Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

वाहनकाट्यासंबधी फसवणुकीची तक्रार

$
0
0
वाहनकाटा व पडताळणीचा अधिकृत परवाना नसताना रविशंकरकुमार सिंग हे अवाजवी रक्कम आकारून वाहनकाटाधारक व शासनाची फसवणूक केली जात आहे, अशी तक्रार महाराष्ट्र राज्य वजनमापे परवानाधारक संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष सोपान लोखंडे यांनी संबंधितांकडे केली आहे.

जमीन भूमिहीनांना द्या

$
0
0
राज्य शासनाच्या धोरणानुसार भूमिहिनांना जमीनवाटप करणे हे बंधनकारक असल्यामुळे तालुक्यातील रावळगाव येथील शेती महामंडळाची जमीन भूमिहिनांना द्यावी, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे नेते देवराज गरुड यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जिल्ह्यातही बाजार समित्या आजपासून बंद

$
0
0
लासलगाव बाजार समितीसह जिल्ह्यातील १४ कांदा बाजार समितीचे कांदा लिलावाचे कामकाज आजपासून थंडावणार आहे. कामगारांना लेव्ही दर-वाढ देण्यावरून व्यापारी व कामगार यांच्यात वाद असून व्यापारीवर्ग शासकीय परिपत्रकानुसार लेव्हीच्या दर वाढ देत नसल्याचे कारण कामगारांनी पुढे केले असून राज्य सरकारने नो वर्क नो वेजेस असा पवित्र घेतल्याने जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कामकाजावर प्रभाव दिसणार आहे.

महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

$
0
0
येवला तालुक्यातील शिरसगाव लौकी येथील निकिता दिलीप जाधव (वय २०) या महिलेने शनिवारी आपल्या माहेरच्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. सकाळी अकरा वाजेच्या सुमारास ही घटना घटल्याची माहिती तालुका पोलिस सूत्रांनी दिली.

पाइपलाईनला सुरक्षेसाठी स्लॅबचे कवच

$
0
0
​अंबड औद्योगिक वसाहतीसाठी पिण्याच्या पाण्याची पाइपलाईन सातपूर भागातून जाते. सुरक्षेचा विचार करून एमआयडीसीकडून या पाइपलाइनवर स्लॅब टाकण्याचे काम सुरू झाले आहे. एमआयडीसीचे उपअभियंता जयवंत बोरसे यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.

मोबाईल टॉवर हटवाच!

$
0
0
आरोग्याला धोका निर्माण होण्याच्या धास्तीपोटी जेलरोडच्या चंपानगरी येथील रहिवाशांनी परिसरात असलेला मोबाईल टॉवर काढावा त्वरित हटविण्याची मागणी महापालिकेच्या नगररचना विभागाकडे केली आहे. समर्थ निवास या इमारतीवर खासगी कंपनीचा मोबाईल टॉवर उभा केला जात आहे.

इमारतीला नावे नद्यांची, पण दारोदारी पाणीटंचाई

$
0
0
पाथर्डी फाटा येथील प्रशांतनगर परिसरातील रहिवाशांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. गंगा, गोदावरी, यमुना, नर्मदा अशी नद्यांची नावे असलेल्या इमारतींमधीलच रहिवाशांची तृष्णा भागणार कधी? अनेक दिवसांपासून पाणीप्रश्न सुटत नसल्याने महिला वर्ग त्रस्त झाला आहे.

चार्वाक चौक रस्ता दिवाळीपर्यंत लांबणार?

$
0
0
चार्वाक चौक ते इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक या रस्त्याचे काम संथगतीने सुरू आहे. पावसाळा सुरू झाल्याने डांबरीकरणाचे काम दिवाळीतच पूर्ण होण्याची शक्यता असून, ठेकेदाराचे पैसे मिळत नसल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचे सांगितले जात आहे.

शहर विकासासाठी नव्या पर्यायांची गरज

$
0
0
मनमाड शहर विकासासाठी परिवर्तनाची लाट येणे आणि प्रत्येक वार्ड, प्रभागातून चारित्र्यसंपन्न तसेच जनतेच्या हिताशी बांधिलकी असणारे उमेदवार निवडून देणे काळीची गरज आहे. नवीन पर्याय शोधण्यासाठी मनमाडकरांनी उत्स्फूर्त साथ द्यावी, असे आवाहन मनमाड बचाव कृती समितीच्या जाहीर सभेत करण्यात आले.

समाजकंटकांवर कारवाई करा

$
0
0
सोशल मीडियाद्वारे देव देवता तसेच राष्ट्रपुरुषांची विटंबना होत आहे. दोन धर्मात तेढ व जाती जातीत संघर्ष निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत. अशा प्रवृत्तींना आळा घालून दोषींवर कठोर कारवाई करावी.

TI सायकलविरोधात सिटूचा तहसीलवर मोर्चा

$
0
0
सिन्नर तालुक्यातील माळेगाव औद्योगिक वसाहतीतील टी आय सायकल या कारखान्यातील कामगारांनी न्याय मागण्यासाठी कंपनीच्या गेटवर सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सिटूच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

आयात उमेदवाराला शिवसैनिकांचा विरोध

$
0
0
लोकसभा निवडणुकीनंतर इगतपुरी तालुक्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम जोराने वाजू लागले आहेत. प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेत इच्छुकांची भाऊगर्दी झाल्याचे दिसून येत असल्याने स्थानिक शिवसैनिकांसह युवा सेना, विद्यार्थी सेना कार्यकर्ते सुयोग्य उमेदवारासाठी अधिक सक्रिय झाले आहेत.

गोदाघाट हिरवाईने फुलला

$
0
0
कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांनी पर्यावरणही राखण्याचा संकल्प करीत गोदाघाट परिसरात रविवारी वृक्षारोपण केले. पंचवटी पोलिसांसह शहरातील विविध संघटनांनी या उपक्रमासाठी सहाय्य केले.

‘त्यांना’ प्रतीक्षा कायम होण्याची

$
0
0
नाशिक जिल्ह्यातील महाराष्ट्र बँकेच्या विविध शाखांमध्ये गेल्या दहा वर्षापासून सफाई कर्मचारी अद्यापही कायम होण्याच्या प्रतीक्षेत असून, याबाबत महाबॅँक व्यवस्थापनाने तातडीने निर्णय न घेतल्यास महाबॅँक नवनिर्माण सेना आंदोलन छेडणार असल्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष उमाकांत कोटणीस यांनी दिला.

`अनफिट` वाहने RTO च्या रडारवर

$
0
0
प्रादेशिक परिवहन विभागाने फिटनेस नसेलेली वाहने पुन्हा रडारवर घेतली आहेत. फिटनेसबाबत दुर्लक्ष झालेल्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी आरटीओने मोहीम उघडली आहे. त्यासाठी तीन विशेष पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.

नैताळे रस्त्यावर अपघातात १ ठार

$
0
0
बोलेरो जीप आणि मारुती कार यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत होऊन एक जण ठार झाला, तर दोघे जण जखमी झाले. जखमींवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. निफाड तालुक्यातील नैताळे रस्त्यावर हा अपघात झाला.

वास्तुशांतीसाठी आलेल्या पाहुण्याचा मृत्यू

$
0
0
मोटरसायकल घसरून जखमी झालेल्या तरुणाचा आडगाव येथे मृत्यू झाला. येथील कोणार्कनगरमध्ये रविवारी दुपारी चारच्या सुमारास हा अपघात झाला. दत्तात्रय नामदेव नलगे (३६, रा. आडगाव टप्पा, ता. चांदवड) असे मयत मोटरसायकलस्वाराचे नाव आहे.

निवडणूक खर्चाचा आज ताळमेळ

$
0
0
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी करणाऱ्यांना निवडणूक खर्च सादर करण्यासाठी सोमवार (१६ जून) हा शेवटचा दिवस आहे. यासाठी निवडणूक खर्च निरीक्षक नाशकात दाखल झाले असून, खर्च सादर न करणाऱ्यांविरोधात निवडणूक आयोगाकडून कारवाई केली जाणार आहे.

गोपीनाथ मुंडेंच्या अस्थिंचे विसर्जन

$
0
0
भाजपचे दिवंगत नेते गोपिनाथ मुंडे यांच्या अस्थिंचे रविवारी दुपारच्या सुमारास भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. तत्पूर्वी या कलशाची मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी सर्व राजकीय पक्षातील अनेक नेते आणि मान्यवर उपस्थित होते.

मतदान नोंदणीचा पुन्हा उडतोय फज्जा

$
0
0
मतदार पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रांवर विधानसभा निवडणुकीसाठीची प्रारूप मतदार यादीच उपलब्ध नसल्याची बाब निदर्शनास येत आहे. बूथ लेव्हल ऑफिसर्स (बीएलओ) यांनी मारलेल्या दांडीमुळे केंद्रात ही यादी नसल्याने अनेक नागरिकांना रिकाम्या हाती परतावे लागले असून, याचा मोठा फटका मतदार नोंदणी अभियानाला बसण्याची शक्यता आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images