Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

नाशिकमध्ये मतदार नोंदणी मोहीम

$
0
0
लोकसभा निवडणुकीवेळी अनेकांची नावे मतदार यादीतून गायब झाल्याने गोंधळ उडाला. विधानसभा निवडणुकीवेळी असा प्रकार घडू नये, यासाठी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात मतदार नावनोंदणी मोहीम आयोजित केली आहे. २१ व २२ जून तसेच २८ व २९ जूनला ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

धार्मिक विटंबनेमुळे धुळ्यात तणाव

$
0
0
फेसबुकवर विदेशातील प्रार्थना स्थळाबाबत अक्षेपार्य छायाचित्र टाकल्याने धुळ्यातील देवपूर परिसरात गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास तणाव निर्माण झाला. एकत्र आलेल्या संतप्त जमावाने जवळच्या घरांवर दगडफेक करून रस्त्यावरून जाणाऱ्या बसेसच्या काचाही फोडल्या.

क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी खासगी बसेसला पडणार महागात

$
0
0
खासगी बसेसमध्ये परवानगीशिवाय आसन क्षमतेत वाढ करणाऱ्यांवर तसेच अशा वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बस‌विणे कायदशीर गुन्हा आहे. अशा वाहनधारकांवर मोटर वाहन अधिनियमाद्वारे कारवाई करण्याचा इशारा ना‌शिक प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिला आहे. येत्या एक ऑगस्टपासून अशा खासगी प्रवासी बसेस तपासणीची मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

प्रियंकाचे यश देशासाठी भूषणावह

$
0
0
देशात माहिती आणि तंत्रज्ञानाचा उपयोग लोकसभा निवडणुकीत दिसून आला. मतदारसंघातील १७५० बुथवरील पाच-पाच मिनिटाला मतदानाची माहिती मिळत होती. हे फक्त माहिती तंत्रज्ञानाच्या अद्ययावत पणामुळे शक्य झाले. त्याच क्षेत्रात प्रियंका डमाळे या ग्रामीण भागातील विद्यार्थीनीने ६४ देशात प्रथम क्रमांक मिळविला. ही तालुका व देशासाठी भूषणावह बाब आहे, असे गौरवोद्गार खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी काढले.

कोंडी किती दिवस सहन करायची?

$
0
0
कोर्टामध्ये कामानिमित्त येणाऱ्या पक्षकार व अन्य नागरिकांची वाहने पास नसल्यास प्रवेशद्वाराबाहेरच अडविली जातात. यामुळे सीबीएसचा निम्मा रस्ता वाहनतळ म्हणून वापरला जातो अन् दिवसभर खेळ रंगतो तो वाहतूक कोंडीचा. यातच या रस्त्यावर एखादे वाहन अचानक बंद पडल्यास या खेळात वाहतूक पोलिसही सहभागी होतात.

सिडको, सातपूरमधील ६० घरे धाेकादायक

$
0
0
पावसाळ्यात दक्षता म्हणून महापालिकेच्या सिडको व सातपूर विभागाने धोकेदायक घरांनी तसेच नदीपात्रालगतच्या घरांना नोटिसा बजावल्या आहेत. दोन्ही विभागातील एकूण ६० घरे व नदीपात्रालगतच्या ४१७ घरांनाही नोटिसा देण्यात आल्या आहेत.

महापौर परिषदेत एलबीटीवर चर्चा

$
0
0
एलबीटी अर्थात लोकल बॉडी टॅक्स की जकात अशा संभ्रमात अडकलेल्या महापालिका कमी उत्पन्नामुळे हैराण झाल्या आहेत. त्यातच राज्य सरकार पुढील निर्णय घेण्यास टाळाटाळ करीत असल्याने महापालिकांचा आर्थिक डौलरा कोलमडण्याची चिन्हे दिसून येत आहे. राज्यातील सर्वच महापालिकांमध्ये उद्भवलेल्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र महापौर परिषदेने तातडीच्या बैठकीचे आयोजन केले आहे. ही बैठक २३ जून रोजी अंधेरी पश्चिम येथे होणार आहे.

सिंहस्थ कामे तातडीने करा

$
0
0
पावसाळा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता अशी कुठलीही सबब न सांगता तातडीने आपल्या विभागातील सिंहस्थ कामांना प्रारंभ करा, असे निर्देश विभागीय महसूल आयुक्त एकनाथ डवले यांनी सर्व विभागांच्या प्रमुखांना दिले.

स्थायी सभापतीपदाच्या निवडणुकीला मुहूर्त

$
0
0
फेब्रुवारी महिन्यापासून प्रलंबित असलेल्या स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीला अखेर मुहूर्त सापडला आहे. ही निवडणूक ३० जून रोजी सकाळी ११ वाजता पार पडणार असून निवडणुकीच्या निमित्ताने मनसे, शिवसेना आणि भाजपात रस्सीखेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

आजचा रविवार परीक्षांचा

$
0
0
तलाठी, वाहनचालक आणि विविध पदांसाठी होणारी स्टाफ सिलेक्शनची लेखी परीक्षा रविवारी (२२ जून) होत आहे. जिल्ह्यातील तब्बल साडेचौदा हजार परीक्षार्थी त्यास पात्र ठरले असून प्रशासनाने त्याची ठोस तयारी केली आहे.

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कमाफी

$
0
0
दुष्काळी भागात पिकांची आणेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी असल्याचे आढळल्याने यंदाही दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कमाफी जाहीर करण्यात आली आहे. उच्च व तंत्र श‌िक्षण व‌िभागाच्या या न‌िर्णयाचा फायदा राज्यभरातील सुमारे दहा हजार आण‌ि नाश‌िक ज‌िल्ह्यातील २६३ गावांना होणार आहे.

पोलिस भरतीसाठी आज लेखी परीक्षा

$
0
0
ग्रामीण पोलिस दलातील भरतीसाठी आडगाव येथील ग्रामीण पोलिस मुख्यालयात पात्र उमेदवारांची आज लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. २४४ पदांसाठी घेण्यात येणाऱ्या या परीक्षेला २ हजार ४२७ उमेदवार सामोरे जाणार आहेत. शहर पोलिस दलामध्ये सुरू असलेल्या भरती प्रक्रियेत पहिल्या दिवशीच्या पात्र ४१६ उमेदवारांपैकी ३२३ उमेदवार १०० मीटर धावण्याच्या चाचणीला पुन्हा सामोरे गेले.

नाशिक- महापालिकेचे वेतनाचे वांदे

$
0
0
एलबीटी (लोकल बॉडी टॅक्स) रद्द होणार अशा प्रतीक्षेत असलेल्या व्यापारी उद्योजकांनी जून महिन्यात एलबीटी कर भरण्यास चालढकल केली. २० जूनपर्यंत अवघा २८ कोटी रुपयांचा महसूल महापालिकेकडे जमा झाला आहे. पैसे जमा होण्याचे प्रमाण इतके अल्प आहे की, कर्मचाऱ्यांचे वेतन होणार की नाही, असा प्रश्न यामुळे उपस्थित केला जात आहे.

... तर ठेकेदाराचे पेमेंट रोखणार

$
0
0
पांडवलेणी येथील दादासाहेब फाळके स्मारक आणि बुद्ध विहार या ठिकाणी देखभाल आणि दुरुस्तीची कामे करणाऱ्या कामगारांशी चर्चा करून त्यावर तोडगा काढावा. तसेच, नियमाप्रमाणे वेतन अदा करावे, अन्यथा ठेकेदाराचे पेमेंट रोखण्यात येईल, असा इशारा महापौर अॅड. यतीन वाघ यांनी दिला आहे.

मतदार नोंदणीला संमिश्र प्रतिसाद

$
0
0
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी तयार करण्यासाठी पहिल्या मतदार नोंदणी अभियानाला शनिवारपासून प्रारंभ झाला. काही ठिकाणी या मोहिमेला उत्स्फुर्त तर काही ठिकाणी अल्प प्रतिसाद लाभला. आज, रविवारीही मतदार नोंदणीची संधी मिळणार आहे.

आता चांदवड, धुळ्यात टोलवाढ

$
0
0
पिंपळगाव बसवंत येथील टोलचे दर तिप्पट झाल्यानंतर आता चांदवड आणि धुळे येथील टोलचे दरही वाढणार आहेत. येत्या १ जुलैपासून टोलची दरवाढ करण्याचे इरकॉन सोमा टोलवे कंपनीने घोषित केले असून यामुळे रेणुकादेवीच्या दर्शनासाठी चांदवडला जाणाऱ्या नाशिककरांना तब्बल २६५ रुपयांचा टोल भरावा लागणार आहे.

दाखल्यांसाठी सेतू केंद्रे गजबजली

$
0
0
दहावी व बारावीचे निकाल ऑनलाईन घोषित झाले आहेत. निकालानंतर पालक आणि विद्यार्थ्यांची मिशन अॅडमिशनसाठी धावपळ सुरू आहे. पुढील शैक्षणिक वर्षात आवश्यक दाखल्यांची जमवाजमव करण्यासाठी शहरातील सेतू सुविधा केंद्रावर विद्यार्थी-पालकांची एकच गर्दी होऊ लागली आहे. शहरात प्रांत कार्यालयात गर्दी होत आहे तर, ग्रामीण भागात सुरू केलेल्या महा-ई-सेवा सेतू केंद्रांवरदेखील अशीच गर्दी पहायला मिळत आहे.

पिंपळगावातही ‘कॅम्पा कोला’

$
0
0
पिंपळगाव बसवंतमध्ये बांधण्यात आलेली विविध प्रकारच्या बांधकामे ही बेकायदा असल्याचे खुद्द बिल्डरांनीच मान्य केले आहे. त्यामुळेच नियमाप्रमाणे काही दंड किंवा अकृषिक सारा भरायचा असल्यास तो भरण्यास आम्ही तयार आहोत. पण, ही बांधकामे नियमित करण्याची आर्जव बिल्डरांनी मंडल अधिकाऱ्याकडे केली आहे.

केटीवेअर बांधण्यास ग्रीन सिग्नल

$
0
0
इगतपुरी तालुक्यातील पूर्ण झालेल्या धरणांच्या धरणग्रस्तांच्या थकीत पेमेंटबाबत पाठपुरावा सुरू आहे. तसेच, सुरू असलेल्या धरणांच्या कामाबाबतचा आढावा घेत धरणांच्या कामाबरोबरच धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या कामांनाही गती द्या, असे आदेश महसूल आयुक्त एकनाथ डवले यांनी आढावा बैठकीत दिले.

वादग्रस्त गाळ्यांचा अखेर लिलाव

$
0
0
गेल्या अनेक महिन्यांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या सटाणा बाजार समितीच्या नामपूर उपबाजार समितीत बावीस व्यापारी गाळ्यांचा अखेर शनिवारी जाहीर लिलाव करण्यात आला. भाडेपट्टीवर देण्यात येणाऱ्या या गाळ्यांची प्रथमच जाहीर लिलाव प्रक्रिया राबविण्यात आल्यामुळे बाजार समितीला तबल १ कोटी ४९ लाख ७७ हजार रुपयांचे डिपॉझिट मिळाले आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images