Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

मराठा आरक्षणासाठी रेलरोको

$
0
0
मराठा समाजाची अर्थिक परिस्थिती खालावली असून ९९ टक्के समाजाला अन्नपाण्यासाठी धडपड करावी लागत आहे. या समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर छत्रपती फाऊंडेशनच्या वतीने गणेश कदम यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी रेलरोको आंदोलन करण्यात आले.

महासभेत ‘क’ची बाराखडी

$
0
0
पती-पत्नी समायोजनेतंर्गत करण्यात आलेल्या शिक्षकांच्या बदल्या, मराठा शिक्षण प्रसारक मंडळाकडून प्रशासन अधिकाऱ्यांविरोधात आलेली तक्रार आणि हजर नसताना अधिकाऱ्यांनी महापालिकेकडून वसूल केलेले अतिरिक्त वेतन, अशा तीन प्रमुख कारणांवरून सहायक आयुक्त वसुधा कुर्णावळ, चेतना केरूरे आणि शिक्षण मंडळाच्या प्रशासनाधिकारी किरण कुँवर यांच्या चौकशीचे आदेश महापौरांनी शुक्रवारी दिले.

नाशिककरांकडून दरवाढीचा निषेध

$
0
0
नाशिकच्या प्रवाशांनाही चांगलीच झळ बसणार असून, सध्या असलेले मुंबईचे भाडे ८८ रुपयांवरुन अंदाजे १०० रुपये होणार आहे. एसटीचे भाडे परवडत नसल्याने अनेक नाशिककर पुण्याला जाण्यासाठी रेल्वेच्या पर्यायाचा वापर करतात. या मार्गावरचे भाडेही १२५ रुपयांच्या आसपास होणार आहे. रेल्वे संघटनांचे पदाधिकारी व सामान्य प्रवाशांनी या भाववाढीचा निषेध केला आहे.

पासपोर्टचे उत्पादन सहा महिन्यांपासून ठप्प

$
0
0
नाशिकरोड प्रेसला हाय अल्ट्रा व्हायलेट (एचयूव्ही) फिल्मचा पुरवठा खंडीत झाल्याने गेल्या सहा महिन्यांपासून पासपोर्टचे उत्पादन ठप्प झाले आहे. पासपोर्ट कार्यालयाने वेळोवेळी मागणी नोंदवूनही पासपोर्ट मिळत नसल्याने नागरिकांना पासपोर्टसाठी उत्पादन होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागण्याची चिन्हे आहेत.

फाळके स्मारकातील कर्मचारी हतबल

$
0
0
पांडवलेणी येथील दादासाहेब फाळके स्मारक आणि बुद्ध विहार याठिकाणी देखभाल आणि दुरुस्तीची कामे करणाऱ्या कामगारांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने त्यांनी बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. उपोषणाला २६ दिवस उलटले पण कुणीही दखल घेत नसल्याने कर्मचारी हतबल झाले आहेत.

वेगवेगळ्या अपघातात दोन ठार

$
0
0
नाशिक-पुणे महामार्गावर शहरातील हॉटेल प्रियासमोर व सिन्नर-शिर्डी महामार्गावर देवपूर फाट्यानजीक झालेल्या अपघाताच्या घटनांमध्ये दोन युवक जागीच ठार झाले असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

पंढरपूरसाठी एसटी वारकऱ्यांच्या दारी

$
0
0
आषाढी एकादशी समीप येऊ लागल्याने तमाम वारकऱ्यांना सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची आस लागली आहे. हीच आस मनी घेऊन गावोगावीच्या वैष्णवांना पंढरपूर येथे जाता यावे, यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळही सेवा देण्यासाठी सरसावले आहे. ग्रामस्थांची मागणी असेल तर थेट त्यांच्या गावातून पंढरपूरपर्यंत एसटीची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

स्थापत्यशैलीतुन साधणार फोटो वॉक

$
0
0
निळ्याभोर आकाशाची नवलाई संपण्याच्या मार्गावर असतानाच काळ्याशार नभांची अलोट गर्दी स्वच्छंद आभाळ व्यापून टाकते अन् मृगाचा झरझरणारा पाऊस तजेलदार नवचैतन्याचा उन्मेष घेऊन उभा ठाकतो. वसुंधरेसह साऱ्या आसमंताच्या चराचरात आनंदाच्या उन्माद या पाऊस मश्गुल होतो.

ऋतुरंग भवनात आज एकपात्री नटसम्राट

$
0
0
वि. वा. शिरवाडकर यांच्या सिद्ध हस्त लेखणीतून साकारलेल्या नटसम्राट नाटकाच्या अजरामर संहितेला ६० मिनिटांच्या कालावधीत एकपात्री अभिनयाद्वारे सादर करण्याचा प्रयत्न डॉ. राजेश आहेर यांनी केला आहे. आज (दि. २१) ऋतुरंग भवन, नाशिक रोड येथे सायंकाळी ६.३० वाजता हा अभिनव प्रयोग सादर होणार आहे.

मालेगावमध्ये समावेशास चांदवड, कळवणचा विरोध

$
0
0
प्रस्तावित मालेगाव जिल्ह्यात समाविष्ट होण्यास चांदवड व कळवण तालुक्यातून विरोध होत आहे. कळवणला आदिवासी जिल्हा निर्माण करण्याची तर चांदवडकरांची नाशिक जिल्ह्यातच राहण्याची मागणी आहे.

क्रीडा प्रबोधिनीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

$
0
0
ग्रामीण भागातील खेळाडू शोधून त्यांना महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा प्रबोधिनीतर्फे तंत्रशुध्द प्रशिक्षण देण्यात येते. या क्रीडा प्रबोधिनीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून ८ ते १४ वर्षे वयोगटातील मुला व मुलींना प्रवेश दिले जात आहेत.

जातपंचायतीची दाहकता लघुपटातून

$
0
0
जातपंचायतीच्या विरोधात अंधश्रध्दा निर्मूलन समितीने उभारलेल्या लढ्याची माहिती आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचली आहे. या लढ्याची दखल एका आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मात्याने घेतली असून याच विषयावर लघुपट बनविणारे त्यांचे पथक गुरुवारी नाशकात येऊन गेले. या लघुपटात सहा देशांमधील अशा घटनांची हकीकत मांडली जाणार असून नाशकातील कुंभारकर कुटुंबाची व्यथाही चित्रीत करण्यात आली आहे.

आमदार हिरे सोडविणार शिक्षकांच्या अडीअचणी

$
0
0
शिक्षण क्षेत्रातील विविध समस्या, अडीअडचणी संदर्भात व शिक्षकांच्या वैयक्तीक, शैक्षणिक मागण्यांसंदर्भात आमदार डॉ. अपूर्व हिरे हे नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्हा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते शिक्षकांशी संवाद साधणार आहेत. ही मा‌हिती महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष प्रा. श्याम पाटील यांनी दिली आहे.

अकरावी प्रवेशप्रक्रियेला २६ जूनपासून सुरुवात

$
0
0
दहावीचे निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांना आता महाविद्यालयीन प्रवेशाचे वेध लागले आहेत. अकरावी प्रवेशासाठीची प्रवेशप्रक्रिया २६ जूनपासून राबविली जाणार आहे. त्याचे वेळापत्रकही जाहीर झाले आहे.

समृद्धनगरचा रस्ता बनला `घात रस्ता`

$
0
0
त्र्यंबकरोडवरील समृद्धनगरमध्ये मुख्य रस्त्यावर असलेला कॉर्नर अपघाताचे केंद्र बनले आहे. तेथील खाजगी विहीर रस्त्याला लागून असल्याने नागमोडी वळण तयार झाले आहे. नेमके याच वळणात अपघात घडत असतात. अमृतागार्डन हॉटेल ते महिंद्र मेटिरियल गेटदरम्यानच्या रस्त्यावर आजवर अनेकांचा बळी गेला आहे. या भागातील अतिक्रमणे हटवून रस्ता मोकळा करण्याची मागणी रहिवाशी व वाहनचालकांनी केली आहे.

भारनियमनाविरोधात मनमाडला कडकडीत बंद

$
0
0
मनमाड शहरात सुरू असलेल्या सक्तीच्या भारनियमनाविरोधात शुक्रवारी शहरातील व्यापारीवर्गाने एकजुटीचे दर्शन घडवत मनमाड बंद व धरणे आंदोलन केले. शहरातून कँडल मार्च काढून भारनियमन कायमस्वरूपी बंद झालेच पाहिजे, अशी मागणी व्यापारीवर्गाने केली.

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांची बँकेकडून अवहेलना

$
0
0
मार्च महिन्यात तालुक्यात गारपिटीने अतोनात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून मिळणाऱ्या मदतीसाठी जिल्हा बँकेच्या स्थानिक शाखांमध्ये अवहेलनेला सामोरे जावे लागत आहे.

दाभोलकरांचे मारेकरी शोधा

$
0
0
अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष नरेद्र दाभोलकरांच्या मारेकऱ्यांचा त्वरित शोध लावावा, अन्यथा संपूर्ण राज्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीने दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोलकरांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यात निर्घूण हत्या करण्यात आली. दहा महिने पूर्ण होऊनही खून करणारे व सूत्रधारांचा शोध लागलेला नाही.

कांद्याला १९२० रुपये भाव

$
0
0
देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकाने पुन्हा निर्यातमूल्य लागू केले आहे. असे असूनही शुक्रवारी कांद्याने उसळी घेतली. सटाण्यात कांद्याला प्रतिक्विंटल १९२० रुपये सर्वाधिक भाव मिळाला.

येवल्यावर पाणीटंचाईचे सावट

$
0
0
येवला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नगरपालिकेच्या नवीन साठवण तलावातील पाणीसाठा संपत आला आहे. येत्या ३० जूनपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा या साठवण तलावात शिल्लक आहे. यामुळे सध्या चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जाता आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images