Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

वाहन नोंदणीवरून आरटीओला घेराव

0
0
दर महिन्याला होणाऱ्या वाहन नोंदणी शिबिरात कपात करण्याचा राज्य परिवहन विभागाने नुकताच निर्णय घेतला. हा निर्णय वाहनधारकांना वेठीस धरणारा असल्याचा आरोप करत बुधवारी संतप्त शिवसैनिकांनी सटाण्यात आरटीओला घेराव घालून सुमारे एक तास वाहन नोंदणी बंद पाडली. महिन्यातून सटाण्यात तीन वेळा वाहन नोंदणी शिबिर घेण्याची मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली.

नांदगाव, येवल्यात कार्यकर्त्यांचे मुंडण

0
0
केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या दशक्रिया विधीनिमित्त नांदगाव तालुक्यातील त्यांच्या हजारो चाहत्यांनी मुंडन करून श्रद्धांजली अर्पण केली. नांदगाव तालुक्यात गोपीनाथ मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग होता. तालुक्यात त्यांचे जिव्हाळ्याचे संबध होते.

६०२ कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता बंद

0
0
तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सेवेत असणाऱ्या व मुख्यालयी न राहणाऱ्या ६०२ कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता बंद करण्यात आला आहे. मे महिन्याच्या वेतनातून घरभाडे भत्ता वजा करून पगार बिल जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात आले आहे.

इगतपुरीतील ग्रामपंचायती बिनविरोध

0
0
इगतपुरी तालुक्यात जून महिन्यात मुद्दत संपलेल्या सुमारे ३७ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुका या महिन्यात होत आहेत. या पार्श्वभूमीवर माघारीच्या प्रक्रियेत पिंपळगाव घाडगा, वाळविहीर, आवळखेड, भावली खुर्द आणि चिंचलेखैरे या चार गावांनी स्थानिक पातळीवर मतभेद बाजूला सारून संपूर्ण ग्रामपंचायत बिनविरोध निवडली आहे.

येवल्यात पालिका कर्मचाऱ्यांचे धरणे

0
0
नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी भारतीय मजदूर संघाच्या वतीने नगरपालिका कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत धरणे आंदोलन करण्यात आले. नगराध्यक्ष नीलेश पटेल यांच्यासोबत संघटना पदाधिकाऱ्यांनी मागण्यांसंदर्भात चर्चा केली.

नामकरणावरून दोन गटात वाद

0
0
बागलाण तालुक्यातील करंजाड येथील मराठा विद्याप्रसारक समाज संचलित हायस्कूलच्या नामकरणावरून दोन गटात वाद उफाळून आला आहे. मविप्रच्या मध्यवर्ती कार्यालयात नामकरणावरून एका टोळक्याने धुडगूस घातल्याने खळबळ उडाली आहे.

मेळाच्या बंधाऱ्याला मिळाले पाणी उपलब्धता प्रमाणपत्र

0
0
ममदापूर परिसरातील गावांना वरदान ठरणाऱ्या मेळाच्या साठवण प्रकल्पाला जलविज्ञान प्रकल्पाने पाणी उपलब्धता प्रमाणपत्र दिले आहे. यामुळे या प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यासाठी संबधितांच्या बैठका घेवून अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या.

खोटे पंचनामे पडणार महागात‍

0
0
तालुक्यातील गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करताना मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी वाढल्यामुळे तहसीलदार आश्विनीकुमार पोतदार यांनी सर्व पंचनाम्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

तीन कैद्यांना विषबाधा

0
0
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहामध्ये शिक्षा भोगत असलेल्या तीन कैद्यांना बुधवारी रात्री जेवणातून विषबाधा झाली. कारागृहातील हॉस्पिटलमध्ये रात्री प्राथमिक उपचार केल्यानंतर गुरूवारी सकाळी त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृत‌ी स्थिर असल्याची माहिती हॉस्पिटलमधील सुत्रांनी दिली आहे. अंतर्गत व्यवस्थेतील त्रुटीमुळे विषबाधा होण्याची घटना घडल्याची चर्चा आहे.

शिका गुंतवणुकीची कला

0
0
‘महाराष्ट्र टाइम्स’ आणि ‘सीडीएसएल’च्या वतीने शेअर मार्केट आणि गुंतवणूक विषयक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन रविवारी, १५ जून रोजी सायंकाळी सहा वाजता प्रसाद मंगल कार्यालय, एस. टी. कॉलनीजवळ, प्रसाद सर्कल, गंगापूर रोड, नाशिक येथे करण्यात आले आहे. कार्वी स्टॉक ब्रोकिंग लि. आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज हे या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत.

‘युपीएससी’त नाशिकचा झेंडा

0
0
नाशिकच्या किरण मोहाडीकर, चेतन कळमकर, योगेश भरसट, मनिष मेहता या चार विद्यार्थ्यांनी युपीएससीत झेंडा रोवला आहे. नाशिकमधील चारजणांची निवड प्रशासकीय सेवेत होणे ही नाशिक आणि उत्तर महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाची बाब ठरणार आहे.

प्रशासनात जाण्याची इच्छापूर्ती झाली...

0
0
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या प्रशासकीय सेवा परीक्षेचा अंतिम निकाल गुरूवारी जाहीर झाला. या परीक्षेत चार विद्यार्थ्यांनी नाशिकचा झेंडा रोवला असून, भारतीय प्रशासकीय सेवेत काम करण्याची इच्छापूर्ती झाल्याची प्रतिक्रिया चौघांनीही नोंदविली.

नाशिक सेतू होणार स्मार्ट!

0
0
विविध दाखल्यांचे वितरण करणारा सेतू आता स्मार्ट होणार आहे. स्मार्ट फोनसाठीचे ‘सेतू नाशिक’ हे वेब अॅप्लिकेशन येत्या सोमवारपासून सेवेत येणार आहे. या अॅप द्वारे सेतूशी संबंधित विविध प्रकारची माहिती मोबाईलवर सहजच उपलब्ध होणार आहे.

ठेकेदारावर उपोषणाची वेळ

0
0
केलेल्या कामांचे पैसे महापालिका देत नसल्याने ठेकेदाराने आज, गुरूवारी लाक्षणिक उपोषण केले. उद्यान विभागाकडे सुमारे ३० लाख रुपयांचे बिले थकीत असून, अधिकारी हेतूपुरस्सर बिले देण्याची प्रक्रिया पुढे ढकलत असल्याचा आरोप संबंधीत ठेकेदाराने केला आहे.

रुग्णवाहिकांचे दिवे बदला

0
0
रुग्णवाहिकांवरील दिव्यांच्या रंगसंगतीमध्ये बदल करा, असे आदेश सर्वाच्च न्यायालयाने नुकतेच दिले असल्याने राज्य सरकारनेही यासंदर्भात अधिसूचना काढली आहे. त्यामुळे यापुढे रुग्णवाहिकांवर जांभळ्या काचेमध्ये लुकलुकणारे लाल दिवे बसवावेत, असे आवाहन प्रादे‌शिक परिवहन विभागाने केले आहे.

राजाभाऊ वाजेंचे शक्तीप्रदर्शन

0
0
तुमचा आमचा सर्वांचा पक्ष फक्त राजाभाऊ वाजे असून, राजाभाऊंचा जो निर्णय असेल तो सर्वांना मान्य असेल, असा पवित्रा राजाभाऊ समर्थक कार्यकर्त्यांनी घेतला आहे. देशात आलेल्या परिवर्तनाच्या लाटेप्रमाणे सिन्नर तालुक्यात परिवर्तन घडविण्यासाठी राजाभाऊंनी निर्णय घ्यावा, असे सांगत कार्यकर्त्यांनी अंतिम निर्णय त्यांच्यावरच सोपवला.

केबलचालकांना नो‌टिसा

0
0
राज्य सरकारने काढलेल्या नव्या आदेशामुळे सर्व केबल चालकांचे परवाने रद्द झाले असून, या सर्वांनी नव्याने लायसन घेतानाच गेल्या अडीच महिन्यांपासून थकलेला करमणूक कर त्वरित भरावा, अशी नोटीस जिल्हाधिकाऱ्यांनी केबल चालकांना काढली आहे.

आदिवासींनी रोखला एसटीचा मार्ग

0
0
गडकरी चौकाजवळ आदिवासी बांधवांनी ठिय्या मांडल्याने एसटी महामंडळाच्या नियोजनाचा पुरता फज्जा उडाला. त्र्यंबक नाका ते गडकरी चौक हा मार्ग आदिवासी बांधवांनी व्यापल्याने वाहतूक मार्गात बदल करणे भाग पडले. विशेष म्हणजे याच मार्गावर असणाऱ्या पंपावर एसटी बसेस डिझेल भरू शकल्या नाहीत. त्यासाठी द्वारका येथील पेट्रोल पंप शोधण्याची वेळ एसटीच्या चालकांवर आली.

मराठा आरक्षणासाठी गाड्यांच्या सोडल्या हवा

0
0
मराठा समाजाचे आरक्षण जाहिर व्हावे यासाठी आखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अनोखे आंदोलन करीत पार्थडी फाटा येथे महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या गाड्यांच्या हवा सोडल्या. यावेळी अंबड पोलिसांनी छावा संघटनेच्या दहा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते.

निवडणूक आयोग सचिव नाशकात

0
0
निवडणूक आयोगाचे सचिव अनुज जयपुरिअर शुक्रवारी, २० जून रोजी नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. मतदार याद्यांचे कामकाज पहाण्यासाठी त्यांचा हा नियोजित दौरा असून लवकरच विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागणार असे संकेत मिळू लागले आहेत.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images