रकल्पग्रस्तांना अखेर दाखले मिळणार आहेत. तसे निर्देश राज्य सरकारने विभागीय आयुक्तांना दिले आहेत.

भीष्मराज बाम यांचा सत्कार

$
0
0
भारतीय क्रीडामानसतज्ञ संघटनेतर्फे दिला जाणारा मानाचा जीवनगौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ क्रीडामानसतज्ञ भीष्मराज बाम यांना प्रदान करण्यात आला. त्यानिमित्त प्रिसिजन स्पोर्टस क्लबतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

घंटागाड्यांची सरकारकडून चौकशी

$
0
0
नगरसेवकांनी प्रभागनिहाय घंटागाडी असावी, अशी मागणी केली असतानाही महापौरांनी सभागृहाचा कौल डावलून विभागनिहाय घंटागाडीच्या निविदा काढण्याचा आदेश दीड महिन्यांपूर्वी दिला होता.

एका रात्रीत सात कारफोडी

$
0
0
शहराच्या कॅनडा कॉर्नर व गंगापूर रोड भागातील विविध घटनांत चोरट्यांनी एकाच रात्रीत सात कारच्या काचा फोडत सुमारे एक लाखाचा मुद्देमाल लंपास केल्याच्या घटना मंगळवारी उघडकीस आल्या.

गायक सुरेश वाडकरांना गंडा?

$
0
0
नाशिकरोड येथील दीड एकर जमीन व्यवहारात प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर व सोनू निगम यांची १५ कोटींची फसवणूक झाल्याचे सांगितले जाते आहे.

पाण्यासाठी उपमहापौरांना घेराव

$
0
0
महापालिका प्रशासनाकडून पाण्याच्या नियोजनात सुरु असलेल्या हलगर्जीपणामुळे नागरिकांचा होणारा संताप आता रस्त्यावर उमटू लागला आहे. उपमहापौर सतीश कुलकर्णी यांच्या प्रभागात येणाऱ्या अशोका मार्गवरील सिध्दीविनायक सोसायटीचे रहिवाशी गेल्या वर्षभरापासून पाण्याच्या समस्येला तोंड देत आहेत.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images