Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

नाशिकची तरुणी हॉलिवूडमध्ये

0
0
हॉलिवूड सिटी अर्थात लॉस एंजेलिस म्हणजे आंतरराष्ट्रीय सिनेमासृष्टीचे माहेरघर. सिनेमासृष्टीत काम करणारी मंडळी एकदा तरी या इंडस्ट्रीला भेट देण्याचा प्रयत्न करतात. मात्र, थेट करिअर करण्याची हिम्मत घेऊन दाखल झालेल्या अर्चना शिंदे या नाशिककर तरुणीने आपल्या कामगिरीच्या जोरावर हॉलिवूडमध्ये झेंडा रोवला आहे.

'आडगांवकर' देणार सोनेखरेदीवर साडी

0
0
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आडगांवकर सराफ प्रा. लि. यांनी अनोखी योजना जाहीर केली आहे. याअंतर्गत ८ मार्च रोजी आडगांवकर सराफ दालनातून दहा ग्रॅम सोने खरेदी करणाऱ्या महिलेला एक साडी मोफत देण्यात येणार आहे, अशी माहिती संचालक महेश आडगावकर यांनी दिली.

सोनी गिफ्टस्च्या महासूट योजनेला प्रतिसाद

0
0
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सोनी गिफ्टस् वतीने आयोजित करण्यात आलेल्या महासूट योजनेला महिलांचा जोरदार प्रतिसाद लाभत असल्याचे पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

'मटा'तर्फे आज महिला दिनानिमित्त मोफत सेमिनार

0
0
'उत्तम बीजापोटी फळे रसाळ गोमटी' ही उक्ती सर्वांनाच लागू होते. त्यामुळे भावी पीढी घडविण्यासाठी ती जन्माला येण्याआधीपासूनच त्या अनुषंगाने तयारी करणे गरजेचे आहे.

सारथीचा गाडीशोध!

0
0
असं म्हणतात की राजकारणात कुणी दिर्घकाळ मित्र वा शत्रू नसतो. गेल्या काही दिवसांपूर्वी वाघांच्या कळपात असलेले 'सैनिक' घड्याळवाल्या 'साहेबां'चे कार्यकर्ते झाले.

महिंद्रातील आंदोलन मागे,कंपनी सुरु

0
0
वेतन कराराच्या प्रश्नावरुन सुरु झालेले महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीतील आंदोलन कामगार उपायुक्तांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आले आहे.

पेटंटच्या क्षेत्रात मुबलक संधी

0
0
'पाश्चात्य देशांच्या तुलनेत आपल्याकडे अद्याप संशोधनाला पुरेसे पोषक वातावरण नाही. तरीही गेल्या दशकभरात संशोधनाच्या क्षेत्राकडे तरूणांचा कल वाढीला लागला आहे.

'क्लस्टर कॉलेज'चा फायदा होणार

0
0
'गुणवत्ता सुधार योजनेसाठी पुणे विद्यापीठमार्फत सुरू करण्यात आलेली क्लस्टर कॉलेजची संकल्पना उपक्रमांची गुणवत्ता सुधाण्यास उपयुक्त ठरेल', अशी माहिती पुणे विद्यापीठाचे बीसीयुडी संचालक डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी व्यक्त केले. क्लस्टर कॉलेज संकल्पनेच्या अंमलबजावणीबाबत 'मटा'शी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

ट्रेनींना विजयाबाईंच्या टीप्स

0
0
नाटक म्हणजे नुसती घटना नाही तर त्याला सर्वस्पर्शी समजले पाहिजे. त्याला स्पर्श असतो, वास असतो, रंग असतो, आवाज असतो हे अनेक कंगोरे मिळून नाटक तयार होते. असे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांनी केले.

उद्योजकांची लेखी माफी मागा

0
0
मार्च एण्डच्या पार्श्वभूमीवर अनेक उद्योजकांवर चुकीची कारवाई केल्याप्रकरणी उद्योजकांची लेखी माफी मागावी, असे आदेश अतिरीक्त विक्रीकर आयुक्त एस. एस. आर. आबिदी यांनी करणारे सहाय्यक विक्रीकर आयुक्त (वसुली) अनिल सोनवणे यांना दिले.

आधीच दुष्काळ, त्यात बाष्पीभवन!

0
0
वरुणराजाने यंदा अवकृपा केली असताना दुसरीकडे सूर्यदेवतेचाही पारा चढायला सुरुवात झाली आहे. त्याचा थेट परिणाम नाशिककरांच्या पिण्याच्या पाण्यावर अर्थात गंगापूर धरणावर होत आहे. डिसेंबरअखेरपर्यंत ३२ दशलक्ष घनफूट (दलघफू) इतके बाष्पीभवन झाले होते.

ड्रायव्हिंगमध्ये महिला राज

0
0
पुरुषप्रधान संस्कृती असलेल्या भारतात महिला वाहन चालवताना दिसल्या की सर्वांच्याच भुवया ताणल्या जायच्या. मात्र गेल्या काही वर्षांत महिलांनी वाहन चालवण्यात घेतलेली आघाडी पाहता वाहन चालवणे म्हणजे केवळ पुरुषांचे काम हा समज खोडून निघाला आहे.

'महिंद्रा'तील आंदोलन मागे

0
0
वेतन कराराच्या प्रश्नावरुन सुरु झालेले महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीतील आंदोलन कामगार उपायुक्तांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आले आहे.

डॉक्टरी अहवालानंतर पवारला पुन्हा अटक

0
0
खंडणी मागितल्याच्या कारणावरून न्यायालयीन कोठडीत असलेल्या मात्र सध्या उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या नाशिकरोड प्रभाग समिती​चे सभापती पवन पवार यास डॉक्टरी अहवालानंतर पुन्हा पोलिस कोठडीत घेण्याच्या हालचाली पोलिसांनी सुरू केल्या आहेत. गुरुवारी दाखल झालेल्या गुन्ह्यात ही अटक करण्यात येणार आहे.

कब्रस्तानात फुलले आयुष्य

0
0
कधी सण माहीत नाही की वार. वर्षभर फक्त कामच सुरू असायचं. त्यांचं सारं आयुष्य कब्रस्तानातच चाललंय, परंतु त्याचं दु:ख न मानता आलेलं काम निस्पृह भावनेनं करणं एवढंच त्यांचं काम झालं आहे. 'देवाने पुण्याचं काम करण्याची संधी दिली आहे, ते करीत राहणं हेच आयुष्याचं ध्येय झालं' असं म्हणत शहरातील ख्रिस्ती कब्रस्तानमध्ये अलका म्हस्के या कॉफिन बॉक्स बनवण्याचं काम करताहेत. कॉफिन बनविणाऱ्या त्या महाराष्ट्रातील एकमेव महिला कारागिर आहेत.

एक शिवराळ प्रकाशन

0
0
कार्यक्रमासाठी चांगला प्रमुख पाहुणा मिळणं हे आता जवळजवळ दुरापास्त होत चाललं आहे. त्यामुळे मिळेल तो पाहुणा 'पदरी पडला अन् पवित्र झाला' म्हणून सहन करावा लागतो. त्यात एखादा मोठा कार्यक्रम असावा व त्यासाठी मुख्य वक्ता फाटक्या तोंडाचा मिळावा. अशावेळी आयोजकाचे काय हाल होतील ते शब्दात सांगवेना.

मलाईदार रबडी कुल्फी

0
0
शहरानं जसजशी कात टाकली तसतशी इथली खाद्यसंस्कृतीही बहुढंगी बनत गेली. उन्हाळ्यातली संध्याकाळही याला अपवाद कशी ठरेल. शहरात मोठ्या ब्रॅण्ड्सचे आईस्क्रीम्स पार्लर आले, असले तरीही बालपणापासून प्रत्येकाच्या मनात रूजलेल्या रबडी कुल्फीची चव कायम आहे. नवनव्या टेस्टी अन् कलरफुल केमिकल फ्लेवरला दूर ठेवत रबडी कुल्फीने आपले वेगळेपण अन् चव जपली आहे.

महिलांच्या सक्षमीकरणातूनच क्रांती

0
0
महिलांचे सक्षमीकरण होणे, ही प्रत्येक समाजाच्या प्रगतीचे लक्षण आहे. त्यात ग्रामीण भागातील महिलांना योग्य दर्जा मिळून त्यांना संधी दिल्यास समाजाचा सर्वांगीण विकास होतो, असे प्रतिपादन जिल्हा प​रिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत कुमार यांनी व्यक्त केले.

बनवा चमचमीत, खा चवदार!

0
0
चमचमीत आणि चवदार खायला तर सर्वांनाच आवडते, पण हे बनविण्याची हौस असते ती महिलांनाच. घरच्या घरी काहीतरी स्पेशल बनवता यावे, म्हणून महिला नेहमीच प्रयत्न करीत असतात. म्हणूनच 'महाराष्ट्र टाइम्स'मार्फत अशा हौशी महिलांसाठी 'चमचमीत अन् चवदार' या कुकरी वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे.

परीक्षा केंद्रावर मोबाइल चोरी

0
0
दहावी प‌रीक्षेदरम्यान गांगापूररोडवरील नवरचना हायस्कूलमधून ३६ हजार रुपये किमतीचे तीन मोबाइल चोरीला गेल्याची घटना बुधवारी घडली. या गुन्ह्याची गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये नोंद झाली असली तरी घटनेची जबाबदारी विद्यार्थ्यांचीच असल्याची भूमिका बोर्डाने घेतली आहे. कोणत्याही मौल्यवान परीक्षा केंद्रावर न आणण्याची सूचनाही बोर्डामार्फत पुन्हा एकदा करण्यात आली.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images