Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धा उद्यापासून

$
0
0
महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन संघटना व नाशिक जिल्हा बॅडमिंटन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धा २५ जूनपासून सुरू होत आहेत. या स्पर्धा आडगाव नाका येथील मीनाताई ठाकरे स्टेडियमवर (विभागीय क्रीडा संकुल) होतील.

आजपासून भागवत सप्ताह

$
0
0
जन्मजात अपंग असलेल्या व पोलिओग्रस्त व्यक्तींच्या मदतीसाठी श्रीमद भागवत सेवा परिवार जोधपूर व नाशिकरोड येथील महेश सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘श्रीमद भागवत सप्ताह ज्ञान यज्ञ महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले आहे. मोहनाबाई नंदलालजी राठी माहेश्वरी भवन आर्टीलरी सेंटररोड येथे हा महोत्सव आयोजीत केला असून, २४ जून ते ३० जून या कालावधीत तो संपन्न होणार आहे.

क्रीडाभूमी म्हणून नाशिकची ओळख

$
0
0
‘नाशिक शहराने मंत्रभूमी, यंत्रभूमी बरोबरच क्रीडा क्षेत्रात आपले नाव उंचावले असून, क्रीडाभूमी म्हणून नाशिकची ओळख निर्माण झाली आहे.’ असे प्रतिपादन महापौर यतीन वाघ यांनी केले. जागतिक ऑलिम्पिक दिनाचे औचित्य साधून मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्यावतीने मॅरेथॉन धावपटू शिल्प अनावरण व ऑलिम्पिक डे रनचे सोमवारी सकाळी आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

अन् टवाळखोरांना घडली अद्दल !

$
0
0
तरुणी, महिलांनी थोडा सावधपणा दाखवित धाडस केले व पोलिसांना योग्य माहिती दिल्यास टवाळखोरांना अद्दल घडविता येऊ शकते, याचा सुखद अनुभव नुकताच आला. रविवारी सायंकाळी नाशिकरोडपासून द्वारका चौकापर्यंत भररस्त्यात तरुणींची छेडछाड करीत चाललेल्या मोटरसायकलस्वार टवाळखोरांना भद्रकाली पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासात ताब्यात घेऊन धडा शिकविला. संबंधित तरुणींनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे ही कारवाई करणे पोलिसांना शक्य झाले. नागरिकांनी, संबंधीत व्यक्तींनी अशाप्रसंगी सतर्कता दाखविल्यास तात्काळ मदत उपलब्ध करून देण्याची ग्वाही पोलिसांकडून दिली जात आहे.

ये रे घना, दे रे घना...

$
0
0
मान्सूनपूर्व सरी वगळता नाशिक जिल्ह्यात अद्यापपर्यंत मान्सूनने अस्तित्व दाखविले नसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. जून संपत आला तरी पाऊस पडत नसल्याने जिल्ह्यात दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पेरण्या खोळंबल्या आहेत. बळीराजाचा नजरा आभाळाकडे लागल्या असून, `ये रे घना, दे रे घना` अशी आर्त साद तो घालत आहे.

येवल्यात पक्षांतराचे वारे

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार मारोतराव पवार यांचे पुतणे व पंचायत समिती सदस्य संभाजी पवार यांनी ‘मातोश्री’वर जावून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचे वृत्त तालुक्यात आल्यानंतर येवल्यातील राजकीय घडामोडी गतीमान झाल्या आहेत.

ग्रामीणभागात अवैध वाहतूकीत वाढ

$
0
0
शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर अनेकदा चर्चा होते. मात्र, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी भागात आजही अवैध प्रवासी वाहतूक व्यवस्थेवरच ग्रामीण भागातील नागरिकांना विसंबून रहावे लागत आहे. या दुर्लक्षित घटकाकडे कोण लक्ष देणार? हा प्रश्न असून, अवैध वाहतुकीमुळे होणारे अपघात हाही मोठा प्रश्न आहे.

डीपी रस्त्याचे काम रखडले

$
0
0
महापाल‌िकेने आसाराम बापू आश्रमापासून ते नवश्या गणपती मंदिरापर्यंतच्या २४ मीटर डीपी रस्त्याचे काम मागील वर्षी हाती घेतले होते. मात्र, आसाराम बापू आश्रमातील रस्ता झाल्यानंतर पुढील रस्त्याचे काम अजूनही पूर्ण होऊ शकलेले नाही. महापालिकेने हे काम अर्धवट ठेवल्याने गंगापूररोडला पर्याय समजला जाणारा हा रस्ता अजूनही प्रतीक्षेत आहे.

मतदार नोंदणीला अल्प प्रतिसाद

$
0
0
मतदार नोंदणीसाठी गेल्या दोन दिवसांत विशेष मोहीम राबविण्यात आली असली तरी शहरात काही प्रमाणात तर ग्रामीण भागात अल्पसाच प्रतिसाद यात लाभला आहे. तरीही येत्या शनिवारी आणि रविवारी (२८ व २९ जून) मतदार नोंदणीची मोहीम घेतली जाणार आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीला निफाडमध्ये गालबोट

$
0
0
निफाड तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींचा निवडणूक निकाल जाहीर झाला असून, मतमोजणीदरम्यान पाचोरे बुद्रुक येथील दोन प्रतिस्पर्धी पॅनलच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याने तालुक्यातील निवडणुकांना गालबोट लागले आहे.

सोनेवाडी ग्रामस्थांचे दुसऱ्या दिवशीही उपोषण

$
0
0
सिन्नर तालुक्यातील भोजापूर धरणातील पाणी वाचविण्यासाठी सोनेवाडी ग्रामस्थांनी सोमवारपासून भोजापूर धरणात उपोषणास प्रारंभ केला आहे. परिसरातील नांदूरशिंगोटे, दोडी, कणकोरी, मानोरी आदि गावांतील ग्रामस्थांनी या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी सकाळपासून शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला आहे.

एका दिवसात दीड हजार दाखले

$
0
0
शैक्षणिक वर्ष सुरू होताच ऐरवी विद्यार्थी अन पालक यांना कॉलेज प्रवेशासाठी विविध दाखले मिळविण्यासाठी करावी लागणारी दरवर्षीची धावपळ, दगदग बघता त्यांचा वेळ जाऊ नये यासाठी येवला उपविभागाच्या नूतन प्रांताधिकारी वासंती माळी यांनी हाती घेतलेल्या `एकाच दिवसात दाखला` या अभिनव शासकीय उपक्रमाला आज तालुक्यातील विद्यार्थी अन पालकांचा मोठा प्रतिसाद लाभला.

५ हजारांची लाच घेताना महिला PSI ला अटक

$
0
0
येवला शहर पोलिस ठाण्यातील महिला पोलिस उपनिरीक्षकास ५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हाथ पकडले. महिला अधिकाऱ्यास पकडण्याची ही शहरातील पहिलीच घटना आहे. मंगला जोगन असे या महिला पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

शंकराचार्य स्वरूपानंदांवर शिर्डीत गुन्हा

$
0
0
शिर्डीच्या साईबाबांची पूजा-अर्चा करणे हे थोतांड असून, ते देव नाहीत. त्यांचे देऊळ बांधणे गैर आहे, असे वादग्रस्त विधान करून संपूर्ण देशभर भाविकांमध्ये खळबळ माजविणारे द्वारकापिठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद यांचा मंगळवारी शिर्डीत ‌निषेध करण्यात आला.

संभागी स्टेड‌ियम परिसरात दुर्गंधीचा त्रास

$
0
0
सिडकोतील राजे संभाजी स्टेडियमच्या प्रवेशद्वाराजवळील चेंबरमधून सांडपाण्याची गळती सुरु असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. गळती त्वरित थांबविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

रस्त्यावरील विक्रेत्यांमुळे सिडकोत वाहतूक कोंडी

$
0
0
जुन्या सिडकोतील शिवाजी भाजी मार्केटमध्ये भाजी आणि फळ विक्रेत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. हे विक्रेते आता रस्त्यालगतच बसत आहेत. शिवाय, ग्राहकही बेशिस्तपणे वाहन पार्किंग करत असल्याने दररोज वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत आहे.

आयटी डेस्टिनेशन, पण केव्हा ?

$
0
0
नाशिक हे शहर मुंबई-पुणे-नाशिक या सुवर्णत्रिकोणाचा एक महत्त्वाचा भाग आहे; परंतु शासनाच्या दूरदृष्टीचा अभाव म्हणा अथवा प्रशासनाच्या अपरिपक्वतेचे लक्षण म्हणा, नाशिकला आयटी विकासाच्या बाबतीत पुण्या-मुंबईच्या जवळपासही जाता आले नाही.

येवल्यात राष्ट्रवादीला खिंडार

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच माजी आमदार मारोतराव पवार यांचे पुतणे व विद्यमान पंचायत समिती सदस्य संभाजी पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सहकाऱ्यांसह मंगळवारी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. पवार आणि समर्थकांच्या शिवसेना प्रवेशाने तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडले आहे.

मराठी माणसाने उद्योजकतेकडे वळावे

$
0
0
उद्योजकतेव‌िषयी मराठी माणसाच्या मनात सुरुवातीपासूनच नकारात्मक दृष्टीकोन आहे. बदलत्या काळाच्या टप्प्यावर हा दृष्टीकोन मराठी तरुणांनी बदलायला हवा. मोठ्या पॅकेजेसच्या नोकऱ्यांमागे धावण्याऐवजी त्यांनी त्या नोकऱ्या न‌िर्माण करणारे उद्योग उभारायला हवेत.

एलबीटी विवरणपत्र सादर करण्यात टाळाटाळ

$
0
0
एलबीटी अर्थात लोकल बॉडी टॅक्स रद्द होऊन व्हॅट आकारणीचा निर्णय राज्य सरकार घेऊ शकते, अशा अपेक्षेवर असलेल्या व्यवसायिकांकडून विवरणपत्र सादर करण्यास थंडा प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत २९ हजार ५७८ व्यवसायिकांपैकी अवघ्या ३०० जणांनी विवरणपत्र सादर केले आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images