Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

शुक्रवारची महासभा वादळी होणार!

$
0
0
महापालिकेची सर्वसाधारण सभा २० जून होणार आहे. महापलिकांच्या मिळकतींचे सर्व्हेक्षण, गाळ्यांबाबत धोरण, क्रीडा धोरण, शहरी आरोग्य केंद्रांच्या करारास मंजुरी, अशा विविध विषयांवर महासभेत खडाजंगी होण्याची शक्यता आहे.

विशालची अन् अंबादासची शेवटचीच धाव...

$
0
0
लहानपणापासूनच शिकायचं, सरकारी नोकरी करायची अन् मोठ व्हायचं अस स्वप्न उराशी बाळगून विशालने मोठ्या जिद्दीने शिक्षण घेतले. गतवर्षी मुंबईला पोलिस भरतीला गेला. पळण्याच्या स्पर्धेत पायाला काच लागली अन् अर्धवट भरती सोडून घरी यावे लागले.

एसटी कर्मचाऱ्यांमध्‍ये खुशीचा माहोल

$
0
0
कामगार करारातील थकबाकीचे वाटप २५ जूनला करण्यात येणार असल्याने राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ना‌शिक जिल्ह्यातील कामगारांमध्ये सध्या खुशीचा माहोल आहे. एसटी महामंडळाच्या जिल्ह्यातील ६ हजार कामगारांना या निर्णयाचा लाभ होणार असून सुमारे दोन कोटींची रक्कम त्यांच्या हातात पडणार आहे.

बनावट कागदपत्रांद्वारे भूखंडाचा अपहार

$
0
0
बनावट कागदपत्रांच्या आधारे भूखंडाचा व्यवहार करण्यात आल्याचा प्रकार जिल्हाधिकारी कार्यालयातील सहकार विभागात घडला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. माणिकचंद पलोड, योगेश चांडक, पुष्कर हिंगणे यांच्यासह आणखी एकाचा आरोपींमध्ये समावेश आहे.

संपत्तीची माहिती द्या; अन्यथा शिस्तभंग!

$
0
0
दरवर्षी ३० जूनच्या आत आपल्या मालमत्ता आणि कर्जाची माहिती देण्याचे आदेश राज्य सरकारने काढले असून, या आदेशामुळे सरकारी अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली आहे. यापूर्वी काढलेल्या आदेशांना अधिकारी जुमानत नसल्याने सरकारला तब्बल चौथ्यांदा अध्यादेश काढावा लागला आहे.

जिल्ह्यातील बाजार समित्या बेमुदत बंद?

$
0
0
माथाडी कामगारांना देण्यात येणाऱ्या तोलाई, वराई यांच्या लेव्हीच्या दरात ४४ टक्क्यांनी वाढ सूचविण्याच्या विरोधात नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापारी, माथाडी कामगार व सर्व १४ कांदा बाजार समितीचे सचिव यांची शनिवारी नाशिक येथे जिल्हा निबंधक बनसोडे यांनी बोलवलेल्या बैठकीत मार्ग न निघाला नाही.

मुंडे यांचा अस्थिकलश विसर्जनासाठी नाशकात

$
0
0
दिवंगत केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपिनाथ मुंडे यांच्या अस्थिकलशाचे नाशकात आगमन झाले असून या कलशाच्या दर्शनासाठी रविवारी भाजप कार्यालयात गर्दी झाली होती. नाशिक शहरातील अस्थिकलशाचे रविवारी सकाळी तर नाशिक ग्रामीणच्या अस्थिकलशाचे सोमवारी सकाळी विसर्जन केले जाणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांची मुक्कामाला पहिल्याच शुक्रवारी दांडी

$
0
0
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दर शुक्रवारी ग्रामीण भागात मुक्कामी रहावे, या मुख्य सचिवांच्या आदेशानंतर पहिल्याच शुक्रवारी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांची दांडी असल्याचे दिसून आले आहे.

अन्यायग्रस्त पुरुषांच्या मदतीसाठी हेल्पलाइन

$
0
0
म‌हिलांकडून होणाऱ्या कौटुंबिक अत्याचारापासून पुरुषांचे संरक्षण करण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्याचा निर्णय पुरूष हक्क समितीने घेतला आहे. अनेक वेळा चूक नसताना नाहक पुरुषाना खोट्यानाट्या प्रकरणात गोवले जाते. यामुळे अनेकांचे करिअर व जीवन बरबाद झाले आहे.

कृ‌षीसाठी अर्थसहाय्य करा

$
0
0
कृषी क्षेत्रात रस नसल्याने सरकारने या क्षेत्रासाठी भरीव तरतूद केलेली नसल्याची टीका आमदार अॅड. उत्तरराव ढिकले यांनी अर्थसंकल्पीय पुरवणी मागण्यांदरम्यान केली. ऊस खरेदी करामध्ये सवलत आणि कापसावरील कर ५ टक्क्यांवरून २ टक्के आणून सरकारने ऊस उत्पादक व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.

अर्ध्या वरती डाव मोडला...

$
0
0
मुंबईला जातो अन् खाकी वर्दी घेऊनच घरी येतो, असे आश्वासक शब्द आपल्या आई, पत्नी, भाऊ, बहिण यांना सांगून अंबादास गेला तो परत आलाच नाही. मुंबईला पोलिस भरती दरम्यानच त्याची प्राणज्योत मालवली. ही कहाणी आहे, मालेगांवपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या द्याने या गावातील.

ज्येष्ठांना मिळेना हक्काची जागा

$
0
0
जुने सिडको परिसरात ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी होत आहे. मात्र, त्यांना स्वत:चा विरंगुळा व्हावा यासाठी हक्काचे स्थळ नाही किंवा नाना नानी पार्कही नाही. २००१ पासून हक्काचे एक विरंगुळा केंद्र व्हावे, नाना नानी पार्क व्हावे, यासाठी हे ज्येष्ठ नागरिक पाठपुरावा करत आहेत. मात्र, त्यांच्या पदरी घोर निराशाच आली आहे.

वेळेचा दबाव अन् निधीचा अभाव

$
0
0
बारा वर्षातून एकदाच नाशिक आणि त्र्यंबकक्षेत्री भरणारा सिंहस्थ कुंभमेळा आता केवळ एका धार्मिक सोहळा राहिलेला नाही. गेल्या चार-पाच दशकात दळणवळणाच्या साधनांमध्ये झालेली आमूलाग्र सुधारणांमुळे कुंभमेळा आता एक आंतरराष्ट्रीय 'इव्हेन्ट' बनला आहे.

भरतीच्या वाटेवर काचाच!

$
0
0
लहानपणापासूनच शिकायचं, सरकारी नोकरी करायची अन् मोठं व्हायचं असे स्वप्न बाळगून विशालने मोठ्या जिद्दीने पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेतले. गेल्या वर्षीही तो मुंबईला पोलिस भरतीसाठी आला. पण पळण्याच्या स्पर्धेत पायाला काच लागली अन् परीक्षा अर्धवट सोडून घर गाठावे लागले. यंदा आपण यशस्वी होणार अशी आशा बाळगून विशाल मुंबईत आला.

अर्ध्यावरती डाव मोडला...

$
0
0
चार महिन्यांपूर्वी घरात लग्नाचे सूर घुमलेले आणि बाळाच्या आगमनाची संपूर्ण घर वाट पाहात होते...पण अर्ध्यावरती डाव मोडला. पोलिस भरतीच्या चौथ्या प्रयत्नासाठी मुंबईत दाखल झालेला मालेगावचा अंबादास सोनवणे याचा धावण्याच्या परीक्षेतच कोसळून मृत्यू झाला आणि विधवा आई, पत्नी, अंध भाऊ आणि लहान बहीण अशा परिवाराचा आधारच हरवला.

वेळेचा दबाव अन् निधीचा अभाव

$
0
0
बारा वर्षातून एकदाच नाशिक आणि त्र्यंबकक्षेत्री भरणारा सिंहस्थ कुंभमेळा आता केवळ एक धार्मिक सोहळा राहिलेला नाही. गेल्या चार-पाच दशकात दळणवळणाच्या साधनांमध्ये झालेल्या आमूलाग्र सुधारणांमुळे कुंभमेळा आता एक आंतरराष्ट्रीय ‘इव्हेन्ट’ बनला आहे.

जोरका झटका..

$
0
0
एखादी परदेशी व्यक्ती पाहिली की तिला मराठी भाषा येत नसणार हे आपण गृहीतच धरलेलं असतं. त्यामुळे मग अनेकदा काही टवाळखोर मुलं अशा फॉरेनर्सना मराठीमध्ये बोलून त्रास देताना दिसतात. असाच एक किस्सा काही दिवसांपूर्वी घडला.

जकात, एलबीटीला तीव्र विरोध

$
0
0
जकात व एलबीटी वसुलीमुळे महाराष्ट्राची पिछेहाट होत आहे. व्यापाऱ्यांना चोर ठरवणारा हा कर त्वरित रद्द करावा, राज्यात जकात व एलबीटी हे कालबाह्य झालेले कर रद्द होवून त्याद्वारे होणारे भ्रष्टाचार व इन्स्पेक्टरराज संपुष्टात यावे, अशी मागणी मालेगाव एलबीटी हटाव संघर्ष समितीने केली आहे.

वृध्दाचा खून : दोघांना अटक

$
0
0
गेल्या महिन्यात आशेवाडी शिवारात हरिसिंग संपत या वृद्धाचा गळा आवळून खून केल्या प्रकरणाचा छडा लावण्यात दिंडोरी पोलिसांना यश आले आहे. केवळ चोरीच्या उद्देशाने खून केलेल्या नाशिकच्या दोन आरोपींना पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले आहे.

मालेगावसाठी आ. हिरेंचे मुख्यमंत्र्यांना साकडे

$
0
0
नवीन जिल्हा निर्मितीसाठी सरकारने सचिवांच्या अध्‍यक्षतेखाली एक समिती स्‍थापन केलेली असून त्यामध्ये मालेगाव जिल्हा निर्मितीसंबधीच्या सगळ्या बाबी तपासून पाहण्यात येतील. शक्य असेल तर मालेगाव जिल्हा निर्मितीचा निर्णय घेण्यास सरकारला कोणतीही अडचण नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नाशिक विभागाचे शिक्षक आमदार अपूर्व हिरे यांना दिली आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images