Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

नुकसानीचे पंचनामे करताना खाडाखोड

0
0
बागलाण तालुक्यात फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे कोट्यवधीचे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करताना कृषी सहाय्यक आणि ग्रामस्थांनी चक्क खाडाखेाड करून सुमारे सातशेवर पीडित शेतकऱ्यांना वंचित ठेवल्याचा खळबळजनक प्रकार नुकताच उघडकीस आला.

पावसाने उडवली त्रेधातिरपीट

0
0
पहिल्याच पावसात गुरुवारी शहरातील रस्ते जलमय झाले होते. तसेच गंगापूररोड, सातपूर, अंबड व सिडको परिसरात पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्याने वाहतूक कोंडी झाली होती.

भूमिहीनांना मिळणार ‘सातबारा’

0
0
तालुक्यातील महालखेडा पाटोदा व महालखेडा चांदवड या दोन गावांमधील गायरान जमिनीत अतिक्रमण करून ती कसणाऱ्या भूमिहीनांच्या जमिनीची तहसीलदार शरद मंडलिक यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.

गोदापार्क वर्षात राज यांची माहिती

0
0
गोदापार्कच्या कामाचा पहि;ला टप्पा आगामी वर्षभरात पूर्ण होईल, असाही विदश्वास मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केला. या प्रकल्पासाठी अनेक परवानग्या घ्याव्या लागल्याने गोदापार्कचे काम लांबल्याचेही त्यांनी सांगितले.

`हाय कोर्टातील वृक्ष याचिका मागे घ्या`

0
0
गंगापूर रोड येथील रस्त्याचे रुंदीकरण रखडल्याच्या प्रकरणावरून मुंबई हायकोर्टातील जनहित याचिकाच मागे घ्या, अशी आर्जव मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वृक्षप्रेमींकडे केली आहे. मात्र, ही याचिका मागे घेण्याचा प्रश्नच नसल्याचे वृक्षप्रेमींनी सांगितले आहे.

बायपासने केला तोट्याला `पास`!

0
0
नाशिक आणि धुळे आगाराने संयुक्तरित्या सुरू केलेली ‘धुळे-नाशिक बायपास विनावाहक बस’ दोनही आगारांसाठी सोन्याचे अंडी देणारी कोंबडी ठरत आहे. विनावाहक असल्यामुळे कमी मनुष्यबळात सुरू असलेल्या या बसपासून जानेवारी ते मे पर्यंत नाशिक आगाराला जवळपास एक कोटी २८ लाख तर धुळे आगाराला तब्बल ३ कोटी १६ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.

गमावलेली संधी पुन्हा गवसली

0
0
पोलिसांनी ठरवून दिलेल्या दिवशी भरती प्रक्रियेसाठी हजर न राहू शकलेल्या उमेदवारांना गुरूवारी भरती प्रक्रियेला सामोरे जाण्याची संधी देण्यात आली. अशा ६० उमेदवारांची भरती प्रक्रिया पार पडली आहे. गमावलेली संधी पुन्हा प्राप्त झाल्याने या उमेदवारांच्या चेहऱ्यावर आंनदाची लकेर उमटली.

महिलेचा संशयास्पद मृत्यू

0
0
दुसऱ्या लग्नाबाबत पतीला जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याने पोलिसांची घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे. हनुमानवाडीत घडलेल्या या घटनेप्रकरणी पंचवटी पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे. व्हिसेरा राखून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

मनसेच्या ब्लू प्रिंलटमध्ये ट्रामही

0
0
नाशिकमधील सार्वजनिमक वाहतूक सेवा अधिीक बळकट करण्यासाठी आता मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्राम बस सेवेचा पर्यायही सुचविणला आहे. अनौपचारिक गप्पांमध्ये शहराविठषयी बोलताना त्यांनी वाहतुकीच्या समस्या सोडविाण्यावर भर दिाला.

मालेगाव जिल्ह्यासाठी हालचाली

0
0
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मालेगाव जिल्हा निर्मितीच्या दृष्टीने पुन्हा हालचालींना वेग आला आहे. मालेगाव जिल्ह्यांसाठी प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश मिळाल्यानंतर यासंदर्भात प्रशासकीय स्वरुपाची माहिती गोळा करण्याचे काम सुरु झाले असून, जिल्हाधिकारी यासंबंधीचा अहवाल राज्य सरकारला शुक्रवारी सादर करणार आहेत.

सटाण्यात कांद्याला १९२० रुपये भाव

0
0
देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकाने पुन्हा निर्यातमूल्य लागू केले आहे. असे असूनही शुक्रवारी कांद्याने उसळी घेतली. सटाण्यात कांद्याला प्रतिक्विंटल १९२० रुपये सर्वाधिक भाव मिळाला.

पेपरात फोटो... ‘लवकर घरी ये...’

0
0
‘मला दहावीला ३६ टक्के मार्क्स होते. गणितात तर तीन मार्क्स मिळाल्याबद्दल माझा वानखेडेवर सत्कार होता... पण वेळ न मिळाल्यामुळे मी गेलो नाही... नंतर माझा फोटो पेपरमध्ये आल्याबद्दल सर्वांनी माझे अभिनंदन केले...फोटोखाली लिहिले होते...लवकर घरी ये...तुझ्यावर कोणीही रागावणार नाही...’

सरसावली तरुणाई

0
0
सोशल नेटवर्कींग साईट्सवर उत आलेल्या पोरकटपणाला आवर कोणी घालायचा असाच प्रश्न आज निर्माण झाला आहे. तरुणाईचा अधिक सहभाग असलेल्या या सोशल नेटवर्कींग साईट्सवर पोस्ट केल्या जाणाऱ्या बदनामीकारक तसेच अक्षेपार्ह मजकुराचे प्रमाण वाढत आहे.

सिन्नरला अपघातात दोन ठार, पाच जखमी

0
0
नाशिक-पुणे महामार्गावर शहरातील हॉटेल प्रियासमोर व सिन्नर-शिर्डी महामार्गावर देवपूर फाट्यानजीक झालेल्या अपघाताच्या घटनांमध्ये दोन युवक जागीच ठार झाले असून, पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

सफाई कामगारांची मानधनावर नियुक्ती

0
0
सफाई कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, या मागणीसाठी सभापतीपदाच्या खुर्चीवर न बसणाऱ्या ​उत्तम दोंदे यांनी महासभा सुरू होताच, महापौरांच्या दालनाकडे धाव घेत घोषणाबाजी केली. इतर सदस्यांनी देखील त्यास प्रतिसाद दिला. चर्चेअंती सफाई कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया सुरू करावी आणि तोपर्यंत मानधनावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, असे आदेश महापौर अॅड. यतीन वाघ यांनी प्रशासनाला दिले.

चंचल मेहरोलीयाचे निधन

0
0
नाशिक महापालिकेचे माजी नगरसेवक प्रताप मेहरेलिया यांची द्वितीय कन्या आणि नाशिकरोड प्रभाग समितीच्या विद्यमान सभापती कोमल मेहरोलीया यांची बहीण चंचल मेहरोलीया (वय १४) हिचे शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास निधन झाले.

महासभेमध्ये भ्रष्टाचार चव्हाट्यावर

0
0
शिक्षकांच्या अनियमत बदल्या, अधिकाऱ्यांची अरेरावी आणि भ्रष्टाचार अशा बाबींमुळे शिक्षण मंडळातील अनागोंधी कारभार चव्हाट्यावर आला आहे. याचे पडसाद शुक्रवारी (दि. २०) झालेल्या महासभेत उमटले. विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनी परसेवेतील अधिकाऱ्यांना परत पाठविण्याची मागणी केल्याने महापौरांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

मोटरसायकल अपघातात तरुणाचा मृत्यू

0
0
सातपूर महापालिका कार्यालयासमोर मोटरसायकल घसरून गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गुरुवारी रात्री पावणे आठच्या सुमारास हा अपघात झाला. मुकीम मल्नू खान (३६, रा. स्वारबाबानगर, सातपूर) असे त्या मोटरसायकलस्वाराचे नाव आहे. घराकडे जात असताना त्याची मोटरसायकल महापालिकेच्या कार्यालयासमोर घसरली.

ज्यादा प्रवाशी खासगी बसेसला पडणार महागात

0
0
खासगी बसेसमध्ये परवानगीशिवाय आसन क्षमतेत वाढ करणाऱ्यांवर तसेच अशा वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बस‌विणे कायदशीर गुन्हा आहे. अशा वाहनधारकांवर मोटर वाहन अधिनियमाद्वारे कारवाई करण्याचा इशारा ना‌शिक प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिला आहे. येत्या एक ऑगस्टपासून अशा खासगी प्रवासी बसेस तपासणीची मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

आयटी उद्योग वाढीसाठी नाशिकमध्ये वाव

0
0
आयटी उद्योगवाढीसाठी नाशिक जिल्ह्यात मोठा वाव असल्याचे मत नॅसकॉमचे क्षेत्रीय व्यवस्थापक परेश देवरगांवकर यांनी व्यक्त केले. नाशिक इंजिनीअरिंग क्लस्टरमध्ये आयोजित आयटी एक्स्पोच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images