Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पाटपाण्याच्या प्रश्नावर राजकारण नको

$
0
0
येवला तालुक्याच्या पाटपाण्याच्या प्रश्नावर राजकारण न करता कामाची वस्तुस्थिती जनतेपुढे मांडली पाहिजे, असे आवाहन येवला तालुका जलहक्क संघर्ष समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीतून करण्यात आले आहे.

‘ट्रॅक्टर जप्ती थांबवा’

$
0
0
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सुरू केलेली ट्रॅक्टर जप्ती त्वरित थांबविण्यात यावी, कांद्याचे निर्यातमूल्य शुन्य डॉलर झाले पाहिजे, आदी मागण्यांचे निवेदन नाशिक जिल्हा स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

सटाण्यातील गाळ्यांचा फेरलिलाव करा

$
0
0
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या आदेशाचे अवमूल्यन करून सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी १ लाख रुपये डिपॉझिट व नाममात्र भाड्याने वितरीत केलेल्या सटाणा येथील गाळ्यांचा करार रद्द करून सक्षम अधिकाऱ्याच्या उपस्थित नव्याने व्यापारी गाळ्यांचा लिलाव करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. विलास बच्छाव यांनी पणन मंत्र्याकडे केली आहे. या मागणीमुळे संबंधित गाळेधारकांचे धाबे दणाणले आहेत.

पाण्याचा वापर काटकसरीने करा

$
0
0
पाणी गुणवत्ता टिकवायची असेल तर सर्वप्रथम गावातील पाणी स्त्रोत सुरक्षित करायला हवे. पिण्याच्या पाण्याची गळती थांबवावी, पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरवावा आणि पाण्याचा काटकसरीने वापर करावा. शुद्ध पाणी हा जनतेचा अधिकार आहे, त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली आहे हे ओळखूनच आपले कर्तव्य बजवावे, असे आवाहन कळवण गटविकास अधिकारी एम. ए. शिरसाठ यांनी केले.

एक दिवसात होणार योजना प्रकरण पूर्ण

$
0
0
संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभापासून कुणीही गरजू वंचित राहू नये, यासाठी येवला उपविभागातील प्रत्येक मंडळ ग्रामस्तरावर एका दिवसात योजना प्रकरण पूर्ण करणारी शिबिरे घेण्यात येणार असल्याचे प्रतिपादन प्रांताधिकारी वासंती माळी यांनी केले.

‘डोलारखेडा’मधील वाघांचे अस्तित्व धोक्यात

$
0
0
जळगाव जिल्ह्यातील वढोदा रेंजमधील डोलारखेडामधील (कंपार्टमेंट क्रमांक ५१८) वाघांचे अस्तित्व धोक्यात आले असून, याच भागात दोनशे एकरवर अतिक्रमण झाले आहे. तेथील झाडांना आगी लावून त्यांचा सफाया करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे वनविभाग त्याची दखल घ्यायला तयार नसल्याचे सातपुडा बचाव समितीचे निमंत्रक राजेंद्र नन्नवरे, अभय उजागरे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

माती परीक्षणाचे मार्गदर्शन

$
0
0
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या कर्मयोगी दुलाजीनाना पाटील कृषी महाविद्यालय, मविप्र नाशिक आयोजित ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषीदुतांकडून माती परीक्षणासाठी लागणाऱ्या प्रातिनिधीक नमूना कशा प्रकारे घ्यावा, याबाबत निफाड तालुक्यातील नांदुर्डीच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

येवला तालुक्यात हरिण धोक्यात

$
0
0
येवला तालुक्यात चिचोंडी व पश्चिम भागात हरिणांचा बळी जाण्याचे सत्र अजूनही सुरूच आहे. पाणी व अन्नाच्या शोधार्थ फिरणाऱ्या हरणे कुत्र्यांची शिकार होत आहेत. उन्हाळ्यात सुमारे २५-३० हरणांचा या ना त्या कारणाने बळी गेला आहे. याबाबत वन विभागाने कोणतीही ठोस योजना केली नसल्याने वन्यप्रेमी नाराजी व्यक्त करीत आहेत.

घोटी ग्रामपालिकेसाठी ६३ टक्के मतदान

$
0
0
इगतपुरी तालुक्यातील अतिशय महत्त्वपूर्ण घोटी ग्रामपालिकेसाठी रविवारी मतदान झाले. ग्रामपालिकेच्या एकूण १७ जागांसाठी ६३ टक्के मतदान झाले असून सर्वाधिक मतदान वॉर्ड क्रमांक १ व ६ मध्ये तर सर्वात कमी मतदान वॉर्ड क्रमांक ३ मध्ये झाले. आज (दि. २३) मतमोजणी होणार असून धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे.

विश्वलता महाविद्यालयात मुलीच ठरल्या अव्वल

$
0
0
येथील श्री साईराज शिक्षण प्रतिष्ठाण संचलित विश्वलता कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या द्वितीय व तृतीय वर्षाच्या विविध शाखांचे निकाल जाहीर झाले असून महाविद्यालयाने पुन्हा एकदा आपला गुणवत्ता दर्जा सिध्द केला आहे. यंदाच्या निकालातही मुलींनींच बाजी मारली आहे.

जॉईंट फार्मिंग सोसायटीचे संचालक मंडळ बरखास्त करा

$
0
0
पिंपळगाव बसवंत येथील जॉईंट फार्मिंग सोसायटीच्या जमिनीचा तिढा काही सुटत नाही. यामुळे सभासद शेतकऱ्यांच्या मागणीनुसार व विशेष सर्वसाधारण सभेत झालेल्या ठरावानुसार जमीन वाटप करण्यास अपयशी ठरलेल्या पिंपळगाव बसवंत येथील जॉईंट फार्मिंग सोसायटीचे संचालक मंडळ तातडीने बरखास्त करून जमीन वाटपातील अडसर दूर करावा, अशी मागणी जमीन बचाव संघर्ष समितीने केली आहे.

अवजड वाहनांच्या स्पर्धेत ‘ज‌िवाचा खेळ’

$
0
0
मुंबई-आग्रा महामार्गावर अवजड वाहनांच्या चढाओढीचा त्रास इतर वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. यासाठी महामार्ग पोलिसांनी अवजड वाहनांनावर कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे. अवजड वहाने व ट्रेलर यांच्या अनेकदा ओव्हरटेक करण्याची स्पर्धाच लागत असल्याने महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. याबाबत प्रवाशी तसेच विविध संघटनांकडून अनेकदा तक्रारी करूनही वाहतूक पोलिस याकडे गांर्भीयाने पाहत नसल्याची तक्रार आहे.

प्रेसच्या अत्याधुनिकीकरणासाठी खासदारांची दिल्लीत चर्चा

$
0
0
इंडिया सिक्युरिटी प्रेस व करन्सी नोट प्रेसचे अत्याधुनिकरण करावे यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी सिक्युरिटी प्रेसचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर एम. एस. राणा यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली.

शहरातील रस्त्यांची कामे संथ गतीने

$
0
0
शहरात महापालिकेने सुरू केलेली रस्त्यांची कामे ठेकेदाराकडूनच संथ गतीने सुरू आहेत. यामुळे मुख्य रस्त्याची कामे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या ब्ल्यू प्रिंटमध्ये नाहीत का? असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामात ठेकेदार देखील वेळकाढूपणा करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.

खासगीकरणासाठी प्रशासनच जबाबदार

$
0
0
चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके यांचे मोठ्या उत्साहात स्मारक उभारणाऱ्या महापालिकेला त्याचे जतन करणे अवघड जात आहे. त्यामुळे हतबल झालेल्या महापालिकेने फाळके स्मारकाचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला. मात्र, फाळके स्मारक ठेकेदारी पद्धतीने चालवण्यास घेण्यास ठेकेदारच इच्छुक नाही. निव‌िदा प्रक्रिया सुरू झाल्यापासून अद्यापपर्यंत एकाही ठेकेदाराने स्मारकात 'रस' घेतलेला नाही. प्रशासनाची मुदतवाढीची मात्रही चालत नसल्याने नाशिकच्या ‘भूषणा’चे काय होणार असा प्रश्न नागरिकांना पडतो आहे.

फाळके स्मारक तळमळले

$
0
0
पांडवलेणी येथील दादासाहेब फाळके स्मारकातील बालगोपाळांसाठी लावण्यात आलेल्या खेळण्यांची दयनीय अवस्था झाली आहे. फाळके स्मारक चालविण्यास खाजगी ठेकेदाराकडे दयायचे की, महापाल‌िकेकडेच ठेवायचे याबाबत निर्णय होत नसल्याने खेळण्यांची दुरुस्ती आणि देखभाल होत नाही. स्मारकातील अनेक प्रदर्शन हॉल मोकळेच पडून आहेत. यामुळे नाशिकची ओळख सांगणारे स्मारकाची दयनीय अवस्थेत पडून आहे.

९,४२० जणांनी दिली तलाठी परीक्षा

$
0
0
जिल्ह्यातील तलाठी पदांच्या पदासाठी जिल्हा प्रशासनातर्फे घेण्यात आलेली लेखी परीक्षा शांततेत पार पडली. स्टाफ सिलेक्शनचीही परीक्षाही रविवारी झाली. या दोन्ही परीक्षेला एकूण १० हजार ७१२ परीक्षार्थींनी हजेरी लावली.

बांधकामे अपूर्ण तरीही पूर्णत्वाचा दाखला

$
0
0
पिंपळगाव बसवंत येथे बेकायदेशीर पद्धतीने बांधकाम केले जात असताना स्थानिक ग्रामपंचायतीच्या मुखंडांनी चक्क अर्धवट बांधकामांनाही बांधकाम पूर्णत्वाचा दाखला प्रदान केल्याची बाब उघडकीस येत आहे. मंडल अधिकाऱ्यांनी केलेल्या पंचनाम्यातून ही बाब समोर आली असून, यामुळे ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

स्थायी निवडणुकीनंतरच बजेटला मुहूर्त

$
0
0
स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक जाहीर झाली असून, निवडीची प्रक्रिया ३० जून रोजी होणार आहे. स्थायी समितीच्या निवडणुकीनंतरच बजेट सादर होण्याची शक्यता आहे. आणखी किती काळ वाट पाहायची, असा सवाल नगरसेवकांकडूनच उपस्थित केला जातो आहे.

शहरात विनयभंगाच्या दोन घटना

$
0
0
शहरात आडगाव आणि नाशिकरोड पोलिस स्टेशनच्या हद्दीत विनयभंगाच्या दोन घटना घडल्या. यामध्ये दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, आडगावच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. सुनील सुरेश साळुंखे (२६, रा. रामनगर, मूळ रा. कळवण) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images